ABHA Health Card Yojana 2025
ABHA Health Card Yojana 2025 |आभा हेल्थ कार्ड योजना २०२५ मराठी : आभा कार्डच्या एका क्लिकवर मिळवा तुमची ” आरोग्य कुंडली ” आभा कार्ड म्हणजे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट याच्या द्वारे तुम्हाला १४ अंकी आभा कार्ड नंबर देण्यात येतो. तो नंबर तुम्हाला भारताच्या डिजिटल हेल्थ केअर मध्ये एक भागीदार म्हणून विशेष ओळख देत असतो.आभा नंबर तुमच्यासाठी एक मजबूत आणि विश्वासू ओळख निर्माण करत असतो. याचा वापर तुम्ही देशभरातील कोणत्याही रुग्णालयात करू शकतात.यामुळे तुमची संपूर्ण आरोग्या बाबत माहिती डिजिटल पद्धतीने या आभा नंबर वर Save करण्यात येते.
आभा कार्ड मुळे आता तुम्हाला आरोग्या संबधीचे कागदपत्रे सांभाळण्याची आवश्यकता राहणार नाही. आभा हेल्थ कार्ड वरती सर्व माहिती साठवली जाते. सर्वजण आपले मेडिकल रिपोर्ट किंवा मेडिकल संबधित सर्व कागदपत्रे सोबत हॉस्पिटल मध्ये घेऊन जात असतात. ते हरवण्याची भीती असते मात्र आभा कार्ड नंबर वर तुमची आरोग्य माहिती डिजिटल रुपामध्ये संग्रहित होत असल्या मुळे तो धोका आभा कार्डमुळे राहणार नाही.

ABHA Health Card Yojana 2025 : आभा कार्ड म्हणजे काय
आभा कार्ड/ हेल्थ आयडी कार्ड ही एक भारत सरकारची योजना आहे. आभा कार्ड म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट असे आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन नंतर तुम्हाला १४ अंकी आभा कार्ड नंबर देण्यात येतो. याच्या द्वारे रुग्णाच्या उपचारा संबधीची सर्व माहिती डिजिटल पद्ध्तीने या नंबर वरती Save करण्यात येते. खास करून केंद्र सरकार आर्थिक द्रुष्ट्या मागास कुटुंबाना समोर ठेवून आभा कार्ड हेल्थ आयडी सुविधा सुरु करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक कुटुबांतील ज्याचे आर्थिक उत्पन्न अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल ते आभा कार्ड सहज पणे बनवू शकतात.
ABHA Health Card Yojana 2025 : हायलाईट
योजनेचे नाव | आभा हेल्थ कार्ड |
द्वारा सुरु | आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार |
आभा कार्डची सुरुवात | २०२२ |
लाभ कोणाला मिळणार | देशातील सर्व नागरिक |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | abha.abdm.gov.in |
हेल्पलाईन | १८००११४४७७ |
ABHA Health Card Yojana 2025 : आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
ABHA Health Card Yojana 2025 : वैशिष्ट्ये
सर्वजण आपले मेडिकल रिपोर्ट किंवा मेडिकल संबधित सर्व कागदपत्र सोबत घेऊन हॉस्पिटल मध्ये जात असतात. ते हरवण्याची भीती असते. मात्र आरोग्य सेवा उद्योग वेगाने डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करत आहे. याद्वारे आरोग्य माहिती डिजिटल रुपामध्ये संग्रहित करून सुविधा पुरवण्याचे काम करत आहे. या मधील च एक भाग म्हणून आभा कार्ड देण्यात येत आहेत. अद्वितीय आणि विश्वास पूर्ण ओळख :- डिजिटल स्टोरेज आजचा एक प्रमुख लाभ म्हणजे ही विविध आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्यांना एक प्रकारे अद्वितीय आंनी विश्वास पूर्ण ओळख देत असते. तसेच डॉक्टर आणि पोलिसांना आभा कार्डच्या आधारे कोणत्याही व्यक्तीची ओळख पटवून देण्यासाठी मदत करत होते.
