Ramai Awas Yojana 2024 In Marathi | रमाई आवास योजना २०२४ मराठी
Ramai Awas yojana 2024 | रमाई आवास योजना २०२४ :- महाराष्ट्र शासना मार्फत जनकल्याणासाठी आणि राज्यातील आर्थिक दुर्बल, वंचित आणि गरीब सामान्य नागरिकांसाठी उपयोगी व कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. रमाई आवास योजना २०२४ हि योजना खूप महत्वाची आणि महत्वाकांक्षी राज्य पुरस्कृत योजना असून, देशातील नागरिक मोठ्याप्रमाणात दारिद्रय रेषेखालील जीवनयापन करतात हे नागरिक साधारणता कमी उत्पन्न गटातील असतात, त्यामुळे त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंची कमतरता असते. तसेच कमी उत्पन्न असल्यामुळे त्यांच्याकडे निवाऱ्याची पण व्यवस्था नसते.कमी उत्पन्न असल्यामुळे ते स्वताची जागा पण घेऊ शकत नाहीत. आणि अशा परिस्थितीत या नागरिकांना कच्चे माकन किंवा झोपडी ह्या प्रकारची निवाऱ्या ची सोय करावी लागते.
राज्यामध्ये अशा दारिद्रय रेषेखालील परिस्थितीत कुटुंबे ग्रामीण भागात व शहरी भागात सुद्धा खूप प्रमाणात दिसून येतात.ज्यांच्या कडे राहण्यासाठी स्वताच्या मालकीचे घर नाही, त्यामुळे अशा नागरीकांना नाईलाजाने रस्त्याच्या कडेला किंवा ज्या ठिकाणी जागा मिळेल तिथे ते वस्ती करून राहतात या परिस्थिती मध्ये त्यांना पावसाच्या पाण्याचे व आगीचे सुद्धा भय असते, या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने या वंचित आणि बेघर नागरिकांसाठी ही रमाई आवास योजना सुरु करण्यात आली आहे.मित्रानो आपण ह्या लेखामध्ये पाहणार आहोत रमाई घरकुल योजना २०२४ या योजने बद्दल पूर्ण माहिती.

Ramai Awas Yojana 2024 : संपूर्ण माहिती
राज्यामध्ये वाढत्या जागेच्या किमतींमुळे सर्वच नागरीकांना स्वताचे घर विकत घेणे शक्य नाही. तसेच कमी उत्पन्न असल्यामुळे त्यांना स्वताच्या परिवाराचे पालन पोषण करणे कठीण असते. या मधील बहुतांश नागरिक ग्रामीण भागामध्ये राहतात त्यामुळे त्यांना कच्चे घर किंवा झोपड्या बांधून राहावे लागते, हे सर्व नागरिक आर्थिक दुर्बल घटकांमध्ये मोडले जातात. या दारिद्रय रेषेखालील यादीत नाव असणाऱ्या परंतु इंदिरा आवास योजनेच्या मूळ प्रतीक्षा यादीत ज्या नागरिकांची नवे नाहीत. आणि जे नागरिक बेघर आहेत. अशा अनुसूचित जाती आमी नवबौद्ध पात्र लाभार्थी नागरिकांना ज्यांच्या जवळ ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी स्वताची जागा आहे.
अशा अनुसूचित जाती आणि नवबौद्ध नागरिकांना महाराष्ट्र शासन घर बांधण्यासाठी रमाई घरकुल योजना या योजनेच्या अंतर्गत अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेंर्गत महाराष्ट्र राज्यातील ज्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध नागरिकांना राहण्यासाठी स्वताचे घर नाही अशा नागरिकांना घराचे वाटप करण्यात येणार आहे.
रमाई आवास योजना २०२४ महाराष्ट्र या योजनेंर्गत महाराष्ट्र शासनाने १.५ लाख घरे प्रदान केलेली आहेत आणि आणखी ५१ लाख घरे प्रदान करण्याचे लक्ष शासनाने निर्धारित केले आहे. रमाई आवास योजनेच्या अंतर्गत ज्या अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध वर्गातील नागरिकांना स्वताचे घर प्राप्त करायचे असेल त्या नागरीकांना शासनाच्या आधिकारिक वेबसाईट वर जाऊन त्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
Ramai Awas Yojana 2024 : उद्देश
रमाई आवास योजना घरकुल योजना महाराष्ट्र या योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध या वर्गातील नागरिक जे बेघर आहेत किंवा त्यांना राहण्यासाठी स्वताचे घर नाही व जे नागरिक कच्च्या घरात राहत आहेत. या नागरिकांकडे मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत, अशा बेघर आणि आर्थिक द्रुष्ट्या कमकुवत नागरिकांचे जीवन मान उंचावण्यासाठी, त्यांच्या जीवनात सुधारणा होण्यासाठी शासनाकडून घरकुल बांधण्यासाठी आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे या योजनेंर्गत त्यांना पक्की घरे दिले नानार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या निर्णया प्रमाणे रमाई आवास योजनेच्या अंतर्गत राज्याच्या शहरी भागात २२६७६ घरकुल आणि ग्रामीण भागात ११३५७१ घरकुल बांधण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.या बाबतचा अध्यादेश सामाजिक न्याय विभागाने जारी केला आहे. रमाई आवास योजनेला मान्यता २०२१ ते २०२२ या आर्थिक वर्षासाठी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध या प्रवर्गातील नागरिक या योजनेसाठी पात्र राहतील. त्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
Ramai Awas Yojana 2024 : वैशिष्ट्ये आणि अनुदान
महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत व तसेच नगर परिषद आणि महानगरपालिका विभागातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध कुटुंबांना पक्की घरे देणे व तसेच कच्च्या घराचे किंवा झोपडीचे पक्के बांधकाम करण्यासाठी व शासकीय अभिकरणा मार्फत घर खरेदीसाठी सरकार कडून मर्यादेत अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इंदिरा आवास योजना हि ग्रामविकास विभागा कडून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे मार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेंर्गत केंद्र शासनाच्या मार्ग दर्शक तत्वानुसार ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या योजने मध्ये अनुसूचित जाती पप्रवर्गासाठी आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. या आरक्षणाच्या अंतर्गत लाभ मिळालेल्या नागरिकांना वगळून उर्वरित अनुसूचित जातीच्या अर्जदारामधून पात्र लाभार्थ्यांची निवड करून रमाई आवास योजना अंतर्गत लाभ दिला जाईल.
सामान्य विभाग घरकुल बांधकाम | १, ३२ ,००० रुपये |
नक्षलग्रस्त आणि डोंगराळ भागासाठी घरकुल बांधकाम | १ ,४२ ,००० रुपये |
शहरी विभागासाठी घरकुल बांधकाम | २ .५ लाख रुपये |
शौचालय बांधण्यासाठी | १२ ,००० रुपये |
- रमाई आवास घरकुल योजना या योजनेंर्गत लाभार्थ्यांच्या अनुदानात ३० सप्टेंबर २०१६ च्या शासन निर्णया नुसार सुधारणा करण्यात आली आहे. रमाई आवास योजनेमध्ये घरकुलाच्या बांधकामासाठी शौचालयासह सामान्य विभागासाठी १,३२ ,००० रुपये अनुदान तसेच डोंगराळ भाग आणि नक्षलग्रस्त भागासाठी शौचाल्यासहीत १, ४२,००० रुपये अनुदान देण्याचे नवीन शासन निर्णयानुसार हि सुधारणा करण्यात आली आहे.
- रमाई आवास घरकुल योजना अंतर्गत शहरी विभागासाठी जसे नगरपालिका, महानगरपालिका आणि नगर परिषद , प्रधानमंत्री आवास योजने प्रमाणे शहरी परिवारातील एकूण वार्षिक उत्पन्न मर्यादित ३ लाख असलेल्या लाभार्थ्याना घरकुल बांधण्यासाठी अनुदानाची रक्कम २.५ लाख निर्धारित करण्यात आली आहे.
- रमाई आवास घरकुल योजना या अंतर्गत लाभार्थ्यांना शौचालय बांधण्यासाठी देण्यात येणाऱ्या १२, ००० रुपये प्रतिकृती पाणी पुरवठा स्वच्छता विभागामार्फत केले जाते. हि योजना अनुसूचित जाती, नवबौद्ध या जातीतील नागरिकांसाठी राबविण्यात आली आहे.
- रमाई घरकुल योजनेंर्गत लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी अनुदान व्यतिरिक्त नरेगा योजनेच्या अंतर्गत ९० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून दिला जातो.या साठी लाभर्थ्याना १८ ,००० रुपये मजुरीच्या स्वरुपात दिले जाते.
- रमाई आवास घरकुल योजने मध्ये प्रधानमंत्री आवास योजने प्रमाणेच नरेगा अंतर्गत जॉब कार्ड धारक लाभार्थ्यांना मजुरी दिली जाते. या योजनेचे लाभार्थ्यांची निवड प्राधान्य क्रमाने होते.
- अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील ४० % पेक्षा अधिक अपंगत्व नागरिक आणि ज्यांचे उत्पन्न १ लाखाच्या आत आहे असे अपंग नागरिक या योजनेचे इतर अटी पूर्ण करत असतील तर अशा नागरिकांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ मिळवू शकतात.
रमाई आवास योजना २०२४ मराठी थोडक्यात माहिती
योजनेचे नाव | रमाई आवास योजना |
द्वारा सुरु | महाराष्ट्र राज्य सरकार |
लाभार्थी | अनुसूचित जाती, जमाती , नवबौद्ध प्रवर्गातील गरीब नागरिक |
उद्देश | आर्थिक द्रुष्ट्या दुर्बल नागरिकांना स्वताचे घर उपलब्ध करून देणे |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र |
official website | Click Here |
प्रकार | आवास योजना |
राज्य | महाराष्ट्र |
रमाई आवास घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया
रमाई घरकुल योजने अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी निर्धारित केलेले लाभार्ती निवड प्रक्रिया खालील प्रमाणे असेल .
