PM Janman Yojana 2024 |पी एम जनमन योजना २०२४ आदिवासी समाजाला मिळेल लाभ

PM Janman Yojana 2024

PM Janman Yojana 2024 In Marathi | पी एम जनमन योजना २०२४ या योजनेचा आदिवासी समज कल्याणासाठी २४००० करोडची योजना ची घोषणा केली आहे. पीएम जनजाती आदिवासी न्याय महा अभियान देशातील आदिवासी सुरक्षित आदिवासी गटाच्या कल्याणासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी १५ नोव्हेंबर २०२३ रोजी सुमारे २४,000 कोटी रुपये बजेटसह पी एम आदिवासी न्याय महाभियान सुरु केले आहे . या योजनेच्या मध्य्मातून आदिवासी समजतील लोकांना उपजीविकेच्या चांगल्या संधी मिळतील मुलभूत सुविधा आणि गरजा पुरविण्याचे काम केले जाईल

PM नरेंद्र मोदिजी म्हणाले कि , भाजपच्या अटलबिहारी वाजपये सरकारने आदिवासी समाजासाठी वेगळे मंत्रालय तयार केले आहे . आदिवासी कल्याणाच्या बजेट मध्ये पूर्वीच्या तुलनेत ६ पट वाढ करण्यात आली आहे.जेणेकरून पंतप्रधान जनमन योजनेअंतर्गत सरकारने आदिवासी समूह आणि आदिवासी आदिम जमातीपर्यंत पोहोचू त्याचा सर्वागीण विकास सुनिश्चित करू शकेल .

PM Janman Yojana 2024|पी एम जनमन योजना २०२४ (PM PVTG योजना ) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी गौरव दिनानिम्मित झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात बिरसा मुंडा यांच्या जन्मानिमित्त ही योजना सुरु केली आहे. हि योजना आदिवासींच्या कल्याणासाठी खास करून सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी पंतप्रधानांनी २४,००० कोटी रुपयांच्या बजेट मध्ये ही योजना सुरु केलेली.तसेच पीएम मोदी म्हणाले की,विकसित भारताच्या संकल्पाचा प्रमुख आधार पीएम जनमन किंवा पीएम ट्राइब ट्राईबल न्याय महाअभियान आहे.

PM Janman Yojana 2024 |पी एम जनमन योजना २०२४ आदिवासी समाजाला मिळेल लाभ

प्रधानमंत्री जनमन योजने अंतर्गत, सरकार आदिवासी गट आणि आदिम जातींपर्यंत पोहचणार. अजूनही आदिवासी नागरिक जंगलात राहत आहेत. या मोहिमे द्वारे आरोग्य व पोषण यासारख्या मुलभूत सुविधा आणी शाश्वत जीवन जगण्यासाठी संधी उपलब्ध केल्या जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असे म्हणाले की, शासनाने अशा ७५ आदिवासी समुदायांची आणि लाखोंची लोकसंख्या असलेल्या आदिम जमातींची ओळख केली आहे. जि देशातील २२ हजारा पेक्षा अधिक गावांमध्ये राहत आहेत. पंतप्रधान मोदीजी म्हणाले कि, आधीची सरकार होते ते डेटा जोडण्याचे काम करायचे, पण पंतप्रधान मोदी बोलतात कि मला जीवन जोडायचे आहे, डेटा नाही. या ध्येयाने पीएम जनमन योजनेची सुरुवात केली आहे.

केंद्र सरकार या मेगा मोहिमेवर २४ हजार कोटी रुपये खर्च करणार आहेत. तसेच PMJAY, सिकलसेल रोग निर्मुलन, TB निर्मुलन, १०० %लसीकरण, PM सुरक्षित मातृत्व योजना, PM मातृ वंदना योजना, PM पोषण, PM जन धन योजना इ. साठी या जमातींचा संपूर्ण विकास स्वतंत्र पणे सुनिश्चित केला जाणार आहे.

