PM E-Shram Card Pension Yojana 2025
PM E-Shram Card Pension Yojana 2025|आता दरमहा असंघटित कामगारांना मिळणार रु. ३,००० पेन्शन : केंद्र सरकारने असंघटित कामगारांना एकत्रित करून त्यांचा डेटाबेस साठी ई-श्रम कार्ड योजना सुरु केली आहे. त्यामुळे आकस्मिक येणारे संकट किंवा अपघात/ मृत्यू अश्या संकटात असताना कामगारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राज्य सरकार व केंद्र सरकार राबवत आहेत. या योजनेच्या द्वारे ई-श्रम कार्ड धारकांना वर्षाला ३६ हजार रुपयाची पेन्शन देण्यात येणार आहे. ई-श्रम कार्ड पेन्शन योजना अश्य नागरिकांना साठी बनवण्यात आली आहे. जे असंघटित क्षेत्रात काम करतात यामुळे जेणेकरून त्यांच्या उपजीविकेसाठी शाश्वत विकास निश्चित करता येणार.
ई-श्रम कार्ड पेन्शन योजना भारत हा विकसनशील देश आहे. आपल्या देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी देशातील कामगार वर्ग यांचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर श्रमिक वर्ग देखील भरपूर आहेत. परंतु असंघटित क्षेत्रात काम करणारे मजुरांचे दैनंदिन जीवन हे खूप अडचणीचे असते. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांची आर्थिक परिस्थिती ही खूप हालाकीची असते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक मदत करण्यासाठी २०२० पासून ई श्रम कार्ड पेन्शन योजना सुरू केली आहे.

PM E-Shram Card Pension Yojana 2025 : संपूर्ण माहिती
ई श्रम कार्ड पेन्शन योजनेचा लाभ हा देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना मिळतो. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना वार्षिक ३६ हजार रुपये पेन्शन देण्यात येते. ही योजना असंघटित क्षेत्रातील सर्व नागरिकांना साठी तयार करण्यात आलेली योजना आहे. या योजने अंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या एका विशिष्ट वयानंतर पेन्शन सुरू होत असते.ई श्रम कार्ड पेन्शन योजने अंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या वयाच्या ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर ३ हजार रुपये दरमहा पेन्शन देण्यात येते. म्हणजेच ३६ हजार रुपये वार्षिक पेन्शन या लाभार्थ्यांना ई श्रम कार्ड योजने अंतर्गत देण्यात येते. तसेच ई श्रम कार्ड योजने अंतर्गत लाभार्थ्याला २ लाख रुपयांचा अपघात विमा पण मिळत असतो.
केंद्र सरकारने देशातील सर्व ई-श्रम कार्ड धारकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी ई-श्रम कार्ड पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या द्वारे असंघटित क्षेत्रात काम करत असलेल्या कामगाराला निश्चित वयानंतर पेन्शन देण्यात येईल. पेन्शन योजना अंतर्गत ई-श्रम कार्ड धारकांना वयाचे ६०वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. म्हणजेच प्रतिवर्षी ३६ हजार रुपयाची पेन्शन रक्कम पात्र कामगारांना मिळणार आहे. योजनेचा लाभ तुम्हाला मोफत घेता येणार नाही. यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला वयानुसार काही ठराविक रक्कम भरावी लागणार आहे. त्यानंतर साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. ही योजना कामगारांना सामाजिक आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
PM E-Shram Card Pension Yojana 2025 : हायलाईट
योजना | ई श्रम पेन्शन कार्ड |
द्वारा सुरु | केंद्र सरकार |
विभाग | कामगार आणि रोजगार मंत्रालय |
उद्देश | असंघटीत कामगारांना आर्थिक मदत करून त्यांच्या भविष्यासाठी तरतूद करणे |
लाभार्थी | देशातील असंघटीत कामगार |
पेन्शन रक्कम | ३,००० रु. दरमहा |
वार्षिक पेन्शन | ३६,०००रु. |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन आणि ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | maandhan.in/ |
PM E-Shram Card Pension Yojana 2025 : वैशिष्ट्ये
- देशातील ई-श्रम कार्ड धारकांचा सामाजिक आर्थिक विकास व्हावा आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी केंद्र सरकारने ई-श्रम कार्ड पेन्शन योजना सुरू केली आहे.