- रमाई आवास योजनेमध्ये ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील लाभार्ती निवड ग्राम सभा घेऊन निवड करण्यात येते
- या योजनेंतर्गत लाभार्थी निवड अनुसूचित जातीतील अपंग लाभार्थ्याना किमान तीन टक्के घरकुल देणे बंधनकारक आहे या मध्ये सामाजिक न्याय विशेष सहाय विभाग तर्फे ७/१२ उतारा संबंदित अटशिथिल करण्यात आली आहे .
- रमाई घरकुल योजना मध्ये सभेत निवड केलेल्या अनुसूचित जातीच्या लाभार्थ्याना अंतिम निवड शासनाच्या निर्णया नुसार गाठीत करण्यात आली आहे घरकुल निर्माण समिती करेल , या समितीचे अध्यक्ष जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतील
रमाई आवास घरकुल योजना २०२४ आवश्कायक कागदपत्र
रमाई आवास योजनेअंतर्गत लागणारे कागदपत्र खालील प्रमाणे सादर करणेआवश्यक राहील
- लाभार्थी चा ७/१२ उतारा मालमत्ता नोदणी पत्र , ग्रामपंचायतीत मालमत्ता नोदणी केलेल्या उत्तारा यापैकी काहीही घरपट्टी, पाणीपट्टी , वीज बिल या कागदपत्रा पैकी एक
- सक्षम प्राधिकारीने दिलेल्या अधिकृत जातीचे प्रमाणपत्र
- सक्षम प्राधिकारीने दिलेल्या उत्पन्नाचा दाखला
- मतदार यादीतला नावाचा उतारा
- निवडणूक मतदार ओळखपत्र
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- सरपंच /तलाठी दाखला
- ग्रामपंचायत /महानगरपालिका/नगरपालिका मधील मालमत्ता कर भरल्याचा पावतीची प्रत
रमाई आवास घरकुल योजनाऑनलाईनअर्ज करण्याची प्रक्रिया
- महाराष्ट्रातील ज्या पात्र नागरिकांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ मिळवायचा आहे त्यांना सर्वप्रथम शासनाच्या website वर जाऊन नोदणी करावी लागेल , नोदणी झाल्यावर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
- रमाई आवास योजनेंतर्गत ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला प्रथम योजनेच्या आधिकारिक वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल.
- या होम पेजवर तुम्हाला तुमची नगरपरिषद किंवा ग्राम पंचायत निवडायची आहे.
- यानंतर होम पेजवर तुम्हाला रमाई घरकुल योजनेच्या ऑनलाइन अर्ज या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल या पेजवर असलेल्या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल या प्रमाणे तुमचे नाव, जन्म तारीख, आधार नंबर इत्यादी विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल, या प्रमाणे सर्व माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल, यासाठी लॉगिन पर्यायावर वर क्लिक करा.
- यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल या पेजवर तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड प्रविष्ट करवा लागेल
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन रमाई आवास घरकुल योजना फॉर्म उघडेल या फॉर्म मध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरावी लागेल, विचारलेली सर्व माहिती भरल्यावर आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन अपलोड करावी लागेल.
- यानंतर पूर्ण तपशील पडताळणी करून तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल, या प्रमाणे तुमची या योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया संपूर्ण होईल.
महत्वाची सूचना :- प्रिय वाचक मित्रानो सर्वाना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किवा आपल्या नातेवाईकांपैकी कोणी व्यक्ती असेल ज्याला या योजना चा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजने विषयी माहिती द्या किवा त्यांना हा आमचा कृषी पिक विमा योजना लेख वाचण्यास सांगावा हि विनंती जेणे करून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल व त्यांचे स्वप्नपूर्तीसाठी आपण काही मदत करू शकू
सर्व वाचक मित्रांना एक विनंती आहे हे website केंद्र शासन किवा राज्य शासना ची नाही किवा त्या सबंधी देखील नाही जर आपण वर नमूद केलेल्या माहिती च्या आधारे या योजने बद्दल काही निर्णय घेणार असाल तर कृपया वरती दिलेली माहिती तुम्ही परत एकदा पडताळून बघा किवा शासना च्या अधिकृत website वरती visit करून योग्य तो निणर्य घ्यावा आम्ही फक्त या योजने ची माहिती आपल्या मराठी वाचकांना मराठी भाषेत वाचण्यास मिळावी या अनुषंगाने हा एक छोटासा प्रयत्न केला आहे तरी कृपया आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी व आमचा लेख तुम्हाला कसा वाटला आम्हला तुमच्या शब्दात कळवावे .
माझी कन्या भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा
सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येते click करा
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी बद्दल जाणून घेण्यासाठी येते click करा
भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा
Follow Social Media Page