RTE Private School Admission Open
RTE Private School Admission Open| आरटीई द्वारे खाजगी शाळेत २५ % पुन्हा ऍडमिशन सुरु २०२५-२६ : सर्वांना खुशखबर खाजगी शाळा ( English School ) मध्ये आता आरटीई द्वारे २५ % मोफत ऍडमिशन १६ मे २०२४ पासून परत सुरु करण्यात आले आहेत. आरटीई २५ % या सरकारी योजने अंतर्गत छोट्या मुलांना खाजगी शाळेमध्ये २५ % मोफत शिक्षण मिळणार आहे. या योजने अंतर्गत ज्या खाजगी शाळेमध्ये लहान मुलांचे सिलेक्शन होते त्यांची ऍडमिशन फी माफ करण्यात येते.
आरटीई २५ % या योजनेमध्ये नर्सरी , जुनियर, सिनियर केजी, आणि १ ली पासून ते ८ वी पर्यंतचे शिक्षण मोफत मिळत असते. या मध्ये ज्या मुलांचे RTE २५ % द्वारे ऍडमिशन झालेले आहेत. त्या लहान मुलांना मोफत शिक्षण घेता येणार आहे. ज्या गरीब कुटुंबातील पालकांना त्यांच्या मुलांचे ऍडमिशन खाजगी शाळेत करता येत नव्हते. ते आता त्यांच्या मुलांचे RTE २५ % द्वारे ऍडमिशन करू शकतील.

RTE Private School Admission Open : महत्वाची माहिती
शासनाने फेब्रुवारी २०२४ मध्ये आरटीई २५ % ने निर्णय जारी करण्यात आला आहे. तसेच त्यामध्ये जर पाल्याच्या १ किलोमीटर अंतरावर विनानुदानित / शासकीय शाळा म्हणजेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व खाजगी शाळे ऐवजी दुसरी शाळा असेल तर मुलांच्या पालकांना फॉर्म भरताना इंग्लिश स्कूल म्हणजे खाजगी शाळेचे निवड करता येत नव्हते. या मुळे लहान मुलांचे पालक नाराज व्हायचे.
उच्च न्यायालया पर्यंत हे प्रकरण गेले होते त्यामुळे इंग्लिश स्कूल मध्ये आरटीई द्वारे मोफत ऍडमिशन साठी मे २०२४ पासून फॉर्म भरणे परत सुरु करण्यात आले आहे. शासनाने गरीब मुलांचा व त्यांच्या पालकांचा विचार करून आरटीई २५ % द्वारे खाजगी शाळेत ऍडमिशन पुन्हा सुरु करण्यात आले आहेत.
सन २०२४-२५ या वर्षा करीता आरटीई २५ % प्रवेश करण्यासाठी लहान मुलांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविले होते. तसेच मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. २०२५ -२६ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत याआधी ऑनलाइन अर्ज करण्यात आलेल्या मुलांच्या पालकांनी परत नवीन ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
तसेच याआधी ऑनलाइन पद्ध्तीने करण्यात आलेल्या अर्जाच्या २०२४-२५ या वर्षामध्ये आरटीई २५ % ने प्रवेश प्रक्रियेचा विचार केला जाणार नाही. याची पालकांनी कृपया करून नोंद घ्यावी.
RTE Private School Admission Open : पालकांसाठी सूचना
- आरटीई २५ % द्वारे प्रवेश प्रक्रिया २०२५ -२६ या वर्षाकरिता अर्ज भरण्यास सुरुवात मे पासून होईल . पालकांनी खाली दिलेल्या सूचना च पालन करून अर्ज भरून पूर्ण करावा
- सर्व पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location परत एकदा तपासून घ्यावे. अर्ज पूर्ण पणे बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.
- आपल्या मुलाच अर्ज भरताना जन्म दाखल्या वर जी जन्म तारीख आहे तीच लिहावी.
- १ किलो मीटर, ते १ ते ३ किलो मीटर अंतरावर शाळा निवडताना कमाल १० शाळा निवडाव्यात.
- पालकांनी अर्ज भरत असताना आवश्यक असणारे कागदपत्र तयार ठेवावेत. जर पूर्ण कागदपत्र नसतील तर तुमच्या मुलांचा प्रवेश रद्द होऊ शकतो याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी.
- अर्ज भरून झाल्या नंतर जर तो चुकला आहे असे तुम्हाला समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावाव त्यानंतर नवीन अर्ज भरावा.
- कोणत्याही पालकाने आपल्या मुलाचा डुप्लिकेट अर्ज भरू नये. जर एकाच मुलाचे दोन अर्ज आढळून आल्यास त्या मुलाचे दोन्ही अर्ज बाद केले जातील व ते लॉटरी प्रक्रीये मध्ये समाविष्ट करण्यात येणार नाही. याची नोंद घ्यावी.
