Solar Pump Yojana Maharashtra 2024
Solar Pump Yojana Maharashtra 2024 |आता शेतकऱ्यांना मिळणार मुख्यमंत्री सोलर पंप २०२४ : शेतकऱ्यांना सुलभ सिंचनासाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरु करण्यात आली आहे.कुठलीही शंका नाही कि कोणत्याही राज्या मध्ये शेतकऱ्यांची स्थिती जी पाहिजे तशी चांगली नाही. या मध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतकरी पण येतात. त्यांना सिंचनासाठी डीझेल आणि विद्युत पंपचा वापर करावा लागतो. तसेच वीज बिल पण खूप जास्त येते आणि डिझेलची किंमत तर सर्वाना माहितीच आहे.
काही दिवसा आधी डिझेलची किंमत पेट्रोल च्या किंमती पेक्षा जास्त झाली होती. या मुळे सर्व शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदती साठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरु केली आहे. सर्वाना माहिती आहे कि ही योजना महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप सुविधा जनक आहे.

या लेखा द्वारे आम्ही तुम्हाला पूर्ण विस्तार मध्ये माहिती देणार आहोत या योजने मध्ये किती शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार. या योजनेसाठी महाराष्ट्रातील किती शेतकरी पात्र असतील. या योजने अंतर्गत कोणत्या प्रकारचे अनुदान देण्यात येणार. तसेच या योजने मधून कोणाला त्याचा लाभ घेता येणार. ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला ह्या लेखातून देणार आहोत. तरी आपण सर्वांनी हा लेख पूर्ण वाचवा.
Solar Pump Yojana Maharashtra 2024 : या योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना भेटणार
महाराष्ट्र शासनाने सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना लागू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत महारष्ट्र शासनाने कृषी शेतकऱ्यांना सौर पंप प्रदान केले आहेत जेणे करून ते आपल्या शेता मध्ये सिंचनाची सुविधा करू शकतील. या योजने अंतर्गत एक लाख सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत. जे शेतकरी याचा लाभ घेतील त्यांना ९५ टक्के सबसिडी देण्यात येईल. याचा ३ वर्षाचा कालावधी असेल म्हणजेच महाराष्ट्रात १ लाख सौर कृषी पंप बसवण्यात येतील. त्यामुळे १ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार.
Solar Pump Yojana Maharashtra 2024 :सौर कृषी पंपाचे फायदे
- शेतकऱ्यांना जे विजेचे बिल येत आहे त्या बिला पासून मुक्तता मिळणार.
- शेतकऱ्यांना दिवसा शेती पंपास वीज उपलब्ध
- दिवसा विनाव्यतय अखंडित वीज पुरवठा
- डीझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च
- औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती वीज ग्राहकांवरील क्रास सबसिडीचा बोजा कमी करणे.
- पर्यावरण पूरक परिचलन
- शेती सिंचनाचा भाग वीज सबसिडी पासून पृथ्थकरण करणे.
Solar Pump Yojana Maharashtra 2024 : सौर कृषी पंप वैशिष्टे
या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच भेटणार. शासनाने पहिल्या चरणात २५ हजार पंप दुसऱ्या चरणात ५० हजार पंप आणि तिसऱ्या चरणात २५ हजार सोलर पंप वाटप करण्यात येतील. ५ एकर पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना किंवा ५ एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना शासन ३ एचपीडीसी पंपिंग प्रदान करण्यात येणार आहेत.ज्या शेतकऱ्या जवळ वीज पुरवठा कनेक्शन आहे त्यांना सौर उर्जा पंपिंग मशीन भेटणार नाही तसेच सौर पंप या योजने मुळे शासना वरील अतिरिक्त वीज बिल कमी होणार आहे.
- मुख्यमंत्री सोलर पंप योजने अंतर्गत महाराष्ट्र शासन सौर कृषी पंपा च्या किंमतीच्या ९५ % अनुदान देणार आहेत. व त्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्याला ५ % रक्कम भरावी लागेल.
- या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
- या योजने अंतर्गत ५ एकर शेतजमीन असलेल्या सर्व शेतकऱ्यांना ३ HP पंप देण्यात येणार आहेत. आणि ५ एकर पेक्षा जास्त शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना ५ HP आणि ७.५ HP पंप देण्यात येणार आहेत.
- सौर कृषी पंपा सोबत दोन डी.सी.एल.ई.डी.बल्ब, मोबाईल चार्जिंग व चार्जिंगची सुविधा ( लाभार्थ्यांना घ्यावी लागेल.)
- पारेषण विरहीत १ लाख सौर कृषी पंप टप्प्या टप्प्यात उपलब्ध करून दिले जातील.
- या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक टप्पा प्रत्यक्ष चालू झाल्या पासून १८ महिन्यात राबविण्यात येणार.
Solar Pump Yojana Maharashtra 2024 : लाभार्थी पात्रता
- महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री सोलर पंप योजना २०२४ मोठ्या प्रमाणात राबविली जाणार आहे. त्यामुळे या योजनेसाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी पात्रता निकष ठरवून दिले आहेत. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे पात्रता निकष माहिती असणे गरजेचे आहे.
- मुख्यमंत्री सोलर पंप योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे, अशे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील. परंतु या शेतकऱ्यांकडे पारंपारिक पद्धतीने विद्युत कनेक्शन नसणे आवशयक आहे.
- या योजने अंतर्गत पाच एकरापर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन HP सौर कृषी पंप आणि पाच एकरांपेक्षा जास्त शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच HP सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत.
- या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पारंपारिक पद्धतीने विद्युत कनेक्शन नसलेले शेतकरी तसेच विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, महावितरण कंपनीकडे विद्युत कनेक्शनसाठी पैसे भरूनही प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांपैकी, ज्यांना नजीकच्या काळात विद्युत कनेक्शन मिळणे शक्य नाही असे शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजने अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी यांना पण या योजने अंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे.
- वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारी शेतजमीन असलेले शेतकरी पण या योजनेसाठी पात्र असणार .
- योजनेच्या अंतर्गत सौर कृषी पंपांसाठी सर्वसाधारण गटांच्या लाभार्थ्यांकडून १० टक्के आणि अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून ५ टक्के याप्रकारे लाभार्थी हिस्सा म्हणून भरणे गरजेचे असेल.
Solar Pump Yojana Maharashtra 2024 : हायलाईट
योजना | मुख्यमंत्री सोलर पंप योजना महाराष्ट्र |
द्वारा सुरुवात | महाराष्ट्र शासन |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
उद्देश | राज्याच्या शेतकऱ्यांना सोलर पंप उपलब्ध करून देणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://www.mahadis.com.in/solar |
विभाग MSEDCL | MSEDCL |
Solar Pump Yojana Maharashtra 2024 : आवश्यक कागदपत्रे
- शेतीचे कागदपत्र
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रहिवासी दाखला
- ७/१२ उतारा
- ओळख पत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
Solar Pump Yojana Maharashtra 2024 : उद्दिष्ट
महाराष्ट्र राज्यातील विवध भागामधील शेकरी आज ही शेती सिंचनासाठी डीझेल पंप किंवा इलेक्ट्रिक पंप वापरत आहेत. या मध्ये दुर्गम भागा मधील शेतकरी डिझेल पंप उपयोगात आणत असून, डिझेल पंप महाग असतात आणि डिझेलची किंमत पण वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याना शेती सिंचनासाठी खूप खर्च करावा लागत असून या सर्व बाबिंमुळे शेतकऱ्यांचे जास्त प्रमाणात नुकसान होत आहे. या नुकसानापासून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी त्यांचा शेती सिंचनाचा प्रश्न मिटविण्यासाठी व पर्यावरणाचे संरक्षण करणे हा उद्देश लक्षात घेऊन सरकारने ही योजना सुरु केली आहे.
महाराष्ट्र राज्या मध्ये ही योजना राबवत असताना विशेषता विदर्भातील आत्म हत्या ग्रस्त जिल्ह्यांमध्ये तसेच आतु दुर्गम भागांमधील शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणार आहे.या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांनी भरण्याचा हिस्सा कमीत कमी ठेऊन उर्वरित रक्कम वित्तीय संस्थे मार्फत कर्ज स्वरुपात देण्यात येणार आहे. आणि या कर्जाची परत फेड महावितरण कंपनीद्वारे टप्प्या टप्प्याने करण्यात येईल.
