Pradhanmantri Vay Vandana Yojana 2024 Marathi | प्रधानमंत्री वय वंदना योजना २०२४ मराठी

Pradhanmantri Vay Vandana Yojana 2024 Marathi

Pradhanmantri Vay Vandana Yojana 2024 Marathi | प्रधानमंत्री वय वंदना योजना २०२४ मराठी :- जेष्ठ नागरिक हा आपल्या समाजाचा ठेवा असून. त्यांनी इतकी वर्षे समाज आणि राष्ट्राचा विकास करण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत.त्यांना जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांचा मोठा अनुभव आहे.देशाला उंचीवर नेण्यासाठी आजचा तरुण जेष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा फायदा घेऊ शकतात. त्यांच्या आयुष्याच्या या वयामध्ये त्यांची काळजी घेवून व त्यांना काही तरी विशेष वाटायला पाहिजे.

भारत सरकार हे विकासाच्या विविध क्षेत्रांमध्ये आपल्या योजनांद्वारे अनेक प्रकारचे फायदे प्रदान करत आहेत. त्यांच्या साठी विविध कर सवलती,प्रवास व आरोग्य सुविधा हि उपलब्ध केल्या आहेत. भारत सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत.

निवृतीची योजना बहुतेक लोक आधीच करतात, जेणेकरून त्यांचे भविष्य आरामात जाईल. त्यासाठी जेष्ठ नागरिक नोकरी वरून निवृत्ती झाल्या नंतरचे पैसे अशा ठिकाणी गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात ज्या ठिकाणी त्यांची गुंतवणूक सुरक्षित राहणार आणि त्यांना चांगला परतावा मिळू शकेल. निवृत्ती नंतर पण जेष्ठ नारीकांना दर महिन्याला पैशांची गरज भासत असते, अशावेळी लोक अधिक पेन्शन योजना घेण्याचे पसंत करतात. त्यांना त्या योजने मुळे लाभ होत असतो. जिथे दर महिन्याला आयुष्यभराची एकदा गुंतवणूक करून उत्पन्न मिळत असते.

Pradhanmantri Vay Vandana Yojana 2024 Marathi | प्रधानमंत्री वय वंदना योजना २०२४ मराठी

जेष्ठ नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ४ मे २०१७ या दिवशी एक योजना सुरु केली. अशी योजना सुरु केली की त्या योजने मुळे जेष्ठ नागरिकांना त्या योजनेचा खूप जास्त फायदा होणार. ज्यामध्ये जेष्ठ नागरिक पैशांची गुंतवणूक करू शकतील. आणि त्यांना चांगली पेन्शन पण मिळणार. वाचक मित्रानो प्रधानमंत्री वय वंदना योजना २०२४ मराठी या योजने संबधित संपूर्ण माहिती या लेखा द्वारे देत आहोत. तरी आपण सर्वांनी हा लेख पूर्ण वाचवा.

Pradhanmantri Vay Vandana Yojana 2024 Marathi : माहिती

प्रधानमंत्री वय वंदना योजना २०२४ मराठी: ही जेष्ठ नागरिकांसाठी निवृत्ती आणि निवृत्ती वेतन योजना आहे. सरकारने सामाजिक सुरक्षा योजनांचा एक भाग म्हणून प्रधानमंत्री वय वंदना योजना सुरु केली आहे. भारतामध्ये सरकारने अशा विविध सामाजिक सुरक्षा योजना सुरु केलेल्या आहेत, तसेच प्रधानमंत्री वय वंदना योजना २०२४ मराठी ही एक नॉन-लिंक्ड आणि गैर-सहभागी पेन्शन योजना असून जि भारत सरकार द्वारे अनुदानित आहे.

गुंतवणूकदार ही योजना ते ऑफलाईन आणि ऑनलाईन खरेदी करू शकतील. गुंतवणुकीची रक्कम खरेदी किमंत म्हणून ओळखण्यात येते. प्रधानमंत्री वय वंदना योजना गुंतवणुकीवर खात्रीशीर परताव्याची ऑफर देत असते. गुंतवणुकदार मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक या पद्ध्तीने पेआउट कालावधी ठरवू शकतात. ही योजना त्यांच्या गुंतवणूकदारांना नियमित व निश्चित उत्पन्न देत असते. तसेच बचत खात्यात तुमचे पैसे ठेवण्यापेक्षा हि योजना एक उत्तम पर्याय आहे.

