Ration Card New Update 2024
Ration Card New Update 2024|राशन कार्ड नवीन माहिती २०२४ : राशन कार्ड किंवा शिधा पत्रिका हा एक अधिकृत कागदपत्र आहे. जे की शासनाने जारी केला आहे. राशन कार्ड च्या मदतीने किंवा साह्याने महाराष्ट्रातील पात्र परिवार हे राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा २०१३ नुसार अनुदानित दराने अन्नधान्य खरेदी करू शकतील. भारत देशातील मोठ्या लोकसंख्ये समोर उभी असलेली गरिबी आणि कुपोषण ही एक दीर्घकालीन व मोठी समस्या असून याच समस्ये तून बाहेर जाण्यासाठी भारत सरकार हे नागरिकांसाठी विविध योजना सुरु करत आहेत.
भारत सरकार ने महत्वपूर्ण योजना म्हणजे राशन कार्ड / शिधापत्रिका योजना सुरु केली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना व दारिद्य्र रेषेखालील नागरिकांना परवडणाऱ्या किंमती मध्ये अन्न धान्य आणि घरात लागत असलेल्या वस्तू शासना मार्फत कमी दरामध्ये मिळू शकतील.

Ration Card New Update 2024 : या योजने मध्ये झालेले नवीन बदल
केंद्र शासनाने खूप वर्षा नंतर राशन कार्ड योजनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. राशन कार्ड धारकांना आता पर्यंत तांदूळ व गहू या गोष्टी भेटत होत्या पण या नंतर राशन कार्ड धारकांना तांदूळ आणि गहू सोबतच आणखीन नवीन ३५ वस्तूंचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. या वस्तू मध्ये साखर, मीठ, साबण, डाळ, रवा, तेल व तसेच घरात उपयोगी येणाऱ्या वस्तू या मध्ये असणार आहेत. हा बदल केल्या मुळे देशातील गरीब परिवारांसाठी त्यांच्या मुलभूत व दैनदिन गरजा भागविण्यासाठी मदत होणार आहे.
राशन कार्ड या योजने मुळे देशातील गरीब व कमी उत्पन्न असलेल्या परिवारांना या योजने मुळे खूप मोठी मदत मिळणार आहे. या योजने अंतर्गत अन्न धान्य आणि ग्रह उपयोगी वस्तू परवडणाऱ्या किमंती मध्ये देशातील गरीब परिवारांना मिळत आहेत. दारिद्रय रेषेखालील नागरिकांना याची मदत होणार आहे.आणि बेरोजगारी व दारिद्रयामुळे होत असलेल्या पोषण अभावातून बाहेर पडण्यासाठी याची मदत होणार.
Ration Card New Update 2024 : राशन कार्ड चे प्रकार
राशन कार्ड किंवा शिधापत्रिका याचे साधारपणे चार प्रकार आहेत या चार राशन कार्ड ची ओळख त्यांच्या रंगानुसार होत असते. ते चार राशन कार्ड खालील प्रमाणे आहेत.
- केशरी राशन कार्ड
- पिवळ्या रंगाचे राशन कार्ड
- बिपीएल राशन कार्ड
- पांढरे राशन कार्ड हे राशन कार्ड परिवारांच्या उत्पन्न गटानुसार, मिळकत किंवा कमाई नुसार राशन कार्ड वाटप करण्यात येते.
१) केशरी राशन कार्ड :- हे राशन कार्ड ज्या परिवाराचे एकूण वार्षिक उत्पन्न दारिद्रय रेषेखालील पेक्षा जास्त आहे अशा परिवारांना देण्यात येते.ज्या परिवाराचे एकूण उत्पन्न वर्षाकाठी १५ हजार रुपया पेक्षा जास्त आहे अशा कुटुंब धारकाला या केशरी राशन कार्ड चा लाभ घेता येतो.
नियम :-
- परिवारातील कुठल्याही सदस्या कडे चार चाकी वाहन असू नये.
- वार्षिक उत्पन्न हे १५ हजार रुपया पेक्षा जास्त आणि १ लाखा पेक्षा कमी असले पाहिजे.
- परिवाराकडे चार हेक्टर किंवा जास्त सिंचना खाली जमीन असू नये.
२) पिवळ्या रंगाचे राशन कार्ड :- पिवळे राशन कार्ड मुळे नागरिकांना जन वितरण दुकानामधून तांदूळ आणि गहू कमी किंमतीत मिळत असतात. सध्या या कार्ड मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या राशन कार्ड लाभार्थी मध्ये परीवातील जेष्ठ महिलेचे नाव हे कुटुंबांचे प्रमुख म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.
