शेतकरी फार्म हाऊस बांधकाम योजना २०२४
शेतकरी फार्म हाऊस बांधकाम योजना २०२४|Shetkari Farm House Bandhkam Yojana 2024 : शेतीच्या जागेवर फार्म हाऊस बांधण्यासाठी शेतकऱ्यांना शेतामध्ये फार्म हाऊस बांधून त्यामध्ये राहण्यासाठी वापर व तसेच शेतीसाठी लागत असलेले सर्व कृषीचे अवजारे त्यांनतर शेतातून निर्माण झालेले उत्पन्न म्हणजे शेतातील पिकवलेला माल सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना फार्म हाऊस बांधण्यासाठी ही योजना सुरु केली आहे.
सरकारच्या आदेशाने सदर योजनेंर्गत लोन म्हणजे कर्ज देण्याचे सर्व बँकांना आदेश देण्यात आलेले आहेत तर ह्या पोस्टमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र लोन योजना शेतकरी तर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेबद्दल माहिती असणार आहे.शेतकरी फार्म हाऊस योजना यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा आहेत त्या आपण पाहणार आहोत. सदर योजनेंतर्गत बँकेतर्फे कृषी टर्म लोन मिळणार आहे.
शेतकरी फार्म हाऊस बांधकाम योजना २०२४ : उद्देश
शेतीच्या जागेवर फार्म हाऊस बांधण्यासाठी शेतकऱ्यावरील शेती व्यवस्थेचे बांधकाम करणे ज्यामुळे शेती उत्पादनांचे संचय आणि इतर गरजांचीही काळजी घेता येणार. प्रभावी पर्यवेक्षण आणि शेती व्यवस्थापन यासाठी शेतीची साधने, शेड इ. शेती हा एक व्यवसाय म्हणून पहिले जात आहे. त्यामुळे प्रभावीपणे शेती व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना पूरक सुविधा पुरवण्यासाठी सरकार मदत करत असते.

शेतकऱ्यांचे शेतामध्ये पक्के घर नसल्यामुळे शेतीचे अवजारे, खाते, शेतातून निर्माण होणारे उत्पन्न धान्य यांचे पाऊस व उन्हापासून नुकसान होऊ नाही म्हणून शेतकऱ्यांसाठी या योजनेद्वारे फार्म हाऊस बांधून त्यामध्ये जे काही उत्पन्न व शेतीसाठी लागणारे अवजारे यांचे रक्षण होण्यासाठी हि योजना आहे.जेणेकरून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळेल. व शेती व्यवस्थापना मध्ये याचा अधिक प्रभावी वापर करता येणार.
शेतकरी फार्म हाऊस बांधकाम योजने अंतर्गत शेतकऱ्यांचा उत्पन्न होणारा धान्याचा संचय हा व्यवस्थित राहील आणि त्यातून शेतीचे उत्पादन वाढवता येईल. तसेच इतर गरजांची पूर्तता होईल याची काळजी घेतली आहे.
शेतकरी फार्म हाऊस बांधकाम योजना २०२४: पात्रता
- २.५ एकर जमीन असलेल्या किमान सिंचित क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना
- जो व्यक्ती स्वंतत्रपणे किंवा आपल्या कुटुंबासमवेत पूर्ण वेळ शेती व्यवसायाशी निगडीत आहे.
- आपल्या स्वताच्या शेतातून तसेच शेतीशी निगडीत व्यवसायातून पुरसे आर्थिक उत्पन्न असणारे शेतकरी.
- बँक आणि वित्तीय संस्थांमधील कोणतीही कर्जदार सुविधा नसलेल्या नव्या कर्जदारांनी मागील 3 वर्षासाठी चांगले रेकॉर्ड केलेले सध्याचे कर्जदार.
- एका पेक्षा जास्त बँकांमध्ये तुमचे खाते नसावे व एका पेक्षा जास्त बँकांमध्ये कर्ज घेतलेले नसावे.
