PMEGP Rojgar Yojana 2024 | प्रधानमंत्री रोजगार योजना मराठी
PMEGP Rojgar Yojana 2024 | प्रधानमंत्री रोजगार योजना मराठी :- भारत देश हा कृषिप्रधान देश असल्यामुळे आपल्या कडील लोकसंख्या जास्त प्रमाणात ग्रामीण भागात दिसून येते . ग्रामीण भागात जास्त करून शेती हा व्यवसाय केला जातो. परंतु शासनाच्या विविध योजनाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना सरकार अनेक प्रकारातून आर्थिक मदत करून स्वताचा उद्योग व स्वयंरोजगार निर्माण करून देण्यासाठी प्रोत्साहन करत आहेत.तसेच अर्थव्यवस्थेच्या बळकटी चा रोजगार निर्मिती हा एक महत्वाचा उपाय मानला जातो. व त्याच प्रमाणे देशाच्या बेरोजगारीचा दर त्या अर्थव्यवस्थेची कमजोरी अधोरेखित करतो.
केंद्र सरकार व राज्य सरकार देशातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकारचे रोजगार संबंधित योजना व तसेच योजनाच्या माध्यमातून नागरिकांना किमान वेतनाचा लाभ प्रदान करण्यात येतो.त्याचप्रमाणे नागरिकांसाठी कायमच्या रोजगार संधी उपलब्ध होतील या द्वारे शासन प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या विविध योजनांच्या माध्यमाद्वारे देशाची व राज्याची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि एकूण बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
सर्व वाचक मित्रानो, आपण आज केंद्र सरकारच्या काही अशाच महत्वाच्या व महत्वाकांशी योजना PMEGP योजना २०२४ मराठी संबंधित सर्व माहिती या लेखा मध्ये दिलेली आहे तर हा लेख तुम्ही पूर्णपणे वाचा. जसे कि, योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करणे, योजने संबंधित अर्ज करणे, योजनेचा लाभ, योजनेची पात्रता, PMEGP लोन योजना अप्लिकेशन.

PMEGP योजना २०२४ मराठी
केंद्र सरकार प्रधानमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व नागरिकांना जास्तीत जास्त व्यवसायासाठी कर्ज वाटप करण्याचा प्रयत्न करत आहेत.तसेच या प्रधानमंत्री रोजगार योजनेंर्गत व्यवसाय कर्ज घेण्या आधी योजना पूर्ण समजून घेणे गरजेचे आहे. देशातील ज्या नागरिकांना त्यांना स्वतः आपला व्यवसाय सुरु करायचा आहे. त्यांना PMEGP लोन या योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. प्रधानमंत्री रोजगार योजनेंर्गत व्यवसाय कर्ज घेण्यासाठी योजनेच्या नियमानुसार उमेदवाराला व्यवसाय कर्ज घ्यायचे असलेल्या संपूर्ण रक्कमेच्या १० % पर्यंत रक्कम स्वताची गुंतवणूक करावी लागते.याचा अर्थ एखद्या व्यक्तीला जर प्रधानमंत्री रोजगार योजनेंर्गत १० लाख रुपयांचे व्यावसायिक कर्ज घेण्यासाठी अर्ज केलेला असेल, तर त्या व्यक्तीला १० लाख रु .पर्यंतचे व्यावसायिक कर्ज घेण्यासाठी १० लाख रुपयांच्या १० % म्हणजेच १ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
PMEGP कर्ज योजनेच्या माध्यमातून व्यक्तीला व्यावसायिक कर्जाच्या एकूण रक्कमेच्या ९० % व्यवसाय कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.केंद्र सरकारने २०२० पर्यंत प्रधानमंत्री रोजगार योजनेंर्गत १४ लाख रोजगार निर्माण करण्याचे ध्येय ठेवले होते, तसेच यासाठी सरकार कडून २,३२७ करोड रुपयांचे प्रावधान देण्यात आले आहे. प्रधानमंत्री रोजगार योजना २०२४ मराठी या योजनेच्या माध्यमातून सेवा क्षेत्रांच्या संबंधित व्यवसाय सुरु करण्यासाठी १० लाख रुपयांच्या व्यावसाईक कर्जाचे प्रावधान व तसेच उत्पादन क्षेत्राच्या संबंधित व्यवसाय सुरु करण्यासाठी २५ लाख रुपयांचे व्यावसायिक कर्ज देण्याचे तरतूद करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री रोजगार योजना २०२४ मराठी सबसिडी आणि वैशिष्ट्ये
- प्रधानमंत्री रोजगार योजना २०२४ हि योजना २००८ ते २००९ या दरम्यान सुरु करण्यात आली. हि योजना एक क्रेडीट लिंक्ड सबसिडी योजना असून,या योजने मधून लघु आणि सूक्ष्म व्यवसायांच्या स्थापने द्वारे स्वयं रोजगाराला चालना देते.
- प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंर्गत सरकार सूक्ष्म व लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून २५ लाख रुपयांच्या व्यावसाईक कर्जासाठी आणि १० लाख रुपयांच्या व्यावसाईक कर्जासाठी ३५ % सबसिडी प्रदान करते.
- प्रधानमंत्री रोजगार योजनेंर्गत भेटणाऱ्या कर्जाची रक्कम एकूण प्रकल्पाच्या खर्चाची शिल्लक रक्कम बँकेच्या द्वारे मुदत कर्ज आणि खेळत्या भांडवलाच्या स्वरुपात दिली जाते.ही MSME मंत्रालयाची एक महत्वपूर्ण आणि प्रमुख योजना आहे.
- प्रधानमंत्री रोजगार योजना २०२४ हि योजना राष्ट्रीय स्तरांवर खादि आणि ग्राम उद्योग आयोग या नोडल एजन्सीच्या माध्यमातून राबविण्यात येते, तसेच राज्य स्तरांवर राज्य KVIC संचालन आणि राज्य खादी व ग्राम उद्योग मंडळे आणि जिल्हा उद्योग केंद्रे व प्रमुख बँका मधून राबविण्यात येते.
- प्रधानमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून सरकारने या योजनेला चालना देण्यासाठी चालू वर्षात पुढे ८० ,००० उद्योगांच्या स्थापनेला समर्थन देण्याचे लक्ष वाढविण्यात आलेले आहे.
- २०२० -२१ या आर्थिक वर्षात पहिल्या पाच महिन्यात प्रधानमंत्री रोजगार निर्मिती उपक्रम ( PMEGP )अंतर्गत प्रकल्पांच्या मंजुरीत ४४ % नी वाढ करण्यात आली आहे.
- प्रधानमंत्री रोजगार निर्मिती उपक्रमा अंतर्गत खाडी आणि ग्राम उद्योग आयोगाने २०१९ मधील याच कालावधीत ७१, ५५६ प्रकल्पांच्या तुलनेत १.०३ लाख प्रकल्प अर्ज मंजूर केले असून आणि ते बँकांना पाठविले आहेत.
- प्रधानमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या प्रकल्पांची जास्त संख्या ,स्थानिक उत्पादनाला चालना देऊन त्या क्षेत्रातील नागरिकांसाठी स्वयंरोजगार व शाश्वत उपजीविकेचे साधन निर्माण करण्याचा सरकार चा संकल्प दिसून येत आहे.
प्रधानमंत्री रोजगार योजना २०२४ : योजनेचे उद्देश
- प्रधानमंत्री रोजगार या योजनेंर्गत देशामध्ये लघु ,सूक्ष्म व मध्यम उपक्रम आणि स्वयंरोजगार निर्माण करून ग्रामीण आणि शहरी भागात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे.
- देशाच्या ग्रामीण किंवा शहरी भागात बेरोजगारीची समस्या सामान्य आहे,पाहिजे तसे तरुणांना काम मिळत नाही त्याच्या मुळे रोजगाराच्या संधी निर्माण करण्या बाबतचा केंद्र सरकारच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे हे सर्व लक्षात घेऊन सरकारने प्रधानमंत्री रोजगार योजना सुरु केली आहे.
- देशातील ग्रामीण व शहरी भागातील मोठ्या प्रमाणात विखुरलेलं पारंपारिक कारागीर या सर्वाना एकत्र आणून शक्य तितक्या त्यांच्याच ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देऊन व बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगारच्या संधी त्यांना उपलब्ध करून देणे.
- प्रधानमंत्री रोजगार योजनेच्या अंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगार तरूण ,पारंपारिक कारागीर यांना मोठ्याप्रमाणात शाश्वत रोजगार उपलब्ध करून देणे, ग्रामीण तरुणांचे शहराकडे जाण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
- या योजनेंर्गत त्या सर्व नागरिकांना कर्ज उपलब्ध करून दिले जातील ज्या नागरिकांना त्यांचा रोजगार निर्माण करायचा आहे,या योजनेच्या माध्यमातून देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होऊन देशातील नागरिक स्वावलंबी बनतील.
- ग्रामीण आणि शहरी भागातील रोजगारीच्या दरात वाढ करणे व त्यात योगदान देणे, तसेच कारागिरांची मजुरी मिळविण्याची क्षमता वाढवणे.
प्रधानमंत्री रोजगार योजना अंतर्गत वित्तीय संस्था
१ ) सार्वजनिक क्षेत्रातील बँका
२ ) भारतीय लघु उद्योग विकास बँक
३ ) सर्व प्रादेशिक ग्रामीण बँका
४ ) आयुक्त (उद्योग )
५ ) प्रधान सचिव (उद्योग (आयुक्त ) यांच्या अध्यक्षतेखाली
६ ) प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समिती
७ )राज्यस्तरीय टास्क फोर्स समितीने मंजूर केलेल्या सहकारी बँका
८ )खाजगी क्षेत्रातील अनुसूचित व्यावसायिक बँका राज्य स्तरावर मंजूर
प्रधानमंत्री रोजगार योजनेंर्गत श्रेणी
प्रधानमंत्री रोजगार कर्ज योजने अंतर्गत व्यवसाय कर्ज दोन श्रेणी मध्ये दिले जाते. ST ,SC ,अपंग ,महिला आणि सेवानिवृत्ती व्यक्ती.
