Vidhwa Pension Yojana 2024| विधवा पेन्शन योजना २०२४ महाराष्ट्र

Vidhwa Pension Yojana 2024

Vidhwa Pension Yojana 2024 | विधवा पेन्शन योजना २०२४ महाराष्ट्र ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रवर्गातील गरीब विधवा महिलांसाठी सुरु करण्यात आलेली असून. ही योजना महाराष्ट्र शासनाने २०२२ पासून सुरु केली आहे. महाराष्ट्र शासन स्रियांसाठी कायम चांगल्या कल्याणकारी योजना सुरु करत असतात. तसेच विधवा पेन्शन योजना ही एक पण योजना सुरु केली आहे. गरीब परिवारातील विधवा स्रियांनी सन्मानाने जीवन जगावे या साठी विधवा पेन्शन योजना सुरु केली आहे.

विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र शासनाने राज्यातील गरीब परिवारातील विधवा स्रियांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेंर्गत महाराष्ट्र राज्यातील गरीब परिवारातील विधवा महिलांना दर महिन्याला ६०० रुपये येवढी आर्थिक मदत केली जात आहे. विधवा पेन्शन योजनेमुळे या महिलांना आर्थिक लाभ भेटणार आहे.

या योजनेमुळे परिवारातील गरीब परिवारातील विधवा स्रियांना आर्थिक मदत करून व त्यांना स्वावलंबी बनण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. विधवा महिलांना त्यांचे आयुष्य सुखाने जगता येईल. ज्या महिलांच्या पतीचे निधन अपघाती किंवा अचानक झाले त्या महिलांना आर्थिक आधाराची खूप गरज असते. अश्या वेळी पैसेंची त्यांना गरज असते मग त्या दुसऱ्यांकडून कर्ज किंवा उसने पैसे घेऊन त्या आपल जीवन जगत असतात. पण त्यांच्या वर अशी वेळ येऊ नाही त्यासाठी महाराष्ट्र शासनाने या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. यो योजनेंर्गत भेटणाऱ्या मासिक आर्थिक मदती साठी विधवा महिलेचे कमीत कमी वय हे ६५ वर्ष असले पाहिजे. अशी मर्यादा ठेवण्यात आली आहे.

आयुष्याचा साथीदार गेल्या नंतर महिलेचे पूर्ण आयुष्य हे बरबाद होऊन जाते. नातेवाईक व मित्र मैत्रणी हि फक्त नावापुरतीच असतात. ज्या वेळी गरज पडते तेव्हा मदती साठी खूप कमी जण येतात. व त्यामध्ये हि कधी जेव्हा केव्हा आर्थिक मदत पाहिजे. अशा वेळी तर आणखी मदत करणारे खूप कमी होऊन जाता. अश्या वेळेला मग त्या विधवा महिलेला जर एखाद्या ठिकाणी काम भेटायला वेळ लागत असेल तेव्हा किंवा काम भेटत नाही. तर अशा वेळेस विधवा महिलेचा उदर निर्वाह होणे खूपच अवघड असते. ह्या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने विधवा पेन्शन योजना सुरु केली आहे.

Vidhwa Pension Yojana 2024 विधवा पेन्शन योजना २०२४ महाराष्ट्र

विधवा पेन्शन योजनेमुळे विधवा महिलेला दर महिन्याला ६०० रुपये भेटणार व तिला जर एका पेक्षा जास्त मुल असतील तर त्या महिलेला महिन्याला ९०० रुपये इतकी आर्थिक मदत भेटणार.तिचा मुलगा वयाच्या २५ वर्षाचा होईपर्यंत तिला हे ९०० रुपये मिळणार. जर विधवा महिलेला मुलगी असेल तर मुलीच्या लग्नानंतर पण त्या महिलेचे वय ६५ वर्ष होई पर्यंत तिला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

प्राथमिक दृष्टीने बगितले तर हि जि मिळणारी रक्कम कमी वाटू शकते पण महिन्याला भेटणाऱ्या या आर्थिक मदतीमुळे काही अंशी का होईना विधवा महिलेचा मुलभूत गोष्टी वर होत असलेल्या खर्चाची मदत तिला होणार असून, त्यामुळे विधवा महिलेचे थोडे का होईना मानसिक त्रास कमी होईल.