शेतकरी फार्म हाऊस बांधकाम योजना २०२४: वयोमर्यादा
- किमान अर्जाच्या तारखेनुसार अर्जदार हा १८ वर्षाचा पूर्ण असणे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी जास्तीत जास्त ६५ वयाच्या आतील व्यक्ती अर्ज करू शकतात पण त्यासाठी अर्जदाराचे उत्पन्न हे किती आहे त्याचे कागदपत्रे दाखवणे आवश्यक आहे व ७५ वर्षा पेक्षा अधिक वय नसावे .
शेतकरी फार्म हाऊस बांधकाम योजना २०२४ : कर्ज रक्कम
- २ लाख ते १० लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. २.५ एकर जमीन असणारे अर्जदार शेतकरी याचं स्वताच्या शेतीपासून मिळणारे उत्पन्न लक्षात कर्जाची रक्कम मंजुरी होईल.
- १० लाख ते ५० लाखापर्यंत – ५ एकर जमीन असलेले अर्जदार शेतकरी त्यांच्या स्वताच्या शेतीपासून मिळणारे उत्पन्न लक्षात घेऊन कर्जाची रक्कम मंजुरी होईल.
शेतकरी फार्म हाऊस बांधकाम योजना २०२४ : मार्जिन
शेतकरी फार्म हाऊस बांधकाम योजने अंतर्गत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना फार्म हाऊस बांधण्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या २५ % बांधकाम हे स्वताच्या खर्चातून करावे लागेल.
शेतकरी फार्म हाऊस बांधकाम योजना २०२४ : व्याज दर
शेतीविषयक प्रगतीवर लागू असलेला ROI असेल. Up to Rs 10.00 Lakh : 1 Year MCLR +BSS @ 0.05 % +2%
Above Up to Rs 10.00 Lakh : 1 Year MCLR +BSS @ 0.05 % +3%
शेतकरी फार्म हाऊस बांधकाम योजना २०२४ : तारण
- शेतकरी फार्म हाउस योजने अंतर्गत लोन घेण्यासाठी तुम्हाला फार्म हाउस बांधत असलेल्या जमिनीचे किंवा बांधलेले फार्म हाऊस व जी तुमची शेती त्यातून उत्पन्न घेत असतात. त्या जमिनीचे मॉडगेज
- या योजने अंतर्गत कर्ज घेण्यासाठी अर्ज करते वेळी योग्य उत्पन्न असलेले जामीनदार दोन व्यक्ती.
शेतकरी फार्म हाऊस बांधकाम योजना २०२४: आवश्यक कागदपत्रे
- या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार जर पगारदार किंवा व्यापारी व्यवसाय करत असेल तर त्यांचे महिन्याची वेतन स्लिप, इन्कम टॅक्स रिटर्न, बॅलन्स शीट , फॉर्म १६ , एल स्टेमेन्ट इ.
- सर्व शेत जमिनीचा ७ /१२ उतारा, ८ अ व अर्जदारचे चतुर सीमा
- पीएसीएससह जवळच्या वित्तीय संस्थांकडून अर्जदाराची कोणतीही देय रक्कम नसल्याचा पुरावा.
- बँकेच्या वकिलांवरील कायदेशीर शोध व जमिनीचे इतर कागदपत्रे जेथे ३० वर्षापर्यंत जमीन गहाण ठेवणे आहे.
- शेतकरी फार्म हाऊस बांधकाम योजने अंतर्गत फार्म हाऊस बांधण्यासाठी चे किंमत कोटेशन ,योजना अंदाज, परवानग्या इ. आवश्यक आहेत.
- अर्जदाराच्या जमिनीचे सरकारी व्हॅल्युएशन मूल्यमापन प्रमाणपत्र क्षेत्राचा रजिस्ट्रार
- या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जादारचे पॅन कार्ड. आधार कार्ड व रहिवासी दाखला
हमीपत्र एफ – १४८ / गॅरंटी फॉर्म
- जे दोन जामीनदार व्यक्ती त्यांचे ७/१२ उतारा ८ ए पीएसीएस जमीनदारांचे प्रमाणपत्र
- दिल्यास जामीनदार पगारदार ,किंवा उद्योगपती , नवीनतम पगार स्लिप ,आयटीआर ,फार्म १६ व बॅलन्स शीट आणि पीएल कागदपत्रे
- त्या दोन जामीनदार व्यक्तींचे आधार कार्ड व पॅन कार्ड, रहिवासी दाखला
शेतकरी फार्म हाऊस बांधकाम योजना २०२४ : कर्जाची परतफेड
- अधिस्थगन कालावधी १८ महिन्यापर्यंत ज्या व्यक्तीने फार्म हाउस बांधण्या साठी कर्ज घेतले आहे त्याची परतफेड ते कर्जाची रक्कम बँकेत जमा झाल्यापासून १८ महिन्या पर्यंत करू शकता किंवा आधी बांधलेल्या फार्म हाऊस चे बांधकाम पूर्ण केंयासाठी परवानगी दिली जाऊ शकते.
- ज्या अर्जदार शेतकऱ्यांनी फार्म हाऊस बांधण्यासाठी कर्ज घेतले आहे त्या कर्जाची व्याजांसह परत फेड ही ते वार्षिक, सहामाही, तिमाही, किंवा मासिक हप्त्यांमध्ये परतफेड करू शकता. आणि अधिस्थगन कालावधी सह १५ वर्षाच्या कालावधीत व्याज देले जाईल. परत फेडीचा मुख्य किंवा नगदी पिकाचा हंगाम , क्रिया कलाप, उत्पन्न निर्मिती चक्र यांच्याशी दुवा साधला जाणार.
शेतकरी फार्म हाऊस बांधकाम योजना २०२४: बीमा
शेतकरी फार्म हाऊस बांधकाम योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांनी पूर्ण मालमत्तेची तयार केलेली मालमत्ता विम्याची गरज आहे. तसेच ज्या शेतकऱ्याच्या नावावर या योजनेचे कर्ज काढले जाते. त्या अर्जदार व्यक्तीच्या नावाने बीमा काढणे गरजेचे आहे.
शेतकरी फार्म हाऊस बांधकाम योजना २०२४: कायदेशीर पैलू
- संबधित राज्यांच्या कायद्यानुसार ठरवून देण्यात आलेल्या नियमा प्रमाणे शेत जमिनी मध्ये फार्म हाऊस बांधण्याची परवानगी इतर आवश्यकते नुसार घेण्यात यावी. जसे कि बांधकाम विषयक परवाना.
- शोध अहवाल जी जमीन गहाण ठेवण्याची प्रस्तावित केलेल्या शेतजमिनी साठी पेनेल (panel ) मधील वकीला कडून सर्च रिपोर्ट मिळेल त्या ठिकाणी फार्म हाऊस बांधण्यात येईल.
शेतकरी फार्म हाऊस बांधकाम योजना २०२४ : नियम व अटी
- शेतकरी फार्म हाऊस बांधकाम योजनेसाठी शेतकऱ्याच्या घराच्या बांधकामा साठी कृषी जमीन रुपांतर करणे संबधित राज्य सरकारने निर्दिष्ट केलेल्या कलम ( जर असेल तर ) च्या अनुपालना साठी आवश्यक नसते.
- ज्या शेत जमिनी मध्ये फार्म हाऊस बांधणार आहेत त्या जमीन मूल्याचे पडताळणी करण्या साठी संबधित क्षेत्राचे रजिस्टर किंवा उप-रजिस्ट्रार करून जमिनीचे मुल्यांकन प्रमाणपत्र प्राप्त करणे गरजेचे आहे.
- शेतकरी फार्म हाऊस बांधकाम योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकर्याची कर्जाची रक्कम निश्चित करण्या साठी सहकारी आवेद्कांची मिळकत बनवता येते. कर्ज परत फेड करण्याची क्षमता जर मालमत्ता किंवा वैयक्तिक रित्या एकत्रित केलेली असेल तर.
- ज्या शेतकऱ्याने या योजनेसाठी अर्ज केला आहे त्या शेतकऱ्याला पुरेशी मिळकत, रोखता आणि कर्जा चा हप्ता भरण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.
- या योजने साठी अर्ज केलेल्या अर्जदार शेतकऱ्याने केवायसी डॉक्युमेंट कम्प्लीट करणे आवश्यक आहे.
- ज्या अर्जदार शेतकऱ्याने तहसीलदार , मंडल महसूल अधिकारी, महसूल खात्याचे राज्यस्तरीय राजपत्रित रंक असलेले आयकर प्रमाण पत्र स्वीकारलेले जाऊ शकते जेथे शेतकऱ्याने आयकर विवरण भरले नाहीत.
शेतकरी फार्म हाऊस बांधकाम योजना २०२४ : फायदे
- फार्म हाऊस बांधल्याने शेतकरी जमिनीतून जे उत्पन्न काढत असतो. त्या साठी खूप फायदेशीर असते म्हणजेच काढलेले धान्य ठेवण्यासाठी पाऊस व उन्हा पासून सुरक्षित राहते.
- शेतकऱ्याला शेती करण्यासाठी जी अवजारे लागत असतात ते अवजारे शेतकरी त्या फार्म हाऊस मध्ये ठेऊ शकतो.
- शेतकरी शेत जमिनी मध्ये जे बी बियाणे पेरतात व खत ठेवण्यासाठी फार्म हाऊस चा फायदा होत असतो.
- ज्या शेतकऱ्याला पावसाळी काळात आसरा म्हणून फार्म हाऊस चा उपयोग होतो.
- शेतकऱ्याचे उन्ह ,वारा, पाऊस या सर्वान पासून संरक्षण होण्यासाठी फार्म हाऊस चा खूप फायदा होतो.
- शेतकरी कुटुंब फार्म हाऊस मध्ये सुरक्षित राहण्यासाठी व त्यांना लागणारे साहित्य ठेवण्यासाठी.
निष्कर्ष
सर्व मित्रांनो शेतकरी फार्म हाऊस बांधकाम योजने विषयी या लेखा मध्ये खूप महत्वाची व शेतकऱ्यांच्या उपयोगाची माहिती देण्यात आलेली असून.शेतकऱ्यांचे शेतामध्ये पक्के घर नसल्यामुळे शेतीचे अवजारे, खाते, शेतातून निर्माण होणारे उत्पन्न धान्य यांचे पाऊस व उन्हापासून नुकसान होऊ नाही म्हणून शेतकऱ्यांसाठी या योजनेद्वारे फार्म हाऊस बांधून त्यामध्ये जे काही उत्पन्न व शेतीसाठी लागणारे अवजारे यांचे रक्षण होण्यासाठी हि योजना आहे. फार्म हाऊस बांधण्यासाठी शेतकरी लोन कश्या पद्ध्तीने घेऊ शकतो, पात्रता , वयोमर्यादा, योजनेचा उद्देश, कर्ज रक्कम, कर्जा चा व्याजदर ,कर्ज परत फेड, पैलू, आवश्यक कागदपत्रे अर्ज करण्याची बँकेची अधिकृत वेबसाईट या विषयी सर्व माहिती या लेखा मध्ये दिलेली आहे. आपल्या आजूबाजूच्या नागरिकांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा लाभ घेता येणार. सर्वांनी हा लेख आवश्यक वाचावा.
अधिक माहिती साठी अधिकृत website ला visit करा
माझी कन्या भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा
सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येते click करा
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी बद्दल जाणून घेण्यासाठी येते click करा
भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा