Pradhanmantri Lakhapati Didi Yojana 2024 |देशातील तब्बल ९ कोटी महिलांना होणार लाभ

Pradhanmantri Lakhapati Didi Yojana 2024

Pradhanmantri Lakhapati Didi Yojana 2024 | देशातील तब्बल ९ कोटी महिलांना होणार लाभ : लखपती दीदी योजनेचा फायदा देशातील ८३ लाख बचत गटाशी जोडल्या गेलेल्या तब्बल ९ कोटी महिलांना होणार आहे. देशभरातील महिलांना आर्थिक द्रुष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारच्या अंतर्गत प्रधानमंत्री लखपती दीदी  ही योजना सुरू करण्यात आली आहे.नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी १ फेब्रुवारी २०२४ या दिवशी सादर केला. या वेळी निर्मला सितारामन यांनी महिलांच्या कल्यानासाठी करण्यात आलेल्या अनेक उपाय योजनाची माहिती दिली.

गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर भाषण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी योजेनेची घोषणा केली होती. ग्रामीण भागातील महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना बचत गटा मार्फत प्रशिक्षण देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्या नंतर २०२३ च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने या योजनेची घोषणा केली होती. आता सरकारने या योजनेचा विस्तार करत देशातील ३ कोटी महिलापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्याचे लक्ष असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Pradhanmantri Lakhapati Didi Yojana 2024 देशातील तब्बल ९ कोटी महिलांना होणार लाभ

Pradhanmantri Lakhapati Didi Yojana 2024 : संपूर्ण माहिती

लखपती दीदी योजने अंतर्गत महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच बचत गटाशी संबंधीत असलेल्या महिलांना सरकारकडून कर्जही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. लखपती दीदी योजने अंतर्गत उत्तराखंड राज्य सरकार महिला बचत गटांना बिनव्याजी ५ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे महिलांना लखपती बनवण्यास मदत होत आहे. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक राज्य सरकार देखील आर्थिक मदत करत आहेत.

बचत गटामध्ये बँकवाली दीदी,अंगणवाडी वाली दीदी, इ. समावेश असून. लखपती दीदी योजने अंतर्गत बचत गटाशी संबंधित जवळपास १० कोटी महिलांना एलईडी बल्ब, ड्रोन दुरुस्ती, प्लंबिंग,या बाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.व महिलांना लखपती म्हणजेच स्वावलंबी बनवण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट २०२३ रोजी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना आर्थिक द्रुष्ट्या सक्षम करण्यासाठी लखपती दीदी योजनेची घोषणा करण्यात आली होती. लखपती दीदी ही योजना देशभरातील महिलांसाठी चालवल्या जात असलेल्या बचत गटाशी संबंधित आहे. 

लखपती दीदी हा एक महिलांसाठी कौशल्य विकास उपक्रम असून  या द्वारे देशभरातील महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लखपती दीदी योजनेस पात्र असलेल्या महिलांना स्वयं रोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी १ ते ५ लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे.आर्थिक द्रुष्ट्या वंचित असलेली महिलांना स्वतःच्या पायावर उभी करण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी ही योजना केंद्र सरकार राबवीत आहेत.

देशभरातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी ५ लाखाचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहेत. यामुळे महिलांना रोजगार मिळणार व त्यांच्या राहणीमानात सुधारणा होणार , त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढून खऱ्या अर्थाने स्वावलंबी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत बचत गटाशी निगडीत असलेल्या महिला स्वतःचे उद्योग सुरू करत असून त्यांच्यासह काम करणाऱ्या इतर महिलांचीही आर्थिक स्थिति यामुळे सुधारणार आहे.

Pradhanmantri Lakhapati Didi Yojana 2024 : हायलाईट

योजना प्रधानमंत्री लखपती दीदी योजना
केव्हा सुरु झाली लाल किल्यावर १५ ऑगस्ट २०२३ रोजी घोषणा करण्यात आली
कर्ज किती मिळणार १ ते ५ लाखाचे बिनव्याजी कर्ज
उद्देश महिलांना लखपती बनवणे
लाभ कोणाला मिळणार बचत गटाशी संबधित असलेल्या महिलांना
अर्ज प्रक्रिया ऑफलाईन / ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट https://lakhpatididi.gov.in/

