Pradhanmantri Yashasvi Scholarship Yojana 2025|९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार १,२५,००० रुपये शिष्यवृत्ती

Pradhanmantri Yashasvi Scholarship Yojana 2025

Pradhanmantri Yashasvi Scholarship Yojana 2025|९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार १,२५,००० रुपये शिष्यवृत्ती : विद्यार्थ्यांसाठी प्रधान मंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना केंद्र सरकारने सुरु केली आहे. या योजनेच्या अंतर्गत देशातील गरीब व दुर्बल वर्गातील मुलांना आणि मुलींना उच्च शिक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. गरीब समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू नाही. त्यासाठी ही योजना मदत करत असते. भारत देशातील जे कुटुंब आर्थिक स्वरुपात कमकुवत आहेत त्या कुटुबांतील मुली व मुलांना प्रधान मंत्री यशस्वी योजने अंतर्गत लाभ देण्यात येतो.

Pradhanmantri Yashasvi Scholarship Yojana 2025९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार १,२५,००० रुपये शिष्यवृत्ती
Pradhanmantri Yashasvi Scholarship Yojana 2025९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार १,२५,००० रुपये शिष्यवृत्ती

सध्याच्या जगात पाहतच आहोत जसे माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा आहेत. त्याचप्रमाणे शिक्षण सुद्धा आता मूलभूत गरज झाली आहे. आपला संपूर्ण देश साक्षर व्हावा, यासाठी केंद्र सरकार शंभर टक्के प्रयत्न करत आहे आणि ते आता यशस्वी होण्याच्या मार्गावर देखील आहेत. परंतु भारत हा शंभर टक्के साक्षर होण्यासाठी एक अडचण येते ती म्हणजे पाचवीला पुजलेली गरीबी… यामुळे भारतातील जे दारिद्रय रेषेखालील लोक आहेत, त्यांना त्यांच्या मुला-मुलींना शिक्षण देण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी सरकारने प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. YOUNG ACHIEVERS SCHOLARSHIP AWARD SCHEME FOR VIBRANT INDIA प्रधानमंत्री यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया असे हे नाव आहे.

प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना ही शिष्यवृत्ती ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थी यांच्या साठी मर्यादित आहे. या स्कॉलरशिपचा उद्देश विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे, पूर्व माध्यमिक शिक्षणाच्या पलीकडेही त्यांना शिक्षण घेता यावे. यासाठी या योजनेतून त्यांना मदत मिळणार आहे. या योजने अंतर्गत ९ वी आणि ११ मधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेचा लाभ फक्त भारत देशातील विद्यार्थ्यांनाच मिळतो. शिष्यवृत्ती पुरस्कारसाठी अर्जदारांची निवड यशस्वी एंट्रन्स टेस्ट २०२५ म्हणून ओळखली जाणारी लेखी परीक्षा होणार. यामुळे भारतातील विद्यार्थ्यांचे चांगले भविष्य घडणार.

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप शिष्यवृत्ती योजने अंतर्गत इयत्ता नववी, दहावी, अकरावी, बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ७५ हजार रुपये पासून ते १ लाख २५ हजार रुपये पर्यंतची शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. जे विद्यार्थी २०२४-२०२५ मध्ये नववी, दहावी, अकरावी, बारावी, यापैकी एका वर्गात शिक्षण घेत आहेत त्यांना सरकारकडून ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत एकूण वार्षिक १५००० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी निवडण्यात येते. ही योजना विद्यार्थ्यांच्याभविष्यासाठी महत्वाची योजना आहे.

Pradhanmantri Yashasvi Scholarship Yojana 2025 : हायलाईट

योजनेचे नाव प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना
द्वारा सुरु महाराष्ट्र सरकार
योजना सुरु झाल्याची तारीख २६ जानेवारी २०२४
उद्देश भारत देशातील गरीब व दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करणे
लाभार्थी देशातील ९ वी ते १२ वी च्या वर्गातील विद्यार्थी
लाभ ७५ हजार रुपये ते १ लाख २५ हजार रुपये पर्यंतची स्कॉलरशिप
परीक्षेची पद्धत लेखी
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट यशस्वी योजना

