Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojana|in marathi |marathi Yojana : सुकन्या समृद्धी योजना हा एक परवडणारा पर्याय आहे तुमच्या मुलीच्या शिक्षणा साठी किंवा तिच्या भविषकाळात येणाऱ्या खर्च साठी योग्य रकम तुम्ही जमा करू शकतात या योजनेत किमान २५० रु आणि कमाल १.५ लाख रु जमा करता येतील तुम्ही १५ वर्ष गुंतवणुक करावी लागणार आणि तुम्हाला २१ वर्षानी परतावा मिळेल . सुकन्या समृध्दी योजना कोणत्याही बँक शाखेत किंवा पोस्ट ऑफिस शाखेत खाते तुम्ही उघडू शकता. तुम्ही तुमच्या नेट बँकिंग च्या सुविधेने ते ऑनलाईन देखील सेट करू शकता. तुम्हाला सुकन्या समृध्दी योजनाचे खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आहेत. SSY खाते उघडण्याचा फॉर्म.
सुकन्या समृध्दी योजना हि मासिक जमा करण्याची कुठलीही आवश्यकता नाही. सुकन्या समृध्दी योजना १००० प्रति महिना म्हणजे काय. प्रति वर्ष २५० रु. SSY साठी आवश्यक आहेत. जोपर्यंत एकूण रक्कम किमान २५० रु. वाढेल तोपर्यंत तुम्ही वर्षभर लहान हप्त्यांमध्ये गुंतवणुक करू शकता.
सुकन्या समृध्दी योजनेत तुम्ही दर महिन्याला १००० रु. गुंतवणुक केल्यास तुम्हाला वार्षिक १२००० रुपये लागतील. तुम्ही १५ वर्षात १.८०.०००. इतकी गुंतवणूक कराल. १५ ते २१ वर्षाच्या दरम्यान तुम्ही कोणतीही गुंतवणूक करणार नाही,७.६% टक्के दराने व्याज तुमच्या रक्कमेवर जोडला जाईल.
तुम्ही जितक्या लवकर यामध्ये गुंतवणुक कराल तितक्याच लवकर तुम्हाला तुमच्या मुलीसाठी मोठा फंड तयार करू शकता. तुम्ही तुमच्या मुलीचा जन्म होताच तिच्या नावावर हे खाते उघडले तर वयाच्या २१ व्या वर्षी तुम्ही तिच्या साठी २७ लाखांचा मोठा फंड तयार करू शकता. सुकन्या समृध्दी योजनेत १५ वर्ष गुंतवणूक करावी लागते. व ती २१ वर्षामध्ये मच्युअर होते.
Sukanya Samriddhi Yojana 2024 :- नियम
- सुकन्या समृद्धी योजनाचे खाते मुलीच्या नावाने असावे.
- खाते खोलण्यासाठी कमीत कमी २५० रु खात्यात जमा करणे.
- एका वर्ष मध्ये १.५ लाख रु जमा करू शकतात.
- खाताधारकाच्या शिक्षणासाठी खात्यातून पैसे काढता येतील.
- खातेधारकाची वय १८ वर्ष किवा १० वी झाल्यानंतर खात्यातून पैसे काढता येणार.
- मुलीच्या जन्मानंतर तुम्ही पोस्टात खाते ओपन करू शकतात .
- खातेधारक मुलीचे वय खाते ओपेन करण्यासाठी १० वर्षा पेक्षा जास्त नसावे

Sukanya Samriddhi Yojana 2024 :- कागदपत्र
- जन्म प्रमाणपत्र
- आधार कार्ड ( असल्यास )
- Pan कार्ड ( वडिलांचा किंवा आईचा )
- आधार कार्ड ( वडिलांचा किंवा आईचा )
- वास्तव्याचा पुरावा ( वडिलांचा किंवा आईचा )
Sukanya Samriddhi Yojana 2024 :- प्रश्न आणि उत्तर
किती वर्षा साठी पैसे भरावे लागणार ? :- १५ वर्षा पर्यंत तुम्ही पैसे भरू शकतात.
सुकन्या समृध्दी योजनाचे व्याजदर किती ? :- २०२४ या वर्षा अंतर्गत ७.६% व्याज दर दिला जात आहे .
खाते ओपन करण्या साठी लागणारा खर्च ? :- २५० रु भरून तुम्ही खाते चालू करू शकतात.
सुकन्या समृध्दी योजनाचे खाते कुठे ओपन करतात ? :- कोणत्याही बँक मध्ये किवा पोस्टऑफिस मध्ये ओपन करू शकतात .
एक घरातून किती मुलीचे खाते ओपन करता येतील ? :- २ मुलीचे खाते तुम्ही ओपन करू शकतात .
योजनेचा परतावा केव्हा मिळणार ? :- मुलीचे वय २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळतो .
पैश्या ची आवशकता असल्यास पैसे काढू शकतो का ? :- तुमच्या मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तिच्या शिक्षणा साठी खात्यातील ५०% रक्कम तुम्ही काढू शकतात .
सुकन्या समृध्दी योजना खाते उघडण्यासाठी वय किती असावे ? :- मुलीच्या जन्मानतर १० वर्ष होई पर्यंत केवाही उघडला जाऊ शकतो .सुकन्या समृद्धी योजना २०२४ या योजनेंतर्गत मुलीचे वय दहा वर्षापेक्षा जास्त असेल तर खाते उघडता येत नाही.
कोणत्या परिस्थितीत खाते बंद केले जाऊ शकते ? :- खातेधारकचा आकस्मित मृत्यू या योजनेंअतर्गत खातेधारकाचा आकस्मित मूर्त झाल्यास खातेधारकाचे कायदेशीर पालक खात्यातील रक्कम आणि व्याज काढू शकतात .सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावर ,लग्नाच्या खर्चासाठी मुलीकडून SSY खाते बंद केले जाऊ शकते .
सुकन्या समृद्धी योजनेत किती रु भरावे लागतात :- सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत सुरवातीला किमान १००० रु प्रति महिना भरावे लागत होते परंतु या नंतर सरकारने सामन्य नागरिकांना जमेल अशी रक्कम कमी करून ती प्रति महिना २५० रु किमान रक्कम केली आहे , या योजनेंतर्गत २५०/- रुपये ते १.५०.०००/- रुपये पर्यंत वार्षिक गुंतवणुक करता येणार. आहे या योजनेत खाते ओपेन केल्यानंतर १४ वर्ष साठी गुंतवणुक करणे आवश्यक आहे.
सुकन्या समृद्धी योजनेत रक्कम जमा कशी करावी :- सुकन्या समृद्धी योजना खात्यात रक्कम चेक ,कॅश, या पद्ध्तीने किंवा बँकेला जी पध्दत मान्य असेल , सुकन्या समृद्धी योजना खात्यामध्ये इलेक्ट्रोनिक ट्रान्सफर पद्ध्तीने पण रक्कम जमा करता येऊ शकते .पण त्या बँक किंवापोस्ट ऑफिस मध्ये कोर बँकिग सिस्टिम असायला पाहिजे . बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये कोर बँकिग सिस्टिम असेल तर तुम्ही पोस्ट पेमेंट बँक खात्यामधून
सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता. तुम्हाला यासाठी तुमचे सेविंग खाते IPPB खात्यासोबत जोडावे लागेल ,तुम्हाला त्यानंतर DOP प्रोडक्स मध्ये जाव लागेल व सुकन्या समृद्धी योजना खात्याला निवडाव लागेल .तुम्हाला SSY खाते नंबर आणि DOP कस्टमर आयडी प्रविष्ट करावी लागेल , तुम्हाला तुमच्या हप्त्याची रक्कम निवड करावी लागेल ,यानंतर प्रोसेस पूर्ण करावी लागणार , या पद्ध्तीने खात्यात रक्कम जमा होणार .
सुकन्या समृद्धी योजनेला सुलभ करण्यासाठी केंद्र शासनाने या योजनेमध्ये काही बदल केले आणि योजनेला सुधारित करण्यात आले आहे . केंद्र शासनाने या योजनेत पाच बदल केले आहेत त्यामुळे या योजनेत गुंतवणुक करणे व योजनेचे बचत खाते बंद करणे अधिक सुलभ करण्यात आले आहे , तसेच बचत खाते ऑपरेट करण्याच्या वयामध्ये पण बदल करण्यात आलेला आहे .
Sukanya Samriddhi Yojana 2024 :- परतवा उदाहरण
जमा रक्कम ( वर्ष ) | टक्केवारी ७.६ % | एकूण रक्कम |
रु. ५०,००० | रु.३,८०० | रु.५३,८०० |
रु. ५०,००० | रु.७,८८९ | रु.१,११,६८९ |
रु. ५०,००० | रु.१२,२८८ | रु.१,७३,९७७ |
रु. ५०,००० | रु.१७,०२२ | रु.२,४०,९९९ |
रु. ५०,००० | रु.२२,११६ | रु.३,१३,११५ |
रु. ५०,००० | रु.२७,५९७ | रु.३,९०,७१२ |
रु. ५०,००० | रु.३३.४९४ | रु.४,७४,२०६ |
रु. ५०,००० | रु.३९.८४० | रु.५,६४,०४६ |
रु. ५०,००० | रु.४६,६६७ | रु.६,६०,७१३ |
रु. ५०,००० | रु.५४.०१४ | रु.७,६४,७२८ |
रु. ५०,००० | रु.६१,९१९ | रु.८,७६,६४७ |
रु. ५०,००० | रु.७०,४३५ | रु.९,९७,०७२ |
रु. ५०,००० | रु.७९,५७७ | रु.११,२६,६५० |
Sukanya Samriddhi Yojana 2024 :- फायदे
- सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलीच्या उज्वल भविष्यासाठी मदत होते
- या योजनेमुळे मुलीचे सुरक्षित व स्वावलंबी होण्यास मदत होते .
- या योजनेचा फायदा म्हणजे या योजनेचा परतावा चा कालवधी २१ वर्षाचा असला तरी खातेधारकांना फक्त १४ वर्ष पैसे भरावे लागतात. आणि त्यानंत जमा असलेल्या रकमेवर उर्वरित कालावधीत व्याज जमा होत रहातो
- सुकन्या समृद्धी योजने अतर्गत जमा करण्यात येणारी रक्कम व त्यावर मिळणारे व्याज दर यावर आयकर नियमानुसार धारा ८०C च्या अंतर्गत सुठ भेटत आहे या साठी हि योजना मुलीच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरत आहे.
- सुकन्या समृद्धी योजना सरकारी असल्यामुळे खातेधारकांचे पैसे बुडण्याची शक्यता नाही सरकार कडून नागरिकाच्या पैशांची ची हमी घेतली जाते.
सुकन्या समृद्धी योजना अधिकृत बँका
- Post Bank
- State Bank of India
- Axis Bank
- Dena Bank
- Canara Bank
- Bank of Maharashtra
- Indian Bank
- IDBI Bank
- Bank of India
- Punjab national bank
- Central Bank of India
- Union Bank of India
Sukanya Samriddhi Yojana 2024 :- नियमावली
सुकन्या समृद्धी योजनेत २०२४ ज्या पालकांना खाते ओपन करायचे आहेत त्यांनी खालील प्रमाणे कागदपत्र सादर करणे आवयश्क आहे .
- मुलीचे जन्म दाखला :- पालकांनी आपल्या मुलीचा जन्म दाखला सादर करणे आवयश्क आहे, हे जन्म दाखला मुलीचा जन्म झालेल्या दवाखान्यात किवा सरकारी एजन्सी मार्फेत प्राफ्त करू शकतात .
- खातेधारक किवा खातेधारकाचा पालकाचा पत्ता पुरावा :- मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजना चे खाते उघडू इच्छिणाऱ्या पालकांनी रहिवासी असल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे .हे पुरावे खालील प्रमाणे असू शकतात.
