PM Krushi Sinchan Yojana 2025
PM Krushi Sinchan Yojana 2025 | कृषी सिंचन योजना शेतकऱ्यासाठी ठरतेय लाभदायक : प्रधान मंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत घ्या कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन.भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. आजही भारत देशामधील ९० % शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. दरवर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी अशा समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते.भारत देश कृषी प्रधान असून पण देशामध्ये मुबलक प्रमाणात सिंचनाच्या सुविधा पाहिजे त्या प्रमाणात नाही आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी प्रधान मंत्री कृषी योजना सुरु करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे अनियमित पावसामुळे होणारे शेतीचे नुकसान टाळता येऊ शकते. या योजनेच्या अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना शेतात सिंचन करण्यासाठी आणि त्या संबंधित उपकरण खरेदी करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत अनुदान दिले जाते.या योजने मार्फत मिळणारे अनुदान त्या शेतकऱ्याला आपल्या शेतात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून घेता येतील. देशातील प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतात सिंचन करण्यासाठी या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येते. आणि देशातील प्रत्येक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

PM Krushi Sinchan Yojana 2025 : माहिती
शेतीला मुबलक पाणी आणि सिंचनाची योग्य सुविधा असेल तर शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असते. त्यासाठी सिंचन ही महत्त्वाची बाब आहे. पिकांना योग्य वेळी पाणी न मिळाल्यास पीक वाया जाते. आणि यातून शेतकऱ्याला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते. मात्र, या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात सिंचन सुविधाची सोय उपलब्ध करून घेता येणार आहे. त्यामुळे शेतातील पिकांना योग्य वेळी पाणी देऊन भरघोस उत्पादन मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन साठी अर्ज करता येणार आहे. तसेच याद्वारे सिंचनाचे उपकरण खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सबसिडी सुद्धा देण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी त्यांच्या शेतात सिंचनाचे उपकरण घेऊन योग्यरित्या सिंचन करू शकणार, तसेच आपले उत्पादन वाढवून देशाच्या विकासात हातभार लावू शकते.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ बचत गट, ट्रस्ट सहकारी संस्था निगमित कंपन्या, उत्पादक शेतकरी, व इतर सदस्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी केंद्र सरकारने तब्बल ५० हजार कोटी रुपयांची तरतूद करून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेला कोणत्याही प्रकारचा निधी सरकारकडून कमी पडू दिल्या जाणार नाही. असे योजना सुरु करण्याच्या वेळी सांगण्यात आले आहे.
PM Krushi Sinchan Yojana 2025 : हायलाईट
योजना | प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना |
द्वारा सुरु | पंतप्रधान नरेंद्र मोदी |
केव्हा सुरु झाली | १ जुलै २०१५ |
लाभार्थी | देशातील सर्व शेतकरी |
उद्दिष्ट | शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | pmksy.gov.in |
PM Krushi Sinchan Yojana 2025 : वैशिष्ट्ये
- लहरी पावसापासून शेतीचे नुकसान होण्यास वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना सरकार द्वारे सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी सिंचन योजना सुरु केली आहे.
- या योजने अंतर्गत सरकार जल संचय, भूजल विकास आदि जलस्रोत निर्माण करत आहेत.
- सरकार शेतकऱ्यांना सिंचनाचे साहित्य खरेदी केल्या नंतर पण त्या सिंचन साहित्यावर मोठ्या प्रमाणात अनुदान देत आहेत.
- या योजने मुळे पिकांना योग्य वेळी पाणी देण्याची सुविधा उपलब्ध होत आहे. यामुळे शेतीचे उत्पादन वाढण्यात मोठे योगादन या योजनेचे आहे.
- सरकार द्वारे ठिबक सिंचन, तुषार सिंचन इ. खरेदी साठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे.
- या योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्या कडे स्वत:ची जमीन व पाण्याचे स्रोत आहे अशा सर्व शेतकऱ्यांना घेता येणार.
- जे शेतकरी कंत्राटी पद्ध्तीने शेती करत आहेत त्या शेतकऱ्यांना पण या योजनेचा लाभ घेता येणार.
- बचत गटा मार्फत करण्यात येणाऱ्या शेतीलाही सरकारच्या वतीने या योजनेचा लाभ देण्यात येतो.
- या योजने अंतर्गत सरकार सिंचन उपकरणे खरेदी करण्यावर शेतकऱ्यांना ८० ते ९० % अनुदान देते.
PM Krushi Sinchan Yojana 2025 : उद्देश
- शेता मधील पिकांना योग्य वेळी पाणी न मिळाल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. हे नुकसान टाळण्यासाठी कृषी सिंचन योजना सुरु केली आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान हो असते. पण जर सिंचन सुविधा असेल तर शेतकऱ्यांना या नुकसानी पासून बचाव होण्यास मदत होते. आणि शेतकऱ्यांचे उत्पादन ही वाढते. बर्याचदा काही कारणांमुळे पाऊस पाहिजे तसा पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे खूप नुकसान होत असते.
- ही शेतकऱ्यांची पाण्याची सिंचनाची समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरु केली आहे. त्याच अनुषंगाने केंद्र सरकारने या योजने अंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेत पर्यंत पाणी पोहचण्याचा निर्धार केला आहे.
- या योजने अंतर्गत नैसर्गिक गरजवंताचा जास्तीत जास्त वापर करण्यावर सरकारने भर दिला आहे.
- देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना सिंचना द्वारे पाणी उपलब्ध करून देणे, सिंचनासाठी वापरण्यात येत असलेल्या महाग उपकरणाच्या खरेदीवर ८० ते ९० % अनुदान देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- दुष्काळ आणि कमी पावसा मुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने कृषी सिंचन योजना सुरु केली आहे. या मुळे शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात उत्पन्न मिळते.आणी त्यांच्या पिकांचे नुकसान पण होत नाही. त्यामुळे कृषी सिंचन योजना लाभदायी ठरत आहे.
PM Krushi Sinchan Yojana 2025 : फायदे
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत सिंचन सुविधां बरोबर तुमच उपकरण खरेदीसाठी ही शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.
- कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरु केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकला योग्य वेळी पाणी देता येणार.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे स्वत:ची जमीन आणि जल स्रोत म्हणजेच विहीर किंवा बोअरवेल ह्या सुविधा असतील तरच या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येईल.
- या योजनेच्या द्वारे शेतीचे उत्पादन वाढवणे आणि त्यामधून आर्थिक प्रगती करणे हा उद्देश सरकारने ठेवला आहे.
- या योजनेसाठी केंद्र सरकार कडून ७५ % अनुदान तर २५ % खर्च राज्य सरकार मार्फत करण्यात येत आहे.
- सिंचनाद्वारे शेतीला पाणी दिल्यामुळे पाणी वाप्राठी ४० ते ५० % बचत होणार आहे, तसेच कृषी उत्पादन ४० % पर्यंत वाढण्याची शक्यता ही आहे.
PM Krushi Sinchan Yojana 2025 : आवश्यक कागदपत्रे
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- जमिनीचे कागदपत्र
- रहिवाशी दाखला
- पॅन कार्ड
- ओळखपत्र
- बँकचे पासबुक
- घराचे कागदपत्रे
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
PM Krushi Sinchan Yojana 2025 : पात्रता
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर शेती असणे गरजेचे आहे.
- शेतकरी हा भारताचा नागरिक असावा.
- या योजनेचा लाभ त्या संस्थाना होणार आहे ज्यांच्याकडे स्वत:च्या जमिनी ६० वर्षासाठी भाडेपट्ट्यानी करारानुसार असेल ही पात्रता कंत्राटी शेतीतुनही मिळवता येते.
- या योजनेचा बचत गट, अंतर्भूत कंपन्या, सहकारी संस्था उत्पादक शेतकरी गटांचे सदस्य व इतर पात्र संस्थांच्या सदस्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येतो.
PM Krushi Sinchan Yojana 2025 : अर्ज प्रक्रिया
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन अर्ज करू शकता.
- तुमच्या समोर एक होम पेज ओपन होणार.
- त्यानंतर तुम्हाला वेबसाईटचा होम पेज वर लॉगीन करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या ईमेल आयडी किंवा तुमच्या नावाने लॉगीन करू शकता.
- लॉगीन केल्या नंतर वेबसाईट च्या अबाऊट सेक्शन मध्ये जाऊन या योजनेची संपूर्ण माहिती भरू शकता.
- या बरोबरच इंटरनेट कॅफे किंवा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना संबधित कार्यालयात जाऊन ही तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता.
निष्कर्ष :-
वाचक मित्रांनो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने विषयी या लेखा मध्ये खूप मह्त्वाची व शेतकऱ्यांच्या उपयोगाची माहिती देण्यात आलेली असून. जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हालाही तुमच्या शेतात सिंचन करायचे असेल तर ही योजना तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आज आपण या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना काय लाभ मिळणार, या योजनेसाठी कोण पात्र आहे, या योजनेसाठी अर्ज कसा करावा. या पद्ध्तीने आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची माहिती दिली आहे तरी सर्वांनी हा लेख पूर्ण वाचवा.
PM Krushi Sinchan Yojana 2025 : सतत विचारले जाणारे प्रश्न
१. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना म्हणजे काय ?
दुष्काळी परिस्थिती आणि अवेळी येणाऱ्या पावसामुळे शेतीचे खूप नुकसान होते. या पासून वाचवण्यासाठी सरकारने कृषी सिंचन योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत शेतामध्ये सिंचन करून पिकांना योग्य वेळी पाणी उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात आली आहे.
२. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी कोण पात्र आहेत ?
या योजनेसाठी ज्या शेतकऱ्या कडे शेती आणि पाणी उपलब्ध आहे देशातील सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
३. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा उद्देश काय आहे ?
देशातील शेतकऱ्यांना सिंचना द्वारे पाणी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. तसेच महागड्या सिंचनाच्या उपकरणाच्या खरेदी वर ८० ते ९०% अनुदान देण्यात येत आहे.
४. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी कोण अर्ज करू शकतात ?
देशातील सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र त्यांच्याकडे जमीन आणि मुबलक पाणी उपलब्ध असणे गरजेचे आहे.
५.प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे लाभार्थी कोण आहेत ?
देशातील सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. त्यासाठी तुमच्या कडे स्वत:ची जमीन असणे गरजेचे आहे. तसेच पाण्याची उपलब्धता ही असणे आवश्यक आहे. त्या शिवाय कंपन्या, बचत गट, सहकारी समित्या इ. या योजनेचा लाभ घेता येतो.
- PM Krushi Sinchan Yojana 2025 | कृषी सिंचन योजना शेतकऱ्यासाठी ठरतेय लाभदायक या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या अधिकृत website ला भेट द्या.
- ABHA Health Card Yojana 2025 |आभा हेल्थ कार्ड योजना २०२५ मराठी या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा.
- Mukhyamantri Yojana Doot Bharti 2025 | मुख्यमंत्री योजना दूत भरती २०२५ या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या website ला भेट द्या.