शासनाचे वित्त मंत्रालय प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला दराचे पुनरावलोकन करत असते. ते आर्थिक वर्षासाठी लागू असेल.२०२० -२०२१ च्या पहिल्या आर्थिक वर्षासाठी परताव्याचा हमी दर ८ % होता. त्यानंतर २०२१-२०२२ या वर्षासाठी या योजनेने दरमहा वार्षिक देय ७.४० %निश्चित परतावा प्रदान केलेला आहे. एल आय सी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन या योजनेच्या ऑपरेशन साठी पुणपणे जबाबदार आहे.

Pradhanmantri Vay Vandana Yojana 2024 Marathi : हायलाईट

योजना प्रधानमंत्री वय वंदना योजना
द्वारा सुरुवात भारत सरकार
योजना आरंभ ४ मे २०१७
लाभार्थी देशातील जेष्ठ नागरिक
अधिकृत वेबसाईट https://Iicindia.in
द्वारा प्रशासित भारतीय जीवन बीमा निगम
उद्देश देशातील वयोवृद्ध नागरिकांना आर्थिक संरक्षण देणे
लाभ मासिक पेन्शन
वर्ष २०२४
श्रेणी पेन्शन योजना

Pradhanmantri Vay Vandana Yojana 2024 Marathi : महत्वाचे मुद्दे

  • प्रधानमंत्री वय वंदना योजने अंतर्गत जमा केलेली एकरकमी रक्कम आयकर कायदा १९६१ च्या कलम ८०C अंतर्गत करमुक्त आहे. पण लाभार्थीला गुंतवणूक केलेल्या रक्कमेतून मिळत असलेल्या व्याजावर आयकर भरावा लागणार.
  • ज्या इच्छुक जेष्ठ नागरिकांना या योजने अंतर्गत जास्तीत जास्त रुपये १५०००००/- ची गुंतवणूक केल्या वर दरमहा रुपये १०००० /- ची पेन्शन मिळू शकते.
  • पॉलिसी धारकाला जर दर महिन्याला पेन्शन मिळवायची असेल तर त्यांना ८ टक्के दराने व्याज मिळणार. त्यांना जर वर्षातून एकदा पेन्शन मिळवायची असेल तर त्यांना ८. ३ टक्के दराने व्याज मिळणार.
  • पॉलिसी धारकाला १० वर्षाच्या पॉलिसी मुदतीत महिन्याला, तीन महिन्याला, सहा महिन्याला किंवा वर्षाला पेन्शन मिळण्याचा पर्याय आहे.
  • या योजने अंतर्गत १० वर्षाच्या गुंतवणुकी नंतर, पेन्शनच्या अंतिम देयकासह जमा करण्यात आलेली गुंतवणूक रक्कम देखील परत करण्यात येते.
  • प्रधानमंत्री वय वंदना योजने मध्ये सहभागी होण्यासाठी जेष्ठ नागरिकांना कुठल्याही वैद्यकीय चाचणीची गरज नाही.
  • पेन्शन मिळवत असलेल्या पॉलिसी धारकाचा योजने मध्ये सामील झाल्या नंतर १० वर्षाच्या आत जर मृत्यू झाला तर जमा करण्यात आलेली रक्कम नामांकित व्यक्तीला परत केली जाणार.

Pradhanmantri Vay Vandana Yojana 2024 Marathi : वैशिष्ट्ये

  • प्रधानमंत्री वय वंदना योजना खास करून ६० वर्ष वयाच्या जेष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.
  • भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे या योजनेचे संचालन करण्यात आले.
  • या योजने द्वारे जेष्ठ नागरिकांना १० वर्षासाठी खात्रीशीर पेन्शन उपलब्ध करून दिली जाते.
  • प्रधानमंत्री वय वंदना योजने द्वारे तुम्ही वर्षाला ७.४० टक्के दराने व्याज उत्पन्न मिळवू शकता.
  • या योजने अंतर्गत मासिक, त्रैमासिक, सहामाही व वार्षिक अशा पद्ध्तीने पेन्शन मिळेल.
  • १० वर्षे पूर्ण झाल्या वर पेन्शनच्या अंतिम रक्कमेसह खरेदी किंमत परत केली जाणार.
  • या पॉलिसी द्वारे खरेदी किंमतीच्या ७५ टक्के पर्यंत कर्ज पण मिळू शकेल.
  • पॉलिसीची मुदत ३ वर्ष पूर्ण झाल्या नंतरच ही कर्ज सुविधा मिळू शकेल.
  • ही योजना खरेदी किंमतीच्या ९८ टक्के पर्यंत आपत्कालीन पैसे काढण्याची परवानगी देत असते.
  • जर १० वर्ष पूर्ण होण्याआधीच लाभार्थीचा मृत्यू झाल्या वर खरेदीची किंमत नामनिर्देशित व्यक्तीला परत करण्यात येईल.