- पासपोर्ट
- ड्राईविंग लायसेनस
- रेशन कार्ड
- वीज बिल
- आधार कार्ड
सुकन्या समृद्धी योजना अर्ज प्रक्रिया
मुलगी वाचवा मुली शिकवा या केंद्र शासनाच्या अभियानांतर्गत सुकन्या समृद्धी हि योजना सुरु केली आहे, मुलीचे पालक आपल्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी या योजने मार्फत एक मोठी रक्कम मिळवू शकतात, या साठी मुलीचे पालक सुकन्या समृद्धी योजना च्या नावाने बचत खाते ओपेन करू शकतात हे खाते ओपेन करताना काही महत्वपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे . सुकन्या समृद्धी योजनामध्ये मुलीच्या नावाने गुंतवणुक करणारे पालक किवा सरंक्षक याची माहिती देणे आवश्यक आहे . योजने मध्ये गुंतवणुक करण्यासाठी बचत खाते उघडण्यासाठी खालील प्रमाणे माहिती देणे आवश्यक आहे
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र
- मुलीचे नाव
- बचत खाते उघडणाऱ्या पालकांचे , कायदेशीर पालकांचे नाव
- वर्तमानातील आणि कायमचा पत्ता ( पालकांच्या ओळखपत्रानुसार )
- पालकांचे ओळखपत्र ( Driving License , Aadhar card, etc. )
- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार Online पद्धतीने अर्ज download करू शकतात किवा तुमच्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत किवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन मिळवू शकतात.
- KYC कागदपत्र ( Pan card , Voting card, Aadhar card )
- वरील प्रमाणे अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरून अर्जाला आवश्यक असलेले सगळे कागदपत्रांची प्रत जोडावी आणि कागदपत्रा सह अर्ज बँकेत किवा पोस्ट ऑफिस मध्ये जमा करणे
- पोस्ट ऑफिस / बँकेकडून या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार
- सुकन्या समृद्धी योजना बचत खात्यामध्ये किमान राशी २५० रु भरून खाते उघडावे लागणार, त्यानंतर अर्जदाराला एक पासबुक देण्यात येईल, अर्जदार या बचत खात्यात गुंतवणुक करू शकतात .
- अश्याप्रकारे अर्जदार सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळू शकतील .
- या योजनेमुळे भविष्यात तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी येणाऱ्या खर्चात मदत होईल .
- सुकन्या समृद्धी योजनेमुळे तुमच्या मुलीच्या लग्नासाठी येणाऱ्या खर्चात मदत होईल .
- सुकन्या समृद्धी योजनेमुळे तुमच्या मुलीला भविष्यात दुसऱ्या देशात शिक्षणासाठी येणाऱ्या खर्चात मदत होईल .
प्रत्येक घरातील पालकांना त्यांच्या मुलांच्या आरोग्याची व भविष्याची आणि त्यांच्या शिक्षणाची खुप काळजी असते त्यामुळे पालक त्यांच्याकडून प्रयत्न करत असतात , आपल्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे व मुलांचे भविष्य चांगले असावे यासाठी सर्व कुटुंबातील पालक त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणुक करत असतात .या बाबींचा विचार करून केंद्र शासनाने या सुकन्या समृद्धी योजनेचा सन २०१५ मध्ये शुभारंभ केला ,या योजनेचा उद्देश म्हणजे पालकांना त्यांच्या मुलींचे भविष्य सुरक्षित होण्यासाठी या योजनेचा शुभारंभ बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानांतर्गत करण्यात आला आहे .
सुकन्या समृद्धी योजना हि एक छोटी ठेव योजना आहे .ज्या मुलींचे शिक्षण व भविष्यात लग्न कार्याचा खर्च भागविण्यासाठी हि योजना महत्वाची आहे .सुकन्या समृद्धी योजनेचे खाते १० वर्षाखालील मुलींसाठी आहे , मुलीचा जन्म झाल्यानंतर ती १० वर्षाची होण्यापूर्वी केव्हाही मुलीच्या नावाने पालक किंवा कायदेशीर पालक हे बचत खाते उघडू शकतील .सर्व मित्रहो , या मध्ये आम्ही सुकन्या समृध्दी योजनेची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयन्त केलेला आहे , तरी आपणा सर्वाना या योजने ची आणखी माहिती किंवा काही प्रश्न असतील तर आपण सर्वांनी कमेंटस करा .
माझी कन्या भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा
सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येते click करा
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी बद्दल जाणून घेण्यासाठी येते click करा
भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा
Follow Social Media Page