Pradhanmantri Yashasvi Scholarship Yojana 2025 : फायदे

  • प्रधान मंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजने अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिप च्या स्वरुपात आर्थिक मदत देण्यात येते.
  • देशातील गरीब वर्गातील विद्यार्थी आपल्या उच्च शिक्षणासाठी प्रधानमंत्री यशस्वी योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • ९ वी पासून ते १० वीच्या वर्गा मधील विद्यार्थी मुला मुलींना या योजनेच्या अंतर्गत शिक्षण घेण्यासाठी आर्थिक स्वरुपात ७५ हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो.
  • या योजने अंतर्गत ११ वी ते १२ वी च्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थी मुला मुलींना शिक्षण घेण्यासाठी १ लाख २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते.
  • या योजनेच्या अंतर्गत भारत देशामधील OBC, CS, CSS, DNT, SNT व EBC या श्रेणी तील विद्यार्थ्यांना सहभागी होऊन लाभ घेता येणार आहे.
  • या योजनेचा लाभ फक्त इयत्ता नववी, दहावी, अकरावी, बारावी, या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच होणार आहे.
  • या योजनेचा लाभ ९ वीतील विद्यार्थ्यांना ७५ हजार रुपये प्रति वर्ष तसेच इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांना १ लाख २५ हजार रुपये प्रति वर्ष अशी रक्कम मिळणार.

Pradhanmantri Yashasvi Scholarship Yojana 2025 : उद्दिष्ट

  • प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ हा मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना होणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी परिवाराचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपये पेक्षा कमी असले पाहिजे.
  • एमएसजे अँड इ म्हणजे भारत सरकारच्या सामाजिक न्यायाने सक्षमीकरण मंत्रालयाने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी स्कॉलरशिप अनुदान योजना तयार केलेली आहे.
  • या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचा सतत अभ्यास सुरू राहणे आणि त्यांना उच्च शिक्षण घेता यावे हा आहे.
  • या योजनेचा लाभ जे विद्यार्थी इयत्ता ९ वी मध्ये व बारावीमध्ये  शिक्षण घेत आहेत, त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
  • या योजने अंतर्गत जवळपास ३८५ कोटी रुपये इतकी आर्थिक मदत विद्यार्थ्यांना केली जाणार आहे.

Pradhanmantri Yashasvi Scholarship Yojana 2025 : वैशिष्ट्ये

  • या योजने अंतर्गत ७५ हजार रुपये ते एक लाख २५ हजार रुपये पर्यंतची आर्थिक मदत सरकार विद्यार्थ्यांना करत आहे.
  • प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेचे दोन भाग आहेत.
  • भाग १ – ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी तर
  • भाग २ – हा ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
  • जे विद्यार्थी पात्र आहेत. त्यांना ९ वीतील विद्यार्थ्यांना ७५ हजार रुपये तर ११ वीतील विद्यार्थ्यांना १ लाख २५ हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळणार.
  • ही योजना मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेली आहे, OBC , EBC हे विद्यार्थी येतात.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी ९ वी आणि ११ वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना एक स्कॉलरशिपची  परीक्षा द्यावी लागते.
  • त्या परीक्षेत पास झाल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपया पेक्षा कमी असले पाहिजे.

Pradhanmantri Yashasvi Scholarship Yojana 2025 : पात्रता

  • या योजने अंतर्गत अर्ज करून लाभ घेण्यासाठी विद्यार्थी भारत देशाचा मूळचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. 
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयां पेक्षा जास्त नसले पाहिजे. 
  • देशामधील OBC, CS, CSS, DNT, SNT व EBC यांसारख्या गरीब व दुर्बळ वर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 
  • ९ वी आणि ११ वी वर्गातील उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या योजनेमध्ये अर्ज करून स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकतात. 
  • या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थीच्या कुटुंबामधील कोणताही सदस्य सरकारी कार्यालयात कार्यरत नसले पाहिजे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगा आणि मुलगी हे दोघेही पात्र असणार.
  • या योजनेचा लाभ हा मोठ्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनाही घेता येणार.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा ८ वी आणि १० वी उत्तीर्ण असला पाहिजे.
  • ८ वी आणि १० वी मध्ये कमीत कमी त्याला ६०% गुण असायला पाहिजेत.