आभा कार्ड नंबर हा एक १४ अंकी कोड आहे जो भारत सरकारच्या डिजिटल हेल्थ केअर इकोसिस्टीम मध्ये भाग घेत असलेल्या व्यक्तींसाठी एक वेगळीच ओळख निर्माण करून देण्याचे काम करत असतो.
अडचणी दूर करण्यास मदत :- आभा कार्ड एक फोल्डरमध्ये रुग्णाची माहिती संग्रहित करू ठेवत असते. त्यामुळे आरोग्य सुविधा घेण्यासाठी रुग्णाला नोंदणी करण्यासाठी रांगे मध्ये उभे राहण्याची गरज पडत नाही. या व्यतिरिक्त आभा आरोग्य डेटा शेअर करण्यासाठी आभा कार्ड एप्लिकेशन सारखे व्यक्तिगत आरोग्य रेकोर्डच वापर करण्यासाठी एक सहज साइन अप प्रक्रिया प्रदान करतात.
कागद रहित आरोग्य रेकोर्ड :- आभा हेल्थ आयडी कार्ड कोणत्याही तपासणी कागदपत्रा शिवाय डिजिटल पद्ध्तीने रुग्णाचे रेकोर्ड पाहून त्यावर उपचार करता येतात.
पोर्टबिलिटी :-आभा हेल्थ कार्ड संपूर्ण देशात पोर्टबल आहे उपयुक्त आहे हे एका व्यक्तीला देशातील कोणत्याही ठिकाणी आरोग्य सेवा देण्यासाठी सक्षम आहे. हे आभा कार्ड व्यक्तींना आपले आरोग्य रेकोर्ड डिजिटल पद्ध्तीने करण्यास मदत करत असते. त्यामुळे डॉक्टरां साठी रुग्णावर उपचार करणे सोपे होते.
डिजिटल रुपात सुरक्षित :- एका व्यक्तीचे संपूर्ण आरोग्य तपासणी रेकोर्ड डिजिटल पद्ध्तीने याद्वारे सुरक्षित संग्रहित करून ठेवण्यात येते. त्याच्या परवानगी शिवाय कोणालाही ते पाहता किंवा देता येत नाही त्यामुळे ते सुरक्षित आहे. डिजिटल हेल्थ आयडी कार्ड साठी अर्ज करणे संपूर्ण वैयक्तिक आहे हे एक व्यक्ती आपल्या मनानुसार अर्ज करू शकते किंवा परत पण घेऊ शकते.
ABHA Health Card Yojana 2025 : फायदे
- सुगम हेल्थ केअर :- व्यक्तींना याद्वारे अद्वितीय डिजिटल आरोग्य प्रोफाईल बनवण्याची परवानगी मिळत असते. हेल्थ आयडी कार्ड याद्वारे आरोग्य सेवा पुरवण्यात येतात. तसेच या सुविधा पुरवत असताना रुग्णाचा डेटा सहज उपलब्ध होत असतो.
- व्यक्तिगत आरोग्य रेकोर्ड लिंक :- तुम्ही तुमची सर्व आरोग्य तपासणीची माहिती जसे कि रक्त परीक्षण, निदान औषधे याची सर्व माहिती सहज पद्धतीने यामध्ये सेव्ह करू शकतात. तसेच तुम्ही एका क्लिकवर तुमची सर्व रिपोर्ट ची माहिती तात्काळ बघु शकतात.
- आयुष उपचार :- आयुष उपचार संस्थांमध्ये आभा कार्ड स्वीकारले जाणार आहेत यामध्ये आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, नैसर्गिक चिकित्सा, व होमियोपॅथीक उपचार केले जातात.
- डॉक्टर पर्यंत पोहचणे सोपे :- आभा हेल्थ कार्ड व्यक्तींना मोबाईल App चा वापर करून स्वत:चे आरोग्य रेकोर्ड तपासणीचा इतिहास तात्काळ मिळवण्यासाठी मदत करत असते नवीन डॉक्टर कडे जाणे किंवा आपत्कालीन स्थितीमध्ये हे विशेष करून मोठ्या प्रमाणात उपयोगी पडत असते. यातून रुग्णाला यापूर्वी कोणता आजार होता कोणते उपचार चालू आहेत याची सर्व माहिती आभा कार्ड नंबर वरती कोणत्याही डॉक्टरांना मिळत असते त्या नुसार डॉक्टरांना तुमच्यावर पुढील उपचार करण्यसाठी ही माहिती उपयोगाची ठरणार आहे.
ABHA Health Card Yojana 2025 : लाभ
आभा हेल्थ आयडी कार्ड या अंतर्गत लाभार्थी डिजिटल हेल्थ प्रोफाईल बनवण्याची पूर्वी परवानगी मिळत असते याद्वारे आरोग्य सेवा पुरवणे अगदी सोपे होऊन जाते. तुम्ही तुमची संपूर्ण मेडिकल माहिती जसे कि रिपोर्ट अहवाल, औषध अन्य, रक्ताची तपासणी अहवाल संपूर्ण मेडिकल माहिती सहज पद्ध्तीने यामध्ये सेव्ह करू शकतात. तसेच ही माहिती पाहिजे असल्यास तुम्हाला ही माहिती त्यावर काही क्लिक मध्ये तुम्हाला संपून तुमची आज पर्यंतचे तपासणी अहवाल पाहता येणार यामुळे कागदपत्र हरवण्याचा धोका राहणार नाही.
आभा हेल्थ आयडी कार्ड लाभार्थ्यांना मोबाईल app च्या द्वारेही बघण्याची सुविधा आहे. तुम्ही तुमच्या आरोग्य संबधित रेकॉर्ड आणि मेडिकल हिस्ट्री पाहू शकतात. तसेच नैसर्गिक उपचार, योग, युनानी,सिद्धी, आयुर्वेदिक, व होमिओपॅथीक उपचार करण्यात येतात. तुम्ही तुमच्या हेल्थ आयडीला आरोग्य विमा पॉलिसीशि जोडू शकतात. यामुळे लाभार्थीला आपली स्वत:ची पॉलिसीचे विवरण पाहता येते. यामुळे कशलेस हॉस्पिटल मध्ये भरती होण्यासाठी लाभ होत असतो.
ABHA Health Card Yojana 2025 : आयुष्मान कार्ड आणि आभा कार्ड मधील फरक
- आयुष्मान कार्ड हेल्थ इन्शुरन्स आहे, आणि आभा कार्ड हे डिजिटल अकाउंट आहे.
- आयुष्मान कार्ड हे गरीब परिवारातील नागरिकांसाठी आहे, तर आभा कार्ड हे देशातील कोणताही व्यक्ती काढू शकतो.
- आयुष्मान हे शहर आणि ग्रामीण भागात वेगवेगळे बनवण्याचा नियम आहे, तर आभा कार्ड काढण्यासाठी कोणताही नियम लागू नाही.
- आयुष्मान कार्ड साठी उपचारा दरम्यान तुम्हाला आर्थिक मदत मिळत असते, तर आभा कार्ड उपचारा दरम्यान तुमची वैद्यकीय हिस्ट्री समजून घेता येते.
ABHA Health Card Yojana 2025 : कार्ड कसे बनवावे
- आभा कार्ड काढण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला http://nehmi.gov.in/ या वेबसाईट ला भेट द्यावी लागणार त्यांनंतर आयुष्मान भारत डिजिटल मिशन तुमच्यासमोर ओपन होणार.
- त्या मिशन मध्ये क्रिएट आभा कार्ड नंबर या नावावर तुम्हाला क्लिक करावे लागणार.
- त्यानंतर तुम्हाला तिथे एक तर तुमचा आधार कार्डचा नंबर किंवा तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स वापरून आभा हेल्थ कार्ड काढू शकतात.
- जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे आधार कार्ड वापरून काढायचं असेल तर त्यासाठी तुमचा आधार नंबर हा मोबाईलशि लिंक असणे आवश्यक आहे.
- त्यानंतर तुम्हाला Next या वर क्लिक करावे लागेल नंतर तुमच्या समोर दुसरे पेज ओपन होणार त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकावा लागेल नंतर त्यावर दिलेल्या सूचना काळजी पूर्वक वाचायच्या आहेत.
- जर तुम्ही सर्व माहिती भरली आहे. त्यानंतर सहमत असाल तर तेथे दिलेल्या रकाण्यात क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक छोटासा खाली प्रश्न येणार त्या प्रश्नाचे उत्तर लिहून Next या वर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला मोबाईलवर एक OTP पाठवण्यात येणार तो OTP तेथे टाकावा लागेल नंतर पुन्हा तुमच्या समोर दुसरे पेज ओपन होणार त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरील नाव, लिंग, फोटो, पत्ता, जन्मतारीख ही सर्व माहिती अचूकपणे भरावी लागणार.
- आधार अथेटीकेशन सक्सेसफुल झाल्याची माहिती तुम्हाला दिसणार, त्यानंतर Next या वर क्लिक करा तुमच्या स्क्रीनवर आणखी एक नवीन पेज ओपन होणार तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो कि तुमच्या आधार कार्डला लिंक आहे त्या नंतर पुन्हा तुम्हाला Next या वर क्लिक करायच आहे.
- तुम्हाला आवश्यक असल्यास तुमचा मेल आयडी ही तुम्ही आभा कार्डच्या नंबर शि जोडू शकता नंतर तुमच्या स्क्रीनवर आभा कार्ड नंबर तयार झाल्याचा मेसेज दिसणार त्याखाली आभा कार्ड नंबर नमूद केलेला असेल तर पुढे आभा कार्ड address या वर क्लिक करावे लागणार.
- तिथे सुरुवातीला तुम्हाला तुमचे प्रोफाईल डीटेल्स दाखवले जातील ते तुम्ही व्यवस्थित टाकले आहे का हे नित तुम्हाला बघून घ्यावे लागेल नंतर तुम्हाला आभा कार्ड तयार करावा लागेल.
- त्या नंतर रकान्यां मध्ये तुम्ही तुमच नाव, जन्म तारीख यापैकी जे लक्षात राहील आणि तुम्हाला जे सोप आहे ते टाकून आभा address तयार करू शकता नंतर क्रीएट लिंक यावर क्लिक करा. तुमचा आभा कार्ड नंबर address लिंक झाल्याचा मेसेज तुम्हाला स्क्रीनवर येणार या पद्ध्तीने तुम्ही घर बसल्या आभा हेल्थ कार्ड बनवू शकता.
ABHA Health Card Yojana 2025 : सतत विचारले जाणारे प्रश्न
१. आभा हेल्थ कार्ड म्हणजे काय ?
आभा कार्ड हे तुमचे डिजिटल अकाउंट आहे. यामध्ये तुमच्या आरोग्याच्या संबधित संपूर्ण माहिती डिजिटल पद्ध्तीने सेव्ह करण्यात येते. त्यामुळे तुमची आरोग्या संबधीची कागदपत्रे हरवणार नाहीत. आणि सुरक्षित राहणार.
२.आभा कार्डसाठी कोणते App आहे का ?
हो, तुम्हाला प्ले स्टोर मधून आभा App या नावाचे आहे. ते तुम्ही डाउनलोड करू शकतात.
३. आभा कार्डचा फायदा काय ?
आभा कार्ड मुळे तुमची संपूर्ण आरोग्याची माहिती डिजिटल पद्ध्तीने सेव्ह होत असल्याने महत्वाची कागदपत्रे हरवण्याचा धोका राहत नाही.
४. आभा कार्ड कोणाला काढता येते ?
देशातील कोणताही व्यक्ती आभा कार्ड कडू शकतो.