Shauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 | शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र २०२४

Shauchalay Anudan Yojana Maharashtra 2024

Shauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 | शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र २०२४ : केंद्र सरकार आणि राज्य सरकार राज्यातील नागरिकांना स्वत: चा शौचालय बांधण्यासाठी १२,०००/- रुपयांचे आर्थिक मदत करत आहेत. यामध्ये केंद्र सरकार ७५% ( ९०००/- रुपये ) व राज्य शासनाचा २५% ( ३०००/- रुपये ) आर्थिक सहाय्य करणार आहेत. केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवीत आहेत. व तसेच राज्य सरकार देखील देशातील नागरिकांच्या विकासासाठी सतत प्रयत्न करत आहेत. आणि त्यासाठी राज्य शासन वेळोवेळी विविध योजना सुरु करत आहेत.

केंद्र सरकार मानवाच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत आहेत. स्वच्छभारत मिशन ही या योजनेचा एक भाग आहे. आता आपल्या देशात सुलभ शौचालय योजना राबवण्यात येत आहे. या योजने अंतर्गत नागरिकांना स्वच्छतेचे धडे शिकवले जाणार आहेत. आपला देश हा आर्थिक द्रुष्ट्या मागास म्हणून ओळखला जाणारा देश आहे. आपल्या देशात आजही बऱ्येच कुटुंब हे दारिद्य्ररेषेखालील कुटुंबे आहेत.

या कुटुंबांना आपल्या अन्न, वस्र, निवारा या गरजा वेळेवर पूर्ण करता येत नाही. अशा अनेक कुटुंबातील सदस्य उघड्यावर शौचालयासाठी जातात ग्रामीण भागात हा प्रकार सर्रास बघायला मिळत असतो. यामुळे खूप प्रमाणात अस्वच्छता आपल्या भारत देशा मध्ये पसरत आहे. त्यामुळे आपले केंद्र सरकार शौचालय अनुदान योजना घेऊन आले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या एकत्रितकरणाने देशात व राज्यात स्वच्छता निर्माण करण्यासाठी राज्यातील नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणार आहेत.

Shauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 : संपूर्ण माहिती

या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या शौचालय बांधण्यास अक्षम कुटुंबांना सरकार आर्थिक मदत करणार आहे. या योजने अंतर्गत आपले केंद्र सरकार ७५% अनुदान देणार आहे. म्हणजेच केंद्र सरकार कडून ९,०००/- रुपये मिळणार आहेत. तसेच राज्य सरकार २५% आर्थिक सहाय्य करणार आहेत. म्हणजेच ३,०००/- रुपये राज्य सरकार कडून देण्यात येणार आहेत. एकूण १२,०००/- रुपये चा आर्थिक सहाय्य आपले सरकार शौचालय बांधण्यासाठी करणार आहेत.

या योजने अंतर्गत मिळणारी रक्कम दोन टप्प्यांमध्ये अर्जदाराला मिळणार आहे. तसेच प्रत्येक घरामध्ये एक शौचालय उभे राहील शौचालयाचा उपयोग करून महिला आपली व घरातील व्यक्तीची स्वच्छता ठेवू शकतील . जेणेकरून आपल्या देशामध्ये रोगराई पसरणार नाही.या योजने अंतर्गत विधवा महिला दारिद्र रेषेखालील कुटुंब ,अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी ,अपंग व्यक्ती यांना फायदा होणार आहे. योजनेचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना व शहरी भागातील लोकांना देखील घेता येणार आहे. ज्याद्वारे आपण एक शौचालयाचे बांधकाम करू शकतो.व आपल्या कुटुंबाची स्वच्छतेची काळजी घेऊ शकणार.

ग्रामीण भागातील बहुतांश परिवार ही दारिद्रय रेषेखालील स्वत: चे जीवन जगत आहेत. व त्यांच्याजवळ उत्पन्नाचा तसेच रोजगारीचा स्थायी स्रोत उपलब्ध नसल्या मुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते. त्यामुळे अशी आर्थिक द्रुष्ट्या गरीब कुटुंबे स्वत:चे शौचालय बांधण्यासाठी असमर्थ असतात. आणि ते उघड्यावर शौचास बसत असतात. व उघड्यावर शौचास बसल्या वर परिसरामध्ये घाण निर्माण होत असते. व सर्वत्र दुर्गधी पसरते व माशा, कीटक यांचा पादुर्भाव होतो. व परिणामी परिसरात रोगराई पसरत असते. व माणस आजाराला बळी पडतात.

या योजने अंतर्गत लाभार्थी कुटुंबाला स्वत:चे वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी १२०००/- रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे. व लाभाची रक्कम लाभार्थी कुटुंबाच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. महाराष्ट्र शासनाची शौचालय अनुदान योजना २०२४ अंतर्गत राज्यातील प्रत्येक ग्रामीण आणि शहरी भागातील घरात स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून शौचालय बांधून स्वच्छ भारत निर्माण करणे हा उद्देश आहे.

वाचक मित्रांना विनंती आहे की या लेखा द्वारे आम्ही तुम्हाला शौचालय अनुदान योजनेची वैशिष्ट्ये, शौचालय अनुदान योजनेची पात्रता काय आहे, योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, याची सर्व माहिती आम्ही या लेखा मध्ये सांगितली आहे. तरी आपण हा लेख शेवटपर्यंत वाचावा.

Shauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 : हायलाईट

योजनेचे नाव शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र २०२४
द्वारा सुरु केंद्र सरकार आणि राज्य सरकार
योजनेचा फायदा कोणाला होणार आहे दारिद्रय रेषेखालील कुटुंब, विधवा महिला, अपंग व्यक्ती, अनुसूचित जाती व जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी
लाभ शौचालय बांधण्यासाठी १२०००/- रुपये आर्थिक मदत
कोणत्या विभागा मार्फत चालवली जाते सामाजिक सुरक्षा विभाग
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन / ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट shauchalay anudan yojana 2024

Shauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 : उद्दिष्टे

  • या योजने अंतर्गत होणाऱ्या आर्थिक लाभांमुळे ग्रामीण भागातील स्वच्छता प्रमुख हेतु बनणार.
  • स्वच्छ परिवार तर स्वच्छ राज्य हा आपल्या सरकारचा प्रमुख उद्देश आहे.
  • या योजने मुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारणार.
  • देशाला व राज्याला स्वच्छ बनविणे तसेच नागरिकांना उघड्यावर शौचास बसण्यापासून मुक्त करणे.
  • राज्यातील नागरिकांना शौचालयाचे महत्व समजावून शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • आर्थिक द्रुष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना स्वत: चे शौचालय बांधण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये.
  • परिसरात दुर्गंधी तसेच रोगराई पसरण्यापासून रोखणे व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रेरित करणे.
  • घरातील महिलांना उघड्यावर शौचास बसण्याची वेळ येऊ नाही ह्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • या योजनेद्वारे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अभियानाला वाव मिळणार.

Shauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 : आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • विधवा असल्यास पतीचा मृत्यूचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • दारिद्रय रेषेखालील असल्याचा दाखला
  • राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
  • शौचालय स्वयं घोषणापत्र
  • मोबाईल नंबर

Shauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 : अटी व शर्ती

  • महाराष्ट्र राज्यातील कुटुंबांनाच शौचालय अनुदान योजनेचा लाभ देण्यात येईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • फक्त आर्थिक द्रुष्ट्या गरीब कुटुंबांनाच या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
  • ज्या कुटुंबांकडे आधीपासून स्वत:चा शौचालय आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • एका कुटुंबाला फक्त एकदाच या योजनेचा लाभ देण्यात येईल.
  • शौचालय पूर्ण बांधून झाल्या नंतर त्याची देखभालीची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी कुटुंबाची असेल शौचालया च्या देखभालीसाठी शासनाकडून कुठल्याच प्रकारचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार नाही.
  • अर्जदार कुटुंबाने या आधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे एखाद्या योजने अंतर्गत शौचालयाचा लाभ घेतला असेल तर अशा परिस्थितीत त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • शौचालय अनुदान योजना ही आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबा साठी असल्या मुळे सरकारी नोकरी करत असलेल्या कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार कुटुंबाचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे.

Shauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 : पात्रता

  • या योजनेसाठी अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असला पाहिजे.
  • ज्यांच्या घरात शौचालय नाही अशि सर्व कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • या योजनेसाठी जात पात धर्म याची कुठलीही अट नाही.
  • ज्यांच्याकडे स्वत:चे शौचालय नाही असे ग्रामीण आणि शहरी भागातील विहिरीवर अवलंबून असलेले कुटुंबे या योजनेसाठी पात्र असतील.

Shauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 : फायदा

  • राज्यातील दारिद्रय रेषेखालील तसेच दारिद्रय रेशेवरील आर्थिक द्रुष्ट्या गरीब कुटुंबाना स्वत:चा शौचालय बांधण्यासाठी शौचालय अनुदान योजने अंतर्गत १२०००/- रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
  • या योजनेच्या सहाय्याने राज्यातील आर्थिक द्रुष्ट्या सर्व गरीब कुटुंबे स्वत: चा शौचालय बांधू शकतील.
  • महिलांना उघड्यावर शौचास बसण्याची गरज भासणार नाही त्यामुळे परिसरात होणारी दुर्गंधी व रोगराई कमी होणार.

Shauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 : महत्वाच्या गोष्टी

  • स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यातील आर्थिक द्रुष्ट्या गरीब कुटुंबाना स्वत:चे शौचालय बांधण्यासाठी सहाय्य देऊन देशाला व राज्याला स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली शौचालय अनुदान योजना महत्वाची अशी एक योजना आहे.
  • या योजने अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी देण्यात येणारी लाभाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा करण्यात येईल.
  • या योजने अंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाइन केलेली आहे, त्यामुळे अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकतात. त्यामुळे अर्जादाराला कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेरी मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे वेळ व पैसे दोघांची बचत होईल.
  • या योजने अंतर्गत लाभाची राशी लाभार्थ्याला २ टप्प्यात दिली जाणार आहे.
  • या योजने अंतर्गत जातीची कुठलीच अट निर्धारित केली गेलेली नाही त्यामुळे राज्यातील प्रत्येक कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • ही योजना सतत चालू आहे आणि त्यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात.

Shauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 : ऑफलाईन पद्ध्तीने अर्ज

  • अर्जदाराला सर्वात प्रथम आपण ज्या क्षेत्रात राहतो त्या ठिकाणाच्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये जावे लागेल.
  • ग्रामपंचायत कार्यालयातून शौचालय अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची शौचालय अनुदान योजने अंतर्गत ऑफलाईन पद्ध्तीने अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार.

निष्कर्ष :-

शौचालय अनुदान योजनेची आम्ही तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, या योजने अंतर्गत आपण आपल्या स्वच्छ भारत मिशन कडे वाटचाल करणार आहोत. आपल्या सरकारने स्वच्छतेच्या दृष्टीने देशात राबवलेली ही सर्वात उत्तम आणि फायदेशीर योजना आहे. या योजने द्वारे प्रत्येक घरात स्वत:चे एक वैयक्तिक शौचालय उपलब्ध होणार आहे. या पद्धतीने आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे शौचालय अनुदान योजनेची माहिती दिली आहे तरी सर्वांनी हा लेख पूर्ण वाचवा.

Shauchalay Anudan Yojana Maharashtra 2024 : सतत विचारले जाणारे प्रश्न

१.शौचालय अनुदान योजनेचा फायदा कोणाला होणार आहे ?

-शौचालय अनुदान योजनेसाठी कुठल्याही जात धर्मपात याची अट सरकारने ठेवलेली नाही आपल्या देशातील कोणीही दारिद्र्य रेषेखालील कुटुंब या योजनेचा फायदा घेऊ शकतात. विधवा महिला, दारिद्रय रेषेखालील कुटुंब, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी ,अपंग व्यक्ती या योजनेचा फायदा घेऊ शकतात.

२.शौचालय अनुदान योजनेचा अर्ज कसा व कुठे करावा ?

– लाभार्थीला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ते ऑफलाइन व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता,
सविस्तर माहितीसाठी वरील लेख पूर्ण वाचावा त्यात ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज कसा करावा हे नमूद केले आहे.

३. शौचालय अनुदान योजने अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी किती रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे?

-शौचालय अनुदान योजने अंतर्गत लाभार्थी कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी १२०००/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.

शौचालय अनुदान योजना २०२४ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत website ला भेट द्या.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा या योजनेच्या अधिकृत website ला भेट द्या.