नियम :-
- परिवारातील कुठलाही सदस्य वकील किंवा डॉक्टर असायला नको.
- पिवळे राशन कार्ड मिळविण्यासाठी परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे १५०००० रुपया पेक्षा जास्त नसावे.
- परिवाराकडे टेलिफोन असू नये.
- तसेच कुठलाही सदस्य व्यावसायिक कर, विक्रीवर किंवा आयकर भरणारा नसला पाहिजे.
- परिवारातील सर्व व्यक्तींनी जिरायत जमीन एकूण दोन हेक्टर किंवा एक हेक्टर हंगामी बागायती जमीन किंवा अर्धा हेक्टर बागायती जमीन ठेवू नये. ( दुष्काळ ग्रस्त भागांमध्ये दुप्पट )
- परिवाराकडे चार चाकी वाहन नसायला पाहिजे.
३) बिपीएल कार्ड :- दारिद्रय रेषेच्या खालील येत असलेल्या नागरिकांना हे कार्ड देण्यात येते. ज्या नागरिकांकडे स्वता: ची जमीन नाही. त्यांना या बीपीएल कार्डच्या माध्यमातून शासना मार्फत दर महिन्याला तीन रुपये दराने ३५ किलो तांदूळ देण्यात येते. व याच्या सोबतच ग्राहकांना साखर, गहू, तेल, मीठ,रवा, रॉकेल देखील मिळत असते.या कार्डच्या माध्यमा तून ग्राहकांना बँके कडून कमी व्याज दराने कर्ज पण देण्यात येते.
४) पांढरे राशन कार्ड :- ज्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्याच्या पेक्षा जास्त आहे व परिवारातील कुठल्याही व्यक्ती कडे चार चाकी वाहन असेल आणि एकूण चार हेक्टर पेक्षा जास्त सिंचना खाली असलेली जमीन असेल तर तो पांढरा राशन कार्ड घेण्यासाठी पात्र असेल.
Ration Card New Update 2024 :- आवश्यक कागदपत्र
ज्या परिवारा कडे राशन कार्ड नसेल त्यांनी लवकर राशन कार्ड बनवून घ्यावे. त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र खालील प्रमाणे देण्यात आले आहेत.
- मतदान ओळख पत्र
- कुटुंब प्रमुखाचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- चालू मोबाईल नंबर
- बँकेचे पासबुक
- पासपोर्ट साईज तीन फोटो
- ड्रायव्हिंग लायसन्स (असल्यास)
Ration Card New Update 2024 : शासना कडून देण्यात आलेल्या काही सवलती
- सर्व बीडी कामगार व पारधी आणि कोल्हाटी समुदायांना तात्पुरत्या आधारा वरती बीपीएल राशन कार्ड देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
- त्यांनतर कापूस गिरणी व साखर कारखाने २०१३ च्या अखेरीस बंद पडलेल्या या कारखान्यातील कामगारांना तात्पुरते पिवळे राशन कार्ड देण्यात आले आहेत.
योग्य कागद पत्रांची पूर्तता न केल्या मुळे अनेकदा बरेच नागरिक व कुटुंब या योजनेच्या सवलती ओअसून वंचित राहतात. दूर वरच्या भागांमधील व गावांमधील नागरिकांना या योजने बद्दल माहित नसल्या मुळे त्यांना या योजनेचा फायदा देखील मिळत नाही. तसेच राशन कार्ड मिळविण्यासाठी बऱ्याचदा भ्रष्टाचाराला सुद्धा सामोरे जाव लागत अशा अनेक समस्या मुळे राशन कार्ड योजनेचा फायदा हा सर्व सामान्यान पर्यंत पोहचत नाही.
गरिबी कुपोषण आणि बेरोजगारी या सारख्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी राशन कार्ड योजना एक प्रभावी उपाय ठरत आहे. या योजने मुळे गरीब परिवारांना मदत मिळत असली तरी अजूनही अनेक समस्यांना सामोरे जाव लागत आहे. जर एखाद्या परिवारा कडे राशन कार्ड नसेल तर त्यांनी लवकरात लवकर राशन कार्ड काढून घ्यावे.
Ration Card New Update 2024 : राशन कार्ड चे फायदे
- राशन कार्ड हे पत्याचा पुरावा व ओळखीचा पुरावा म्हणून काम करत असते.
- राशन कार्ड मुख्यता अनुदानित खाद्यपदार्थ व इंधन खरेदी करत असताना वापरतात.
- गरीब परिवारांना परवडत असलेल्या कमी किंमतीत अन्न धान्य मिळणे शक्य झालेले आहे.
- एल पी जीच्या नवीन कनेक्शन साठी राशन कार्ड आवश्यक आहे.
