One Nation One Ration Card Yojana 2025
One Nation One Ration Card Yojana 2025 |वन नेशन वन रेशन कार्ड योजना २०२५ : एकाच कार्डावर घेता येणार देशात कुठेही रेशन केंद्र सरकार नवनवीन योजना राबवत आहेत. वन नेशन वन रेशन कार्ड योजना ही केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात आलेली आहे. आता सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये फक्त एकच रेशन कार्ड असणार आहे. या योजने अंतर्गत आपल्या संपूर्ण देशात दर महिन्याला सुमारे १२५ कोटी पोर्टेबिलिटी व्यवहार होत आहे. देशा मधील ३६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेले ८० कोटी लाभार्थी वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेचा लाभ घेत आहेत.
वन नेशन वन रेशन कार्ड चा मुख्य उद्देश हा या योजने अंतर्गत देशातील कुठल्याही राज्यातील पीडीएफ रेशन दुकानातून कोणत्याही ठिकाणांचा नागरिक त्यांचे रेशन कार्ड चा वापर करून रेशन घेऊ शकतील. ही योजना सुरु होण्यापूर्वी नागरिकांना रेशन घेण्यासाठी त्यांच्याच भागात घ्यावे लागत होते. त्यामुळे जे नागरिक बाहेरगावी राहतात त्यांना हे रेशन घेण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. त्या नागरिकांना दर महिन्याला त्यांच्या भागात जाऊन रेशन घेता येत नव्हते. या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना सुरु केली आहे.

आता देशातील नागरिक हा कोणत्याही राज्याच्या पीडीएफ रेशन दुकानातून त्यांचे रेशन घेऊ शकतील.या योजने मुळे स्थांतरित कामगार हे त्यांच्या परिवारांना देशातील कुठल्याही रेशन दुकानातून रेशन घेऊन देतील.वन नेशन वन रेशन कार्ड योजनेची सुरुवात सर्वप्रथम २०१९ मध्ये ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ४ राज्यांमध्ये एक चाचणी कार्यक्रम म्हणून सुरु करण्यात आली होती.त्यानंतर १ जानेवारी २०२० रोजी नवीन १२ राज्यांना या योजने मध्ये प्रवेश देण्यात आला होता.
One Nation One Ration Card Yojana 2025 : हायलाईट
योजनेचे नाव | वन नेशन वन रेशन कार्ड |
द्वारा सुरु | केंद्र सरकार |
केव्हा सुरु केली | १ जानेवारी २०२० |
उद्देश | देशातील कोणत्याही रेशन दुकानातून नागरिकांना रेशन घेता येणे |
लाभार्थी | देशातील नागरिक |
अर्ज प्रक्रिया | अर्ज करण्याची आवश्यकता नाही |
One Nation One Ration Card Yojana 2025 : वैशिष्ट्ये
- वन नेशन वन रेशन कार्ड योजना केंद्र सरकारने स्थलांतरित नागरिकांना रेशन मिळण्यासाठी सुरु करण्यात आलेली योजना आहे.
- या योजने मुळे देशातील कोणताही नागरिक कुठल्याही रेशन दुकानातून रेशन घेऊ शकतात.
- या योजनेसाठी सरकारने एक App सुरु केले आहे ते App म्हणजे मेरा रेशन हे App वापरून तुम्हाला किती रेशन मिळेल हे या App द्वारे चेक करू शकता.
- या योजने अंतर्गत तांदूळ आणि गहू या सारखे अन्न धान्य कमी दरात उपलब्ध करून देण्यात येतात.
- जे नागरिक हे ६५ वर्षांच्या वरील आहेत किंवा जे नागरिक अपंग आहेत त्यांना या योजने अंतर्गत रेशनची घरपोच सेवा मिळते.
- संपूर्ण देशभरात ५.२५ लाख रेशन दुकान हे वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत सामाविष्ट आहेत.
- या योजने अंतर्गत रेशन देण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा वापरली जाते.
One Nation One Ration Card Yojana 2025 : उद्दिष्ट
- देशा मध्ये होत असलेला भ्रष्टाचार थांबवणे व बोगस शिधापत्रिकांना आळा घालणे हे या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- या योजनेमुळे स्थलांतरित झालेल्या व्यक्तीला त्यांचे रेशन घेण्यासाठी कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागत नाही.