खुल्या श्रेणी साठी प्रधानमंत्री रोजगार कर्ज योजना :
प्रधानमंत्री रोजगार योजनेंर्गत खुल्या प्रवर्गातील बेरोजगार तरुणांना ग्रामीण भागात नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी २५ % पर्यंत अनुदानाची तरतूद आहे एखाद्या व्यक्तीला शहरी भागात खुल्या प्रवर्गात व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यांच्या साठी १५ % अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच त्या व्यक्ती ला स्वताची १० % गुंतवणूक करावी लागेल. ग्रामीण भागात उद्योग / व्यवसाय सुरु करण्यासाठी ३५ % अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे.शहरी भागात उद्योग /व्यवसाय चालू करण्यासाठी २५ % अनुदानाची तरतूद केली आहे.तसेच त्यांना यामध्ये ५ % स्वता गुंतवणूक करावी लागेल.
प्रधानमंत्री रोजगार योजना २०२४ अंतर्गत पात्रता
- प्रधानमंत्री रोजगार कर्ज योजना २०२४ अंतर्गत अर्जदार किमान ८ वी पास असले पाहिजे.
- या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असणे.
- सोसायटी नोंदणी कायदा -१८६० अंतर्गत नोंदणीकृत संस्था
- बचत गट आणि धर्मादाय ट्रस्ट यांना या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळणार आहे.
- प्रधानमंत्री रोजगार योजनेंर्गत कोणत्याही शासकीय संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीला प्राधान्य दिले जाणार नाही.
- या योजनेंर्गत नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी हे कर्ज दिले जाणार आहे,यामध्ये तुमच्या जुना व्यवसाय पुढे नेण्यासाठी कर्ज दिले जाणार नाही.
- जर अर्जदाराने याच्या आधी इतर कोणत्याही सबसिडी योजनेचा लाभ मिळवला असेल तर त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
प्रधानमंत्री रोजगार योजना अंतर्गत वर्गाप्रमाणे यादी
- माजी सैनिक
- अपंग
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- इतर मागासवर्गीय
- उत्तर पूर्व राज्यातील नागरिक
- अल्पसंख्याक
- सीमावर्ती भागात आणि डोंगराळ भागात राहणारे नागरिक
- महिला
प्रधानमंत्री रोजगार योजना २०२४ मराठी अंतर्गत कागदपत्र
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- जातीचा दाखला
- मोबाईल नंबर
- पत्याचा पुरावा
- शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या visit
प्रधानमंत्री रोजगार योजना मराठी
प्रधानमंत्री रोजगार योजनेचे लाभ ( PMEGP ) :
- प्रकल्प उभारणीसाठी उत्पन्नाची कमाल मर्यादा नाही.
- योजना KVIC आणि राज्य /UT खादी व VI बोर्डामार्फत ग्रामीण भागात आणि शहरी भागातील जिल्हा उद्योग केंद्राद्वारे KVIC /KVIB /DIC मधील अनुक्रमे ३०:३०:४०:च्या प्रमाणात लागू केली जाईल.
- नकारात्मक यादीत नमूद केलेल्या प्रकल्पांना काढून कॉयर आधरित प्रकल्पांसह कुठलाही उद्योग
- PMEGP योजनेंर्गत सहाय्य फक्त स्थापन करण्यात येणाऱ्या नवीन युनिट्सना उपलब्ध आहे.
- विद्यमान युनिट्स किंवा युनिट्सनी आधीपासून कुठल्याही सरकारी योजनांचा लाभ घेतला असेल. राज्य /केंद्र सरकार अंतर्गत अनुदान योजना पात्र नाहीत.
- दरडोई गुंतवणूक रु. पेक्षा जास्त नसावी.१ .०० लाख मैदानी भागात आणि रु .डोंगराळ भागात १ .५० लाख
- जास्तीत जास्त प्रकल्प खर्च रु .२५ ०० लाख उत्पादन क्षेत्रात आणि रु . सेवा क्षेत्रात १० .०० लाख
- या योजनेंर्गत देशातील बेरोजगार तरुणांना स्वताचा उद्योग , रोजगार सुरु करण्यासाठी केंद्र शासनाकडून १० लाख ते २५ लाख पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत उद्योग
- कृषी आधारित अन्न प्रक्रिया
- रसायने /पॉलीमार आणि खजिने
- वन उद्योग
- दुग्धजन्य पदार्थ
- सिमेंट आणि संबंधित उत्पादने
- कोल्ड स्टोरेज आणि कोल्ड स्टोरेज सोल्युशन
- अन्न प्रक्रिया उद्योग
- इलेक्ट्रोनिक आणि इलेक्ट्रीकल उपकरणे
- लहान व्यवसाय मॉडेल
- कचरा व्यवस्थापन
- फलोत्पादन -सेंद्रिय शेती
- प्लास्टिक आणि संबंधित सेवा
- कागद आणि संबंधित उत्पादने
- कापड आणि पोशाख
- सेवा क्षेत्रातील उद्योग
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी बद्दल जाणून घेण्यासाठी येते click करा
माझी कन्या भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा
सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येते click करा
भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा
Follow Social Media Page