- दारिद्रय रेषे खालील परिवारांना मदत होणार.
- तुम्हाला जर परवाना हवा असेल तर राशन कार्ड हा एक वैध पुरावा आहे.
- बेरोजगारी आणि दारिद्रया मुळे होत असलेल्या पोषण अभावातून बाहेर पडण्यासाठी मदत होईल.
- मुलभूत गृह उपयोगी वस्तू सवलतीच्या दारामध्ये मिळतील.
- आता नवीन पद्धतीचे कार्ड आलेले आहे त्याच नाव डिजिटल राशन कार्ड असे आहे.
Ration Card New Update 2024 : डिजिटल राशन कार्ड
- राशन कार्ड चे नाव बदलून आता डिजिटल राशन कार्ड करण्यात आले आहे. तसेच त्या मध्ये बरेच बदल देखील केलेले आहेत. नवीन डिजिटल राशन कार्ड आता एटी एम कार्ड सारखे दिसणार आहे. त्या मध्ये एक छोटीशी चीप देखील मिळेल.
- या डिजिटल राशन कार्ड मधील कुटुबांतील प्रमुख पुरुषाचे नाव काढून टाकले जात आहे आणि त्या जागेवर कुटुंबातील जेष्ठ महिलेचे नाव टाकले जाणार आहे. हे असे आहे कि आता राशन कार्ड वरील पुरुषांऐवजी त्या जेष्ठ महिलेचे नाव हे कायम स्वरूपी असणार.
- डिजिटल राशन कार्ड हे आधार लिंक करण्यात येईल.
- डिजिटल राशन कार्ड आता कायम स्वरूपी साठी डिझाईन करण्यात आले आहे. त्याची मर्यादा संपणार नाही या आधी पाच वर्ष झाले कि आपल्याला कार्ड रिन्यू करावे लागत असे. परंतु आता याची गरज पडणार नाही.
Ration Card New Update 2024 : डिजिटल राशन कार्ड चे फायदे
- रेशन दुकानात होत असलेल्या फसवणुकीला आळा घालण्यास मदत होईल.
- कुटुंब प्रमुखाने अंगठा दिल्या वरच राशन मिळणार.
- ही प्रक्रिया पूर्णपणे बायोमेट्रिक पद्ध्तीने होणार आहे व दुकानदारांकडून फसवणुकीचा प्रश्न उद्भाणार नाही.
Ration Card New Update 2024 : नवीन नोंदणी साठी पात्रता
नवीन नोंदणी साठी ऑनलाइन फॉर्म भरता येईल त्यासाठी mahafood.gov.in या वेबसाईट ला भेट देऊन नवीन राशन कार्ड साठी तुम्हाला अर्ज करता येणार.
- कोणी जर विवाहित असेल तर त्यांना कुटुबांतील राशन कार्डामध्ये नाव नोंदवणे गरजेचे आहे.
- एखाद्या कुटुंबात नवजात बालकाने जन्म घेतला असेल तर त्याचे राशन कार्ड मध्ये नाव नोंदवणे आवश्यक आहे.
Ration Card New Update 2024 : राशन कार्ड बद्दल माहित असणे आवश्यक आहे
- महाराष्ट्रातील कोणत्याही राशन कार्ड धारकाला राज्यातील कुठल्याही रेशन दुकानातून धान्य घेण्याचा अधिकार आहे. त्यासाठी पत्ता बदलण्याची काहीही आवश्यकता नाही.
- राशन कार्ड स्वत: कडे ठेवायचा व रद्द करण्याचा अधिकार रेशन दुकानदाराला नाही आहे.
- रेशन दुकाना समोर नागरिकांना स्पष्टपणे वाचता येईल असे माहिती फलक लावणे गरजेचे आहे त्यामध्ये दुकाणाची वेळ, दुकान क्रमांक, मोबाईल नंबर इ. माहिती असणे गरजेचे आहे.
- रेशन मशीन वर अंगठा ठेवल्या नंतर घेण्यात आलेल्या रेशींची व दिलेल्या पैशांची पावती येते. टी पावती रेशन कार्ड धारकास देणे बंधनकारक आहे.
- दुकानदार पावती देत नसेल तर रेशन दुकानातील पुस्तकात नोंद करता येते.
- रेशन दुकान साप्ताहिक सुट्टी व्यतिरिक्त सकाळी चार तास आणि संध्याकाळी चार तास निश्चित उघडे असायला पाहिजे.
अधिक माहिती साठी या Official Link La visit करा
माझी कन्या भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा
सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येते click करा
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी बद्दल जाणून घेण्यासाठी येते click करा
भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा
Follow Social Media Page