- या योजने मुळे स्थलांतरित नागरिकांना खूप फायदा होणार आहे. या योजने अंतर्गत त्यांना अन्न सुरक्षा मिळणार.
- या योजनेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना व्हावा यासाठी केंद्र सरकारने ही योजना संपूर्ण राज्यामध्ये लवकरात लवकर सुरु केली आहे.
One Nation One Ration Card Yojana 2025 : फायदे
- वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा लाभ हा देशातील प्रत्येक नागरिकाला जून २०२० पासून घेता येत आहे.
- या योजने मुळे प्रत्येक नागरिक हा त्याचे रेशन कार्ड वापरून कोणत्याही रेशन दुकानातून अगदी सहजपणे रेशन घेऊ शकतात.
- या योजनेचा जास्तीत जास्त फायदा हा जे नागरिक परदेशात राहतात त्यांना होत आहे.
One Nation One Ration Card Yojana 2025 : निवड प्रक्रिया
रेशन कार्डचे २ प्रकार आहेत हे आपणा सर्वाना माहिती आहे. एक APL रेशन कार्ड आणि दुसरे BPL रेशन कार्ड हे रेशन कार्ड नागरिकांना त्यांच्या उत्पन्नानुसार देण्यात येतात. वन नेशन वन रेशन कार्ड या योजने अंतर्गत कशी निवड केली जाते ते आपण पाहूया.
APL रेशन कार्ड : आर्थिक द्रुष्ट्या सक्षम असलेल्या नागरिकांना म्हणजेच ज्यांची फेडरल दारिद्रय पातळी पेक्षा जास्त कमाई आहे अशा नागरिकांना APL रेशन कार्ड देण्यात येते.
BPL रेशन कार्ड : दारिद्रय रेषेखालील म्हणजेच ज्यांचे उत्पन्न गरीब पातळीपेक्षा कमी आहे अशा नागरिकांना BPL रेशन कार्ड देण्यात येते.
One Nation One Ration Card Yojana 2025 : कार्डचे स्वरूप
- वन नेशन वन रेशन कार्ड हे हिंदी व इंग्रजी या दोघ भाषेत उपलब्ध आहेत.तसेच मराठी भाषेत देखील रेशन कार्ड घेता येईल
- नवीन शिधापत्रिका ही आवश्यक असलेली माहिती प्रदान करणार.
- वन नेशन वन रेशन कार्ड च्या ऑनलाईन फॉर्म मध्ये १० अंकी रेशन कार्ड नंबर नोंदविला जाणार यापैकी पहिले २ अंक म्हणजे राज्याचा कोड दिसतो आणि पुढील २ अंकांमध्ये रेशन कार्डचा नंबर दिसतो.
- या ४ अंकां व्यतिरिक्त प्रत्येक परिवारातील सदस्याला एक अद्वितीय ओळखपत्र देण्यासाठी यामध्ये आणखीन २ अंक जोडले जातील.
One Nation One Ration Card Yojana 2025 : या राज्यांचा समावेश
देशभरातील नागरिकांना देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात राहत असताना आपल्या शिधापत्रिका च्या द्वारे कुठल्याही राज्यात रेशन खरेदी करता यावे यासाठी केंद्र सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना सुरु केली आहे.केंद्र सरकारने आधार आणि रेशन कार्ड लिंक ची प्रक्रिया सुरु केली आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत अनेक राज्यांचा सामावेश करण्यात आला आहे.त्यांची यादी अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे. आधार कार्डचा वापर करून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची तपासणी करण्यात येत आहे.कार्यक्रमाच्या सर्वसमावेशक तपशिला साठी कोणीही आता एकात्मिक सार्वजनिक वितरण प्रणाली ऑनलाईन भेट देऊ शकतात. आणि सर्व राज्यांची यादी पाहू शकतात.
बिहार, चंडीगड, आंध्र प्रदेश,अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात,हरियाणा, हिमाचल प्रदेश, दमन आणि देऊ, जम्मू काश्मीर, केरळ, झारखंड, कर्नाटका, लक्षदीप, लेह,लडाख, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, उत्तराखंड, मिझोरम, उत्तर प्रदेश, त्रिपुरा, तामिळनाडू, सिक्कीम, राजस्थान,पुडुचेरी, पंजाब.