- अर्ज भरून झाल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक,अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत तुमच्या जवळ हि प्रक्रिया होई पर्यंत व्यवस्थित ठेवावी.
- अर्ज भरत असताना अर्जातील माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द करण्यात येईल.
- अर्ज करत असताना पासवर्ड विसरल्यास Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा.
- आरटीई २५ % प्रवेश २०२५-२६ या वर्षा करता पालकांनी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत पर्यंत राहणार.
- दिव्यांग मुलांना अर्ज करण्यासाठी दिव्यांग त्वाचे प्रमाण पत्र ४० % आणि व त्या पुढील ग्राह्य धरण्यात येणार.
- २०२५-२६ या वर्षा करता निवासी पुरावा म्हणून gas book रद्द करण्यात येत आहे.
- २०२५-२६ या वर्षा करिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास ते फक्त राष्ट्रीय कृत बँकेचे च पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.
- अर्ज भरत असताना location चुकू नये म्हणून google वर address टाकून ते lattitude, longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.
RTE Private School Admission Open : आवश्यक कागदपत्रे
आरटीई २५ % online प्रवेश घेण्यासाठी लागणारे सर्व कागद पत्रे पालकांनी online प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखे पूर्वी ची असावीत. त्यानंतर ची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाही याची नोंद पालकांनी घ्यावी. मुलाचे आधार कार्ड, रहिवासी दाखला आणि जन्म दाखला हे सर्व कागदपत्रे आरटीई प्रवेश पात्र सर्व मुलांकरिता आवश्यक आहेत.
१. वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाण पत्र ( वडिलांचे/ बालकाचे ) :- उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. तहसीलदार/ उपजिल्हाधिकारी/ उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र. पालकाचा ( वडिलांचा/ बालकाचा ) जातीचा दाखला आवश्यक आहे. पर राज्यातील प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही.
२. वंची गटातील बालकांमध्ये खाली दिलेल्या प्रवर्गाचा समावेश होतो :- १) जात संवर्गातील :- अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, विमुक्त जाती(अ ), भटक्या जमाती, इतर मागास ( ओ.बी.सी ) विशेष मागास बालके २) एच.आय .व्ही.बाधित किंवा एच.आय .व्ही प्रभावित बालके ३) कोव्हीड प्रभावित बालक ( ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन ) ४) अनाथ बालके, दिव्यांग बालके
३. एच. आय.व्ही बाधित/ प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे :- जिल्हा शल्य चिकित्सक/ वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुगणालय यांचे प्रमाणपत्र.
४. दिव्यांग बालकांसाठी वैद्यकीय प्रमाण पत्राचा पुरावा :- जिल्हा शल्य चिकित्सक/ वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुगणालय यांचे ४० % आणि त्या पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
५.कोव्हीड प्रभावित बालक ( ज्या बालकांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन ) अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागद पत्रे:- सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबधित पालकाचे मृत्यू प्रमाण पत्र, कोव्हीड १९ मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाण पत्र. सदर मृत्यू कोव्हीड १९ संबधित असल्याबाबतचे प्रमाणन हे शासकीय , महानगरपालिका, पालिका, रुग्णालय अथवा आय.सी.एम.आर. नोंदणीकृत खाजगी रुगणालय/ प्रयोगशाळा यांचा अहवाल.
६. अनाथ बालके ( वंचित घटक ) : – बालक जर अनाथ आश्रम मध्ये राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतात त्यांचे हमी पत्र. २) अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदा. वार्षिक उत्पन्नाचा दाखला इ. विचारात घेण्यात येऊ नयेत. ३) अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची/ बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील.
७. आर्थिक द्रुष्ट्या दुर्बल असल्यास :- वार्षिक उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र कंपनीचा किंवा Employer चा दाखला, salary स्लिप, उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही.
८. घटस्फोटीत महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे :- १) न्यायालया चा निर्णय. २) घटस्फोट प्रकरण न्याय प्रविष्ट असलेल्या महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. ३) बालक वंचित गटातील असेल तर बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असेल तर बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.
९. विधवा महिला :- १) पतीचे मृत्यूचे प्रमाण पत्र. २) विधवा महिलेचा/ बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. ३) बालक वंचित गटातील असेल तर बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असेल तर बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.
१०. आधार कार्ड :- वंचित व आर्थिक द्रुष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेश पात्र बालकांकरिता आवश्यक आहे.
११. जन्मतारखेचा पुरावा :- ग्रामपंचायत, म.न.पा. यांचा दाखला, रुग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला, अंगणवाडी रजिस्टर मधील दाखला, आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञा पत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन.
१२. रहिवासी/ वास्तव्याचा पुरावा :- राशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल देयक, पाणीपट्टी, घरपट्टी, फक्त राष्ट्रीय कृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट या पैकी कोणतेही एक.
