Tractor Anudan Yojana 2024 Maharashtra
Tractor Anudan Yojana 2024 Maharashtra|ट्रक्टर अनुदान योजना २०२४ महाराष्ट्र : महाराष्ट्र राज्यात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र, शेतीच्या कामासाठी मजुरांचा प्रश्न गंभीर असल्या मुळे शेतीची कामे वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यासाठी अनेक अशा समस्या निर्माण होतात. तसेच मजुरांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होत असून, त्यामुळे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर या बाबींचा परिणाम होत असल्यामुळे शेती हा खडतर व्यवसाय चालला आहे.
२०२४ पर्यंत शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये दुप्पट वाढ करण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट असून शेतीसाठी लागणारा निविष्ठा खर्च कमी करून शेतीचे उत्पादन वाढवायचे असेल तर पारंपारिक शेती पद्ध्ती बदलून आधुनिक यांत्रिकीकरणाद्वारे शेती करणे गरजेचे आहे. त्यासाठी पेरणी आणि काढणी नंतर प्रक्रियेचे यांत्रिकीकरण करणे आवश्यक आहे.नवीन यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याने कृषी उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे शक्य आहे.

Tractor Anudan Yojana 2024 Maharashtra
राज्यातील सुमारे ८० % शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. त्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे यांत्रिकीकरणासाठी लागत असलेली यंत्रे किंवा अवजारे परवडत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना काही आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.
Tractor Anudan Yojana 2024 Maharashtra: संपूर्ण माहिती
महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजना सुरु केल्या आहेत, त्यामधील ही एक महत्व पूर्ण योजना आहे ती म्हणजे ट्रक्टर अनुदान योजना २०२४ महाराष्ट्र या योजने अंतर्गत, महाराष्ट्र शासन राज्यातील पात्र शेतकऱ्यांना ट्रक्टर आणि शेती अवजारे खरेदी करण्यासाठी अनुदान देते.
राज्यातील बहुतांश शेतकरी दारिद्य्र रेषेखाली जीवन जगत आहेत. ते शेतीसाठी पारंपारिक पद्धती वापरत असतात, त्यामुळे त्यांना पारंपारिक शेती करत असताना खूप मेहनत करावी लागते. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना त्यांच्या शेतात आधुनिक यंत्र सामग्री वापरता ये नाही. त्यामुळे शासनाने ट्रक्टर अनुदान योजना सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र सरकार कृषी यांत्रिकीकरणाला प्राधान्य देते कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरण वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार कडून महा-डीबीटी पोर्टल अंतर्गत दरवर्षी नवीन उपक्रम राबविले जातात. या योजनेच्या अंतर्गत शेतीला लागत असलेली मशिनरी व अवजारे यासाठी सरकार कडून अनुदान देण्यात येते. या योजने द्वारे शेतकर्यांना खाली दिलेल्या गोष्टींवर सरकार कडून अनुदान दिले जाते. त्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
Tractor Anudan Yojana 2024 Maharashtra : हायलाईट
योजना | ट्रक्टर अनुदान योजना |
द्वारा सुरु | महाराष्ट्र सरकार |
राज्य | महाराष्ट्र |
अधिकृत वेबसाईट | https://mahadbt.maharashtra.gov.in/ |
विभाग | कृषी विभाग |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
उद्देश | यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतीचे उत्पन्न वाढविणे तसेच राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे |
लाभ | शेतीसाठी ट्रक्टर आणि संबधित यंत्रांसाठी अनुदान |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन किंवा ऑफलाईन |
श्रेणी | राज्य सरकारी योजना |
वर्ष | २०२४ |
Tractor Anudan Yojana 2024 Maharashtra: उद्दिष्ट
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शासन विविध प्रकारचे प्रयन्त करत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. आजही पारंपारिक पद्ध्तीने शेती करणारे बरेच शेतकरी आहेत. पारंपारिक पद्ध्तीने शेती करण्यासाठी खूप वेळ लागत असतो. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीचे आधुनिकीकरण करून त्यांना खूप सोयीस्कर आणि सुविधापूर्ण बनवायचे आहे. यासाठी ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.
