Pradhanmantri Swamitva Yojana 2025
Pradhanmantri Swamitva Yojana 2025|ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार आपल्या संपत्तीचा हक्क : प्रधानमंत्री स्वामित्व योजना २०२५ या योजनेची सुरुवात २४ एप्रिल २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या योजनेची सुरुवात पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून देशातील सरपंचांशी संवाद साधून स्वामित्व योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. ही योजना सुरू करण्यामागचा सगळ्यात मोठा उद्देश म्हणजे जमिनीचा मालकी हक्क असलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे ई प्रॉपर्टी कार्ड E Property Card देणे. या योजनेच्या माध्यमातून खेड्यांमधील शेतकऱ्यांच्या प्रत्येक जमिनीचे मोजमाप केले जाणार आहेत. हे मोजमाप ड्रोन द्वारे करण्यात येईल.
स्वामित्व योजना पायलट प्रोजेक्ट म्हणून २०२० -२१ मध्ये २४ एप्रिल २०२० ला सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर २४ एप्रिल २०२१ ला या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. पंचायत राज मंत्रालय, राज्य राजस्व विभाग, राज्य पंचायत राज विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभागा च्या संयोगाने स्वामित्व योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना सुरू करण्यासाठी राज्यांना भारतीय सर्वेक्षण विभागासोबत करार करण्याची आवश्यकता आहे. आत्तापर्यंत ३१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी एसओआय सोबत करार करून या करारावर सह्या केल्या आहेत. २६ जुलै २०२३ पर्यंत देशातील २ लाख ७० हजार ९२४ गावात स्वामित्व योजनेच्या अंतर्गत ड्रोन च्या माध्यमातून मालमत्ता मोजणीचे काम करण्यात आले आहे.

भारतीय सर्वेक्षण विभागा अंतर्गत स्वामित्व योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले नकाशे आणि मोजणीच्या आधारावर संपत्ती कार्ड तयार करणे आणि वितरण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मात्र पंचायत राज मंत्रालय स्वामित्व योजने अंतर्गत तयार केलेले संपत्ती कार्ड डीजी लॉकर वर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशासोबत संवाद साधत आहेत. २६ जुलै २०२३ पर्यंत ८९ हजार ७४९ गावांमध्ये संपत्ती कार्ड तयार करण्यात आले आहेत. योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले नकाशे मालमत्ता ची कागदपत्रे याद्वारे ग्रामीण क्षेत्रात संपत्ती संबंधित डिजिटल नकाशे दिले जात आहेत. देशातील जवळपास ६.६२ लाख गावांचा ५ वर्षात या योजनेमध्ये समावेश करण्यात येणार आहे.
Pradhanmantri Swamitva Yojana 2025 : हायलाईट
योजना | प्रधानमंत्री स्वामित्व योजना |
द्वारा सुरु | केंद्र सरकार |
विभाग | ग्रामविकास विभाग |
केव्हा सुरु झाली | २४ एप्रिल २०२१ |
लाभार्थी कोण | ग्रामीण भागातील नागरिक |
लाभ | ई प्रॉपर्टी कार्ड वितरण |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन आणि ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | swamitva.nic.in/ |
Pradhanmantri Swamitva Yojana 2025 : वैशिष्ट्ये
- केंद्र सरकारने प्रधानमंत्री स्वामीत्व योजनेची सुरुवात केली आहे.
- स्वामित्व योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर वितरित झालेले ई प्रॉपर्टी कार्ड, डिजिटल नकाशे तयार करण्यात आलेले प्रॉपर्टी कार्ड, पूर्ण झालेले सर्वेक्षण चौकशी प्रक्रिया इ. ची सर्व माहिती प्रत्येक राज्यानुसार तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.
- या योजनेच्या अंतर्गत ग्रामीण भागातील जमिनीच्या जागेची मोजणी करून नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देणे.
Pradhanmantri Swamitva Yojana 2025 : उद्दिष्ट
- स्वामित्व योजनेच्या माध्यमातून सरकारला ग्रामीण विकासाला चालना द्यायची आहे.
- जमिनीचे मॅपिंग करणे, जागेची योग्य प्रकारे मोजणी करणे आणि जागेच्या योग्य मालकांना त्याच्या जागेचा हक्क मिळवून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
- ग्रामीण वस्ती असलेला जमिनीचे सर्वेक्षण करणे आणि हक्काच्या जमीन मालकांना मालमत्ता कार्ड देणे यासाठी त्यांना आर्थिक आणि कायदेशीर मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- जमिनीच्या मालकी हक्कावरून होणारे वाद थांबवणे हा पण या योजनेचा उद्देश आहे.
- मूळ जमीन मालकाला आर्थिक व्यवहार करण्यासाठी त्यांना ई प्रॉपर्टी कार्डचा वापर करता यावा हा या योजनेचा उद्देश आहे.
- या योजनेच्या माध्यमातून मूळ मालकाला प्रॉपर्टी कार्ड मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
Pradhanmantri Swamitva Yojana 2025 : फायदे
- प्रधानमंत्री स्वामित्व योजनेच्या द्वारे जागेची योग्य मोजणी झाल्यामुळे गावातील विकास कामांना गती मिळत असते.
- या योजनेच्या द्वारे आधुनिक पद्धतीने जमिनीची मोजणी होणार असल्यामुळे डिजिटल इंडियाला या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येत आहेत.
- स्वामित्व योजनेच्या अंतर्गत मूळ मालकाला जागेचे ही प्रॉपर्टी कार्ड देण्यात येते व प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून नागरिक कर्ज घेणे व अन्य आर्थिक कामे करू शकतो.
- योजनेमुळे जमीन संपत्ती वरून असणारे आपापसातील वाद मिटण्यास मदत होणार आहे.
- जमीन आणि संपत्तीवर मालकी हक्क मिळाल्यामुळे तरुणांना व्यवसाय व सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होते आणि त्यांना विविध योजनांचा लाभ घेता येतो.
- डिजिटल इंडिया या योजनेचा भाग म्हणून स्वामीत्व योजना ग्रामीण भागात काम करत आहे.
- स्वामित्व योजना सुरू करण्यात आल्यामुळे ग्रामपंचायत मध्ये जमिनीवर होणारा बेकायदेशीर ताबा गैरव्यवहार आणि भूमाफियावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळत आहे.
- मालकी हक्क असणाऱ्या जमीन मालकांच्या नावावर त्यांच्या हक्काची जमीन करून देणे हा योजनेचा उद्देश आहे.
- स्वामित्व योजना आत्मनिर्भर भारतच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.
- या योजनेच्या अंतर्गत जमिनीची ड्रोन च्या माध्यमातून मोजणी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे ऑनलाईन देखरेख करणे सोपे झाले आहे.
- ग्रामीण भागात आजही लोकांच्या नावाने जमीन मालमत्ता आहे. मात्र त्याची कागदपत्रे नाही अशा लोकांना या योजने अंतर्गत ही प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच संपत्ती प्रमाणपत्र देण्यात येत आहे.
- स्वामित्व योजनेच्या अंतर्गत मिळालेल्या प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून नागरिकांना कर्ज घेणे अगदी सोपे झाले आहे.
Pradhanmantri Swamitva Yojana 2025 : स्वरूप
- स्वामित्व योजना देशातील गावांचे या योजने अंतर्गत ड्रोनच्या मदतीने सर्वेक्षण होणार आहे. या द्वारे घराचा नकाशा आणि मालमत्ता कार्ड देण्यात येणार आहे.
- स्वामित्व योजना पंचायत राज मंत्रालय, पंचायत राज विभाग, राजस्व विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभागांतर्गत राबविण्यात येणारी योजना आहे.
- स्वामित्व योजनेच्या अंतर्गत ड्रोन चा वापर करून जागेचे मोजमाप करण्यात येणार आहे. व सीमारेषा निश्चित करण्यात येणार आहे. गावाच्या सीमेच्या आत येणाऱ्या प्रत्येक संपत्तीचे डिजिटल मॅप तयार करण्यात येणार. तसेच रेवेन्यू एरियाची सीमारेषा निश्चित करण्यात येणार आहे.
- केंद्र सरकार ही योजना पहिले प्रोजेक्ट म्हणून केवळ ६ राज्यात राबवली जात आहे. यामध्ये हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. या राज्यातील जवळपास १ लाख खेड्यामध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून प्रथम वनक्षेत्र व कृषी जमिनीपासून वस्ती असणारा भाग वेगळा करण्यात येईल. वस्ती असलेले क्षेत्राचा नकाशा चिन्हीत केला जाईल. सीमे रेषेच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या संपत्तीचे त्यांच्या मालकांना ओळखी नुसार निश्चित करण्यात येणार.
Pradhanmantri Swamitva Yojana 2025 : अंमलबजावणी
- स्वामित्व योजनेच्या अंतर्गत ग्रामीण वस्तीत असणाऱ्या जमिनीचे सर्वेक्षण करून त्यांच्या सीमा निश्चित करण्यात येतात.
- सर्वेक्षण पूर्ण झाल्या नंतर हक्काच्या जमीन मालकांना ई प्रॉपर्टी कार्ड देण्यात येते व या कार्डावर मालकाचे नाव, मालमत्तेचे ठिकाण, क्षेत्रफळ तसेच इतर संबधित माहिती असते.
- या योजनेच्या अंतर्गत केलेल्या संरक्षणा च्या दरम्यान जमा केलेला डेटा भूमी अभिलेख प्रणाली मध्ये एकत्रित करण्यात येतो. त्यामुळे एक व्यापक आणि अद्यावत जमीन डेटाबेस तयार होत आहे.
- मालकांना त्यांचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार यासाठी प्रयत्न करण्यात येतात. आणि ही योजना पारदर्शक पद्ध्तीने राबवण्यात येते.
- स्वामित्व योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया बारकाईने निरीक्षण करण्यात येते.या योजनेच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी व क्षेत्र निश्चित करण्यासाठी मूल्यमापन करण्यात येते.
Pradhanmantri Swamitva Yojana 2025 : आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- मतदान ओळखपत्र
- वीज बिल
- घर पट्टी पावत्ती
- पॅन कार्ड
Pradhanmantri Swamitva Yojana 2025 : ई प्रॉपर्टी कार्ड न मिळण्याची कारणे
- सरकारच्या वतीने ज्या जागेचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्या जागेवर अन्य कोणी हक्कासाठी तक्रार केल्यास.
- लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी नसल्यास
- संबधित जागेवर सह हिस्सेदार असल्यास.
- लाभार्थी व्यक्ती संबधित जागेवर मालकी हक्क नसल्यास.
Pradhanmantri Swamitva Yojana 2025 : अंतर्गत करण्यात येणारे सर्वेपरीक्षण
प्रधानमंत्री स्वामित्व योजनेच्या अंतर्गत जीपीएस ड्रोनच्या माध्यमातून सर्वे करण्यात येतो. सर्वेक्षणच्या माध्यमातून प्रत्येक घराची जिओ टॅगिंग करण्यात येते. त्या घरांचे क्षेत्रफळ निश्चित केले जाते. प्रत्येक घराला एक युनिक आयडी देण्यात येतो. अशा डिजिटल पद्धतीने लाभार्थ्याच्या घराचा / जागेचा पत्ता डिजिटल नोंदवला जातो. ड्रोन च्या माध्यमातून सर्वे करण्यात येतो. त्यावेळी ग्रामसेवक, राजस्व विभाग अधिकारी, जमिनीचा मालक, पोलीस अधिकारी, त्या घराचा शेजारी आदींची उपस्थिती असणे आवश्यक आहे. जमिनीचा मालक, घराचा मालक स्वतःच्या हक्काच्या जमिनी भोवती चुन्याचा एक घेरा बनवतो त्याचा फोटो ड्रोन द्वारे घेतला जातो आणि ड्रोनच्या माध्यमातून जमा झालेल्या माहितीच्या आधारावर एक डिजिटल नकाशा जमिनीचा तयार केला जातो व तो मालकाला देण्यात येतो.
Pradhanmantri Swamitva Yojana 2025 : ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
- सर्वात आधी अर्जदाराला जवळच्या ग्राम पंचायत कार्यालया मध्ये जाऊन स्वामित्व योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- त्यानंतर अर्जामध्ये विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती अचूक पद्ध्तीने भरून संबधित कागद पत्राच्या झेरोक्स प्रति या अर्जा सोबत जोडाव्या लागतील.
- अर्ज भरून झाल्या नंतर ग्राम पंचायत कार्यालयात जमा करावा.
- अर्ज जमा केल्या नंतर काही दिवसांनी तुमच्या मोबाईल वर एक SMS येणार त्याला क्लिक करून तुम्हाला तुमचे संपत्ती कार्ड म्हणजेच ई प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करता येणार आणि राज्य सरकार कडून देखील ही प्रॉपर्टी कार्ड तुम्हाला वितरीत करण्यात येतील.
Pradhanmantri Swamitva Yojana 2025 : सतत विचारले जाणारे प्रश्न
१. स्वामित्व योजना म्हणजे काय ?
केंद्र सरकारने देशातील ६ राज्यासाठी पायलेट प्रोजेक्टवर ही योजना सुरु केली आहे. या योजनेच्या अंतर्गत जमिनीची मोजणी करून नागरिकांना ई प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मालमत्ता प्रमाणपत्र देण्यात येते.
२. SWAMITVA योजनेचा संक्षिप्त रूप काय आहे ?
SWAMITVA योजना म्हणजे Server of village and mapping with improvised technology in village area असे होय.
३. स्वामित्व योजनेचा अर्ज कसा करावा ?
स्वामित्व योजनेचा अर्ज हा ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्ध्तीने करता येतो.
- Pradhanmantri Swamitva Yojana 2025|ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार आपल्या संपत्तीचा हक्क योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत website ला भेट द्या.
- Pradhanmantri Suryoday Yojana 2025|एक कोटी नागरिकांना मिळणार सोलार पॅनेल या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा.
- Maharashtra Shasan Aaplya Dari Yojana 2025| शासन आपल्या दारी योजना या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा.