Pik Vima Yojana 2024 Marathi|पिक विमा योजना २०२४ मराठी

Pik Vima Yojana 2024 Marathi

Pik Vima Yojana 2024 Marathi |पिक विमा योजना २०२४ मराठी :- प्रधानमंत्री पिक विमा योजना महाराष्ट्र राज्यात २०१६ पासून करण्यात आली आहे. राज्यामध्ये पावसाचे प्रमाण कधी अनियमित येतो तर कधी अति प्रमाणात पाऊस पडत असतो. किंवा खूप कमी प्रमाणात पाऊस पडणे.वातावरणातील अनियमित बदल. खूप प्रमाणात येणारा वादळ, अचानक होणारी बर्फवृष्टी, किंवा खूप जास्त प्रमाणात पडणारे ऊन. ह्या सर्व अचानक व अनियमित होणाऱ्या बदलांमुळे शेतकऱ्याला सतत वेगवेगळ्या आव्हानांना सामोर जाव लागत.व त्यांना नुकसान झालेले पण सहन करावे लागते. हे सर्व नुकसान शेतकऱ्याला सहन करावे लागू नाही. म्हणून पिक विमा योजना २०२४ या योजना सुरु केली आहे.

Pik Vima Yojana 2024 Marathi : वैशिष्ट्ये

  • पिक विमा योजना कर्जदार शेतकरी किंवा बिगर कर्जदार ह्या शेतकऱ्यांसाठी वैकल्पिक आहे. या योजनेसाठी कुठलाही शेतकऱ्याला बंधन नाही.
  • अधिसूचित क्षेत्रातील पिकांची शेती करणारे व कुळातील शेती करणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील.
  • पिक विमा योजना ही योजना काही नमूद केलेल्या पिकांसाठीच मोबदला देते.
  • पिक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी २ % रब्बी हंगामासाठी १.५ % व खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी ५ % इतकी मर्यादा ठेवली आहे.
  • पिक विमा योजना ही योजना १२ जिल्हाच्या समुहासाठी निवड केलेल्या पिक विमा कंपन्या मार्फत १ वर्षा करता राबवण्यात येत आहे. विमा कंपन्या १ वर्षामध्ये जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमा हप्ता ११० %पर्यंत चे दायित्व स्वीकारणार.तसेच देय पिक विमा नुकसान भरपाई ची रक्कम, जर विमा हप्ता रक्कमेच्या ११० % पेक्षा अधिक असेल तर ११० टक्के पेक्षा अधिकच भर हा राज्य सरकार स्वीकारतील.आणि जर देय पिक विमा नुकसान भरपाई ची रक्कम जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रक्कमे पेक्षा कमी असेल तर विमा कंपनी विमा हप्ता रक्कमेच्या जास्तीत जास्त २० % रक्कम स्वता जवळ ठेवणार व उर्वरित रक्कम राज्य शासनाला परत करणार.
Pik Vima Yojana 2024 Marathiपिक विमा योजना २०२४ मराठी

Pik Vima Yojana 2024 Marathi : योजनेमध्ये समाविष्ट पिक आणि शेतकरी

पिक विमा या योजनेंर्गत अन्नधान्य पिके, नगदी पिके आणि गळीत धान्य पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे. हि योजना राज्यात खरीप व रब्बी हंगामासाठी अधिसूचित केलेल्या मंडळ आणि अधिसूचित केलेल्या पिंकासाठी तालुका स्तरावर संरक्षण देण्यात येणार आहे.

ज्या सर्वे नंबर साठी आणि ज्या क्षेत्रासाठी पिक विमा काढला असेल त्याच नावाचा ७/१२ उतारा असले पाहिजे. जर बोगस ७ /१२ किंवा बोगस पिक फेरा केला असेल तर अशा प्रकारची बोगस प्रकरणाची दाखल जिल्हा नियंत्रण समिती घेणार आणि समितीच्या मार्गदर्शनाखाली विमा कंपनी कायद्या नुसार कार्यवाही करणार. तसेच महसूल दस्तऐवजा मध्ये तपासणी करून शासनाची फसवणूक केल्याच्या कारणाने महसूल विभागामार्फत तहसीलदार स्वतंत्रपणे गुन्हा दाखल करतील.

ई पिक फनी अंतर्गत पिकाची नोंद करणे आवश्यक आहे. विमा योजनेत विमा घेतलेले पिक व ई पिक पाहणीमध्ये नोंदविलेले पिक सारखेच असले पाहिजे. जर सारखे नसल्यास ई पिक पाहणीमध्ये नोंदविलेले पिक हे अंतिम गृहीत धरले जाणार.

Pik Vima Yojana 2024 Marathi : उद्दिष्टे

नैसर्गिक आपत्ती, पिकांवरील किड, आणि रोगासारख्या अचानक येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतामधील पिकाचे नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना पिकानुसार विमा कंपनी मार्फत नुकसान भरपाई मिळणार. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थिती च्या काळात पण शेतकर्यांचे आर्थिक मनोबल स्थिर ठेवणे. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्राज्ञान व सामुग्री वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे. नुकसान भरपाईची खात्री देऊन शेतकऱ्याला शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणे तसेच शेतीपूरक उद्योगाला चालना देणे असा दुय्यम उद्देश पिक विमा योजनेचा आहे.

Pik Vima Yojana 2024 Marathi : अटी

पिक विमा योजनेचे संरक्षण हे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांना लागू राहणार.अधिसूचित क्षेत्रातील अधिसुच्ती करण्यात येणारे पिक हे जिल्हा / तालुका स्थरावरील एकूण पिका खालील क्षेत्रापैकी किमान २५ %पेरणी क्षेत्र हे हंगामातील त्या मुख्य पिकाखाली असणे बंधनकारक आहे. अधिसुचनेपुर्वी बँके कडून विमा हप्ता जमा केले नाही.किंवा कपात न करता फक्त पिक विमा कर्जाची मंजुरी / वितरीत केल्यास संबंधित शेतकरी विमा संरक्षणासाठी पात्र राहणार नाहीत.

संबंधित जिल्हाधिकारी यांनी या योजनेतील अंतिमसहभागाच्या अंतिम तारखे नंतर १५ दिवसांच्या आत परंतु अधिसूचित पिक वेळा पत्रकानुसार पिकाचे पेरणीच्या अंतिम तारखेच्या एक महिन्या पर्यंतच्या मर्यादेत सदर जोखीमबाबत अधिसूचना जाहीर करणे आवश्यक आहे.संबंधित जिल्हाधिकारी यांच्या मार्फत बाधित क्षेत्राचा अहवाल अंदाजित पेरणी क्षेत्राचा अहवाल व अधिसूचना जाहीर झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत विमा कंपनी मार्फत नुकसान भरपाई देण्यात येणार.

सरकारकडून विमा नुकसानीचा अनुदानाचा पहिला हप्ता प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनी मार्फत वरती दिल्या प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येणार.

पिक विमा योजना २०२४ : खरीप व रब्बी हंगामाचे मिळणारे फायदे

  • बदलत्या हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी व लावणी न झाल्यामुळे पिकांचे होणारे नुकसान.
  • पिक पेरणी झाल्यानंतर म्हणजेच पिकाच्या हंगामामध्ये बदलणाऱ्या हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे झालेले नुकसान.
  • पिकाची पेरणी झाल्या पासून ते पिक काढणी पर्यंत येणारे नैसर्गिक आपत्ती जसे कि अतिवृष्टी , पूरपरिस्थिती, वादळ , आग लावणे, वीज, कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, किड, व रोग या मुळे पिकांच्या उत्पनामध्ये होणारे घट व तसेच होणारे नुकसान.
  • स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान.
  • नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा हवामानातील प्रतिकूल बदलामुळे पिक काढणीच्या वेळी झालेले पिकांचे नुकसान.
  • प्रीमियम मध्ये शेतकऱ्यांचे योगदान लक्षणीयरीत्या कमी करण्यात आले आहे. जसे खरीप पिकांसाठी २%, रब्बी पिकांसाठी १.५ % आणि वार्षिक व व्यवसायिक पिकांसाठी ५%.

वरती दिल्या प्रमाणे कोणत्याही कारणामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याला नुकसान होत असेल तर त्या शेतकऱ्याला पिक विमा योजनेमुळे संरक्षण मिळणार आहे.

योजनेचे नाव पिक विमा योजना
कधी सुरवात झाली २०१६
योजनेचे उद्दिष्ट व लाभार्थी शेतीचे संरक्षण करणे व भारत देशातील सर्व शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत.
अर्ज प्रक्रिया Online
कोणत्या राज्यासाठी देशातील सर्व राज्यांसाठी
योजनेचे फायदे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई प्रदान करणे
अर्ज कसा करावा पिक विमा

पिक विमा योजना २०२४ : नुकसान भरपाई साठी लागणारे कागदपत्रे

  • नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहित नमुन्यातील अचूक भरलेला अर्ज आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याच्या नावाचा आणि त्यांच्या क्षेत्राचा ७ /१२ ज्या क्षेत्राचा विमा घेतला आहे. पिकाची नोंद केलेल्या विमा हप्ता भरलेला पुरावा.
  • इ पीकपाणी अहवाल.
  • वरती दिलेले सर्व कागदपत्रे अचूक जोडून विहित नमुन्यातील अर्जासोबत विमा कंपनी ला सादर करणे गरजेचे आहे.

जर शेतकरी परिपूर्ण माहिती सह अर्ज सादर करू शकले नाही. तर उपलब्ध माहिती सह अर्ज सादर केला जाऊ शकतो. व अर्जातील अपूर्ण राहिलेली माहिती विमा कंपनी ला ७ दिवसाच्या आत सादर करावी लागणार.

पिक नुकसानीचा पुरावा म्हणून मोबाईल द्वारे घेण्यात आलेले फोटो सादर केले तरी पण चालतील.

पिक विमा योजना २०२४ : नुकसानीची माहिती कळविण्याची पद्धत

संबधित शेतकऱ्या ने संबंधित घटना झाल्या पासून ७२ तासा च्या आत झालेल्या नुकसानची सूचना विमा कंपनी संबंधित बँक किवा कृषी अधिकारी , किवा कृषी विभाग या ठिकाणी झालेल्या नुकसानाची माहिती कळवावी.

प्रथम प्राध्यान्य विमा कंपनी च्या टोल फ्री क्रमांकावर call करून झालेल्या नुकसानीची माहिती कळवावी माहिती दिल्यानंतर ४८ तासाच्या आत हि माहिती सदर विमा कंपनी ला पाटवण्यात येणार या नतर बँक कडून विमा बाबत माहिती जसे कि पिक विमा संरक्षित रक्कम भरलेला हफ्ता , व त्याचा दिनाक तपासून संबंधित माहिती विमा कंपनी ला सर्वेक्षणासाठी पाठविले जाईल.

महत्वाची सूचना :- प्रिय वाचक मित्रानो सर्वाना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किवा आपल्या नातेवाइका पेकी कोणी व्यक्ती असेल ज्याला या योजना चा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजने विषय माहिती द्या किवा त्यांना हा आमचा कृषी पिक विमा योजना लेख वाचण्यास सांगावा हि विनंती जेणे करून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल व त्यांचे स्वप्नपूर्तीसाठी आपण काही मदत करू शकू

सर्व वाचक मित्रांना एक विनंती आहे हे website केंद्र शासन किवा राज्य शासना ची नाही किवा त्या सबंधी देखील नाही जर आपण वर नमूद केलेल्या माहिती च्या आधारे या योजने बद्दल काही निर्णय घेणार असाल तर कृपया वरती दिलेली माहिती तुम्ही परत एकदा पडताळून बघा किवा शासना च्या अधिकृत website वरती visit करून योग्य तो निणर्य घ्यावा आम्ही फक्त या योजने ची माहिती आपल्या मराठी वाचकांना मराठी भाषेत वाचण्यास मिळावी या अनुषंगाने हा एक छोटासा प्रयत्न केला आहे तरी कृपया आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी व आमचा लेख तुम्हाला कसा वाटला आम्हला तुमच्या शब्दात कळवावे .

पिक विमा योजना २०२४ : सतत विचारले जाणारे प्रश्न

१. विमा म्हणजे काय ?

विमा एखाद्या व्यक्तीला किंवा व्यवसायाला अनपेक्षितपणे नुकसानीची भरपाई करण्यासाठी एक साधन आहे, जे संकट तर आर्थिक संकट असू शकते. ही एक प्रक्रिया असते, ज्या मध्ये काही नागरिकांच्या नुकसानीची भरपाई अनेक जणांच्या वर्गणीतून केली जाते.

२. सर्व पिके ह्या सर्वांतर्गत अंतर्भूत केल्या आहेत ?

फक्त अधिसूचित पिकेच या प्रकरणा मध्ये अंतर्भूत करण्यात येतील.

३. पिक विमा योजना म्हणजे काय ?

पिक विमा योजना ही एक आकस्मिक स्मरण शक्ती आणि निसर्ग प्रतिकूल वर्तन घडवून आणणारी संकटे संरक्षण पुरवण्यासाठी भारताने प्रयत्न सुरु करण्याची योजना आहे.

अधिक माहिती साठी या Official Link La visit करा

माझी कन्या भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येते click करा

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी बद्दल जाणून घेण्यासाठी येते click करा

भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा

Follow Social Media Page