RTE Private School Admission Open : वयोमर्यादा
२०२५-२६ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५% प्रवेशासाठी बालकाचे वय
अ. क्र | प्रवेशाचा वर्ग | वयोमर्यादा | दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजीचे किमान वय | दि.३१ डिसेंबर २०२५ रोजीचे कमाल वय |
१. | प्ले ग्रुप /नर्सरी | १ जुलै २०२१ -३१ डिसेंबर २०२२ | ३ वर्ष | ४ वर्ष ५ महिने ३० दिवस |
२. | ज्युनियर केजी | १ जुलै २०२० -३१ डिसेंबर २०२१ | ४ वर्ष | ५ वर्ष ५ महिने ३० दिवस |
३. | सिनियर केजी | १ जुलै २०१९ -३१ डिसेंबर २०२० | ५ वर्ष | ६ वर्ष ५ महिने ३० दिवस |
४. | इयत्ता १ ली | १ जुलै २०१८ -३१ डिसेंबर २०१९ | ६ वर्ष | ७ वर्ष ५ महिने ३० दिवस |
RTE Private School Admission Open : बद्दल विचारले जाणारे प्रश्न
१. RTE फॉर्म कधी चालू होणार आहे ?
इंग्लिश स्कूल मध्ये RTE द्वारे मोफत admission साठी २०२५ मे पासून फॉर्म भरण्यास सुरुवात होईल.
२.पालकांना अर्ज केव्हा करता येईल ?
सन २०२५- २६ या शैक्षणिक वर्षासाठी ठरवून दिलेल्या कालावधी मध्येच अर्ज करता येणार.
३. पालकांना सन २०२५-२६ या वर्षात ऑनलाईन अर्ज किती वेळेस करता येणार ?
पालकांना सन २०२५-२६ या वर्षात प्रवेशासाठी फक्त एकदाच अर्ज करता येणार आहे.
४. अर्ज कुठे जाऊन भरावा लागेल ?
मदत केंद्रावर किंवा ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा, संगणक, प्रिंटर, इ. उपलब्ध असेल तेथे जाऊन भरावा.
५. २५ % ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची वेब साईट कोणती आहे ?
अर्ज भरण्याची वेब साईट https://student.maharashtra.gov.in /adm_portal या संकेत स्थळावर ऑनलाइन अर्ज भरावयाचा आहे.
६. प्रवेश अर्जासाठी किती शुल्क आहे ?
शैक्षणिक वर्ष २०२५- २६ ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे अर्ज मोफत स्वरुपात वेबसाईट उपलब्ध असून वरील वेबसाईट वर जाऊन भरावयाचा आहे.
७. पालक किती शाळांसाठी अर्ज करू शकतात ?
ऑनलाइन माहिती भरताना पालकांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रापासून १ किलोमीटर व ३ किलोमीटर आणि अधिक अंतरा पर्यंतच्या असणाऱ्या शाळांपैकी जास्तीत जास्त कोणत्याही १० शाळा निवडता येतील.
८. अर्ज केला म्हणजे खात्रीशीर प्रवेश मिळेलच का ?
शाळेच्या आरंभीच्या वर्गाच्या २५ % प्रवेश क्षमते पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले तर सोडत/लॉटरी पद्ध्तीने प्रवेश दिले जाणार. अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जदाराच्या पाल्याला प्रवेश मिळेलच असे नाही.
९. उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला कोणत्या ठिकाणचा पाहिजे ?
उत्पन्नाचा आणि जातीचा दाखला परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. ज्या ठिकाणी वास्तव्य आहे त्याच ठिकाणचा असावा.
१०. RTE २५% ऑनलाइन प्रवेश करिता उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा पाहिजे ?
पालकांचा आर्थिक वर्ष २०२२-२०२३ किंवा २०२३-२०२४ या वर्षाचा १ लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला असावा.
११. RTE २५ % ऑनलाइन प्रवेश प्रक्रीये अंतर्गत प्रवेश मिळाला अथवा नाही हे कसे समजेल ?
प्रवेशासाठी निवड झाली हा Msg प्राप्त झाल्या नंतर पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश करिता आवश्यक कागदपत्रे सबमिट केल्यानंतर त्यांना पडताळणी समितीकडून Receipt पावती दिली जाणार. आणि प्रवेश मिळाला कि नाही ते समजेल.
१२. RTE २५ % अंतर्गत शाळेत प्रवेश मिळाल्यावर स्थलांतर, बदली अथवा अन्य कारणाने RTE मध्येच शाळा बदलून मिळेल का ?
RTE २५ % अंतर्गत एका शाळेत प्रवेश मिळाल्यावर कोणत्याही कारणास्तव शाळा बदलून मिळत नाही.
माझी कन्या भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा
सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येते click करा
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी बद्दल जाणून घेण्यासाठी येते click करा
भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा
Follow Social Media Page