Maharashtra Kishori Shakti Yojana In Marathi 2024
Maharashtra Kishori Shakti Yojana In Marathi 2024 :- आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर महिलांना त्यांचे हक्क मिळावेत या साठी विविध कायदे करण्यात आले. महिला पुरुषांच्या बरोबरीने संधी देण्यासाठी शासना ने विविध योजना राबविल्या आहेत.स्रियांना संधी मिळत असल्याने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. तसेच महिला आता घरातले काम करून विविध क्षेत्रात काम करत आहेत. पायलट, पोलीस अधिकारी,बँक अधिकारी, लष्करी अधिकारी आणि कंपनीचे सीईओ अशा वेगवेगळ्या पदांवर स्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्याला दिसत आहेत.
महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या संरक्षणासाठी विविध कायदे तयार केले जात आहेत.पण गरिबीमुळे अनेक मुलींना शिक्षण सोडावे मागत असून.काहीना सुविधा अभावी उच्च शिक्षण घेता येत नाही.त्यानंतर घरच्या जबाबदारी मुळे काहींचे बालपण हिरावले जात आहे.काही मुलींचे लग्न पण कमी वयात होत आहेत. त्यांना विविध समस्यांना सामोरे जाव लागत आहे.
एकंदरीत शासनाने स्रियांना व मुलींसाठी विविध योजना सुरु केल्या असल्या तरी अनेकांच्या आयुष्यात सोनेरी पाहत अजून पण उगवलेली नाही. त्यामुळे 11 ते 18 वर्ष वयोगटातील मुलींसाठी राज्य सरकारने महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना सुरु केली असून. या योजनेच्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलींना स्वताची काळजी कशी घ्यावी, शारीरिक बदलांना सामोरे कशे जायचे, प्रशिक्षण घेऊन स्वताच्या पायावर कस उभ राहायचं, यासाठी राज्य शासनाने किशोरी शक्ती योजना 2024 मराठी सुरु केली आहे. त्याचे काही निकष दिले आहेत ते आपण या लेखात याची माहिती पाहूया.
स्थानिक कीशोरीवयीन मुलींना शारीरिक, मानसिक आणि भावनिक द्रुष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना सुरु करण्यात आली आहे. स्रियांचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास किशोरावस्थेत होतो.महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेच्या माध्यमातून 11 ते 18 वर्ष वयोगटातील मुलींना शारीरिक आणि मानसिक द्रुष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून. हे प्रशिक्षण ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी केंद्रातून देण्यात येणार आहे.
आपण जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली किशोरी शक्ती योजना 2024 मराठी मुलींच्या हितासाठी काय आहे? व त्यातून मुलींचा विकास कसा होईल?तसेच योजनेशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्णपणे वाचा.
Maharashtra Kishori Shakti Yojana In Marathi 2024

Maharashtra Kishori Shakti Yojana in Marathi Information : योजनेची थोडक्यात माहिती
किशोरी शक्ती योजना 2024 मराठी या योजनेचा उद्देश कीशोरीवयीन मुलींना स्वावलंबी बनण्यासाठी आवश्यक असलेली साधने देणे हा आहे. कीशोरीवयीन मुलींच्या वाढीसाठी सर्वसमावेशक उपक्रम म्हणून या कडे बघीतले जाते. या उपक्रमाद्वारे कीशोरीवयीन मुलींचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला करण्यात येत आहे. मुलींना त्यांच्या सर्वात मोठ्या क्षमते पर्यंत जाण्याची संधी देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
किशोरी शक्ती हि योजना केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा या योजनेंर्गत एक घटक म्हणून राबविण्यात येत असलेल्या त्या आधीच अस्तित्वात असलेल्या कीशोरीवयीन मुली (AG ) योजनेची पुन र्र्चना आहे.ज्याला केंद्राने पाठिंबा दिला आहे नवीन योजना मुख्य सामग्री संवर्धनासह पूर्वीच्या योजनेची व्याप्ती लक्षणीयरित्या विस्तृत करते, प्रशिक्षण घटक सुधारते, विशेषता कौशल्य विकासामध्ये ,व सशक्तिकरण आणि सुधारित आत्म धारणा यांना प्रोत्साहन देणारे घटक समाविष्ट करते. या व्यतिरिक्त ते तरुण महिला व मुलींच्या परस्पर संबंधित गरजा पूर्ण करून इतर क्षेत्रीय उपक्रमांसह अभिसरण करण्यास प्रोस्ताहित करते.
गरीब परिस्थितीमुळे राज्यातील बऱ्याच मुलींना कमी वयातच शिक्षण सोडावे लागले आहे. त्यांच्या कमी वयातच त्यांचे आई वडील बाहेर गावी कामावर गेल्याने काही मुलींवर परीवाराची पूर्ण जबाबदारी येऊन पडली असून. अशा शिक्षण प्रवाहातून बाहेर पडलेल्या 11 ते 18 वर्ष वयोगटातील कीशोरीवयीन मुलींनी निरोगी राहावे व प्रशिक्षणाद्वारे स्वताच्या पायावर उभे राहावे व त्यांच्या हक्काची माहिती त्यांना मिळावी. आरोग्याचे प्रन्न कसे सोडवले जातील यासाठी किशोरी शक्ती योजना 2024 मराठी हि योजना सुरु करण्यात आली आहे.
कुटुंब नियोजन, समस्या, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेद्वारे 11 ते 18 वर्ष वयोगटातील कीशोरीवयीन मुलींची पोषण आणि आरोग्य स्थिती सुधारणे, त्यांना घरगुती व व्यावसायाभिमुख व्यवसायांमध्ये प्रशिक्षण देऊन पैसे कमविण्यास सक्षम करणे, संवेदनशील करणे त्यांना आरोग्य पोषण, कौटुबिंक कल्याण, गृह व्यवस्थापन, बाल संगोपन, वैयक्तिक आणि अतिपरिचित स्वच्छता यावर प्रशिक्षण देऊन बालविवाह प्रतिबंधित करणे. कीशोरीवयीन मुलींना त्यांच्या निर्णय क्षमतेची क्षमता वाढवण्यासाठी अनौपचारिक शिक्षण देणे हा या योजनेचा उद्देश आहे. यासाठी या किशोरीवयीन मुलींना त्यांच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
किशोरी वयीन मुलींना त्यांना त्यांच्या आरोग्याची माहिती दिली जाईल.व त्यांची तपासणी केली जाणार. त्याची पूर्ण नोंद अंगणवाडीत ठेवण्यात येणार.कीशोरीवयीन मुलींसाठी अंगणवाडी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.
कीशोरीवयीन मुलींना पर्यावरणीय स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, पोषण, प्रथमोपचार, आरोग्य आणि पोषण शिक्षण, कौटुबिंक जीवन, बाल संगोपन व विकास इ. विषयी शिकवणे हे या योजनेचे उद्दिष्टे आहेत.मनोरंजना व्यतिरिक्त, घरगुती कौशल्ये सुधारण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल.
Table of contents
महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेची पात्रता
- अर्जदार कीशोरीवयीन मुलगी महाराष्ट्र राज्याची कायमची रहिवासी असणे अनिर्वाय आहे.
- 11 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरीवयीन मुली या योजनेंर्गत प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.
- किशोरी शक्ती योजना महाराष्ट्र अंतर्गत कौशल्य प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यासाठी कीशोरीवयीन मुलीचे वय 11 ते 18 वर्ष दरम्यान पाहिजे.
- दारिद्रय रेषेखालील व गरीब आणि अनुसूचित जाती, जमाती,BPL कार्ड धारक परिवारातील च मुली अर्ज करण्यास पात्र असतील.
- किशोरी शक्ती योजनेंर्गत केवळ 6 महिन्यांसाठी मुलींची नियुक्ती केली जाईल.
Required Documents For Kishori Shakti Yojana : कागदपत्रे
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला
- रेशन कार्ड
- मुलीचा जन्म दाखला
- मुलीचे आधार कार्ड
- शाळेचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- दारिद्र रेषेखालील कार्ड
- वीज बिल
- जातीचा दाखला
- शालेय शिक्षण मार्कशीट
Maharashtra Kishori Shakti Yojana 2024 : वैशिष्ट्ये
- महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमधून 20 कीशोरीवयीन मुलींची निवड करून त्यांना महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेच्या माध्यमातून विभागीय पर्यवेक्षण,ANM आणि अंगणवाडी सेविकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- किशोरी शक्ती हि योजना 11 ते 18 वर्ष वयोगटातील दारिद्र रेषेखालील परिवारातील शाळा व महाविद्यालयातून बाहेर पडलेल्या मुलींना सक्षम करेल आणि त्यांना शिक्षण, आरोग्य, स्वच्छता व दैनंदिन जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम करणार.
- महाराष्ट्र किशोरी शक्ती योजनेंर्गत निवडण्यात आलेल्या प्रत्येक कीशोरीवयीन मुली संबंधित शासन एक लाख रुपये खर्च करणार आहे.
- महाराष्ट्राच्या महिला व बालविकास विभागा मार्फत अंगणवाडी स्तरावर आयोजित केलेल्या मेळाव्यात आणि किशोरी आरोग्य शिबीर कार्यक्रमांतर्गत किशोरीवयीन मुलींना आरोग्य शिबीर कार्यक्रमांतर्गत कीशोरीवयीन मुलींना पोषण आणि वैयक्तिक स्वच्छतेचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- किशोरी शक्ती योजनेंर्गत मुलींचा शारीरिक विकास होण्यासाठी 1 वर्षातील 300 दिवस 600 केलरीज, 18 ते 20 ग्रेम प्रथिने व इतर पोषक तत्वे देण्यात येतील.
- पौगंडावस्थेतील मुलींना घरगुती व्यवस्थापन, उत्तम स्वयंपाक, व खाण्याच्या सवयी, वैयक्तिक स्वच्छता आणि मासिक पाळीची काळजी या विषयी प्रशिक्षण देण्यात येईल.
- या योजनेच्या अंतर्गत निवडक कीशोरीवयीन मुलींना औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण देण्यात येणार.
- 16 ते 18 वर्ष वयोगटातील पात्र शाळा सोडणाऱ्या मुलींना स्वयंरोजगार आणि व्यवसायासाठी तयार करण्यात येईल.
- महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना कीशोरीवयीन मुलींना आत्मसन्मान, आत्म ज्ञान, आठ विश्वास, आत्म निर्मिती क्षमता विकसित करण्यासाठी मानसिक पद्धती शिकवेल.
Maharashtra Kishori Shakti Yojana 2024 : उद्देश
महाराष्ट्र राज्यातील दारिद्रय रेषेखालील परिवारातील किशोरीवयीन मुलीच्या हितासाठी महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना राबवण्यात आली आहे. या योजनेंर्गत 11 ते 18 वर्ष वयोगटातील कीशोरीवयीन मुली ज्यांनी शाळा किंवा महाविद्यालयसोडले आहेत त्यांना लाभ मिळेल.या योजनेद्वारे किशोरीवयीन मुलींचा शारीरिक, सामाजिक, मानसिक आणि भावनिक विकास करण्यात येईल.त्यासाठी राज्य सरकार प्रत्येक कीशोरीवयीन मुलींवर दरवर्षी 1 लाख खर्च करणार आहेत. किशोरी शक्ती योजनेचे संपूर्ण कामकाज राज्य शासनाच्या देखरेखीखालील महिला व बालविकास विभागामार्फत करण्यात येणार आहे.
सरकार महाराष्ट्र किशोरी शक्ती या योजनेद्वारे गरीब मुलींना शारीरिक व मानसिकद्रुष्ट्या निरोगी बनवतील. जेणेकरून त्या स्वताचा व आपल्या परिवाराचा विकास करून देशाच्या विकासात हातभार लावतील. हि योजना मुलींचा विकास करण्यासाठी आगामी काळात प्रेरणा देईल.तसेच संपूर्ण भारतातील किशोरीवयीन मुलींच्या विकासाबाबत जागृती निर्माण होईल.
- कीशोरीवयीन मुलींना गृह आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षित आणि सक्षम करणे.
- 11 ते 18 वर्ष वयोगटातील कीशोरीवयीन मुलींची पोषण आणि आरोग्य स्थिती सुधारणे.
- किशोरीवयीन मुलींना आरोग्य, पोषण, कौटुंबिक कल्याण. गृह व्यवस्थापन, मुलांची काळजी आणि वैयक्तिक व अतिपरिचित स्वच्छता इ. शिकवले जाते.
- निर्णय घेण्याची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने किशोरीवयीन मुलींना अनौपचारिक शिक्षण देणे.
Maharashtra Kishori Shakti Yojana 2024 : माहिती
- सरकारने हि योजना अकोला, अहमदनगर,औरंगाबाद,भंडारा,चंद्रपुर,धुळे,जळगाव,जालना, हिंगोली, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद,परभणी,पुणे, रायगड,रत्नागिरी, सांगली,सिंधुदुर्ग,सोलापूर,ठाणे, वर्धा, वाशीम येथे सुरु केली आहे.
- महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना महिला व बालविकास विभागाच्या देखरेखीखाली अंगणवाडी केंद्रातून संपूर्ण पणे चालविली जाईल.
- लाभार्थी किशोरीवयीन मुलींच्या आरोग्याची तपासणी दर 3 महिन्यांनी अंगणवाडी केंद्रावर केली जाणार त्यासाठी त्यांची आरोग्य पत्रिका बनवली जाणार. त्यांची उंची,वजन,शरीराचे वस्तुमान इ. नोंद या कार्ड मध्ये ठेवली जाणार.
- या योजनेंर्गत राज्य शासनाकडून दरवर्षी 3 .8 लाख कोटी रुपये देण्यात येणार आहेत. जे जीवन कौशल्य शिक्षण, आरोग्य शिक्षण, माहिती शिक्षण, आणि संप्रेषण, आरोग्य कार्ड, आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये प्रतिदिन रुपये या दराने पोषण आहार यासारख्या सुविधांवर खर्च केली जाणार आहे.
- राज्यातील दारिद्रय रेषेखालील कार्डधारक परिवारातील 11 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरीवयीन मुलींना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी बनवणे हा या योजनेचा हेतु आहे.
Maharashtra Kishori Shakti Yojana 2024 : अर्ज करण्याची प्रक्रिया
- महाराष्ट्र सरकारने या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी कोणतीही ऑनलाईन पद्धत निर्माण केलेली नाही, त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दारांना त्यांच्या जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क करावा लागेल.
- तसेच या योजनेंर्गत अर्ज करण्यासाठी मुलींना कुठेही जाण्याची आवश्यकता नाही कारण, या योजनेसाठी पात्र मुलींना ओळखून त्यांचे अर्ज अंगणवाडी सेविकाच भरतील, या योजने संबंधित अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
- किशोरी शक्ती योजनेंर्गत पात्र किशोरीवयीन मुलींची नावड करण्यासाठी महाराष्ट्रातील अंगणवाडी केंद्राशी संबंधित कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार.
- योजनेंर्गत सर्वेक्षणामध्ये निवड झालेल्या मुलींची यादी महिला व बालविकास विभागाकडे पाठवण्यात येणार आहे.
- विभागाने निवडलेल्या किशोरीवयीन मुलींची तपासणी केली जाणार. ज्या मुलींना विभागाकडून योजनेंर्गत पात्र ठरविण्यात येईल त्या मुलींची या योजनेंर्गत नोंदणी केली जाणार आहे.
- नोंदणी केलेल्या किशोरीवयीन मुलींना किशोरी कार्ड पण दिले जाणार आहेत. ज्याव्दारे तिला या योजनेंर्गत मिळणारे लाभ घेता येतील.
माझी कन्या भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा
सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येते click करा
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी बद्दल जाणून घेण्यासाठी येते click करा
भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा
Follow Social Media Page