Pm Janman Yojana 2024 |पी एम जनमन योजना :- फायदे व वैशिष्टे

  • पंतप्रधान नरेंद्न मोदींनीही योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे.
  • शासनाने या योजनेचे बजेट २४००० कोटी रुपये ठेवले आहे.
  • पीएम जनमन योजनेच्या माध्यमातून आदिवासी जातीसह देशातील इतर आदिवासी जमातींसाठी स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
  • या योजनेच्या माध्यामातून शासनाला अगदी मागासलेल्या आदिवासी पर्यंत पोहचवायचे आहे.
  • या योजने द्वारे देशातील २२००० हून अधिक गावांमध्ये २४००० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
  • शासनाने २२००० हून अधिक गावांमध्ये राहणारे ७५ आदिवासी समुदाय ओळखले आहेत, त्यांना शासनाकडून लाभ दिला जाणार आहे.

Pm Janman Yojana 2024: हायलाईट

योजना पीएम जनमन योजना
द्वारा सुरु माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
योजनेची घोषणा १५ नोव्हेंबर २०२३
लाभार्थी देशातील आदिवासी समुदाय
अधिकृत वेबसाईट लवकरच सुरु
उद्देश देशातील आदिवासी समुदायाचा संपूर्ण विकास
योजनेचे बजेट २४,००० /-करोड
श्रेणी केंद्र सरकारी योजना
वर्ष २०२४

पी एम जनमन योजना २०२४ : उद्दिष्ट

Pm Janman Yojana 2024 |पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पीएम जनमन योजना २०२४ सुरु करण्याचा मुख्य हेतु देशातील आदिवासी समाजातील नागरिकांचा विकास सुनिश्चित करण्यासाठी आहे. जेणेकरून आदिवासी जमातींच्या जीवनात बदल घडवून व त्यांचे कल्याण कल्याण करता येणार. व या योजनेच्या माध्यमातून आदिवासी जमातींच्या कुटुंबांना रस्ते व दूरसंचार जोडणी, वीज, सुरक्षित घरे, पिण्याचे पाणी आणि सुविधा देण्याचे काम केले जाणार आहेत. तसेच आदिवासींच्या गरजा पूर्ण करून व त्यांना आरोग्य, शिक्षण आणि पोषण या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम केले जाणार आहेत.

आदिवासी समाजाचा स्वतंत्र पणे विकास केला जाईल. आदिवासी अभिमानाचे प्रतिक असलेल्या बिरसा मुंडा यांची जयंती आणि तिसऱ्या आदिवशी अभिमान दिना निमित्त या अभियानाचा शुभारंभ करत असताना पंतप्रधान मोदी नी घोषणा केली कि, सरकारने पंतप्रधान आदिवासी न्याय महा अभियान पीएम पीव्हीटीजी योजना सुरु केली आहे. लाखो लोकसंख्या असलेल्या ७५ आदिवासी समुदाय व आदिम जमाती ओळखण्यात आल्या आहेत. जे देशातील २२००० पेक्षा अधिक गावांमध्ये राहत आहेत.जे अत्यंत मागासलेले आहेत. त्यांची संख्या लाखोंच्या घरात असून ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

पंतप्रधान म्हणाले कि पूर्वीची सरकार डेटा जोडण्याचे काम करत असत. पण मला आदिवासी समाजाचे जीवन जोडायचे आहे डेटा नाही. या मोहिमेसाठी केंद्र शासनाने २४ हजार कोटी रुपये खर्च करणार आहेत. तसेच १००% लसीकरण, कुशल पेशी रोग निर्मुलन, PMJAY, TB निर्मुलन, PM सुरक्षा मातृत्व योजना, PM जन योजना इ. योजनांसाठी या जमातींचा स्वतंत्र पणे संपूर्ण विकास केला जाणार आहे.

Pm Janman Yojana 2024 : क्रांतिकारी बदल घडवणार

Pm Janman Yojana 2024 |देशाच्या कानाकोपऱ्यात आदिवासी वीरांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला असून देशाचा असा एक ही भाग नाही की तिथे आदिवासी वीरांनी ब्रिटीश साम्राज्याशी लढा दिला नसेल. आदिवासी समाजातील नागरिकांनी देशाची शान वाढवली आहे.आणि पंतप्रधान स्पेशल व्ह्ल्नेरेबल ट्राइब ग्रुप डेव्हलपमेंट मिशन हा देखील एक प्रकारचा उपक्रम असल्याचे सांगितले. ज्यामध्ये देशातील १८ राज्ये आणि केंद्र शासीत प्रदेशांमध्ये राहणाऱ्या ७५ आदिवासी समुदाय आणि आदिम जमातींचा समावेश असणार आहे.

देशातील२२० जिल्हे आणि २२, ५४४ गावांमध्ये राहत आहेत. त्यांची लोकसंख्या २८ लाखांच्या जवळपास आहे. आणि या जमाती बऱ्याचदा जंगलात विखुरलेल्या, दुर्गम आणि डोंगराळ वस्त्यांमध्ये राहतात. ही योजना त्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आनणार आहे.

Pm Janman Yojana 2024 : या योजने अंतर्गत कोणत्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील

Pm Janman Yojana 2024 |पंतप्रधान विशेष असुरक्षित आदिवासी समूह अभियाना अंतर्गत सुमारे २८ लाख PVTGs समाविष्ट करण्यात येणार आहे. शासनाच्या अधिकृत निवेदना नुसार या अभियाना अंतर्गत आदिवासी जमातींसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामुळे आदिवासींचे कल्याण होईल, २४,००० कोटी रुपयांच्या बजेटच्या या मिशनद्वारे, पीव्हीटीजी परिवारांना आणि वसाहतीच्या आदिवासींना चांगल्या प्रकारे प्रवेश देण्यासाठी आणि शाश्वत उप्जीवेकेच्या संधी सारख्या त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी खाली दिलेल्या सुविधा पुरवल्या जातील.

  • PVTG परिसरात रस्ता आणि टेलिफोन कनेक्टीव्हिटी
  • शक्ती
  • सुरक्षित घर
  • स्वच्छ पिण्याचे पाणी
  • स्वच्छता
  • शिक्षण
  • आरोग्य
  • पोषणासाठी उत्तम प्रवेश
  • चांगल राहण्याच्या संधी इ.

Pm Janman Yojana 2024 : फायदे आणि वैशिष्ट्ये

  • पंतप्रधान मोदींनी ही योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे.
  • शासनाने या योजनेचे बजेट २४,००० कोटी रुपये ठेवले आहेत.
  • पीएम जनमन योजनेच्या माध्यमातून आदिवासी जातीसह देशातील इतर आदिवासी जमातींसाठी स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केले आहेत.
  • या योजनेच्या द्वारे सरकारला अगदी मागासलेल्या आदिवासी पर्यंत पोहचायचे आहे.
  • पी एम योजने द्वारे देशातील २२,००० हून अधिक गावांमध्ये २४,००० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
  • शासनाने २२,००० हून अधिक गावांमध्ये राहत असलेल्या ७५ आदिवासी समुदाय ओळखले आहेत, ज्यांना सरकारकडून लाभ दिला दिला जाणार आहे.

Pm Janman Yojana 2024 : ऑनलाइन अर्ज

पी एम जनमन योजना २०२४ तुमच्या माहिती साठी, शासनाने नुकतीच पी एम जनमन योजना सुरु करण्याची घोषणा केलेली आहे,तसेच शासनाने काहीही सांगितलेले नाही.त्यामुळेच आम्ही तुम्हाला पी एम जनमन योजनेचा अर्ज कश्या पद्ध्तीने करायचा व या योजनेचा लाभ कसा घ्यायचा या विषयी अपडेट देऊ शकत नाही.योजनेसाठी अर्ज कश्या पद्ध्तीने करायचा याची माहिती शासनाने उपलब्ध करताच आम्ही तुम्हाला या संबधित माहिती लेखात अपडेट करु. जेणेकरून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकाल व लाभ पण घेऊ शकणार.

Pm Janman Yojana 2024: हेल्पलाईन नंबर

पी एम जनमन योजना २०२४: या लेखात तुम्हाला पीएम जनमन योजना काय आहे. या योजने अंतर्गत कोणते फायदे होतील व या योजने मुळे आदिवासी समाजातील नागरिकांना कोणता लाभ मिळणार आहे. या सर्वांची माहिती या लेखा मधून तुम्हाला मिळाली आहे. तसेच लवकरच सरकार पी एम जनमन योजनेचा हेल्पलाईन नंबर जारी करणार आहेत. सरकारने हेल्पलाईन नंबर जारी करताच, आम्ही तुम्हाला या लेखातील हेल्पलाईन नंबर ची माहिती देखील अपडेट करू व प्रदान पण करू. जेणे करून तुम्हाला या योजने विषयी अधिक माहिती घरी बसून मिळू शकेल किंवा योजनेशी संबधित तुमची तक्रार नोंदवता येईल.

Pm Janman Yojana 2024 : निष्कर्ष

पी एम जनमन योजना २०२४ झारखंड राज्यातील खुंटी जिल्ह्यात बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजातील लोकांसाठी एक महत्वाची योजना सुरु केली आहे. या योजने साठी शासन लवकरच महत्वाचे पावले उचलणार आहेत.या योजनेच्या माध्यमातून आदिवासी समाजातील नागरिकांचे कल्याण करून त्यांना शौचालय लाभ, घरबांधणी, पेन्शन लाभ अशा अनेक प्रकारच्या सुविधा आदिवासी नागरिकांना दिल्या जाणार आहेत.

इतर मागास वर्गीयामध्ये जसे मागासलेले लोक आहेत, तसे नरेंद्र मोदी म्हणाले आहे कि तसेच आदिवासी समाजातही मागासलेले आदिवासी नागरिक आहेत, त्यांच्या कडे कोणी लक्ष देत नाहीत. पण मात्र, आमचे सरकार देशातील सर्व नागरिकांकडे लक्ष देत आहे. त्यामुळे आदिवासींच्या कल्याणासाठी आम्ही पीएम जनमन योजना २०२४ सुरु करत आहोत.

Pm Janman Yojana 2024 : विचारले जाणारे प्रश्न

१) प्रधानमंत्री जनमन योजना केव्हा सुरु झाली?

-१५ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रधानमंत्री जनमन योजना सुरु करण्यात आली.

२) PM PVTG मिशन कोणी सुरु केले?

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंड मध्ये पंतप्रधान जनजाती न्याय महाअभियान सुरु करण्यात आले.

3) पीएम जनमन योजना २०२४ अंतर्गत किती बजेट ठेवण्यात आले आहे?

-पीएम जनमन योजना २०२४ अंतर्गत २४,००० कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आलेले आहे.

४) PM PVTG मिशनचा लाभ कोणाला भेटणार आहे?

-PM PVTG मिशनचा फायदा देशातील १८ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये राहणाऱ्या ७५ आदिवासी समुदायांना आणि आदिम जमातींना होणार आहे.

महत्वाची सूचना :- प्रिय वाचक मित्रानो सर्वाना एक नम्र विनंती जर आपल्या परिसरात किवा आपल्या नातेवाईकांपैकी कोणी व्यक्ती असेल ज्याला या योजना चा फायदा होऊ शकतो असे आपल्यास वाटत असेल तर त्या व्यक्तीला कृपया करून या योजने विषयी माहिती द्या किवा त्यांना हा आमचा PM Janman Yojana 2024 |पी एम जनमन योजना २०२४ हा लेख वाचण्यास सांगावा हि विनंती जेणे करून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल व त्यांचे स्वप्नपूर्तीसाठी आपण काही मदत करू शकू

सर्व वाचक मित्रांना एक विनंती आहे हे website केंद्र शासन किवा राज्य शासना ची नाही किवा त्या सबंधी देखील नाही जर आपण वर नमूद केलेल्या माहिती च्या आधारे या योजने बद्दल काही निर्णय घेणार असाल तर कृपया वरती दिलेली माहिती तुम्ही परत एकदा पडताळून बघा किवा शासना च्या अधिकृत website वरती visit करून योग्य तो निणर्य घ्यावा आम्ही फक्त या योजने ची माहिती आपल्या मराठी वाचकांना मराठी भाषेत वाचण्यास मिळावी या अनुषंगाने हा एक छोटासा प्रयत्न केला आहे तरी कृपया आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी व आमचा लेख तुम्हाला कसा वाटला आम्हला तुमच्या शब्दात कळवावे .

अधिक माहिती साठी या Official Link La visit करा

माझी कन्या भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येते click करा

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना मराठी बद्दल जाणून घेण्यासाठी येते click करा

भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा

Follow Social Media Page