- ई-श्रम कार्ड पेन्शन योजना धारकांना वयाची ६० वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांना ३,००० रुपये प्रती महिना पेन्शन मिळणार आणि निवृत्ती नंतर मिळणाऱ्या पेन्शन मधून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लागेल.
- सेवानिवृत्ती नंतर त्यांना वार्षिक ३६,००० रुपये पेन्शन च्या माध्यमातून मिळतील कामगारांसाठी हा एक उत्पन्नाचा स्त्रोत असणार.
- ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेतून त्यांना ठराविक पेन्शन मिळत असल्याने कामगारांना कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नसणार.
- ई-श्रम कार्ड पेन्शन योजना या योजनेतून त्यांचा सामाजिक, आर्थिक विकास होण्यास मदत होईल आणि त्यांना हक्काची पेन्शन मिळणार.
PM E-Shram Card Pension Yojana 2025 : फायदे
- ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेचा लाभ देशातील सर्व ई-श्रम कार्ड धारकांना देण्यात येणार आहे. कारण त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारणे हा या उद्देश आहे.
- ई-श्रम कार्ड पेन्शन योजने अंतर्गत कामगारांचे भविष्य उज्वल करण्यास मदत होणार. तसेच त्यांचा आर्थिक विकास पण होणार.
- ई-श्रम कार्ड धारकांचे जीवन मान सुधारण्यासाठी ही योजना सुरु केली आहे.
- लाभार्थीचे वय ६० वर्ष पूर्ण झाल्यावर लाभार्थ्याला मासिक ३,००० रुपये पेन्शन ही देण्यात येणार आहे.
- लाभार्थ्याच्या मृत्यू नंतर जोडीदार ५० टक्के मासिक पेन्शनसाठी पात्र आहे.
- जर पती व पत्नी दोघे पण ह्या योजनेमध्ये सामील झाले तर त्यांना संयुक्त मासिक पेन्शन ही ६,००० रुपये देण्यात येतील.
- केंद्र सरकार कडून देण्यात येणारी पेन्शन रक्कम लाभार्थ्याच्या थेट बँक खात्या मध्ये जमा करण्यात येणार आहे.
- या योजने अंतर्गत लाभार्थ्याला ३६,००० रुपये प्रति वर्ष आर्थिक पेन्शन देण्यात येणार आहे.
PM E-Shram Card Pension Yojana 2025 : स्वरूप
- ई-श्रम कार्ड पेन्शन योजना ही अंशदायी योजना आहे.
- ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी ५० % रक्कम ही लाभार्थ्याला भरायची आहे.
- उर्वरित ५० % रक्कम केंद्र सरकार द्वारे देण्यात येणार.
- लाभार्थ्याला वया नुसार मासिक योगदान हे रु. ५५ पासून ते रु.२०० पर्यंत जमा करायचे आहेत.
- ई-श्रम कार्ड पेन्शन योजने साठी अगोदर आपल्याला ५० % रक्कम भरायची आहे व त्यानंतर केंद्र सरकार द्वारे ५० % रक्कम आपल्याला ६० वर्षा नंतर प्रतीमाह रु. ३ हजार पेन्शन मिळणार.
PM E-Shram Card Pension Yojana 2025 : पात्रता
- अर्जदार हा भारताचा रहिवाशी असला पाहिजे.
- कामगार अर्जादाराचे मासिक उत्पन्न १५,००० हजार रुपयांपेक्षा कमी असावे.
- ई-श्रम कार्ड पेन्शन योजने साठी असंघटीत क्षेत्रात कामगार असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय १८ ते ४० या दरम्यान असले पाहिजे.
PM E-Shram Card Pension Yojana 2025 : आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक खाते पासबुक
- ई श्रम कार्ड
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो ( २ )
- मतदान कार्ड
- मोबाईल नंबर
PM E-Shram Card Pension Yojana 2025 : या योजनेसाठी कोण नोंदणी करू शकता
- दुकानात काम करणारे कर्मचारी
- ऑटो चालक
- मेंढीपाळ
- फेरीवाले
- डिलिव्हरी बॉय
- सेल्समन
- वीट भट्ट्यांवर काम करणारे मजूर
- दुग्ध व्यवसाय करणारे
- पंक्चर दुरुस्ती करणारे
PM E-Shram Card Pension Yojana 2025 : ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
- ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेचा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन हा अर्ज भरावा लागणार.
