Pradhanmantri E-Drive Subsidy Yojana 2025
Pradhanmantri E-Drive Subsidy Yojana 2025|इलेक्ट्रिक वाहनांवर मिळणार आता सबसिडी : देश भरातील वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण पाहता सरकारने ईव्ही वाहनांना भरपूर प्रोत्साहन दिले आहे. मोदी सरकारने सणासुदीच्या आधी इलेक्ट्रिक वाहनांसाठी आपली सबसिडी योजना सुरु केली. यासाठी केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीसाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेला इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजना हे नाव देण्यात आले आहे. या योजनेच्या अंतर्गत दुचाकी, तीन चाकी आणि अवजड वाहन खरेदीसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते. जेणेकरून देशातील अधिकाधिक नागरिकांनी वाहनांची खरेदी करावी हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.
या योजने अंतर्गत देशातील सर्व नागरिकांना लाभ मिळेल ज्यांना इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक मोटर सायकल किंवा इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची आहे. सरकारच्या या नवीन सबसिडी योजने मुळे नागरिकांना ईव्ही वाहनांवर सूट मिळणार आहे. सरकारने आपल्या योजनेच्या सुरुवातीला १०,९०० कोटी रुपये खर्च करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. योजना सुरु केल्यानंतर सरकारने सांगितले कि, ही योजना सुरु करण्याचा उद्देश भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब वेगवान करणे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर ओपन करणे आणि ईव्ही प्रोडक्शनची इकोसिस्टम विकसित करणे हा आहे.

Pradhanmantri E-Drive Subsidy Yojana 2025 : माहिती
केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजना ही योजना सुरुवातीला एप्रिल २०२४ ते ३१ जुलै २०२४ पर्यंत सुरू करण्यात आली होती. आता ही योजना दोन महिन्यासाठी वाढवण्यात आली म्हणजे सप्टेंबर २०२४ पर्यंत योजना सुरू राहणार होती. आत्ता प्रोत्साहन फेम ३ योजनेला अंतिम स्वरूप मिळेपर्यंत या सध्याच्या योजना मुदतवाढ देण्यात येईल अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच डी कुमार स्वामी यांनी वार्षिक अधिवेशनात बोलताना दिली आहे.यावेळेस बोलत असताना कुमार स्वामी म्हणाले की वेगाने स्वीकार आणि निर्मिती हे योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला अद्याप अंतिम स्वरूप मिळाले नाही यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो.
फेम 3 ची घोषणा होईपर्यंत उद्योगांनी घाबरून जाऊ नये अशा आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले आहे. केंद्र सरकारने देशातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढावी यासाठी ही योजना सुरू केली. या योजनेची घोषणा मार्च महिन्यात करण्यात आली ही योजना १ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीसाठी प्रथम सुरू करण्यात आली, यासाठी ५०० कोटी रुपये करण्यात आली होती. या योजनेत सरकारकडून ही दुचाकीसाठी प्रत्येकी १० हजार रुपयापर्यंत आणि ३ चाकी वाहनासाठी प्रत्येकी २५ हजार रुपये पर्यंत अनुदान देण्यात येते. याबरोबरच अवजड तीन चाकी वाहनासाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा अनुदान केंद्र सरकारकडून दिले जाते.
Pradhanmantri E-Drive Subsidy Yojana 2025 : उद्दिष्ट
- केंद्र सरकारचा या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ५०००७८९ इलेक्ट्रिक वाहनांना अनुदान देणे हा आहे.
- यात ५०००८० इलेक्ट्रिक दुचाकी आणि ६०७०९ इलेक्ट्रिक तीन चाकी वाहनांना अनुदान देणे.
- या योजनेच्या माध्यमातून १३५९० रिक्षा इ कोर्ट आणि एल फाईव्ह कॅटेगिरी मध्ये ४७ हजार ११९ इलेक्ट्रिक तीन चाकी वाहनांचा समावेश करण्यात आलेला आहे.
Pradhanmantri E-Drive Subsidy Yojana 2025 : योजनेचा लाभ कोणाला मिळणार
- पेट्रोल आणि डीझेल वाहनांना पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणाऱ्यांना प्रधान मंत्री E-Drive योजनेचा लाभ मिळणार.
- या योजनेत तुम्ही अम्ब्युलन्स सह इलेक्ट्रिक टू-व्हीलर, इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर, इलेक्ट्रिक बस आणि ट्रक खरेदी करू शकता.
- प्रधानमंत्री E-Drive योजना २ वर्षासाठी लागू करण्यात आली आहे, म्हणजेच प्रधान मंत्री E-Drive योजना ३१ मार्च २०२६ पर्यत लागू असणार, ज्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर सबसिडी मिळवू शकता.
२०२६ पर्यंत मिळणार स्कीमचा फायदा :
प्रधान मंत्री ई-वाहन योजना १ ऑक्टोबर २०२४ रोजी सरकारने सुरु केली आणि ही योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू राहणार.तसेच या योजने अंतर्गत तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनांवर थेट सबसिडी मिळणार नाही. सरकार कंपन्यांना सबसिडी देणार आणि नंतर कंपन्या सबसिडीची रक्कम प्रोडक्शन च्या किमतीतून वजा करून ग्राहकाला विकणार.
ई-व्हाऊचर ची सुविधा :
ही संपूर्ण प्रक्रिया अखंडित करण्यासाठी मोबाईल App चा वापर करण्यात येणार. याद्वारे योजने अंतर्गत सबसिडी मिळवण्यासाठी ई-व्हाउचर तयार करता येईल.केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले होते कि, या योजने अंतर्गत एका आधार नंबर फक्त एका वाहनाला परवानगी देण्यात येणार आणि ते वाहन विकल्या बरोबर ई व्हाउचर तयार करण्यात येणार.
योजनेअंतर्गत मागणी प्रोत्साहन मिळण्यासाठी एमएचआय ईव्ही खरेदीदारांसाठी ई-व्हाउचर सादर करत आहे. ईव्हीच्या खरेदीच्या वेळी, योजना पोर्टल खरेदीदारासाठी आधार प्रमाणीकृत ई-व्हाउचर तयार करणार. ई-व्हाउचर डाउनलोड करण्यासाठी एक लिंक खरेदीदाराच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवली जाईल. या ई-व्हाउचरवर खरेदीदाराची स्वाक्षरी केली जाणार.योजनेअंतर्गत मागणी प्रोत्साहन मिळण्यासाठी डीलरला सादर केले जाईल. त्यानंतर, ई-व्हाऊचरवर डीलरची स्वाक्षरी देखील केली जाईल आणि PM E-DRIVE पोर्टलवर अपलोड करण्यात येणार. स्वाक्षरी केलेले ई-व्हाउचर एसएमएसद्वारे खरेदीदार आणि डीलरला पाठवण्यात येणार. योजने अंतर्गत मागणी प्रोत्साहनांच्या प्रतिपूर्तीचा दावा करण्यासाठी OEM साठी स्वाक्षरी केलेले ई-व्हाउचर आवश्यक असेल.
ई-इलेक्ट्रिक ट्रक आणि स्क्रॅपिंग केंद्रे : वायू प्रदूषणात ट्रकचा मोठा वाटा आहे. ही योजना देशात ई-ट्रकच्या तैनातीला प्रोत्साहन देईल. ई-ट्रकला प्रोत्साहन देण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे MoRTH-मंजूर वाहन स्क्रॅपिंग सेंटर कडून स्क्रॅपिंग प्रमाणपत्र आहे त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार.
ई-ॲम्ब्युलन्स: या योजनेत ई-ॲम्ब्युलन्स तैनात करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आरामदायी रुग्ण वाहतुकीसाठी ई-ॲम्ब्युलन्सच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारचा हा एक नवीन उपक्रम आहे. MoHFW, MoRTH आणि इतर संबंधित भागधारकांशी सल्लामसलत करून ई-ॲम्ब्युलन्सची कार्यक्षमता आणि सुरक्षा मानके तयार करण्यात येतील.
72,000 हून अधिक फास्ट चार्जर्सची स्थापना: ही योजना इलेक्ट्रिक वाहन सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स च्या स्थापनेला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊन EV खरेदीदारांच्या चिंता दूर करते. हे EVPCS उच्च EV प्रवेश असलेल्या निवडक शहरांमध्ये आणि निवडक महामार्गांवर देखील स्थापित करण्यात येतील. या योजनेत ई-४ Ws साठी २२,१०० जलद चार्जर, ई-बससाठी १८०० जलद चार्जर आणि e-2W/3Ws साठी ४८ ,४०० जलद चार्जर स्थापित करण्याचा प्रस्ताव आहे. EV PCS चा खर्च रु.२,००० कोटी असेल.
ई-इलेक्ट्रिक बसेस: एसटीयू/सार्वजनिक वाहतूक एजन्सीद्वारे १४,०२८ ई-बसच्या खरेदीसाठी रु.४,३९१ कोटी प्रदान करण्यात आले आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, सुरत, बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद या ४० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या नऊ शहरांमध्ये मागणी एकत्रीकरण CESL द्वारे करण्यात येईल. राज्यांशी सल्लामसलत करून आंतरशहर आणि आंतरराज्यीय ई-बसनाही पाठिंबा देण्यात येईल. शहरे/राज्यांना बसेसचे वाटप करताना, एमओआरटीएच व्हेईकल स्क्रॅपिंग स्कीम मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून अधिकृत स्क्रॅपिंग केंद्रांद्वारे (RVSFs) जुन्या एसटीयू बसेस स्क्रॅप केल्यानंतर खरेदी केल्या जाणाऱ्या शहरे/राज्यांच्या बसेसना प्रथम प्राधान्य देण्यात येणार.
Pradhanmantri E-Drive Subsidy Yojana 2025 : इलेक्ट्रिक टू-व्हीलर वर सबसिडी
प्रधान मंत्री ई-वाहन योजने अंतर्गत सरकारने सर्व विभागांसाठी वेगवेगळ्या सबसिडी देऊ केल्या आहेत. इलेक्ट्रिक टू-व्हीलर साठी सबसिडी बॅटरी पॉवरच्या आधारावर ठरवण्यात आली आहे. टू-व्हीलर साठी पॉवर च्या आधारे सबसिडी ५,००० रुपये प्रती किलोवॅट असेल जि योजनेच्या दुसर्या वर्षात प्रति किलोवॅट तास २, ५०० रुपये केली जाणार. या योजने अंतर्गत ई-२ डब्ल्यू, ई-३ डब्ल्यू, ई-अम्ब्युलन्स, ई-ट्रक आणि इतर ईव्हिला प्रोत्साहन देण्यासाठी ३,६७९ कोटी रुपयांची सबसिडी देण्यात आली आहे. २४.७९ लाख इलेक्ट्रिक दुचाकी, ३.१६ लाख इलेक्ट्रिक थ्री व्हीलर आणि १४, ०२८ ई-बससाठी सबसिडी देण्यात आली आहे. तसेच ई-रिक्षा व इतर तीन चाकी वाहनांना पहिल्या वर्षी २५,००० रुपये सबसिडी मिळणार.
Pradhanmantri E-Drive Subsidy Yojana 2025 : अनुदान किती मिळते
इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजनेच्या अंतर्गत सरकारकडून दूचाकी आणि तीन चाकी ई वाहन खरेदीसाठी ५ हजार रुपये प्रति KWH ही प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. तसेच सरकारकडून माहिती देण्यात आली आहे की अनुदान केवळ चांगली बॅटरी असणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांनाच हे अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये दुचाकी खरेदीसाठी १० हजार रुपये तर तीन चाकी वाहन खरेदीसाठी २५ हजार रुपये अनुदान देण्यात येते.
Pradhanmantri E-Drive Subsidy Yojana 2025 : फेम ३ ची प्रतीक्षा
देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून फेम योजना सुरू करण्यात आली. ही योजना दोन टप्प्यात समाप्त झाली आहे. त्यानंतर टाटा curvv EV ची रेंज आणि बॅटरी पॅक डिटेल्स समोर आली आहे. यामध्ये दहा मिनिट चार्जिंग केल्यानंतर शंभर किमी फेम ३ योजना लागू केली जाणार आहे. पण आता यासाठी वेळ लागू शकतो नुकतेच केंद्रीय मंत्री एचडी कुमार स्वामी म्हणाले होते की सरकार इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन देण्यासाठी फेम ३ योजना वर काम करत आहे आणि लवकरच भविष्यात ते लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. पण यासाठी थोडी प्रतीक्षा ग्राहकांना करावी लागणार आहे. कारण केंद्र सरकारकडून फेम ३ योजना लागू करण्यात आलेली नाही, ती लवकरच लागू करण्यात येणार आहे.
Pradhanmantri E-Drive Subsidy Yojana 2025 : इलेक्ट्रिक ट्रक कडे काल वाढेल
नॅशनल हायवेज फॉर इलेक्ट्रिक व्हेइकल्स चे कार्यक्रम संचालक भिजित सिन्हा म्हणाले कि ई- ट्रक चा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रधान मंत्री ई-ड्राईव्ह मध्ये दिलेली ५०० कोटींची रक्कम ई-ट्रक साठी ३ दिवसांपूर्वी जरी करण्यात आली होती. ५०० कोटी रुपयांच्या मिश्रित हवामान वित्त पुरवठा साधनासह त्यांच्या तांत्रिक चाचण्या चेन्नई मध्ये सुरु होत आहेत.
- Pradhanmantri Gram Sadak Yojana 2025|आता खेड्या गावातील रस्ते होणार पक्के या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या website ला भेट द्या.
- PM E-Shram Card Pension Yojana 2025|आता दरमहा असंघटित कामगारांना मिळणार रु. ३,००० पेन्शन या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा.
- Pradhanmantri Swamitva Yojana 2025|ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार आपल्या संपत्तीचा हक्क या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा.