Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2025
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2025| जेष्ठ नागरिकांसाठी देशातील तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा : महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयां मधील ६० वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांसाठी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे.आता जेष्ठ नागरिकांना देशातील महत्वाच्या तीर्थ स्थळांची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र राज्या बरोबरच इतर राज्यांमध्ये अनेक तीर्थ क्षेत्र आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत व धर्मगुरू होऊन गेले आहेत. ज्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला असून एक पावन भूमी म्हणून महाराष्ट्राच नाव घेण्यात येते.
महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची, भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परंपरा असून यामध्ये लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य भक्ती मार्गान प्रवास करत असतात, याच पार्श्वभूमीवर राज्यातील जेष्ठ नागरिकांना तीर्थ यात्रा करण सोपे व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकार ने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु केली आहे. ६० वर्षांवरील नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार असून देशभरातील ६६ तीर्थ क्षेत्रांसाठी योजना लागू करण्यात आलेली आहे.या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना ३० हजारापर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी देशभरातील ७३ आणि महाराष्ट्रातील ६६ धार्मिक स्थळांची यादी केली आहे.

Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2025 : संपूर्ण माहिती
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या योजने संदर्भातील शासन निर्णय १४ जुलै २०२४ रोजी सामाजिक न्याय विभागाने प्रसिध्द केलेला आहे. या योजनेच्या अंतर्गत देशातील एकूण ७३ व महाराष्ट्रातील ६६ अशी एकूण १३९ तीर्थ क्षेत्रांचा या योजने मध्ये समावेश केलेला आहे. या योजने मध्ये देशातील व राज्यातील सर्व महत्वाच्या तीर्थ स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे. जेणे करून जेष्ठ नागरिकांना तीर्थ स्थळांवर जाऊन मोफत दर्शन घेता येणार यासाठी सरकारने ही योजना राबवली आहे. तीर्थ यात्रांना जाऊन मन शांती अध्यात्मिक पातळी गाठणे सुखकर व्हावे यासाठी महाराष्टातील सर्व धर्मा मधील जेष्ठ नागरिकांना तीर्थ स्थळांचे मोफत दर्शन या योजने अंतर्गत देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या योजने मध्ये देशातील व राज्यातील प्रमुख तीर्थ स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेच्या द्वारे निश्चित केलेल्या तीर्थ क्षेत्रांपैकी एका यात्रेसाठी पात्र व्यक्तीला या योजनेचा एकदाच लाभ घेता येणार आहे. तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रति व्यक्तीला ३० हजार रुपये इतकी रक्कम ठरवण्यात आलेली आहे. या मध्ये प्रवास, भोजन, राहण्याची व्यवस्था इ. बाबींचा समावेश करण्यात आला आहे. तसेच लाभार्थी व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे. व त्याचे वय ६० वर्ष किंवा त्या पेक्षा जास्त असावे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. या योजनेच्या द्वारे रेल्वे तसेच बस प्रवासाचे नियोजन करण्यासाठी अधिकृत टूरीस्ट कंपन्या आणि रेल्वे प्रवासासाठी IRCTC समक्ष अधिकृत असलेल्या अधिकृत कंपनीची निवड केली जाणार आहे. या योजने अंतर्गत प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समिती द्वारे करण्यात येणार आहे. तासेच्ग प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या आधारावर कोठा निश्चित केला जाईल. या योजने अंतर्गत लाभार्थी ७५ वर्षा वरील असेल तर त्यांच्या जिवनसाथी किंवा सहाय्यक यांच्या पैकी एकाला त्यांच्या सोबत नेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. देशातील हिंदू धर्मात चार धाम यात्रा, अमरनाथ यात्रा, इतर धर्मीयांची ही मोठी तीर्थ स्थळे आहेत. त्या ठिकाणी आयुष्या मध्ये एकदा तरी जाण्याचे बऱ्याच जेष्ठ नागरिकांचे स्वप्न असते.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2025 : हायलाईट
योजनेचे नाव | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना |
द्वारा सुरु | महाराष्ट्र सरकार |
केव्हा सुरु झाली | जुलै २०२४ |
उद्दिष्ट | तीर्थ स्थळांचे दर्शन |
लाभार्थी | maharashtra राज्यातील ६० वर्षा वरील नागरिक |
लाभ | देशातील महत्वाच्या तीर्थ स्थळांचे मोफत दर्शन |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2025 : योजनेच्या तरतुदी
- या योजने अंतर्गत ७५ वर्षा वरील लाभार्थ्याला त्यांच्या सहाय्यकापैकी एकाला सोबत घेण्याची परवानगी असेल पण हे अर्जदाराला अर्जामध्ये नमूद करावे लागेल.
- प्रवासा मध्ये सहाय्यक प्रवासी घेण्याची सुविधा ही तेव्हाच उपलब्ध होणार जेव्हा अर्जदार लाभार्थी चे वय ७५ वर्षा पेक्षा जास्त असेल आणि त्याने एकट्याने रेल्वे प्रवासासाठी अर्ज केलेला असेल.
- प्रवासी पती पत्नी आणि सहाय्यकांनी प्रवासा संबधित सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे गरजेचे आहे.
- ७५ वर्षा वरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय ६० वर्षा पेक्षा कमी असले तरीही सहाय्यक प्रवासी अर्जदारा सोबत प्रवास करण्यासाठी पात्र असणार.
- जर दोन्ही पती पत्नी चे वय ७५ वर्षा पेक्षा जास्त असेल तर त्यांच्या सोबत एक सहाय्यक घेता येणार.
- सहाय्यक प्रवासी चे वय २१ ते ५० वर्षा दरम्यान असणे गरजेचे आहे.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2025 : उद्दिष्ट
- महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिकांना तीर्थ क्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- या योजनेची अर्ज प्रक्रिया अत्यंत सोप्या पद्ध्तीने ठेवण्यात आली आहे.
- जेष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन घेण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राह्ण्याची आवश्यकता नाही.
- या योजने मुळे नागरिकांचे तीर्थ दर्शन करण्याचे स्वप्न पूर्ण होणार.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2025 : योजने अंतर्गत महाराष्टातील तीर्थक्षेत्रे
मुंबईतील महत्वाच्या ठिकाणांचाही समावेश : सिद्धिविनायक, चैत्यभूमी, माउंट मेरी चर्च ; तीर्थक्षेत्रांमध्ये वैष्णोदेवी मंदिर, अमरनाथ यात्रा, अमृतसर मधील राम मंदिर, द्वारकामधील सोमनाथ मंदिर आणि ओडीशातील जगन्नाथ पुरी या प्रमुख धार्मिक स्थळांचा सामावेश आहे.
मुंबईतील १५ धार्मिक स्थळांचा समावेश आहे.यामध्ये सिद्धिविनायक, चैत्यभूमी, विपश्यना शिवालय, एक आराधनालय, वांद्रे येथिल माउंट मेरी चर्च, महालक्ष्मी मंदिर,चर्च ऑफ आवर लेडी ऑफ हेल्थ क्यॅवेल,सेंट जॉन द ब्याप्टीस चर्च, सीपझ औद्योगिक क्षेत्र अंधेरी,मुंबादेवी मंदिर, वाळकेश्वर मंदिर मलबार हिल, गोदीजी पार्श्वंत मंदिर.
नाशिक मधील जैन मंदिर आणि नागपुरातील दीक्षाभूमी, जिथे आंबेडकरानी बौद्ध धर्म स्वीकारला, संत निवृत्तीनाथ समाधी त्रंबकेश्वर जवळ,त्र्यंबकेश्वर शिवमंदिर त्रंबकेश्वर, मुक्तिधाम,सप्तशृंगी मंदिर वनी, काळाराम मंदिर,जैन मंदिरे मांगी तुंगी,गजपंथ. संत साईबाबा मंदिर शिर्डी,सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक, शनी मंदिर शनिशिंगणापूर,श्रीक्षेत्र भगवानगड पाथर्डी, बल्लाळेश्वर मंदिर पाली, संत गजानन महाराज मंदिर शेगाव, एकविरा देवी कारला, श्री दत्त मंदिर औदुंबर,केदारेश्वर मंदिर,वैजनाथ मंदिर परळी,गणपतीपुळे, महाकाली देवी,
मयुरेश्वर मंदिर मोरगाव पुणे, चिंतामणी मंदिर थेऊर, गिरिजात्मज मंदिर लेण्याद्री, महागणपती मंदिर रांजणगाव,खंडोबा मंदिर जेजुरी, संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर आळंदी, भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर खेड, संत तुकाराम महाराज समाधी मंदिर देहू, संत चोखामेळा समाधी पंढरपूर सोलापूर मधील, संत सावता माळी समाधी मंदिर अरण ता. माढा, विठोबा मंदिर पंढरपूर, शिखर शिंगणापूर, महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा मंदिर, गुरुगोविंद सिंग समाधी हुजूर साहेब नांदेड, रेणुका देवी मंदिर माहूर,खंडोबा मंदिर मालेगाव, तुळजाभवानी मंदिर तुळजापूर, संत एकनाथ समाधी पैठण, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वेरूळ.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2025 : पात्रता
- अर्जदार लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे गरजेचे आहे.
- लाभार्थी परिवाराचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारा पेक्षा जास्त नसले पाहिजे.
- अर्जदार लाभार्थीचे वय ६० वर्ष किंवा त्या पेक्षा जास्त असले पाहिजे.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2025 : अपात्रता काय आहे
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे.
- ज्या कुटुंबातील सदस्य नियमित/ कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/ मंडळ/ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाहीत.
- २.५० लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रानाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी पात्र ठरतील.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/ आमदार आहे.
- ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कोर्पोरेशन/उपक्रमाचे अध्यक्ष/ उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
- ज्यांच्या कडे चारचाकी वाहने( ट्रक्टर वगळून ) त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी कृत आहेत.
- प्रवासासाठी शारीरिक आणि मासिक द्रुष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे व कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे जसे कि, टीबी, हृदयाशी संबधित श्वसन रोग, अपुरेपणा, कोरोनरी, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्टरोग इ.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2025 : आवश्यक कागदपत्रे
- ऑनलाईन अर्ज
- लाभार्थ्याचे आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- जन्म प्रमाणपत्र
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- रहिवाशी दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- नातेवाईकांचा मोबाईल नंबर
- या योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्या बाबतचे हमीपत्र
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2025 : लाभार्थ्यांची निवड
- प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात येईल, ज्या मध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित करण्यात येईल. विहित कोत्या पेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धते वर आधारित प्रवाशांची निवड करण्यात येणार. कोट्यातील १०० टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी पण तयार करण्यात येईल.
- निवडलेला प्रवासी प्रवासाला न गेल्यास प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासा साठी पाठवता येणार.
- निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येईल.
- फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थ यात्रेला जाणार. तो किंवा ती तत्यांच्या सोबत इतर कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही.
- जर पती पत्नीने स्वतंत्र पणे अर्ज केलेला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल, तर आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, पुणे त्यांना किंवा तिला तीर्थ दर्शनासाठी पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील.
Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2025 : अर्ज करण्याची प्रक्रिया
- या योजनेसाठी पात्र जेष्ठ नागरिकास ऑनलाईन अर्ज करता येईल.
- ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल, तर त्यांच्या साठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल.
- अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामुल्य असेल.
- Pradhanmantri E-Drive Subsidy Yojana 2025|इलेक्ट्रिक वाहनांवर मिळणार आता सबसिडी या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या website ला भेट द्या .