Pradhanmantri Vay Vandana Yojana 2024 Marathi : समाविष्ट क्षेत्र

ही योजना दोन परिस्थितींमध्ये फायदा देते.

१. १० वर्षाच्या पॉलिसी कालावधीमध्ये पेन्शन धारकाचा मृत्यू झाल्यास पॉलिसी लाभार्थी/ नॉमिनीला मृत्यूचे फायदे देते.

मृत्यू लाभ : मुळ खरेदी किंमत किंवा पेन्शन धारकाने गुंतवणूक केलेली वास्तविक रक्कम मृत्यू लाभ म्हणून लाभार्थी/ नामांकित व्यक्तीला परत करण्यात येते. जसे कि ६० वर्षे वयाच्या एका व्यक्तीने १५,००,०००/- रुपयांची प्रधानमंत्री वय वंदना योजने मध्ये गुंतवणूक केली आहे. त्यासाठी त्यांना १०, ०००/- रुपयांची मासिक पेन्शन मिळणार.

लाभार्थी ६६ वर्षाचा असताना त्याचा मृत्यू झाला. तर अशा स्थितीत मासिक पेन्शन पे-आउट मृत्युच्या तारखेपासून बंद करण्यात येईल, आणि त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम म्हणजेच १५ लाख रुपये त्यांच्या नॉमिनीला देण्यात येणार.

२. पेन्शन धारक १० वर्षाचा पॉलिसी कालावधी संपेपर्यंत जिवंत असल्यास, पॉलिसी पेन्शन धारकाला सर्व्हायव्हल चा फायदा मिळणार.

सर्व्हायव्हल फायदा : १० वर्षाचा पॉलिसी कालावधी पूर्ण केल्यास, मूळ खरेदी किंमत किंवा पेन्शन धारकाने गुंतवलेली वास्तविक रक्कम त्यांना/ तिला सर्व्हायव्हल लाभ म्हणून परत केली जाणार.एखाद्या व्यक्तीचे उदाहरण घेतले, तर पॉलिसी टर्मच्या शेवटी म्हणजेच ते वयाच्या ७० व्या वर्षी त्यांना त्यांची मूळ गुंतवणूक १५ लाख रुपये परत मिळणार. पॉलीसीची मुदत संपेपर्यंत त्यांना त्यांची मासिक पेन्शन १०,०००/- रुपये मिळत राहणार. दर महिन्याच्या शेवटी १०,०००/- रुपये.

Pradhanmantri Vay Vandana Yojana 2024 Marathi : विरुद्ध कर्ज

पॉलीसिच्या कालावधी दरम्यान ग्राहक पॉलीसिवर कर्ज घेऊ शकतात. खरेदी किंमतीच्या ७५ टक्के पर्यंत जास्तीत जास्त कर्ज मिळू शकेल. कर्जा वरील व्याज पण लागू आहे. कर्जाचा व्याज दर ठराविक अंतराने निर्धारित केला जात असतो. व्याज् दराची गणना मार्गदर्शक तत्वे आणि IRDAI द्वारे मंजूर करण्यात आलेल्या पद्ध्तीने केले जाते. कर्जाच्या संपूर्ण मुदतीसाठी लागू व्याज दर वार्षिक ९.५० टक्के इतका असेल.

कर्जावरील व्याज हे ग्राहकाला पेन्शनच्या रक्क्मेतून समायोजित केले जाणार. या उद्देशासाठी प्रीमियम भरण्याच्या पद्धती नुसार व्याज जमा करण्यात येतील. तसेच कर्जावरील व्याज पेन्शन च्या देय तारखेला देय असणार. दाव्याच्या रक्कमेतून थकीत कर्जाची रक्कम वसूल करण्यात येणार. पॉलिसी मधून बाहेर पडताना अशा पद्धतीची वसुली करण्यात येईल.

Pradhanmantri Vay Vandana Yojana 2024 Marathi : नवीन अपडेट

ही पॉलिसी योजना १० वर्षासाठी आहे. प्रधानमंत्री वय वंदना योजने अंर्तगत पेन्शन धारक खरेदीच्या वेळी मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक या पद्धतीने पेन्शन ची निवड करू शकतो. या योजने द्वारे तुम्हाला दरमहा सुमारे ९,२५०/- रुपये पेन्शन मिळेल. तीन महिन्यांसाठी २७,७५०/- रुपये दर ६ महिन्यांनी ५५,५००/-रुपये व पेन्शन म्हणून दरवर्षी १,११,०००/- रुपये. या योजनेचा कालावधी वाढवण्या बरोबरच शासनाने त्या मध्ये मोठ्या सुधारणा केल्या आहेत.

प्रधानमंत्री वय वंदना योजने अंतर्गत किमान पेन्शन साठी ( वार्षिक ) एक हजार रुपये प्रति महिना देण्यात येणारी रक्कम, ज्या मध्ये १ लाख ६२ हजार १६२ रुपयांपर्यंतच्या किमान गुंतवणुकीच्या नियमात सुधारणा केली आहे.

Pradhanmantri Vay Vandana Yojana 2024 Marathi : कागदपत्रे

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • वयाचा पुरावा
  • बँक खाते पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • अर्जदार नोकरीवरून निवृत्त झाले असल्याचे कागदपत्रे

Pradhanmantri Vay Vandana Yojana 2024 Marathi : पात्रता अटी व इतर निकष

  • प्रधानमंत्री वय वंदना योजनेसाठी कुठलेही विशिष्ट पात्रता निकष नाही आहेत, तसेच लाभार्थी हा जेष्ठ नागरिक असणे गरजेचे आहे. ( वय ६० वर्षा पेक्षा जास्त )
  • अर्जदार भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.
  • प्रधानमंत्री वय वंदना योजनेसाठी प्रवेशाचे कमाल वय नाही.
  • अर्जदार १० वर्षाची पॉलिसी मुदतीचा लाभ घेण्यासाठी तयार असणे गरजेचे आहे.

Pradhanmantri Vay Vandana Yojana 2024 Marathi :ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

  • सर्वात आधी अर्जदाराने त्यांच्या जवळच्या एल आय सी शाखेत संपर्क साधावा. त्यानंतर शाखेत जाऊन योजनेच्या संबधित सर्व कागदपत्रे अधिकाऱ्याला द्यावे लागतील. आणि त्यांची सर्व माहिती द्यावी लागेल.
  • एल आय सी एजंट या योजने अंतर्गत तुमचा अर्ज करणार. अर्जाच्या तपासणी नंतर एल आय सी एजंट तुमची या योजनेची पॉलिसी सुरु करणार.

Pradhanmantri Vay Vandana Yojana 2024 Marathi : संपर्क तपशील

अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
PMVVY अर्ज PDF इथे क्लिक करा
संपर्क तपशील पॉलिसी शी संबधित प्रश्नांसाठी संपर्क क्रमांक : 022-67819281 किंवा 022-67819290
ई-मेल onlinedmc@liciindia.com
केंद्र सरकारी योजना इथे क्लिक करा

Pradhanmantri Vay Vandana Yojana 2024 Marathi :विचारले जाणारे प्रश्न

१. प्रधानमंत्री वय वंदना योजना काय आहे?

-प्रधानमंत्री वय वंदना योजना ही एक विमा पॉलिसी कम पेन्शन योजना आहे. जि देशातील जेष्ठ नागरिकांना उत्पन्नाचे पर्यायी मार्ग प्रदान करत असते. ६० वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

२. प्रधानमंत्री वय वंदना योजनेमध्ये पती आणि पत्नी दोघेही गुंतवणूक करू शकतात का?

-हो. या योजने अंतर्गत जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा प्रति परिवार प्रति वर्ष प्रति नागरिक असा बदल करण्यात आलेला आहे. पती पत्नी दोघेही जेष्ठ नागरिक असल्यास प्रत्येकी १५ लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात.

३. परताव्याचे व्याजदर बदलतात की पेन्शन योजनेसाठी निश्चित केले जातात?

व्याजदर बदलत असतात. सरकार दरवर्षी पॉलीसिच्या व्याजदरात सुधारणा करत असते. चालू वर्षाचा दर हा व्याजाचा दर असेल त्यावर त्या वर्षापासून १० वर्षासाठी पेन्शन देण्यात येते.

४. मला दरमहा १,००० रुपये पेक्षा जास्त पेन्शन पाहिजे असल्यास, मी किती गुंतवणूक करावी?

-१.००० रुपया पेक्षा जास्त पेन्शन परतावा मिळविण्यासाठी तुम्हाला अधिक खरेदी किंमत भरणे आवश्यक आहे. जर तुम्हाला दरमहा ३,०८३ रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही ५,००,०० रुपये ची एक रक्कम भरून योजना खरेदी करू शकता.

माझी कन्या भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येते click करा

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी बद्दल जाणून घेण्यासाठी येते click करा

भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा

Follow Social Media Page