Pradhanmantri Lakhapati Didi Yojana 2024 : वैशिष्ट्ये

  • या योजने अंतर्गत महिलांना बचत करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येते.
  • महिलांना या योजने अंतर्गत छोटे कर्ज सहज उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म कर्ज सुविधा देण्यात आलेली आहे.
  • लखपती दीदी योजना कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे काम करते.
  • केंद्र सरकारने महिलांना आर्थिक द्रुष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी लखपती दीदी योजना सुरू करण्यात आली आहे.
  • देशातील प्रत्येक महिलेला आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून १ ते ५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे.
  • या योजनेद्वारे महिलांना विमा संरक्षण आणि  आर्थिक सुरक्षा देण्यात येते.
  • महिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी लखपती दीदी योजने अंतर्गत विविध सशक्तीकरण कार्यक्रम चालविण्यात येतात.
  • आता पर्यंत तब्बल १ कोटी महिलांना लखपती दिदी बनविण्यात आले आहे.
  • २०२४ च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
  • महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी आर्थिक साक्षरता कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत.
  • या योजने अंतर्गत उद्योजक होण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
  • महिलांना डिजिटल साक्षर करण्यासाठी डिजिटल बँकिंग सेवा, डिजिटल प्लॅटफॉर्म पेमेंट, आणि मोबाइल वॉलेट वापरण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहित केले जाणार आहे.

Pradhanmantri Lakhapati Didi Yojana 2024 : ३ कोटी महिलांना लखपती बनवण्याचे लक्ष्य

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आपल्या सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना या निवडणूक वर्षात लखपती दीदी योजनेचा प्रसार केला जाणार असल्याचे सांगितले होते. अर्थमंत्री सितारामन म्हणाल्या की आत्तापर्यंत तब्बल १ कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्यात आले आहे . त्यामुळे ९ कोटी महिलांचे आयुष्य बदलले आहे. आत्ता या योजने अंतर्गत ३ कोटी महिलांना लखपती  दीदी बनवण्याचे सरकारने लक्ष्य ठेवले आहे. यापूर्वी आम्ही २ कोटी महिलांना लखपती  बनवण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्यात या अर्थसंकल्पनात वाढ करून ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून. या अंतर्गत आता १ कोटी महिलांना लखपती दिदीसाठी प्रमोट करण्यात येत आहे.

Pradhanmantri Lakhapati Didi Yojana 2024 : फायदे

  • लखपती दीदी योजने अंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी मार्गदर्शकत्वे देण्यात येतात.
  • व्यवसाय योजना, मार्केटिंग धोरणे, आणि बाजारात आपले उत्पादन कसे पोहचवावे या बाबत माहिती देण्यात येते.
  • देशातील महिलांना आपल्या पायावर उभे करून त्यांना स्वावलंबी बनवणे हा लखपती दीदी योजनेचा उद्देश आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या महिला आणि बचत गटांना विविध प्रकारचे फायदे होत असतात.
  • लखपती दीदी योजने द्वारा महिलांना कर्ज सुविधा देण्यात आली आहे. ज्या मुळे त्यांना त्यांचा व्यवसाय मुलांची शिक्षण किंवा इतर काही गरजा यासाठी मदत होणार . एवढेच नाही तर काही सरकार त्यांना बिनव्याजी कर्ज सुविधा देखील देतात.
  • लखपती दीदी योजना महिलांना आर्थिक सुरक्षितेसाठी कमी खर्चात विमा संरक्षण देते आणि आर्थिक माहितीही देण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत सरकार एक कार्यशाळा आयोजित करते, या कार्यशाळेत बचत, गुंतवणूक, बजेट, आर्थिक पर्यायांशी संबंधित माहिती देण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत महिलांना बचत करण्यासाठी त्यांच्या मनात उत्साह निर्माण करण्यात येतो.

Pradhanmantri Lakhapati Didi Yojana 2024 : आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • पॅन कार्ड
  • पत्याचा पुरावा ( लाईट बिल. आधार कार्ड )
  • बँक खाते पासबुक
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र

Pradhanmantri Lakhapati Didi Yojana 2024 : पात्रता

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याची कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • लखपती दीदी योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतील.
  • या योजनेसाठी महिला बचत गटाशी संबंधित असणे बंधनकारक आहे.
  • त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न ही ३ लाखा पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • महिलेचे वय १८ वर्ष ते ५० वर्षा च्या दरम्यान असेल तरच ती महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार.

Pradhanmantri Lakhapati Didi Yojana 2024 : अर्ज करण्याची पद्धत

उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड या राज्यांमध्ये लखपती दीदी योजना सुरू करण्यात आली आहे. सध्यातरी आपल्याला अर्ज करण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाइटला https://lakhpatididi.gov.in/ भेट द्या. सध्या लखपती दीदी योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही खालील पद्धती वापरु शकता.

लखपती दीदी योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील, शहरातील स्थानिक जवळच्या बचत गटाला भेट द्या. सविस्तर माहिती तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रातून मिळऊ शकतात.

यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तुम्ही जमा करा. यात आधार कार्ड, बँक खाते पासबूक, स्वयं साहायता समूह नोंदणी प्रमाणपत्र आणि व्यवसाय, योजनांचा समावेश आहे.

स्थानिक कार्यालयात जाऊन तुम्ही तुमचा अर्ज स्वयं साहायता समूहाकडे जमा करा. ते तुमच्या अर्जाची तपासणी करणार. आणि तुमचा अर्ज सरकारकडे पाठविण्यात येणार.

तुम्ही केलेला अर्ज सरकारी अधिकारी तपासतील आणि तुमचा अर्ज योग्य असल्यास तुम्हाला कर्ज मिळण्यास सरकारची मदत होणार.

Pradhanmantri Lakhapati Didi Yojana 2024 : ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

  • सर्वप्रथम तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला महिला व बालविकास कार्यालयात जावे लागणार .
  • तुम्हाला तेथील कर्मचाऱ्याकडून लखपती दीदी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • तुम्हाला त्या अर्जात जी माहिती दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचून ती भरावी लागेल.
  • या नंतर सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्हाला त्या अर्जासोबत जोडावी लागतील.   
  • हा फॉर्म आणि त्याला जोडलेली कागदपत्रे तुम्हाला तेथील कर्मचाऱ्याला द्यावे लागतील.
  • त्या नंतर ते तुम्हाला एक पावती देतील ती पावती तुम्हाला व्यवस्थित सांभाळून ठेवावी लागेल.

Pradhanmantri Lakhapati Didi Yojana 2024 : ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया

  • लखपती दीदी योजना या योजनेचा ऑनलाइन फॉर्म भरण्याकरीता सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तिथे होमपेज दिसणार.
  • या नंतर तुम्हाला apply Lakhpati Didi Yojana या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा अर्जाचा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होणार.
  • तुम्हाला तो फॉर्म काळजीपूर्वक वाचून व्यवस्थित माहिती भरावी लागणार.
  • त्या नंतर आपण वरती आवश्यक कागदपत्राची यादी दिलेली आहे त्या प्रमाणे आपली आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ती अपलोड करावी लागतील.
  • या नंतर खाली submit या बटनावर क्लिक करावे लागेल.
  • त्या नंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची पावती मिळेल जी तुम्हाला प्रिंट करायची आहे त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा.

निष्कर्ष :-

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी योजना २०२४ सुरू करण्यात आली आहे . या योजनेअंतर्गत बचत गटाशी संबंधित असलेल्या महिलांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यांना आर्थिक मदत होते. त्यांचे उत्पन्न वाढते त्या या योजनेच्या नावाप्रमाणेच लखपती होऊ शकतात. महिला बचत गटामध्ये एलईडी बल्ब बनविणे, प्लंबिंग, ड्रोन रीपेयरिंग इत्यादि तांत्रिक कामे शिकवले जाते आणि यातून त्यांचे उत्पन्न वाढत असते.

लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना विविध प्रकारची कलाकौशल्य शिकविण्यात येतात . त्यांना आर्थिक द्रुष्ट्या सक्षम बनविण्यात येते. त्यांना कर्जसुविधा देण्यात येते. महिलांना आर्थिक व्यवहाराची माहिती देण्यासाठी कार्यशाळा घेतल्या जातात. या योजनेअंतर्गत त्यांना छोटी कर्जे व्यवसायिक प्रशिक्षण बचत उद्योजक्ता समर्थन आणि विमा संरक्षण देण्यात येते. सरकार त्यांना चांगली बाजारपेठ मिळून देण्याचा प्रयत्न करत आहे . या योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांना स्वयं सहायता समूहाचा भाग असणे आवश्यक असते. याचा अनेक महिला लाभ घेत आहेत.

Pradhanmantri Lakhapati Didi Yojana 2024 : विचारले जाणारे प्रश्न

१. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी योजनेची घोषणा केव्हा केली ?

-१५ ऑगस्ट २०२३ रोजी लाल किल्यावर नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी योजनेची घोषणा केली.

२. प्रधानमंत्री लखपती दीदी योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

– प्रधानमंत्री लखपती दीदी योजनेचा अर्ज करण्यासाठी जवळच्या अंगनवाडीशी संपर्क करावा.

३. प्रधानमंत्री लखपती दीदी या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असतील ?

– प्रधानमंत्री लखपती दीदी योजनेसाठी त्या महिला बचत गटाशी संपर्क असावा आणि त्या महिलेचे १८ ते ५० वर्षाच्या दरम्यान असावे.

  • Pradhanmantri Lakhapati Didi Yojana 2024 |देशातील तब्बल ९ कोटी महिलांना होणार लाभ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत website ला भेट द्या.
  • राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना २०२४ बद्दल माहिती घेण्यसाठी आमच्या website ला भेट ध्या
  • Ration Card New Update 2024|राशन कार्ड नवीन माहिती २०२४ साठी आमच्या website ला भेट द्या .
  • RTE Private School Admission Open|आरटीई द्वारे खाजगी शाळेत २५ % पुन्हा ऍडमिशन सुरु २०२५-२६ माहिती जाणून घेण्यसाठी येते click करा .
  • EPFO NEW UPDATE 2024 |पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्ड द्वारे काढता येणार याची माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा.