Pradhanmantri Suryoday Yojana 2025
Pradhanmantri Suryoday Yojana 2025 | एक कोटी नागरिकांना मिळणार सोलार पॅनेल : अयोध्यामध्ये श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठे नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरित ऊर्जेच्या दिशेने पाऊल टाकले आहे. श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करून दिल्लीला परतल्यानंतर मोदींनी देशभरातील १ कोटी घरांना सौरऊर्जेवरील छत देण्याची घोषणा आहे. ही सुविधा प्रधानमंत्री सूर्योदय योजनाच्या अंतर्गत देण्यात येणार आहे. देशातील अल्प-मध्यम उत्पन्न असलेल्या नागरिकांच्या घराच्या छतावर या योजने अंतर्गत सौर पॅनेल बसवले जाणार आहेत. प्रधानमंत्री सूर्योदय योजने अंतर्गत १ कोटी नागरिकांना याचा लाभ होणार आहे. ही सौरऊर्जा पॅनेल सूर्यप्रकाशात चार्ज होणार आणि नागरिकांना मोफत वीज पुरवठा होईल. यामुळे विजेची बचत होईल आणि नागरिकांचा खर्चही वाचणार.
देशातील नागरिकांना मोफत वीज मिळावी यासाठी केंद्र सरकारने ही योजना आखली आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक घरावर सौरऊर्जा पॅनेल बसवण्यात येणार आहेत. त्यांना शासनाकडून ३०० युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे. एक किलोवॅट सौरऊर्जा पॅनेल बसवण्यावर ३०,००० रुपये, दोन किलोवॅट सौरऊर्जा पॅनेल वर ६०,००० रुपये आणि तीन किलोवॅट सौरऊर्जा पॅनेल च्या स्थापनेवर ७८,००० रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

Pradhanmantri Suryoday Yojana 2025 : हायलाईट
योजना | प्रधानमंत्री सूर्योदय योजना |
केव्हा सुरु झाली | २२ जानेवारी २०२४ |
सबसिडी किती मिळणार | ६० % |
लाभ | वीजेची बचत करण्यासाठी होणार मदत |
उद्देश | १ कोटी नागरिकांच्या घरांवर बसणार सौर पॅनेल |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | pmsuryaghar.gov.in |
Pradhanmantri Suryoday Yojana 2025 : उद्देश
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४ ही केंद्र सरकारची नवीन योजना घोषित करण्यात आली आहे.
- या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे १ कोटी गरीब व मध्यम कुटुंबाच्या घरच्या छतावर सोलार पॅनल बसवणे हा आहे.
- देशातील मध्यम आणि गरीब कुटूंबांसमोर सर्वात मोठी समस्या आहे महागाई आणि जास्त प्रमाणात येणारे वीज बिल या समस्यामधील महत्वाची भूमिका निभावतो.
- पीएम सुर्योदय योजना २०२४ देशातील गरीब जनतेला या महागड्या बिलापासून सुटका करून देण्याचा एक प्रयत्न आहे.
- या योजने अंतर्गत सरकारद्वारे देशातील १ कोटी गरीब व मध्यम वर्गातील परिवारांच्या घरांवर सोलर पॅनल लावले जाणार. तसेच सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून सबसीडी देण्यात येणार आहे.
- या योजनेची योग्य पद्धतीने अमलबजावणी झाल्यास गरीब कुटूंबियाचे जीवनातील आर्थिक स्थितीवर एक सशक्त प्रभाव तर टाकेलच, तसेच सरकारची ऊर्जा संरक्षण नीतीमध्येही ही योजना एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार.
Pradhanmantri Suryoday Yojana 2025 : वैशिष्ट्ये
- या योजनेचा देशभरातील गरीब कुटुबांना वीज बिलापासून दिलासा देण्यासाठी घरांवर सोलर पॅनल लावून त्याचे वीज बिल कमी करणे या योजनेचा उद्देश आहे.
- या योजनेत जवळपास १ कोटी नागरिकांना सोलर पॅनल लावण्यासाठी केंद्र सरकार कडून सबसिडी देण्यात येणार आहे.त्यामुळे ही योजना सर्वांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
- पीएम सूर्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
- प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीय परिवारातील नागरिकांना होणार आहे.
Pradhanmantri Suryoday Yojana 2025 : पात्रता
पीएम सूर्योदय योजना २०२५ ची पात्रता काय, अटी बद्दल अजून अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र काही आधारभूत अटी, ज्या प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकार कडून निश्चित करण्यात येतात, त्या सर्व या योजनेसाठी ही असू शकतील. या बद्दल आपण जाणून घेऊ.
- प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही देशाचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- या योजनेच्या पात्रतेसाठी तुमचे स्वत:चे घर असणे गरजेचे आहे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने निश्चित केलेले सर्व कागदपत्रे तुमच्या कडे असणे आवश्यक आहे.
- ही योजना फक्त गरीब आणि मध्यम वर्गीयांसाठी आहे. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्ती दारिद्रय रेषेखालील किंवा मध्यम उत्पन्न गटातील असावा.
Pradhanmantri Suryoday Yojana 2025 : लाभ
- प्रधानमंत्री सूर्योदय योजना द्वारे देशातील गरीब परिवारातील लोक आणि सरकारलाही अनेक दीर्घकालीन लाभ होतील.
- सूर्योदय योजने अंतर्गत देशातील १ कोटी परिवाराला आपल्या महागड्या वीज बिलांपासून कायमची सुटका मिळणार. हा मोठा दिलासा आहे.
- या योजनेच्या माध्यमातून सरकार आपले सौर उर्जा संरक्षणाचे लक्ष ही पूर्ण करू शकेल.
- या योजने द्वारे गरिबांच्या घरांवर सोलर पॅनल लावले जाणार आहेत.
- सोलर पॅनल लावण्यासाठी सरकार तुम्हाला सबसिडी देणार आहे.
Pradhanmantri Suryoday Yojana 2025 : आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- उत्पन्न चा दाखला
- बँक खाते असणे आवश्यक आहे.
- रेशन कार्ड किंवा बिपीएल कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- लाभार्थ्यांचे नावाचे वीज बिल
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
Pradhanmantri Suryoday Yojana 2025 : कोणाला मिळणार लाभ
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या नागरिकांना मिळणार आहे. या योजनेसाठी अल्प मध्यम उत्पन्न वर्गातील नागरिक पात्र आहेत. पात्र असलेल्या नागरिकांच्या घरांना सौर उर्जेतून निर्माण होणारी वीज मोफत मिळणार आहे.
२५ वर्षासाठी केवल प्रतिदिन ८ रुपये दर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचा गरीब नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. सरकारच्या अधिकृत वेबसाईट नुसार ३ kw क्षमतेच्या प्लांट साठी प्रकल्पाची किंमत जवळपास १ लाख २६ हजार रुपये आहे. त्यापैकी सरकार ५४ हजार रुपये अनुदान म्हणून देणार आहे. म्हणजेच हा प्लांट तयार करण्यासाठी तुम्हाला केवळ ७२ हजार रुपयांचा खर्च करावा लागेल. हा तयार करण्यात आलेला सौर उर्जेचा प्लांटचे आयुष २५ वर्ष असेल. त्यानुसार २५ वर्ष विजेसाठी तुम्हाला दररोज फक्त ८ रुपये खर्च करावे लागतील.त्यामुळे नागरिकांचा एक प्रकारे फायदाच आहे. या योजनेचा लाभार्थ्यांची प्रत्येक महिन्याला भरावे लागणाऱ्या बिलातून सुटका होणार आहे.
सोलर पॅनल योजने द्वारे १ कोटी परिवारांना मिळणार मोफत वीज :
प्रधानमंत्री सूर्योदय योजने द्वारे देशातील १ कोटी हून अधिक परिवारांना वार्षिक १८,००० कोटी रुपयांची बचत करता येईल अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सितार मन यांनी अर्थ संकल्प सादर करत असताना दिली होती. तसेच सूर्योदय योजने मुळे नागरिकांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होणार.
१८ हजार कोटींची होणार बचत :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्यातील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमातून परतल्यानंतर प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली होती. या योजने अंतर्गत जवळपास १ कोटी घरांवर सोलार पॅनल बसवण्यात येणार आहेत.असे मोदींनी सांगितले. नुकत्याच झालेल्या २०२४ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा करून असे सांगितले की एका कुटुंबाला कमीत कमी ३०० युनिट वीज वाचवता येणार. असा सौर पॅनल छतावर बसवणार आहोत. त्यामुळे १८००० कोटींची बचत होणार. यामुळे वीज वाचण्यास मोठी मदत होईल कोट्यवधी परिवार ही वीज वाचवणार आणि तसेच वीज कंपन्यांना ही कुटुंबे वीज वाचून हातभार लावतील, ही वीज कंपन्यांना विकून त्यातून उत्पन्न वाढवू शकतील.
२०७० पर्यंत निव्वळ शून्य लक्ष :
२०२४ च्या अर्थसंकल्पनात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी असे सांगितले की २०७० पर्यन्त आपल्याला “नेट झीरो” ही लक्ष्य साध्य करायचे आहे. या सौर उर्जेसोबतच पवन ऊर्जा स्त्रोतांचा पाठपुरावा करण्यासाठी सरकार आणखीन निधीची व्यवस्था करत आहे. सरकार वीज कंपन्यांना पवन उर्जेद्वारे १००० मेगावॅट वीजनिर्मिती करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. आणि तसेच बायोगॅस बनवण्यासाठी जी आवश्यक उपकरणे असतात ते उपकरणे खरेदी करण्यासाठी सरकार मदत करणार आहे.
Pradhanmantri Suryoday Yojana 2025 : या योजनेतून होणार रोजगार निर्मिती
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या माध्यमातून अशी आशा निर्माण केली आहे की देशात एलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. या योजनेतून निर्माण होणाऱ्या उर्जेचा पुरवठा करण्यासाठी त्याचे कौशल्य असलेल्या तरुणांना रोजगार मिळेल त्यामुळे रोजगारांच्या अनेक संधी निर्माण होतील.
Pradhanmantri Suryoday Yojana 2025 : अर्ज करण्याची पद्धत
- प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२५ साठी अर्ज करायचा आहे आपल्या घरावर सोलर पॅनल लावायचे आहे आणि यासाठी तुम्हाला सबसिडी हवी आहे यासाठी तुम्हाला या योजने साठी सर्वप्रथम अर्ज करावा लागेल.
- प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२५ साठी अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाईट पीएम सूर्योदय योजना २०२५ https://solarrooftop.gov.in या साइटवर भेट द्या.
- त्यानंतर तुमच्यासमोर आलेल्या पीएम सूर्योदय योजना २०२५ नोंदणीवर क्लिक करा. या योजनेवर मागण्यात आलेली सर्व माहिती तुम्ही भरा त्यानंतर सर्व माहिती चेककरून सबमिट बटणावर क्लिक करा. अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२५ साठी आपला अर्ज करू शकता आणि सोलर पॅनल लावण्यासाठी सबसिडी प्राप्त करू शकता.
६० टक्के सबसिडी मिळणार आता :
या पूर्वी नागरिकांना घरावर सोलार पॅनल बसविण्यासाठी सरकारकडून ४० टक्के सबसिडी मिळत होती मात्र आता प्रधानमंत्री सूर्योदय योजने अंतर्गत ६० टक्के सबसिडी देण्यात येणार आहे. बाकीची ४० टक्के रक्कम तुम्ही कर्ज स्वरूपात घेऊ शकता अशी माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी दिली आहे.
Pradhanmantri Suryoday Yojana 2025 : सतत विचारले जाणारे प्रश्न
१. प्रधानमंत्री सूर्योदय योजना म्हणजे काय ?
केंद्र सरकारच्या वतीने गरिबांना मोफत वीज मिळावी यासाठी सोलार पॅनल च्या माध्यमातून मोफत वीज देण्यात येणार आहे.
२.प्रधानमंत्री सूर्योदय योजना केव्हा सुरु करण्यात आली ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०२४ रोजी आयोध्यातील श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करून दिल्लीला परत गेल्यानंतर या योजनेची घोषणा करण्यात आली आहे.
३.प्रधानमंत्री सूर्योदय योजने अंतर्गत सबसिडी किती टक्के मिळणार ?
प्रधानमंत्री सूर्योदय योजने अंतर्गत आता ६० टक्के सबसिडी मिळणार आहे.
४.प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ कोणाला मिळतो ?
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो.
- Pradhanmantri Suryoday Yojana 2025|एक कोटी नागरिकांना मिळणार सोलार पॅनेल या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत website ला भेट द्या.
- Maharashtra Shasan Aaplya Dari Yojana 2025| शासन आपल्या दारी योजना या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा.
- PM Krushi Sinchan Yojana 2025 | कृषी सिंचन योजना शेतकऱ्यासाठी ठरतेय लाभदायक या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा.