EPFO NEW UPDATE 2024 |पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्ड द्वारे काढता येणार

EPFO NEW UPDATE 2024

EPFO NEW UPDATE 2024 | पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्ड द्वारे काढता येणार ? किती पगारावर किती रुपये मिळणार :- पीएफ खातेधारकांना वर्ष २०२५ च्या सुरुवातीला एक विशेष भेट मिळणार आहे. आता पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी वाट पाहण्याची गरज नाही. ATM मधून तुम्ही पीएफ काढू शकता. ईपीएफओनं पीएफ खात्यातील पैसे एटीएम सेंटरमधून काढण्याची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती समोर आली आहे. पीएफ खाते धारकांमध्ये आनंदाच वातावरण निर्माण होत आहे.

केंद्रीय श्रम सचिव सुमिता डावरा यांनी काही दिवसांपूर्वी पीएफ खात्यातील पैसे ATM मधून काढण्याची सुविधा उपलब्ध करून देणार अस म्हटल होत.EPFO अंतर्गत येणाऱ्या नोकरदारांना त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढणे खूप सोपे होणार आहे. EPFO अशा प्रणाली वर काम करत आहे ज्याद्वारे कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यात जमा केलेले पैसे थेट एटीएम मधून काढू शकतील. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कामगार सचिव सुमिता डावरा यांनी सांगितले की, भारत सरकारचे श्रम आणि रोजगार मंत्रालय पीएफ खात्यात जमा केलेले पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आपली IT प्रणाली अपग्रेड करत आहे .

पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी पासून ATM सेंटर वरून पीएफ खात्यातून पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याच त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता हे स्पष्ट झाल आहे की EPFO खाते दारांकडून पैसे काढण्यासाठी बँकिंग प्रणाली सारखी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे .

EPFO NEW UPDATE 2024 |पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्ड द्वारे काढता येणार

EPFO NEW UPDATE 2024 : खात्यातून पैसे काढण्यासाठी नवी प्रक्रिया

पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासाठी ATM कार्ड सारखे एक कार्ड पीएफ खाते दारांना दिले जाऊ शकते. सुमिता डावरा यांच्या माहिती नुसार हॉर्डवेअर अपडेट केल जाणार आहे. सध्या EPFO खाते दारांना क्लेम सेटल होण्यासाठी ७ ते १० दिवसांची वाट पाहायला लागते. या कार्डच्या मदतीने, EPFO खाते दार ATM मध्ये जाऊन त्यांच्या पीएफ खात्यात जमा केलेले पैसे काढू शकतील. पण पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी मर्यादा असतील.

पैसे कसे काढाल : तुम्ही EPFO खातेदार आहात आणि तुम्हाला तुमच्या निधीतील पैसे काढायचे आहेत, तर त्यासाठी अगदी प्राथमिक अनिवार्यता म्हणजे तुम्हाला तुमचा युनिव्हर्सल अकाऊंट नंबर तुमच्या बँक खात्याशी संलग्न करावा लागेल. ही सुविधा सुरु करण्याच्या आधी या संलग्नतेसाठी आवश्यक प्रक्रिया राबविली जाईल. पीएफ मधील पैसे ATM द्वारे काढण्यासाठी EPFO कडून एक कार्ड दिले जाईल. ते कार्ड एटीएम मध्ये घातल्या नंतर स्क्रीन वर EPFO चा पर्याय निवडावा लागेल.

पुढे तुमचा युएएन नंबर टाकल्यावर तुम्हाला हवी असलेली रक्कम नमूद केल्या नंतर तुम्हाला OTP येणार. OTP टाकावा लागेल त्या नंतर पुढील प्रक्रिया केल्यावर ATM मधून पैसे येतील. हि प्रक्रिया या बरहुकुमच होईल असे नव्हे. पण श्रम मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार ही प्रक्रिया साधारणतः या प्रकारे होण्याची अपेक्षा आहे.

पीएफ खात्यातील ५० टक्के रक्कम काढता येणार : कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या खाते दारांना हे माहिती असणे आवश्यक आहे की त्यांच्या खात्यात जमा असलेल्या पीएफ खात्यातील ५० टक्के रक्कम ATM सारख्या कार्ड वरून काढता येणार.EPFO खाते धारकांना त्यांच्या खात्यात जमा केलेल्या रक्कमे पैकी जास्तीत जास्त ५० टक्के रक्कम एका वेळी काढता येणार. पीएफ सेटलमेंटची प्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सोपी करण्यात आली आहे. अनावश्यक प्रक्रिया सर्व बंद करण्यात आल्या आहेत. या बाबत सूत्रांनी माहिती दिली आहे.

पीएफ खातेदारांच्या वारसांना देखील पैसे काढता येणार : श्रम सचिव सुमिता डावरा यांनी दिलेल्या माहिती नुसार एखाद्या खातेदारांचा मृत्यू झाल्यास त्याच्या परिवारातील वारसदारांना नॉमिनी एटीएम सारख्या स्मार्ट कार्ड सारख्या एम्प्लॉई Deposit लिंक्ड इन्शुरन्स द्वारे क्लेमची रक्कम काढता येणार. यासाठी एम्प्लॉयर कडून योगदान दिल जाईल.

EPFO NEW UPDATE 2024 : किती पगारावर किती रक्कम काढता येणार

ज्या खाते धारकांचा सरासरी मासिक पगार १५ हजार रुपये आहे, त्यांना ७ लाख रुपयांपर्यंत रक्कम पीएफ खात्यातून मिळेल. ज्याचं मासिक सरासरी उत्पन्न १५ हजारांपेक्षा कमी आहे त्यांना ५.५ लाख रुपयांची रक्कम एटीएम मधून काढण्यासाठी सुविधा देण्यात येईल. सध्या पीएफ खात्यातून रक्कम काढायची असल्यास आजारपण,लग्न घर खरेदी या कारणांसाठी रक्कम काढता येत आहे.मात्र त्यासाठी संबधित कर्मचाऱ्याला किमान ५ वर्षाची सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक असते.

पीएफ खात्यातून पैसे काढणे : पैसे काढण्याचे नियम पूर्वी प्रमाणेच असतील. जर एखादी व्यक्ती एका महिन्या साठी बेरोजगार असेल तर तो त्याच्या पीएफ खात्यात जमा केलेल्या रक्कमे पैकी ७५ टक्के रक्कम काढू शकतो. तर दोन महिन्या नंतर तो त्याच्या खात्यात जमा केलेली सर्व रक्कम काढू शकतो.

कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या या निर्णया मुळे नोकरी करत असलेल्या लोकांना त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढणे खूप सोपे आणि जलद होणार आहे.

EPFO NEW UPDATE 2024 : ATM सुविधेमागील हेतु

EPFO-३ च्या अंतर्गत केंद्रीय श्रम मंत्रालय EPFO च्या आधुनिकीकरणासाठी पावले उचलत आहे.
त्यातील पहिला टप्पा या डिसेंबर महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.या आधुनिकीकरणाचा एक भाग म्हणून पीएफमधील पैसे एटीएमद्वारे काढण्याची सुविधा EPFO खाते धारकांना उपलब्ध करून देण्याची आखणी श्रम मंत्रालय करीत आहे. आत्ताच्या प्रक्रियेनुसार सदस्यांना पैसे काढण्यासाठी अर्जप्रक्रिया करावी लागते. पैसे काढण्याची विनंती केल्यापासून १५-२० दिवसांत सदस्याला पैसे मिळतात. २० दिवसांत अर्ज/दावा मंजूर न झाल्यास EPFO कडे तक्रार करावी लागते.या पार्श्वभूमीवर सदस्यांना त्यांच्या हक्काचे पैसे तातडीने मिळावेत, म्हणून एटीएमची सुविधा श्रम मंत्रालय देऊ करीत आहे.

EPFO NEW UPDATE 2024 : ATM मार्गापासून धोका काय ?

आपल्या हक्काचे पैसे तातडीने मिळण्याचा मार्ग EPFO खातेदारांना याद्वारे प्राप्त होणार, हे खरे आहे, मात्र त्याचवेळी, सोप्या पद्धतीने पैसे काढता येतायत,तर काढा .. असा विचार खाते धारकांच्या मनात बळावणार नाही ना, अशी शंका ज्या व्यक्तींना माहिती असते ते व्यक्त करतात. निवृत्ती पश्चात विविध योजनांची आखणी EPFO मधील निधीनुसार केली जाते. त्यामुळे त्यात घट होणे हे खाते धारकांच्या दृष्टीने फारसे हितावह नाही. यामुळे पैसे सोप्या पद्धतीने मिळत असले तरी ते आवश्यक असतील व अन्य पर्याय उपलब्ध नसतील त्याचवेळी काढण्याचे तारतम्य खाते धारकांनी बाळगायला पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.

EPFO NEW UPDATE 2024 : आणखी मोठा निर्णय होणार

एका माहिती नुसार केंद्र सरकार आणखी मोठ पाउल उचलण्याच्या तयारी मध्ये आहे. कर्मचाऱ्यांच्या पीएफ योग दानावर असलेल्या १२ टक्के च्या मर्यादेला हटवण्या साठी केंद्रात हालचाली सुरु आहेत. या बदला मुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या बचतीच्या आधारावर अधिक योगदान करण्याचा पर्याय मिळू शकेल. पण नियोक्त्याचे योगदान निश्चित राहील. तसेच ते कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या टक्के वारीतून केले जाणार. सध्याच्या स्थितीत कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही कर्मचारी प्रॉव्हिंडट फंडात १२ टक्के योगदान देतात. नियोक्त्याच्या योगदाना पैकी ८.३३ टक्के EPS-९५ अंतर्गत पेन्शन कपात म्हणून जाते आणि ३.६७ टक्के EPF मध्ये जात असते.

पेन्शन मध्येही वाढ : कर्मचारी पीएफ योगदानावर असलेली मर्यादा हटवली जाऊ शकते, तर कर्मचाऱ्यांचे योगदान १२ टक्के वरच राहणार. या बदलचा पेन्शन रक्कमेवर परिणाम होणार नाही. कारण पेन्शन अंशदान देखील ८.३३ टक्क्या वरच स्थिर राहील. पेन्शन रक्कम फक्त तेव्हा वाढेल जेव्हा सरकार पीएफ कपाती साठी वेतन मर्यादा वाढवण्यात येईल. ही मर्यादा सध्या १५ हजार रुपये आहे. केंद्र सरकार या मर्यादेला २१ हजार रुपये पर्यंत वाढवू शकते, अशी चर्चा चालू आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे अधिक योगदान त्यांना ५८ वर्ष पूर्ण केल्या नंतर एक मोठा निवृत्ती निधी मिळण्यासा मदत करू शकतो.

EPFO खाते धारकांना स्वेच्छेने पीएफ अधिक योगदान करण्याचा पर्याय देखील आहे कर्मचारी त्यांच्या अनिवार्य १२ टक्के योगदाना पेक्षा अधिक पीएफ कपात करण्याची मागणी करू शकतात. अधिक पीएफ योगदान मूळ पगार आणि महागाई भत्याच्या १०० टक्क्या पर्यंत असू शकते. त्यावर मूळ योगदाना सारखाच व्याज दर लागू शकतो.

EPFO NEW UPDATE 2024 : वाचक मित्रांना सतत पडणारे प्रश्न

१) EPFO खातेधारकांना ATM केव्हा मिळणार आहे ?

:- EPFO खातेधारकांना वर्ष २०२५ च्या सुरुवातीला एक विशेष भेट मिळणार आहे. या बाबत आजून काही update नाही पण नवीन वर्षच्या सुरवातीला माहिती मिळणार .

२) EPFO खातेधारकांना ATM मधून किती पैसे काढता येणार आहेत ?

:- EPFO खातेधारकांना ५० टक्के इतकी रक्कम त्यांच्या EPFO खात्यातून काढता येणार आहे.

३) किती पगारावर किती रककम काढता येणार ?

:- ज्या खाते धारकांचा सरासरी मासिक पगार १५ हजार रुपये आहे, त्यांना ७ लाख रुपयांपर्यंत रक्कम पीएफ खात्यातून मिळेल. ज्याचं मासिक सरासरी उत्पन्न १५ हजारांपेक्षा कमी आहे त्यांना ५.५ लाख रुपयांची रक्कम एटीएम मधून काढण्यासाठी सुविधा देण्यात येईल.

नविन update साठी EPFO च्या अधिकृत website ला भेट द्या

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येते click करा

माझी कन्या भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी बद्दल जाणून घेण्यासाठी येते click करा

भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा

आता शेतकऱ्यांना मिळणार मुख्यमंत्री सोलर पंप २०२४ योजने ची माहिती जाणून घेण्येयसाठी येथे click करा

Ration Card New Update 2024|राशन कार्ड नवीन माहिती २०२४ साठी आमच्या website ला भेट द्या .

RTE Private School Admission Open|आरटीई द्वारे खाजगी शाळेत २५ % पुन्हा ऍडमिशन सुरु २०२५-२६ माहिती जाणून घेण्यसाठी येते click करा .


Leave a Comment