- ट्रक्टर अनुदान योजने अंतर्गत शेतकर्याना जमीन सुधारणा अवजारे /यंत्रे, आंतरमशागत अवजारे, पूर्व मशागत अवजारे, पेरणी व लागवड यंत्रे, पिक संरक्षण यंत्रे, कापणी व मळणी यंत्रे इ. खरेदी करण्यासाठी आर्थिक साहाय्य देण्यात येते.
- ज्या शेतकऱ्यांकडे कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहचवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
Tractor Anudan Yojana 2024 Maharashtra: महत्वपूर्ण माहिती
शेतकरी बांधवानो तुम्ही स्वता महाडीबीटी पोर्टलवर तुमच्या किंवा इतरांच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी करू शकतात आणि या अनुदाना संबधित माहिती जास्तीत जास्त नागरिकांना पाठवू शकता. जेणे करून या योजनेचा राज्यातील सर्वाना फायदा होईल. ट्रक्टर अनुदान योजना २०२४ महाराष्ट्र महाडीबीटी पोर्टलवर सर्वात जास्त चालत असलेली एकमेव योजना म्हणजे ट्रक्टर अनुदान योजना २०२४ असून आज आपण आमच्या लेखात या योजने बद्दल माहिती पाहणार आहोत. ट्रक्टर अनुदान योजना २०२४ या योजने मध्ये शेतकऱ्यांना ट्रक्टर साठी अनुदान मिळत आहे. पण यामध्ये शासन शेतकऱ्यांना कृषी यंत्र खरेदीसाठी पण अनुदान देणार आहेत.
Tractor Anudan Yojana 2024 Maharashtra : आवश्यक मुद्दे
ट्रक्टर अनुदान योजना २०२४ महाराष्ट्र या योजनेचे फायदे फक्त एकाच औजारासाठी उपलब्ध असतील म्हणजे एकतर तुम्हाला ट्रक्टर मिळणार किंवा तुम्हाला ट्रक्टर साठी लागणारे कुठलीही यंत्रेने मिळणार.वरती दिल्या प्रमाणे जर लाभार्थ्या कडे ट्रक्टर असेल आणि त्याला ट्रक्टर साठी लागत असलेल्या अवजारांसाठी अनुदान मिळवायचे असेल तर तुम्हाला अर्ज करत असताना ट्रक्टर असल्याचा पुरावा जोडणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत ट्रक्टर अनुदान योजना २०२४ महाराष्ट्र ही योजना राबविली जात आहे.तसेच महाडीबीटी फार्मर पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण योजना राबविली जात आहे. महाडीबीटी पोर्टलवर केंद्र शासनाच्या ६०% आणि राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरणाच्या ४०% सहभागासह अनेक प्रकारच्या योजना लागू केल्या जात आहेत. महाडीबीटी पोर्टलवर लागू केलेली अनेक कृषी यंत्रे वरती दिल्या प्रमाणे योजने मध्ये समाविष्ट आहेत.
Tractor Anudan Yojana 2024 Maharashtra : फायदे
- ट्रक्टर अनुदान योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकार कडून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वर्गातील शेतकऱ्यांना ५० % अनुदान देण्यात येणार आहे.
- या योजने अंतर्गत राज्य सरकार कडून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ४०% अनुदान देण्यात येत आहे.
- या यंत्रांमुळे आणि अवजारांमुळे शेतीची कामे कमी वेळात जलद गतीने पटकन होण्यासाठी खूप मोठी मदत होणार.
- या योजने अंतर्गत शेतकरी त्यांना स्वता ला आवडणारा ट्रक्टर खरेदी करू शकता.
- ट्रक्टर अनुदान योजनेमुळे शेतकऱ्याला बँकाकडून किंवा संस्थांकडून कमी व्याजदराने कर्जाची सुविधा देण्यात येणार आहे.
- महिला शेतकऱ्यांना या योजनेसाठी प्राथमिकता दिली जात आहे.
- या योजने अंतर्गत देशातील कुठलाही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होणार, परिणामी शेतकऱ्यांचे जीवनमान सुधरणार आणि त्यांची आर्थिक परिस्थिती पण उंचावणार.