महाराष्ट्र शासनाच्या या योजनेमुळे विधवा महिलांना समजा मध्ये मानसन्मानाने जीवन जगण्यास मदत होईल व त्यांना स्वावलंबी असल्याची भावना निर्माण होऊन. आत्मविश्वासने राहिलेले आयुष्य जगण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळेल.या योजनेमुळे विधवा महिलांच्या मना मध्ये असलेली नकारात्मक भावना संपून त्या त्यांच्या पायावर उभे राहू शकतील. आणि त्यांना परिणामी नकारात्मक भावना येऊन होणार्या आत्महत्या सारखे अपराध टाळण्यास पण मदत होणार आहे.

विधवा महिलांना अशे वाटत असते कि आपण विधवा झालो म्हणून आता या समाजाचा भाग नाही किंवा समाज आपला स्वीकार करणार नाही. हया अश्या काही विचारांना काही अंशी का होईना विधवा पेन्शन योजनेमुळे रोख लागेल. या योजनेंर्गत मिळणाऱ्या आर्थिक मद्तीमुळे विधवा महिलांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आता काही प्रमाणात नक्कीच सुटणार आहे.

Vidhwa Pension Yojana 2024 | पात्रता व नियम

Vidhwa Pension Yojana 2024 | विधवा पेन्शन योजनेचे पात्रता व नियम

  • महाराष्ट्र राज्यातील फक्त नियमित रहिवासी असलेल्या विधवा महिला या योजनेचा अर्ज करू शकतात. बाहेरच्या राज्यातील महिलांना महाराष्ट्र राज्यामध्ये अर्ज करता येणार नाही.
  • गरीब परिवारातील विधवा महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्या महिलेचे परिवाराचे वार्षिक उत्पन्न २१००० रुपयां पेक्षा जास्त नसावे.
  • महाराष्ट्र राज्यामधील दारिद्रय रेषेखालील सर्व विधवा महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • जर अर्ज केलेल्या महिलेने दुसरे लग्न केले तर ती महिला या योजने साठी पात्र ठरत नाही.
  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व विधवा महिलेंचे बँक खाते असले पाहिजे. व बँक खाते आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.

Vidhwa Pension Yojana 2024 : फायदे

  • विधवा महिलेला आर्थिक मदत ही प्रत्येक महिन्याला भेटणार आहे.
  • विधवा पेन्शन या योजनेच्या द्वारे विधवा महिलांना आर्थिक आधार मिळणार आहे.
  • आर्थिक अडचणींचा सामोरे जाऊ नाही म्हणून विधवा महिलांना लागणारी मदत हि वेळच्या वेळी DBT च्या माध्यमातून थेट त्यांच्या बँक खात्या मध्ये जमा होईल.
  • विधवा पेन्शन योजनेंर्गत अर्जदार महिलांना ६०० रुपये प्रत्येक महिन्याला थेट बँक खात्यात जमा होणार. जर विधवा महिलेला १ किंवा २ मुल असतील तर ९०० रुपये महिन्याला मिळणार आहे.

Vidhwa Pension Yojana 2024 : उद्दिष्टे

  • विधवा महिलेला आर्थिक आधार देऊन तिला आत्मसन्मानने जगायला शिकवणे.
  • गरीब परिवारातील विधवा महिलेला स्वावलंबी बनविणे.
  • पतीचे निधन झाल्यानंतर तिला दुसऱ्यांवर अवलंबून राहणे टाळता यावे.
  • पतीच्या निधनानंतर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये.
  • मुलांचे शिक्षण करता यावे हे एक उद्दिष्टे आहे.

Vidhwa Pension Yojana 2024 : आवश्यक कागदपत्रे

  • विधवा महिलेच्या पतीचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र
  • विधवा महिलेचे आधार कार्ड
  • नोंदणीकृत मोबाईल नंबर
  • वयाचा दाखला/ प्रमाणपत्र
  • महिलेचा पासपोर्ट साईज फोटो
  • महिलेच्या बँक खात्याचे तपशील
  • महाराष्ट्र राज्याचे अधिकृत रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • कुठलीही महिला जर मागासलेल्या प्रवर्गातील असेल तर जात प्रमाणपत्र

Vidhwa Pension Yojana 2024 : योजनेचा अर्ज कुठे व कसा करावा

विधवा पेन्शन योजनेचा अर्ज आपले सरकार या पोर्टल वर भेटणार. पोर्टल वरून अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट घेऊन त्याच्यावर दिलेली माहिती व्यवस्थित भरून योग्य ते कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालय , तहसील व तलाठी कार्यालय या ठिकाणी जाऊन जमा करावा लागेल.त्यांनंतर अर्ज चेक केला जाईल जर संबंधित महिला योजनेसाठी पात्र असेल तर त्या विधवा महिलेला कळविण्यात येईल.