One Nation One Ration Card Yojana 2025 : अर्ज प्रक्रिया
केंद्र सरकारच्या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा देशातील शिधापत्रिका धारकांना या योजने अंतर्गत कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची आवश्यकता नाही. केंद्र सरकारकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारी नुसार सर्व राज्य आणि केंद्र सरकार स्वत: लाभार्थीच्या शिधाप्रत्रिका च्या आधार कार्ड फोन वर तपासणी करत असतात आणि लिंक करून घेतात. त्यानंतर एकात्मिक व्यवस्थापन सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत डेटा उपलब्ध करून देणार. ज्या द्वारे सर्व पात्र नागरिकांना देशाच्या कुठल्याही भागात स्वत:च्या शिधापत्रिकेच्या आधारे रेशन दुकानातून रेशन घेता येणार.
एक देश एक रेशन कार्ड यासाठी मोबाईल App :- केंद्र सरकारने आता एक देश एक शिधापत्रिका योजनेच्या अंतर्गत एक मेरा रेशन मोबाईल App सुरु करण्यात आहे आहे.या द्वारे इतर राज्या मध्ये नोकरी, रोजगारासाठी गेलेल्या नागरिकांना App चा वापर करून त्या राज्यात स्वत:च्या शिधापत्रिका च्या आधारावर रेशन घेता येणार.
One Nation One Ration Card Yojana 2025 : मोबाईल ॲप ची वैशिष्ट्ये
- या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भागातील रेशन दुकान शोधू शकतात.
- याद्वारे लाभार्थ्याला त्याच्या अन्नधान्याच्या हक्काची माहिती मिळवता येते.
- यापूर्वी तुम्ही खरेदी केलेल्या रेशनची माहिती ही मेरा रेशन मोबाईल ॲप द्वारे मिळवता येते.
- तसेच आधार शेडिंगची संबंधित माहितीही यावर उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त तुम्ही मेरा रेशन स्मार्टफोन ॲप वापरून शिफारशी आणि अभिप्राय देऊ शकता.
- ह्या ॲप मध्ये अर्जदाराला हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये अर्ज करण्याची पर्याय उपलब्ध आहे.
One Nation One Ration Card Yojana 2025 : सतत विचारले जाणारे
१) वन नेशन वन रेशन कार्ड साठी कोण पात्र आहे ?
-देशातील प्रत्येक शिधाधारक हा या योजनेसाठी पात्र आहे.
२) दुसऱ्या राज्यात स्थलांतरित केल्यास लाभ मिळतो का ?
-या योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या प्रत्येक शिधापत्रिकाधारक व्यक्तीला देशातील कुठल्याही रेशन दुकानात जाऊन आपले रेशन खरेदी करता येणार.
३) वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत रेशन कसे मिळेल ?
-देशातील कुठल्याही दुकानात जाऊन तुम्ही तुमचे रेशन कार्ड दाखवून या योजनेअंतर्गत रेशन मिळू शकतात.
४) वन नेशन वन रेशन कार्ड चा फायदा काय ?
-या योजनेचा फायदा म्हणजे कामानिमित्त एका राज्यातून दुसऱ्या राज्यात अनेक लोक स्थलांतरित होत असतात, मात्र त्या राज्यात गेल्यानंतर त्यांना रेशनचा लाभ घेता येत नाही अशा नागरिकांना देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात नोकरी निमित्त राहण्यासाठी गेलेल्यांना तिथल्या संबंधित रेशन दुकानातून रेशन खरेदी करता येणार.
५) वन नेशन वन रेशन कार्ड वापरण्यासाठी काही शुल्क आहे का ?
-या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाहीत ही योजना एकदम मोफत आहे.
- One Nation One Ration Card Yojana 2025 |वन नेशन वन रेशन कार्ड योजना २०२५ या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा.
- Good News For EPFO Members 2025 |PF काढण्यासाठी सदस्यांना मिळणार ATM कार्ड या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या website ला भेट द्या.
- Mukhyamantri Yojana Doot Bharti 2025 | मुख्यमंत्री योजना दूत भरती २०२५ या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा.
- Ayushman Bharat Card Yojana 2025 |५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा.