Mahilansathi Sarkari Yojana 2025
Mahilansathi Sarkari Yojana 2025|महिलांना फायदा मिळवून देणाऱ्या १० सरकारी योजना : केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवतात. त्याच प्रमाणे केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना विशेषतः महिलांसाठी तयार करण्यात आल्या आहेत. देशात गरीब, मजूर, शेतकरी आणि बेरोजगारी साठी विविध योजना सुरु केल्या आहेत. परंतु आज आपण महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या उत्कृष्ट सरकारी योजनांची माहिती जाणून घेणार आहोत. या योजना सुरू करण्या मागचा सरकारचा उद्देश म्हणजे महिलांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. महिला त्यांच्या स्वतःच्या पायावर उभ्या राहून परिवाराला आर्थिक हातभार लावू शकतील या उद्देशाने केंद्र सरकार व राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत.

महिला सक्षम बनाव्यात महिलांचा आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने महिलांसाठी केंद्र सरकार सतत नवनवीन योजना राबवत असते. सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे महिलाही पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून पुढे जाऊ शकतील. केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध योजनांच्या कारणाने आज महिला पण प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत. परंतु समाजात अजून पण काही रूढीवादी परंपरा टिकून आहेत. ज्यांना दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे.समाजा मध्ये आजही मुलींना एक प्रकारचा भुर्दंड म्हणून पहिले जाते आणि त्यांना मुलांच्या तुलनेत कमी महत्व देण्यात येते. घरामध्ये, समाजामध्ये महिलांना कमी मानले जाते. या सर्व कारणांमुळे महिलांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास प्रभावित होते.
केंद्र आणि राज्य सरकार यांनी राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिलांचे सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावले जात आहेत. आजच्या या लेखात आपण महिलांसाठी आणि मुलींना समर्पित १० उत्कृष्ट सरकारी योजनाविषयी माहिती पाहणार आहोत. महिलांसाठी १० सरकारी योजना कोणत्या आहेत. याची माहिती आपण ह्या लेखात दिली आहे. सर्व माहिती चांगल्या प्रकारे वाचा आणि सर्व योजनांचे पात्रता प्रमाणे लाभ घ्या.
Mahilansathi Sarkari Yojana 2025 : हायलाईट
योजनेचे नाव | महिलांसाठी सरकारी योजना |
द्वारा सुरु | केंद्र सरकार आणि राज्य सरकार |
फायदा | महिलांना स्वावलंबी बनवणे |
उद्देश | महिलांना आर्थिक मदत करणे |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन आणि ऑनलाईन |
Mahilansathi Sarkari Yojana 2025 : १ ) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वांतत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुबांतील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ” योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागाने सदर केलेल्या प्रस्तावनास दि. २८.०६.२०२४ रोजी महारष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकी मध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्या नुसार महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात २०२४ मध्ये झाली. महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये आर्थिक मदत सरकारमार्फत देण्यात येणार आहे. ज्या महिलांचे वय २१ वर्ष ते ६५ वर्ष दरम्यान आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेची सुरुवात महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या द्वारे ही योजना सुरु केली आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व गरीब कुटुंबातील विवाहित, विधवा, घटस्पोटीत आणि निराध्रार महिला या महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये एवढी मदत केली जात आहे. अधिक माहिती साठी पुढे वाचा.
Mahilansathi Sarkari Yojana 2025 : २ ) विधवा पेन्शन योजना

विधवा पेन्शन योजना ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रवर्गातील गरीब विधवा महिलांसाठी सुरु करण्यात आलेली असून. ही योजना महाराष्ट्र शासनाने २०२२ पासून सुरु केली आहे. महाराष्ट्र शासन स्रियांसाठी कायम चांगल्या कल्याणकारी योजना सुरु करत असतात. तसेच विधवा पेन्शन योजना ही एक पण योजना सुरु केली आहे. गरीब परिवारातील विधवा स्रियांनी सन्मानाने जीवन जगावे या साठी विधवा पेन्शन योजना सुरु केली आहे. विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र शासनाने राज्यातील गरीब परिवारातील विधवा स्रियांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेंर्गत महाराष्ट्र राज्यातील गरीब परिवारातील विधवा महिलांना दर महिन्याला ६०० रुपये येवढी आर्थिक मदत केली जात आहे. विधवा पेन्शन योजनेमुळे या महिलांना आर्थिक लाभ भेटणार आहे.
आयुष्याचा साथीदार गेल्या नंतर महिलेचे पूर्ण आयुष्य हे बरबाद होऊन जाते. नातेवाईक व मित्र मैत्रणी हि फक्त नावापुरतीच असतात. ज्या वेळी गरज पडते तेव्हा मदती साठी खूप कमी जण येतात. व त्यामध्ये हि कधी जेव्हा केव्हा आर्थिक मदत पाहिजे. अशा वेळी तर आणखी मदत करणारे खूप कमी होऊन जाता. अश्या वेळेला मग त्या विधवा महिलेला जर एखाद्या ठिकाणी काम भेटायला वेळ लागत असेल तेव्हा किंवा काम भेटत नाही. तर अशा वेळेस विधवा महिलेचा उदर निर्वाह होणे खूपच अवघड असते. ह्या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने विधवा पेन्शन योजना सुरु केली आहे. अधिक माहिती साठी पुढे वाचा.
Mahilansathi Sarkari Yojana 2025 : ३) स्री शक्ती योजना

SBI स्री शक्ती योजना खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील अनेक कार्यक्रम चालू झाल्यापासून देशातील महिला उद्योजकांमध्ये वाढ झालेली आहे . महिला आता विविध बँका व वित्तीय संस्था मधून सुरक्षित आर्थिक साहाय्य घेऊ शकतात.महिलांना त्यांच्या उद्दिष्टासह पुढे नेण्यास मदत करणारा असाच एक कार्यक्रम म्हणजे स्रियांना स्वावलंबी बनण्यासाठी आणि समाजातील स्रियांचा आर्थिक स्थर सुधारण्यासाठी केंद्र सरकारने SBI स्री शक्ती योजना ही योजना सुरु केली आहे.अधिक माहिती साठी पुढे वाचा.
Mahilansathi Sarkari Yojana 2025 : ४) सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह विविध राज्यांचे आरोग्य मंत्री आणि माननीय पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी १० ऑक्टोबर २०१९ या दिवशी सुरक्षित मातृत्व अश्वासन सुमन योजना सुरु केली आहे . या योजने अंतर्गत गरोदर महिला आणि नवजात बालकांच्या जीविताच्या सुरक्षे साठी शासना कडून आरोग्य सेवा मोफत पुरविण्यात येणार आहे. या मातृत्व आश्वासन सुमन योजनेच्या माध्यमातून भारत सरकार ने माता आणि नवजात बालकांचे मृत्यू थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अधिक माहिती साठी पुढे वाचा.
Mahilansathi Sarkari Yojana 2025 : ५) फ्री स्कुटी योजना

फ्री स्कुटी योजना सरकार द्वारे शुभारंभ झाले राणी लक्ष्मी बाई या योजने अंतर्गत सर्व मुलींना मोफत स्कुटी मिळणार आहे. शासन व केंद्र शासन पण विविध योजना राबवत आहेत आणि मुलींसाठी बऱ्याच योजना सरकार द्वारे राबवीत आहेत. तसेच हि योजना फक्त मुलींसाठी आहे राणी लक्ष्मी बाई योजने अंतर्गत सर्व मुलींना फ्री स्कुटी देण्यात येणार आहे.या योजनेच्या अंतर्गत राज्यातील मुलींना फ्री स्कुटी देण्यात येणार असून या योजनेची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या जाहीर नाम्या मध्ये केली होती. या योजने द्वारे पदव्युत्तर शिक्षण आणि पदवी घेत असलेल्या विद्यार्थीनीना फ्री स्कुटी देण्यात येणार आहे. त्यामुळे मुली सशक्त आणि स्वावलंबी होतील. अधिक माहिती साठी पुढे वाचा.
Mahilansathi Sarkari Yojana 2025 : ६) लखपती दीदी योजना

लखपती दीदी योजना या योजने अंतर्गत महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच बचत गटाशी संबंधीत असलेल्या महिलांना सरकारकडून कर्जही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. लखपती दीदी योजने अंतर्गत उत्तराखंड राज्य सरकार महिला बचत गटांना बिनव्याजी ५ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे महिलांना लखपती बनवण्यास मदत होत आहे. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी अनेक राज्य सरकार देखील आर्थिक मदत करत आहेत.अधिक माहिती साठी पुढे वाचा.
Mahilansathi Sarkari Yojana 2025 :७) मोफत शिलाई मशीन योजना

मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र राज्यातील आर्थिक द्रुष्ट्या गरीब परिवारातील महिलांना सरकारकडून मोफत शिलाई मशीनचे वाटप केले जाणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे. यामधून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होउन त्या आपल्या पायावर उभ्या राहू शकणार . या योजनेचा लाभ राज्यभरातील शहरी आणि ग्रामीण अशा दोन्हीही महिलांना देण्यात येतो. केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून देशातील ५०,००० पेक्षा जास्त महिलांना मोफत शिलाई मशीन वाटण्याचा हेतू आहे. अधिक माहिती साठी पुढे वाचा.
Mahilansathi Sarkari Yojana 2025 : ८) किशोरी शक्ती योजना

किशोरी शक्ती योजना महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या संरक्षणासाठी विविध कायदे तयार केले जात आहेत.पण गरिबीमुळे अनेक मुलींना शिक्षण सोडावे लागत असून.काहीना सुविधा अभावी उच्च शिक्षण घेता येत नाही.त्यानंतर घरच्या जबाबदारी मुळे काहींचे बालपण हिरावले जात आहे.काही मुलींचे लग्न पण कमी वयात होत आहेत. त्यांना विविध समस्यांना सामोरे जाव लागत आहे.
एकंदरीत शासनाने स्रियांना व मुलींसाठी विविध योजना सुरु केल्या असल्या तरी अनेकांच्या आयुष्यात सोनेरी पाहत अजून पण उगवलेली नाही. त्यामुळे 11 ते 18 वर्ष वयोगटातील मुलींसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना सुरु केली असून. या योजनेच्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलींना स्वताची काळजी कशी घ्यावी, शारीरिक बदलांना सामोरे कशे जायचे, प्रशिक्षण घेऊन स्वताच्या पायावर कस उभ राहायचं, यासाठी राज्य शासनाने किशोरी शक्ती योजना सुरु केली आहे. अधिक माहिती साठी पुढे वाचा.
Mahilansathi Sarkari Yojana 2025 : ९) प्रधान मंत्री उज्वला योजना
प्रधान मंत्री उज्वला योजना १ मे २०१६ पासून सुरु करण्यात आली. या योजने अंतर्गत आर्थिक द्रुष्ट्या दुर्बल आणि मध्यम वर्गातील महिलांना घरगुती Gas सिलिंडर उपलब्ध करून दिला जातो. या योजनेचा लाभ आता पर्यंत करोडो महिलांनी घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी उज्वला योजना २.० १० ऑगस्ट २०२१ रोजी पुन्हा सुरु केली. उज्वला योजना २.० अंतर्गत बीपीएल कुटुंबाना मोफत Gas सिलिंडर दिला जात आहे.
Mahilansathi Sarkari Yojana 2025 : १०) सामुहिक कन्या विवाह योजना
सामुहिक कन्या विवाह योजना या योजने अंतर्गत गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी राज्य सरकारने ५०,००० रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.