विधवा पेन्शन योजनेमुळे गरीब परिवारातील विधवा महिलांना या योजनेचा खूप फायदा होणार आहे. त्यांच्या पतीच्या निधनानंतर कोणीच त्यांची साथ देत नाहीत. आणि मग त्यांना आर्थिक मदतीची खूप गरज असते. अशा वेळी आर्थिक मदत पण कोणी करत नाही. मग त्यांना त्यामुळे मानसिक त्रास, मुलाबाळांची होणारी हेडसांड ह्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी विधवा पेन्शन योजनेचा लाभ होणार. विधवा पेन्शन योजनेमध्ये मिळणारी आर्थिक मदत ही भलेही खूप जास्त नसली तरी पण ” बुडत्याला काठीचा आधार ” या म्हणी प्रमाणे विधवा महिलेला महिन्याला होणार्या खर्चामध्ये थोडा तरी हातभार नक्कीच लागणार.

विधवा पेन्शन योजनेचे सतत विचारले जाणारे प्रश्न :

विधवा पेन्शन योजना काय आहे?

महाराष्ट्र सरकार कडून महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी सुरु करण्यात आलेली ही एक महत्त्वांकाक्षी योजना आहे.

विधवा पेन्शन योजनेसाठी कोण पात्र असेल?

महाराष्ट्र राज्यातील कायम रहिवासी असणाऱ्या विधवा महिला या योजनेसाठी पात्र असतील.

विधवा पेन्शन योजनेसाठी वयाची अट आहे का?

होय. विधवा पेन्शन योजनेसाठी विधवा महिलेचे वय कमीत कमी १८ ते जास्तीत जास्त ६५ वर्ष असले पाहिजे.

विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज कोण करू शकतात?

महाराष्ट्र राज्यातील दारिद्र रेषेखालील विधवा महिला ज्यांचे परिवाराचे वार्षिक उत्पन्न २१,००० रुपये पेक्षा कमी असलेल्या महिला.

विधवा पेन्शन योजनेंर्गत मिळणारी आर्थिक मदत कशी मिळेल?

विधवा पेन्शन योजनेमध्ये मिळणारी रक्कम अर्ज केलेल्या महिलेच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये DBT द्वारे मिळणार.

विधवा पेन्शन योजनेंर्गत मिळणारी आर्थिक मदत किती आहे?

विधवा पेन्शन योजनेंर्गत मिळणारी महिन्याला आर्थिक मदत ६०० रुपये इतकी आहे आणि जर त्या विधवा महिलेला १ पेक्षा जास्त मुल असतील तर ९०० रुपये इतकी महिन्याला आर्थिक मदत मिळेल.

विधवा पेन्शन योजनेसाठी लागणारे लागणारे कागदपत्रे कोणती?

या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी या लेखा मध्ये वरती दिलेली आहे.

विधवा पेन्शन योजना बाहेरील राज्यातील महिलांना लागू आहे का?

नाही. विधवा पेन्शन योजना ही फक्त महाराष्ट्र राज्यातील निवासी असलेल्या विधवा महिलांसाठी आहे.

विधवा पेन्शन योजना कोण राबवीत आहे?

हि योजना महराष्ट्र शासनाच्या निगराणीत महिला व बाल विकास मंत्रालय राबवणार आहे.

सर्व वाचकांना हि विनंती आहे आपल्या नातेवाइकामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये जर कुणी अशी गरजू विधवा महिला असेल तर कृपया त्या महिले पर्यंत ही माहिती नक्की कळवा. किंवा त्या महिलेला हा लेख वाचण्यास सांगा जेणेकरून त्या महिलेला या योजनेची संपूर्ण माहिती या लेखातून मिळेल व तत्या विधवा महिलेला या घेता येईल.

आणखी एक नम्र विनंती सर्व वाचकांना हि वेबसाईट केंद्र सरकार आणि राज्य सरकार ची नाही किंवा त्याच्याशी संबंधित देखील पण नाही. तरी आपण या योजनेशी संबंधित काही निर्णय घेत असाल तर वर दिलेली सर्व माहिती तुम्ही एकदा परत पडताळून बघा आणि मगच निर्णय घ्या. आम्ही फक्त या ठिकाणी या योजनेची माहिती मराठी वाचकांपर्यंत आपल्या मराठी भाषेमध्ये पोहचावी या साठी हा प्रयत्न केला आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी.

सुकन्या समृद्धी योजनेंची मराठी मध्ये माहिती जाणून घेण्यासाठी click करा

माझी कन्या भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येते click करा

भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी बद्दल जाणून घेण्यासाठी येते click करा

Follow Social Media Page