- ट्रक्टर अनुदान योजने अंतर्गत केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे.
Tractor Anudan Yojana 2024 Maharashtra : वैशिष्ट्ये
- या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे व उपयुक्त अवजारे विकत घेण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे
- ट्रक्टर अनुदान योजना २०२४ महाराष्ट्र ही राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सुरु करण्यात आली असून हि अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे या योजने मुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा मिळणार.
- या योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला मिळणारी अनुदानाची धनराशी त्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा केली जाईल.
- या योजने अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन केलेली आहे त्यामुळे शेतकरी घरी बसून अर्ज आपल्या मोबाईल च्या द्वारे करू शकणार. यामुळे अर्जदार शेतकऱ्याला कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. यामुळे शेतकरी त्याचा वेळ व पैसा या दोघांची बचत होईल.
Tractor Anudan Yojana 2024 Maharashtra: कागदपत्रे
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- ७/१२ उतारा ८ अ दाखला
- अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
- अर्जदार अनुसूचित जाती जमातीचा असल्यास जात प्रमाणपत्र
- स्व-घोषणा
- पूर्व संमती पत्र
- केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने जरी केलेले उपकरण तपासणी अहवाल
- राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे
- खरेदी करण्याच्या उपकरणाचे कोटेशन
Tractor Anudan Yojana 2024 Maharashtra : पात्रता व अटी
- शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे गरजेचे आहे, जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- एक शेतकरी फक्त एक च ट्रक्टर घेऊ शकतो.
- शेतकऱ्याकडे स्वताचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ फक्त एकाच कार्यासाठी दिला जाणार म्हणजेच राज्य सरकार कडून मिळणारे अनुदान हे फक्त एकाच कार्यासाठी असणार. उदा. ट्रक्टर अवजारे/यंत्र सामग्री इ.
- लाभार्थीच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्ती कडे ट्रक्टर असल्यास, लाभार्थी ट्रक्टर चालविलेल्या अवजारांसाठी पात्र मानला जाणार. परंतु ट्रक्टरच्या मालकीचा पुरावा आवश्यक असेल.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे शेतजमीन असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराचे वय १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
- जर एखाद्या शेतकऱ्याने इन्स्ट्रुमेन्ट्साठी लाभ घेतलेला असेल त्यामुळे त्याच इन्स्ट्रुमेन्ट्साठी किमान १० वर्ष अर्ज करू शकत नसला तरी तो दुसऱ्या इन्स्ट्रुमेन्ट्साठी अर्ज करू शकतो.
- एखाद्या शेतकऱ्याने या आधी कोणतेही कृषी अनुदान घेतलेले असेल तर तो ट्रक्टर योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
Tractor Anudan Yojana 2024 Maharashtra: ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
- सर्वात पहिले अर्जदाराला त्याच्या क्षेत्रातील कृषी विभाग जिल्हा कार्यालयात जाव लागेल.
- ट्रक्टर अनुदान योजनेसाठी कृषी विभागातील जिल्हा कार्यालयातील कृषी अधिकाऱ्यांकडून अर्ज घ्यावा लागतो.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आणि योग्य ते कागदपत्रे जोडून अर्ज अधिकाऱ्यांना सादर करावा.
- अशा पद्ध्तीने या योजने अंतर्गत तुमची ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार.
Tractor Anudan Yojana 2024 Maharashtra :या कृषी यंत्रांसाठी व अवजारांसाठी अनुदान मिळणार
हे मिळत असलेले अनुदान शेतकऱ्यांना खाली देण्यात आलेल्या शेती अवजारांसाठी आणि शेतीमध्ये उपयोगी येणाऱ्या यंत्रांसाठी मिळेल.
- पॉवर टिलर
- ट्रक्टर ट्रक्टर / पॉवर टिलर जंगम उपकरणे
- बैल चालवणारी अवजारे / यंत्र सामग्री
- प्रक्रिया सेट
- मानवी शक्तीवर चालवणारी यंत्रे / अवजारे
- स्वयंचलित मशीन
- काढणी नंतरचे तंत्रज्ञान
- बागायती यंत्रे / अवजारे
- विशेष यंत्रे /अवजारे
महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत खाली दिलेले कृषी यंत्रे/अवजारे खरेदीसाठी शेतकरी लाभ घेऊ शकतात.
- ट्रक्टर
- पॉवर टिलर
- बागायती यंत्रे /अवजारे
- बैल चालवणारी यंत्रे/ अवजारे
- काढणी यंत्र
- मानवी शक्तीवर चालवणारी यंत्रे /अवजारे
- स्वयंचलित डिव्हाइस
- ट्रक्टर अवजारे
- ट्रक्टर/ पॉवर टिलर जंगम उपकरण
जमीन सुधारणा मशागतीची अवजारे
- रोटोकल्टीव्हेटर
- चीजल नांगर, वखर
- पॉवर, बांड फॉमडर
- रिजर, रोटो पडलर
- केज व्हील
- बटाटा प्लांटर
आंतरमशागत
- ग्रास विड स्लशर
- फरो ओपनर
- पॉवर विडर
कापणी आणि मळणीची अवजारे
- कांदा काढणी यंत्र
- भुईमुग शेंगा तोडणी यंत्र
- रिपर कम बाईडर
- बटाटा काढणी यंत्र स्टी रिपर
- प्लास्टिक मल्चिंग यंत्र
- उस पाचट कुट्टी
- मोवर
- कडबा कुट्टी
- ब्रश कटर
- स्टबल शेव्हर
- कोकोनट फौंड चौपर
- भात मळणी यंत्र
- बहुपीक मळणी यंत्र
- मका सोलणी यंत्र
- उफणणी पंखा
निष्कर्ष
सर्व मित्रांनो जर तुम्ही शेती करत असाल तर त्यासाठी तुम्हाला ट्रक्टर अनुदान योजने विषयी माहिती असणे गरजेचे आहे कारण ट्रक्टर हा शेती करण्यासाठी खूप महत्वाचा भाग आहे. शेती मधील ट्रक्टरने बरेच काम केले जातात. म्हणून ट्रक्टर हा शेतीचा मुख्य भाग आहे. तुम्ही आता सरकारी अनुदानाने ट्रक्टर कसा घ्यायचा याचा विचार करत असणार तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या mahadbt वेब पोर्टलवर नोंदणी करू शकता. महाराष्ट्रात ट्रक्टर अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज कश्या पद्ध्तीने करायचा हे तुम्हाला माहिती नसेल तर या लेखा अंतर्गत माहिती दिलेली आहे.
महत्वाची सूचना :- प्रिय वाचक मित्रानो सर्वाना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किवा आपल्या नातेवाइका पेकी कोणी व्यक्ती असेल ज्याला या योजना चा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजने विषय माहिती द्या किवा त्यांना हा आमचा Tractor Anudan Yojana 2024 Maharashtr |ट्रक्टर अनुदान योजना २०२४ महाराष्ट्र हा लेख वाचण्यास सांगावा हि विनंती जेणे करून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल व त्यांचे स्वप्नपूर्तीसाठी आपण काही मदत करू शकू
सर्व वाचक मित्रांना एक विनंती आहे हि website केंद्र शासन किवा राज्य शासना ची नाही किवा त्या सबंधी देखील नाही जर आपण वर नमूद केलेल्या माहिती च्या आधारे या योजने बद्दल काही निर्णय घेणार असाल तर कृपया वरती दिलेली माहिती तुम्ही परत एकदा पडताळून बघा किवा शासना च्या अधिकृत website वरती visit करून योग्य तो निणर्य घ्यावा आम्ही फक्त या योजने ची माहिती आपल्या मराठी वाचकांना मराठी भाषेत वाचण्यास मिळावी या अनुषंगाने हा एक छोटासा प्रयत्न केला आहे तरी कृपया आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी व आमचा लेख तुम्हाला कसा वाटला आम्हला तुमच्या शब्दात कळवावे .
अधिक माहिती साठी या Official Link La visit करा
माझी कन्या भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा
सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येते click करा
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी बद्दल जाणून घेण्यासाठी येते click करा
भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा
Follow Social Media Page