Pradhanmantri Yashasvi Scholarship Yojana 2025 : आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • बँक खाते पासबुक
  • उत्पन्नाचा दाखला
  • ८ वी व १० वी चे शैक्षणिक प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर
  • कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • रहिवाशी दाखला

Pradhanmantri Yashasvi Scholarship Yojana 2025 : ऑनलाइन प्रक्रिया

  • तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम उमेदवाराची नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • यासाठी तुम्हाला यशस्वी स्कॉलरशिप योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल, जी तुम्हाला NTA वेबसाईटवर  मिळेल, त्या वेबसाईटवर क्लिक करताच तुम्हाला मेन्यू मध्ये रजिस्टर हा पर्याय दिसणार.
  • त्या पर्यावरण क्लिक केल्यानंतर उमेदवार नोंदणी नावाचे नवीन होमपेज तुमच्यासमोर उघडणार.
  • उमेदवार नोंदणी यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, ईमेल, आयडी, जन्मतारीख, पासवर्ड टाकावा लागेल.
  • त्यानंतर कॅप्चा कोड टाकून लॉगिन बटनावर क्लिक करणे. 
  • पोर्टल लॉगिन करून झाल्यावर तुमच्या समोर अर्ज करण्यासाठी फॉर्म उघडून येईल. 
  • तो फॉर्म पूर्णपणे काळजीपूर्वक भरून घेणे
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आवश्यक असणारे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करून घेणे. 
  • या दोन्ही प्रकिया पूर्ण झाल्यावर तपासणी करून सबमिट बटनावर क्लिक करणे. 
  • अशाप्रकारे या योजनामध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकता.

Pradhanmantri Yashasvi Scholarship Yojana 2025 : स्कॉलरशिप साठी निवड प्रक्रिया

  • सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले एप्लिकेशन्स फॉर्म स्वीकारले जातात. 
  • अर्ज स्वीकारून झाल्यानंतर जिल्हा स्थरावर अर्जाचे फॉर्म तपासले जातात आणि पडताळणी करण्यात येते.
  • पडताळणी झाल्यानंतर मेरिटच्या आधारावर प्राधान्य देऊन पात्र असलेले विद्यार्थ्यांचे अर्ज निवडले जातात. 
  • त्यानंतर सगळ्या निवडलेल्या अर्जदारांना Public Financial Management System च्या माध्यमातून लाभार्थी नोंदीमध्ये जोडले जाते. 
  • नोंदणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मेरीटनुसार लाभार्थींची यादी प्रकाशित करण्यात येते.
  • प्रकाशित केल्यानंतर लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये योजनेची रक्कम DBT द्वारे पाठविण्यात येते.

निष्कर्ष :

अशा प्रकारे आम्ही तुम्हाला प्रधान मंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना २०२५ या योजने विषयी माहिती सांगितली आहे. प्रत्येक मुला मुलींना शिक्षण घेण्याची संधी ही मिळायला हवी.या स्कॉलरशिप चा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा ज्यामुळे ते उच्च शिक्षण घेऊ शकतील. तसेच या योजनेसाठी कोण पात्र आहेत. त्यानंतर या योजनेचा अर्ज कसा करावा, या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना कोणते लाभ होणार आहेत.

कशाप्रकारे लाभार्थींची निवड केली जाते ह्या सर्व गोष्टीबद्दल मार्गदर्शन केले आहे. तुम्ही एक विद्यार्थी आहात आणि तुम्हाला पण या योजने मार्फत अर्ज करून लाभ घ्यायचा असेल तर आम्ही दिलेल्या लेखातून संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि अर्ज करून शिष्यवृत्ती चा फायदा घ्या. आणि तुमच्या मित्र मैत्रिणीना पण पाठवून त्यांना या योजनेचा लाभ घेण्यास प्रोत्साहन करा.या पद्ध्तीने आम्ही या लेखाद्वारे प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेची माहिती दिली आहे.

Pradhanmantri Yashasvi Scholarship Yojana 2025 : सतत विचारले जाणारे प्रश्न

१. प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना ही योजना कोणासाठी आहे ?

प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजना या योजनेसाठी ९ वी ते १२ वीच्या मुल व मुलींसाठी आहे.

२. प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजने द्वारे विद्यार्थ्यांना किती लाभ मिळतो ?

विद्यार्थ्यांना सरकार कडून ७५ हजार रुपये ते १ लाख २५ हजार रुपये पर्यंत आर्थिक लाभ मिळतो.

३. प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेसाठी विद्यार्थी कसे पात्र होतात ?

या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याला एक परीक्षा द्यावी लागते ती परीक्षा पास झाल्यानंतर प्रधानमंत्री यशस्वी स्कॉलरशिप योजनेचा लाभ देण्यात येतो.

  • Pradhanmantri Yashasvi Scholarship Yojana 2025|९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार १,२५,००० रुपये शिष्यवृत्ती योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत website ला भेट द्या.
  • Maharashtra Shasan Aaplya Dari Yojana 2025| शासन आपल्या दारी योजना या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा.
  • Maharashtra Berojgari Bhatta Yojana| महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना २०२५ या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा.