Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024|मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वांतत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात ” मुख्यमंत्री माझी लडकी बहिण ” योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.महिला व बालविकास विभागाने सादर केलेल्या प्रस्तावनास दि २८.०६.२०२४ रोजी च्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैटकीत मध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्या नुसार महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु करण्यास शासन निर्णय दि २८.०६.२०२४ रोजी मान्यता देण्यात आली आहे सदर शासन निर्णय मधील नमूद काही निकषां मध्ये सुधारणा करण्याची बाब
या योजनेचा ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या प्रमाणात आधार मिळणार आहे तसच महिलावर्गा मध्ये विधवा महिला किवा मागासवर्गीय महिलांना मुख्य प्राधान्य देण्यात आले आहे सरकार च्या या निर्णया मुळे सगळया महिला वर्गात आनंदाचा वातावरण आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024|मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ मध्ये सदर जिल्हास्तर समिती मध्ये सुधारणा करण्याची बाब विचारणा धारित होते . त्यानुषांगने माननिन्ये मा.मुख्यमंत्री मोह्दय यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या योजने बाबत चर्चा करण्यात आली दि ०२.०७.२०२४ या रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचे दि २८.०६.२०२४ रोजी शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024

Visit Official website
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024:- शासन निर्णय
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” या योजनेचा शासन निर्णय दि २८.०६.२०२४ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे
अ) योजनेचे लाभार्थी , पात्रता, अपात्रता व आवश्यक कागदपत्र
अ.क्र | शासन निर्णय दि २८.०६.२०२४ रोजीच्या परिच्छेद क्र.१ मधील नमूद निकष | शासन निर्णयामध्ये दुरुस्ती |
१. | योजनेचे लाभार्थी :- महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६० या वर्ष वयोगटातील विवाहित , विधवा , घटस्पोटीत आणि निराधार महिला | योजनेचे लाभार्थी :- महाराष्ट्र राज्यातील २१ ते ५६ वयोगटातील विवाहित , विधवा , घटस्पोटीत आणि निराधार महिला तसेच त्या परिवारातील केवळ १ अविवाहित महिला |
२. | योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता :– राज्यातील विवाहित ,विधवा ,घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला. | योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता :-राज्यातील विवाहित, विधवा ,घटस्फोटीत ,परित्यक्त्या आणि निराधार महिला. व तसेच त्या परिवारातील केवल एक अविवाहित महिला. |
३. | योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता :– किमान वयाची २१ वर्ष पूर्ण व कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत. | योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता :-किमान वयाची २१ वर्ष पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत. |
४. | अपात्रता :-ज्यांच्या परिवारातील सदस्य नियमित /कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / कंत्राटी कर्मचारी / उपक्रम /मंडळ /भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेत आहेत.परंतु बाह्य यंत्रणा द्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. | अपात्रता :-ज्यांच्या परिवारातील सदस्य नियमित /कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / कंत्राटी कर्मचारी / उपक्रम /मंडळ /भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेत आहेत. तथापि ,रु २ .५० लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रानाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी ,स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. |
५. | अपात्रता :- सदर लाभर्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रु. १ .५०० /-पेक्षा जास्त लाभ घेतला असेल. | अपात्रता :- सदर लाभर्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १ .५०० /-किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेचा लाभ घेत असेल. |
६. | अपात्रता :-ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. | अपात्रता :- येथिल अपात्रतेची अट वगळण्यात येत आहे. |
७. | सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत :- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. | सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत :-महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र ( लाभार्थी महिले कडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे १५ वर्षापूर्वीचे १ . रेशनकार्ड, २.मतदार ओळखपत्र , 3.शाळा सोडल्याचा दाखला व 4. जन्म दाखला या पैकी कोणतेही ओळखपत्र / प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.) परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचा दाखला किंवा 3. अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे. |
८. | सदर योजनेमध्ये लाभ मिळविण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत :- सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला ( वार्षिक उत्पन्न रु. २ .५० लाखापर्यंत असणे अनिर्वाय आहे. ) | सदर योजनेमध्ये लाभ मिळविण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत :- सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला ( वार्षिक उत्पन्न रु. २ .५० लाखापर्यंत असणे अनिर्वाय आहे.) तसेच, पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाण पत्रातून सूट देण्यात येत आहे. |
ब ) समिती:- “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ” या योजनेचे संनियत्रण व आढावा घेण्याकरिता राज्यस्तरावर व जिल्हास्तर समिती गठीत करण्यात आली आहे. सदर जिल्हास्तर समितीमध्ये जिल्हाधिकारी हे सदर समितीचे अध्यक्ष आहे. सदर समितीमध्ये अंशता बदल करून संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तर समिती गठीत करण्यात येत आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 :- जिल्हास्तर समिती
अ. क्र. | पदनाम | समितीमधील पदनाम |
१ | संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री | अध्यक्ष |
२ | संबंधित जिल्ह्याचे मंत्री | सह अध्यक्ष |
३ | संबंधित सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद | सदस्य |
४ | संबंधित पोलीस अधीक्षक | सदस्य |
५ | जिल्हा सह आयुक्त नगर प्रशासन | सदस्य |
६ | जिल्ह्यातील महानगर पालिकाचे आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी ( उप आयुक्त दर्जापेक्षा कमी नसावे.) | सदस्य |
७ | संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी | सदस्य |
८ | जिल्ह्यातील नगरपरिषदांचे मुख्याधिकारी | सदस्य |
9 | संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विअक्स प्रकल्प | सदस्य |
१० | संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी | सदस्य |
११ | संबंधित जिल्हाधिकारी | सदस्य सचिव |
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 :-सदर समितीची बैठक दरमहा तसेच आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात यावी. सदर समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे आहे.
१ ) सदर योजनेची देखरेख व संनियंत्रण करणे.
२) सदर योजनेच्या अंमलबजावणी बाबत नियमित आढावा घेणे.
३ ) सदर योजनेसाठी उपलब्ध तरतूद व खर्च याबाबतचा आढावा घेवून आवश्यक निधीची मागणी राज्यस्तरिय समितीकडे सादर करणे.
४ ) कालबद्ध पद्धतीने पात्र महिलांची यादी अंतिम करणे व सदर योजनेपासून कोणताही पात्र लाभर्थी ह्या योजने पासून वंचित राहणार नाही, याची पूर्णपणे दक्षता घेणे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 :- तालुकास्तर समिती
तालुका स्तरावर खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.
अ. क्र. | पदनाम | समितीमधील पदनाम |
१ | अशासकीय सदस्य | अध्यक्ष |
२ | मुख्याधिकारी, नगरपालिका , नगरपरिषद ,नगरपंचायत | सदस्य |
३ | गट विकास अधिकारी | सदस्य |
४ | सहायक आयुक्त , सहायक अधिकारी, समाज कल्याण | सदस्य |
५ | सहाय्यक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प | सदस्य |
६ | बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण ) ज्येष्ठतम | सदस्य |
७ | एक अंगणवाडी पर्यवेक्षिका ( बाल विकास प्रकल्प यांच्या मान्यतेने ) | सदस्य |
८ | संरक्षण अधिकारी ( कनिष्ठ ) | सदस्य |
९ | दोन अशासकीय सदस्य | सदस्य |
१० | संबंधित तहसीलदार | सदस्य सच |
सदस्याची निवड सदर जिल्ह्यांच्या पालकमंत्री यांच्यामार्फत करण्यात येईल.
सदर समितीची बैठक दर महिन्याला व तसेच आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात यावी. सदर समितीची कार्यकक्षा खालील प्रमाणे दिलेली आहे.
१) सदर योजनेची देखरेख व संनियत्रण करणे.
२) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या योजनेच्या अंमलबजावणी बाबत नियमित आढावा घेणे.
३) सदर योजने पासून कोणत्याही पात्र महिला वंचित राहणार नाही, याची दक्षता घेणे.
४) ग्रामीण स्तरावर प्राप्त झालेळे अर्ज, त्यांची छाननी/ तपासणी करणे, सदर अर्जासोबत जोडलेल्या कागद पत्रांची पडताळणी करणे.
ड) मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा :-
उपरोक्त कालावधीनंतर या मोहिमेअंतर्गत नोदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, याबाबत खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत आता दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत लाभर्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभर्थी महिलांना दि.१ जुलै २०२४ पासून दर महिन्याला रु. १.५०० आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत नोदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने मुळे महिलांना आता त्यांच्या पोषणात व आरोग्याकडे लक्ष देता येईल. या योजनेमुळे राज्यातील २१ ते ६० या वर्ष वयोगटातील विवाहित,विधवा, घटस्फोटीत, व निराधार महिलांना लाभ मिळणार आहे.
इ) प्रोत्साहन भत्ता :-
सदर योजनेंर्गत मोबाईल मधून ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थ्याची अंतिम यादी प्रसिध्द झाल्यावर, एकूण पात्र महिलेंचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्रति पात्र लाभर्थी रु. ५० /- याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल.
शासन निर्णय दि.०२. ०७. २०२४ रोजीच्या मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०७०३१३३५११४३३० असा आहे.हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
प्रति ,
१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन,मुंबई
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,मंत्रालय, मुंबई
३.मा. उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय,मुंबई
४.मा. अध्यक्ष/उपाध्यक्ष/सदस्य/ विधानसभा/ विधान परिषद, विधानमंडळ,मुंबई
५. मा. विरोधी पक्षनेता ,विधानसभा/ विधान परिषद, विधानमंडळ,मुंबई
६. मा.मंत्री , महिला व बाल विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
७. सर्व मा. मंत्री यांचे खाजगी सचिव , मंत्रालय, मुंबई
८.मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
९. अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव सर्व मंत्रालयीन विभाग,मंत्रालय, मुंबई
१०. सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
११. विभागीय आयुक्त ( सर्व )
१२. आयुक्त, महिला व बाल विकास पुणे
१३. जिल्हाधिकारी ( सर्व )
१४. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद
१५.सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे की त्याचं सरकार आल्यानंतर महिलांना ते लाडकी बहिण योजने मार्फत १५०० रुपये भेटत होते त्या जागी ते वाढवून आता २१०० रुपये करण्यात येणार आहेत मात्र आजून या बद्दल काही माहिती मिळालेली नाही आम्हला Update मिळताच आम्ही तुम्हाला कळवू .
अधिक माहितीसाठी official website visit करा
सुकन्या समृद्धी योजनेंची मराठी मध्ये माहिती जाणून घेण्यासाठी click करा
माझी कन्या भाग्यश्री या योजने बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा
सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येते click करा