Ladki Bahin Yojana 2024|लाडकी बहिण योजना २१०० रुपये मिळणार

Ladki Bahin Yojana 2024

Ladki Bahin Yojana 2024|लाडकी बहिण योजना २१०० रुपये मिळणार :लाडकी बहिण योजने च्या द्वारे राज्यातील महिलांना जुलै,आगस्ट ,सप्टेंबर ऑक्टोबर,आणि नोव्हेंबर या महिन्या मध्ये एकूण पाच महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांना मिळाले आहेत . या योजनेच्या द्वारे आता पर्यंत ३ करोड पेक्षा अधिक महिला या योजनाचा लाभ घेत आहेत.

महाराष्ट्र राज्य सरकारचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी लाडकी बहिण योजना च्या द्वारे जे १५०० रुपये महिलांना देण्यात देण्यात आले त्यामध्ये ते आता १५०० रुपये प्रति महिने ऐवजी ते आता वाढवण्यात येत आहेत. प्रति महिना २१०० रुपये करण्यात आले आहेत.लाडकी बहिण योजनेमध्ये ज्या लाभार्थी महिला पात्र ठरतील त्या महिलांना प्रति महिना २१०० रुपये चा लाभ मिळणार आहे.

लाडकी बहिण योजनेची सुरुवात महाराष्ट्र चे पूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या द्वारे ही योजना सुरु केली आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व गरीब कुटुबांतील विवाहित, विधवा, घटस्पोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला या महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये एवढी मदत केली जात आहे. पण आता त्यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे.

Ladki Bahin Yojana 2024|लाडकी बहिण योजना २१०० रुपये मिळणार

Ladki Bahin Yojana 2024|लाडकी बहिण योजना २१०० रुपये मिळणार

माझी लाडकी बहिण योजनेसाठी लातूर जिल्हयातून आतापर्यंत आलेल्या सुमारे ६ लाख महिलांच्या अर्जांची लवकरच तपासणी करण्यात येणार आहे.या योजनेसाठी संबधित महिला खरोखरच निकषात बसतात का, त्यांना सरकारचा १५०० रुपयांपेक्षा जास्त निधी इतर योजनेतून मिळत आहे का. त्यांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे का, घरात कोणी सरकारी नोकरी करत आहे का,या सर्वांची फेरपडताळणी करण्यात येणार आहे.

Ladki Bahin Yojana 2024 :महत्वाची घोषणा

लाडकी बहिण योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यात राहत असलेल्या महिला अर्ज करू शकता. ज्या महिलांची वय २१ वर्षापेक्षा जास्त व ६५ वर्षापेक्षा कमी असलेल्या महिला पात्र असतील. तसेच या योजनमध्ये राज्य सरकार द्वारे पात्रता व मिळत असलेल्या पैशा मध्ये बदल करण्यात आलेला आहे. ladki bahin yojana 6th installment द्वारे महिलांना प्रत्येक महिन्याला २१०० रुपये देण्यात येणार आहेत.

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली ही योजना महिला सशक्तीकरणासाठी आणखी प्रभावी होणार. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना मिळत असलेले मासिक अनुदान आता १५०० रुपये वरून २१०० रुपये करण्याची घोषणा केली आहे. यामुळे राज्यभरातील लाखो महिला लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या बद्दलची माहिती दिली. व त्यांनी स्पष्ट केले कि वाढीव मासिक अनुदान बजेट सत्रात प्रस्तावित केले जाणार. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले कि, ” आम्ही बळकटी देण्यासाठी दर महिन्याला १५०० हि रक्कम वाढवून २१०० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु हे करण्याआधी वित्तीय स्थितीचे पुरावलोकन केले जाईल.

माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत सुमारे २. ४ कोटी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर -नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम वितरीत केली गेली आहे, तसेच या योजनेला आणखी सुस्पष्टता देण्यासाठी आणि योग्य पात्र असलेल्या लाभार्थी महिलांनाच लाभ मिळावा यासाठी पुन्हा पडताळणी सुरु आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी स्वता घोषणा दिली आहे. तसेच महिला लाडकी बहिण योजना २१०० रुपये मिळवायचे असतील तर त्यांना या योजनेमध्ये करण्यात आलेल्या बदला मधील पात्रता पूर्ण कराव्या लागतील. लाडकी बहिण योजना तुमचा बँक खाते तुमच्या आधार कार्ड ला ( Aadhar Card Seeding ) लिंक करावा लागेल. जर तुम्ही लाडकी बहिण योजनेसाठी पात्र असतील आणि या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला प्रत्येक महिन्याला २१०० रुपये प्राप्त करायचे असतील तर तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा.

लाडकी बहिण योजना २१०० रुपये अपडेट ची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तसेच माझी लाडकी बहिण योजना २०२४ ऑनलाइन apply कसे करायचे, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, पात्रता, लाभ, आणि लाडकी बहिण योजना २१०० रुपये कोणत्या पद्ध्तीने मिळणार याची संपूर्ण माहिती या लेखात दिलेली आहे.

Ladki Bahin Yojana 2024 : हायलाईट

योजनेचे नाव लाडकी बहिण योजना
सुरु कोणी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्य महाराष्ट्र
वर्ष २०२४
लाभार्थी राज्यातील गरीब व निराधार महिला
उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक द्रुष्ट्या सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे
लाभ प्रति महिने आर्थिक मदत
आर्थिक मदत २१०० रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाईन
योजना सुरु झाल्याची तारीख १ जुलै २०२४
अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर २०२४
लाडकी बहिण योजनेची आधिकारिक वेबसाईट ladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिण पोर्टल NariDoot App

Ladki Bahin Yojana 2024 : कोणी सुरु केली

लाडकी बहिण योजनेची सुरुवात राज्याचे पूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या द्वारे २८ जून २०२४ ला सुरु करण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व २१ ते ६५ वर्षा पर्यंत च्या विवाहित, विधवा, घटस्पोटीत,निराधार महिला व अविवाहित महिला यांना प्रति महिना १५०० रुपये इतकी आर्थिक मदत केली जात आहे.

लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना आर्थिक स्वतंत्रता, कुटुंबामध्ये स्थान निर्माण करून देणे त्यांच्या पोषणात सुधारणा करणे व आर्थिक रूप ने त्यांना मजबूत बनवणे. या योजनेच्या अंतर्गत राज्याच्या महिला आर्थिक रूप ने व आत्मनिर्भर बनणार. लाडकी बहिण योजनेच्या अंतर्गत पहिल्या पाच महिन्यात प्रत्येक महिन्याला १५०० रुपये ची आर्थिक मदत लाभार्थी महिलांच्या बँक खात्या मध्ये DBT च्या द्वारे ट्रान्सफर करण्यात आली आहे.

या योजनेच्या अंतर्गत राज्यातील ३ करोड ४० लाख पेक्षा अधिक महिलांना लाभ देण्यात येत आहे. प्रत्येक महिन्याला या योजनेसाठी राज्य सरकार ने ३७०० करोड रुपये चा बजेट वाटप केला आहे. लाडकी बहिण योजना २१०० अपडेट या योजेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या निवडणूक च्या वेळी लाडकी बहिण योजना चे पैसे वाढवण्यात येतील अशी घोषणा करण्यात आली होती.

त्यावर अमलबजावणी करून महाराष्ट्र राज्य सरकार ने महिलांना लाडकी बहिण योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिन्याला २१०० रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला .आणि हा संपर्ण बदल लाडकी बहिण योजना २०२४ या योजनेचा ६ व्या हप्या पासून करण्यात येणार आहे.

Ladki Bahin Yojana 2024 : शपथविधी

शपथविधी सोहळ्यानंतर महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी लाडकी बहिण योजना सुरूच राहणार असून १५०० रुपये ऐवजी २१०० रुपये देण्याचा निर्णय लवकरच घेऊ असे सांगितले आहे. लाडकी बहिण योजने मध्ये किती महिला निकषाच्या बाहेर आहेत याची फेरपडताळणी करण्यात येणार आहे. हे पण त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर प्रशासनाकडून आता पर्यंत आलेल्या सर्व अर्जांची फेरपडताळणी करण्याची प्राथमिक तयारी करण्यात आलेली आहे.

लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांनी संजय गांधी निराधार योजना किंवा सरकारच्या इतर योजनांमधून महिलांना निधी मिळत आहे का याची पण प्रामुख्याने पडताळणी केली जाणार आहे. तसेच सरकारच्या सूचनेनुसार ज्या महिलांच्या घरात चारचाकी वाहन आहे, लाभार्थी महिलेचे पती सरकारी नोकरी करीत आहे का यासह इतर काही बाबींची पडताळणी करून निकषात न बसणाऱ्या महिलांचा निधी बंद केला जाण्याची शक्यता आहे.

लाडकी बहिण योजनेसाठी आतापर्यंत ५ लाख ९२ हजार २२२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील ५ लाख ८३ हजार ५३९ इतके लाभार्थी आहेत. अर्जात त्रुटी असल्याने ताप्तुरते रद्द केलेले २ हजार ३३ अर्ज तर निकषात बसत नसल्याने कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेले अर्ज ५ हजार ७४९ आहेत. ९०१ अर्जांवर सध्या प्रक्रिया सुरु आहे.

Ladki Bahin Yojana 2024 : कागदपत्रे

  • बँक पासबुक
  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • रेशन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • आवेदन पत्र
  • आधार लिंक असलेला मोबाईल नंबर
  • स्व-घोषणा पत्र
  • लाडकी बहीण योजना फॉर्म

Ladki Bahin Yojana 2024 : पात्रता

  • लाडकी बहिण योजने साठी महाराष्ट्र राज्यातील महिला पात्र असतील.
  • आवेदन करणाऱ्या महिलेचे वय २१ वर्ष ते ६५ वर्षाच्या मध्ये असले पाहिजे.
  • महिले जवळ तिचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • आवेदन करणाऱ्या महिले जवळ आधार कार्ड ला लिंक असेलेला बँक खाता असले पाहिजे. DBT
  • आवेदन केलेल्या महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखापेक्षा अधिक नसले पाहिजे.
  • कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी करणार नसले पाहिजे.
  • लाडकी बहिण योजनेसाठी विवाहित,विधवा, घटस्पोटीत, निराधार महिला व कुटुंबातील एक अविवाहित महिला अर्ज करू शकते.

Ladki Bahin Yojana 2024 : काय करावे लागेल

लाडकी बहिण योजने अंतर्गत प्रत्येक महिन्याला २१०० रुपयाची आर्थिक मदत प्राप्त करण्यासाठी महिलांना राज्य सरकार द्वारा पात्रते मध्ये झालेले बदलांना पूर्ण करावे लागेल.तसेच ज्या महिला आधीच राज्य सरकार किंवा केंद्र सरकार च्या इतर योजनेचा लाभ घेत आहेत तर अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. लाडकी बहिण योजने अंतर्गत महिलांना आवेदन फॉर्म किंवा दुसरा कोणताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. पण जर महिलांचा बँक खाता आधार कार्ड ला लिंक नसेल तर लवकर महिलांनी लाडकी बहिण योजना आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.

आधार कार्ड बँक खात्याला लिंक केल्या नंतर महिलांना Direct Benefit Transfer (DBT) द्वारे चालू करावे लागेल. महिला DBT बँक या www.npci.org.in पोर्टल द्व्रारा चालू करू शकतात.

राज्य सरकार द्वारा दिलेल्या माहिती नुसार आता प्रत्येक महिलेच्या अर्जाची तपासणी बारकाईने केली जाणार आहे. जर महिला योजने साठी अपात्र आहे तर त्या महिलेचे अर्ज Reject करण्यात येईल आणि त्या महिलेला या योजनेसाठी अयोग्य घोषित केले जाणार. कारण अशा भरपूर महिला आहेत, कि त्या या योजनेच्या पात्रता पूर्ण करत नाहीत. तरी अशा महिलांचा योजनेसाठी स्वीकार करण्यात आलेला आहे. परंतु आता अशा महिलांचे अर्जाची तपासणी केली जाईल आणि या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यांना या योजनेतून अपात्र केले जाईल.

Ladki Bahin Yojana 2024 FAQS :-

१ ) लाडकी बहिण योजना डिसेंबर च्या ६ व्या हप्त्याची तारीख ?

-सरकारने लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत सहावा हप्ता महिलांच्या बँक खाते मध्ये DBT द्वारे ट्रान्सफर केले जातील.

२ ) लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ?

-लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख राज्य सरकार द्वारे ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानंतर निवडणुकी मुळे अर्ज प्रक्रिया काही वेळे साठी बंद करण्यात आली होती.निवडणूक झाल्यानंतर आता परत डिसेंबर महिन्यात अर्ज प्रक्रिया सुरु करण्याची मागणी महिला करत आहेत.

३ )लाडकी बहिण योजनेची अपात्रतेची कारणे कोणती आहेत ?

-योजनेचे निकष पूर्ण न करणाऱ्या अर्जदार महिलांना लाभ मिळणार नाही. आर्थिक स्थिती योजनेच्या मर्यादेपेक्षा अधिक असल्यास. महिला अपात्र असतील.

४ ) लाडकी बहिण योजनेचा नवीन अर्ज करण्यासाठी काय करावे ?

राज्य सरकारने फक्त पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नवीन अर्ज सादर करताना सर्व कागदपत्रे अचूक भरावीत आणि सरकारने नमूद केलेल्या अटी व शर्ती पूर्ण कराव्यात.

माझी कन्या भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येते click करा

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी बद्दल जाणून घेण्यासाठी येते click करा

भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा

Follow Social Media Page