Solar Pump Yojana Maharashtra 2024 : वर्गवारी निहाय लाभार्थी हिस्सा
वर्गवारी | लाभार्थी हिस्सा | ३ एचपी लाभार्थी हिस्सा | ५ एचपी लाभार्थी हिस्सा | ७.५ एचपी लाभार्थी हिस्सा |
सर्वसाधारण | १० % | रु. १६५६०/- | रु.२४७१०/- | रु.३३४५५/- |
अनुसूचित जाती | ५ % | रु.८२८०/- | रु.१२३५५/- | रु.१६७२८/- |
अनुसूचित जमाती | ५ % | रु.८२८०/- | रु.१२३५५/- | रु.१६७२८/- |
Solar Pump Yojana Maharashtra 2024 : लाभार्थी निवडीचे पात्रता निकष ३ HP व ५ HP ( अश्वशक्ती )
- पारंपारिक पद्ध्तीने कृषी पंपाकरिता विद्युत जोडणी न झालेले शेतकरी.
- शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत असलेली शेतजमीन असणे.
- ५ एकरा पर्यंत शेत जमीन धारकास ३ HP अश्वशक्ती सौर कृषी पंप व ५ एकरा पेक्षा जास्त शेतजमीन धारकास ५ अश्वशक्ती व ७.५ अश्वशक्ती सौर कृषी पंप देय असेल.
- अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यास प्राधान्य.
- या पूर्वी शासनाच्या कोणत्याही योजने द्वारे कृषी पंपाचा लाभ णी घेतलेले शेतकरी.
- ” धडक सिंचन योजना ” अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.
- वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अद्याप विद्युतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी.
- महावितरण कडे विद्युत जोडणीसाठी पैसे भरून प्रलंबित असलेले शेतकरी अर्जदार.
लाभार्थी निवडीचे पात्रता निकष ७.५ HP ( अश्वशक्ती ) सोलर पंपासाठी
- विहीर किंवा कुपनलिका या पैकी जलस्रोत असणे गरजेचे आहे.
- अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार अतिशोषित, शोषित आणि अशंत: शोषित क्षेत्रामधील विहिरींमध्ये व कुपनलिका मध्ये नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार नाही.
- अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार ज्या सुरक्षित पाणलोट क्षेत्रांची उपशाची स्थिती ६० % पेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहिरींमध्ये व कुपनलिका मध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र.
- खडकाचे क्षेत्रात खोदल्या जाणाऱ्या बोरवेल विहिरी हे शाश्वत सिंचनाचे साधन नसल्यामुळे बोरवेल विहिरींमध्ये नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार नाही. मात्र गाळाचे क्षेत्रामध्ये खोदल्या जाणाऱ्या कुपनलिका हे शाश्वत सिंचनाचे साधन असल्यामुळे सुरक्षित क्षेत्रामधील कुपनलिका मध्ये ( Tube Well )अ. क्र २ च्या अधीन राहून, नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार आहे.
- कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रामध्ये ६० मी . पेक्षा जास्त खोल असलेल्या विहिरींमध्ये अथवा कुपनलीके मध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र नाही.
Solar Pump Yojana Maharashtra 2024 : वाचक मित्रांना सतत पडणारे प्रश्न
१. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना काय आहे ?
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून देणार आहेत.
२.सौर कृषी पंप म्हणजे काय ?
सौर पंप म्हणजे सौर उर्जेवर चालणारे पंप, यामध्ये फोटोव्होल्टाइक्स (PV) पॅनलव्दारे निर्माण होणाऱ्या विजेवर चालणारे पंप पारंपारिक विजेवर किंवा डिझेलवर चालणाऱ्या पंपांच्या विरुद्ध हेपंप सूर्यप्रकाशापासून निर्माण होणाऱ्या विजेवर म्हणजेच थर्मल उर्जेवर काम करतात.
३. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना पैसे किती भरायचे आहेत ?
मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजना अंतर्गत शासनाव्दारे 95 टक्के अनुदान देण्यात येणार आहे आणि यामध्ये लाभार्थ्यांना 5 टक्के हिस्सा भरावा लागेल.
४. मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजना कोणत्या राज्यात लागू केली आहे ?
महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि मोलाची योजना मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजना सुरु केली आहे.
५. मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजनेची अर्ज प्रक्रिया काय आहे ?
मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन माध्यमातून केली जाते. यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन योजनेसाठी अर्ज करा.
सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येते click करा
माझी कन्या भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी बद्दल जाणून घेण्यासाठी येते click करा
भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा
Follow Social Media Page