- सीएससी केंद्रावर गेल्यानंतर त्यांना ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेसाठी अर्ज करायचाआहे. असे सांगावे लागेल त्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्र सीएससी केंद्र चालकाकडे जमा करावे लागतील.
- सीएससी केंद्रचालक च्या माध्यमातून ई-श्रम कार्ड पेन्शन योजना चार्ज भरला जाणार.
- अर्ज भरल्यानंतर तुम्हाला एक पावती देण्यात येणार त्यानंतर तुम्हाला सीएससी केंद्र चालकाचे निश्चित शुल्क द्यावे लागणार.
- अशाप्रकारे तुम्ही ई-श्रम कार्ड योजने साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
PM E-Shram Card Pension Yojana 2025 : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- ई-श्रम कार्ड पेन्शन योजना २०२५ साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज दिसणार.
- होम पेजवर तुम्हाला schemes याच्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
- त्या नंतर तुम्हाला पी एम एस वाय एम या option वर क्लिक करावे लागेल.
- क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर योजने संबधी माहिती येणार.
- त्यावर असलेल्या लॉगीन वर क्लिक करावे.
- क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होणार. त्यावर तुम्हाला self enrollment या option वर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल वर OTP येईल तो टाकून सबमिट करावा.
- आता तुमच्या समोर ई-श्रम कार्ड पेन्शन योजना २०२५ अर्ज समोर येईल.
- अर्ज फॉर्म वर असलेली सर्व माहिती तुम्ही त्या मध्ये भरायची आहे.
- माहिती भरून झाल्या नंतर तुम्हाला मागितलेले सर्व कागदपत्र स्कॅन करून अपलोड करावे लागतील.
- शेवटी तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करून आपला फॉर्म सबमिट करायचा आहे.
- अर्ज सबमिट झाल्या वर तुम्हाला अर्जाची प्रिंट मिळणार.
निष्कर्ष :-
प्रिय वाचक मित्रानो, आज आपण PM E-Shram Card Pension Yojana 2025|आता दरमहा असंघटित कामगारांना मिळणार रु. ३,००० पेन्शन योजने बद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला आहे. या मध्ये आपण योजनेची पात्रता काय, योजनेचे स्वरूप, योजने साठी आवश्यक कागदपत्रे, योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. ही माहिती अपूर्ण ही असू शकते. आपण संबधित अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन आपण अधिक माहिती जाणून घ्या.ही माहिती इतर गरजू नागरिकांना ही शेअर करा. आपल्या मुळे एखाद्या गरजू लाभार्थ्याचा
PM E-Shram Card Pension Yojana 2025 : सतत विचारले जाणारे प्रश्न
१. ई-श्रम कार्ड पेन्शन योजने अंतर्गत कामगारांना किती पेन्शन मिळते ?
या योजने अंतर्गत कामगाराला दरमहा ३ हजार रुपये पेन्शन देण्यात येते. ती पेन्शन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
२. ई-श्रम कार्ड पेन्शन योजने साठी अर्ज कसा करावा ?
ई-श्रम कार्ड पेन्शन योजने साठी ऑफलाईन व ऑनलाईन या दोघ पद्ध्तीने तुम्ही अर्ज करू शकतात.
३. ई -श्रम कार्ड पेन्शन योजनेचा लाभ कोणाला मिळतो ?
ई-श्रम कार्ड पेन्शन योजनेचा लाभ ई-श्रम कार्ड धारकांना त्यांचे वय ६० वर्ष पूर्ण झाल्या नंतर मिळतो.
- PM E-Shram Card Pension Yojana 2025|आता दरमहा असंघटित कामगारांना मिळणार रु. ३,००० पेन्शन योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत website ला भेट द्या.
- Pradhanmantri Swamitva Yojana 2025|ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार आपल्या संपत्तीचा हक्क या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा.
- PM Krushi Sinchan Yojana 2025 | कृषी सिंचन योजना शेतकऱ्यासाठी ठरतेय लाभदायक या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा.