Maharashtra Sheli Mendhi Palan Yojana 2025
Maharashtra Sheli Mendhi Palan Yojana 2025 |महाराष्ट्र शेळी मेंढी पालन योजना २०२५ : महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये बहुतांश नागरिक पारंपरिक पद्धतीने पशुपालन शेतीला एक जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करत असतात. पशुपालनामध्ये हे नागरिक शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी यासारखे पशु सांभाळून त्यांच्या निघत असलेल्या दुधावर त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी मध्यमवर्गीय असल्यामुळे अनेकांकडे गाय, म्हैस खरेदीसाठी आवश्यक पैसा नसतो. त्यामुळे ते एक दोन शेळी पाळतात शेळीच्या माध्यमातून ते त्यांच्या दुधाच्या गरजा पूर्ण करतात, तसेच त्यांना शेतीपालन व्यवसायातून लाभ होत असतो.
महाराष्ट्र राज्यामध्ये शेळी आणि मेंढीपालनामध्ये प्रामुख्याने धनगर समाज अग्रेसर आहे, त्यांच्या तुलनेत इतर समाजातील नागरिक हे तेवढ्या प्रमाणात शेळ्या मेंढ्याची पालन करत नाहीत.काही शेतकरी मोजक्याच शेळ्या पाळत असतात, तर काही शेतकरी शेळीपालनाचा व्यवसाय करतात. सध्याच्या आधुनिक काळामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन हा प्रमुख व्यवसाय बनला आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने शेळी व मेंढी पालनासाठी आर्थिक अनुदान देणाऱ्या योजना सुरू केलेल्या आहेत.

योजनेच्या अंतर्गत शेतकरी व व्यावसायिक आपला शेळी पालनाचा व्यवसाय वाढू शकतात. तसेच त्यांना यामध्ये भरपूर प्रमाणात अनुदान मिळत असल्या मुळे कमी भांडवलात अधिक पशु खरेदी करता येतात. शेळी पालन योजने अंतर्गत जे शेतकरी किंवा इतर नागरिक शेली पालनाचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना सरकार द्वारे ७५ % अनुदान देण्यात येते.महाराष्ट्र सरकारच्या शेळी पालन योजने अंतर्गत नागरिकांना ७५ % अनुदान रक्कम देण्यात येते आणि उर्वरित २५ % रक्कम शेतकऱ्याने भरून शेळ्या विकत घेता येतात. या योजनेचा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो.
Maharashtra Sheli Mendhi Palan Yojana 2025 : संपूर्ण माहिती
राज्या मध्ये होत असलेल्या पशु पालनाच्या व्यवसायाला बळकटी देऊन व्यवसाय करत असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांना स्वयंरोजगारीत करणे हा सरकारचा या मागील उद्देश आहे तसेच जे नागरिक नवीन आहेत किंवा तरुण वर्ग या व्यवसायामध्ये उतरण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्या साठी ही एक सुर्वण संधी आहे.ते या योजेच्या अंतर्गत आपला स्वताचा शेळीपालन व्यवसाय सुरु करून भरघोस आर्थिक उत्पन्न मिळू शकता. महाराष्ट्र सरकार राज्यातील नागरिकांना पासु पालनासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहेत. या योजनेच्या अंतर्गत राज्यात रोजगाराच्या नव नवीन संधी उपलब्ध हो आहेत. यासाठी सरकार प्रयत्न शील असते.
अशा योजना साठी सरकार कडून मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येते. जेणेकरून अनेक तरून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.राज्यातील नागरिकांना शेली,मेंढी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी शेली व मेंढ्यांची खरेदी करण्यासाठी कमी व्याजदरामध्ये १० ते ५० लाखा पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. राज्यातील जे तरुण नागरिक स्वत: चा शेली पालनाचा व्यवसाय सुरु अक्र्ण्यासाठी इच्छुक आहेत अशा सर्व नागरिकांना साकार कमी व्याजदरा वर कर्ज उपलब्ध करून देत आहेत. जेणेकरून या माध्यमातून तरुणांना स्वत: चा रोजगार उपलब्ध करता येणार.
राज्यातील आजही बऱ्याच नागरिकांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे.शेती बरोबरच जोड व्यवसाय म्हणून ते गाय, म्हैस. शेली पालन करतात पण शेळी व मेंढी खरेदी करण्यासाठी त्यांच्या कडे पैसा उपलब्ध नसतो त्यामुळे ते शेळीपालना कडे वळत नाही किंवा त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरु करता येत नाही त्यामुळे राज्यातील शेतकरी व पशु पालकांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र सरकारने शेळी, मेंढी पालन योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.या योजनेच्या अंतर्गत व्यवसाय इच्छुक तरुणांना सरकारच्या वतीने ५० लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.या अंतर्गत तुम्ही स्वत:चा शेळी पालनाचा व्यवसाय सुरु करू शकतात.
Maharashtra Sheli Mendhi Palan Yojana 2025 : हायलाईट
योजनेचे नाव | महाराष्ट्र शेळी मेंढी पालन योजना |
केव्हा सुरु झाली | २५ मे २०१९ |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी,पशुपालक व अन्य नागरिक |
लाभ | १० ते ५० लाख रुपयांचे कर्ज |
उद्देश | पशु पालनासाठी प्रोत्साहन देणे |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन आणि ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | शेळी पालन योजना |
Maharashtra Sheli Mendhi Palan Yojana 2025 : उद्दिष्ट
- राज्यातील पशुपालकांचे जीवनमान सुधारणे.
- राज्या मध्ये पशु पालनासाठी प्रोत्साहन देऊन बेरोजगार तरुणांना रोजगार निर्माण करून देणे.
- शेळी पालन या पारंपरिकतेला चालना देणे.
- पशुपालकांचा सामाजिक आर्थिक विकास करून त्यांना सक्षम बनवणे.
- पंचायत समिती शेळीपालन योजना माध्यामातूनही तुम्ही शेळी पालन योजना सुरू करू शकतात.
- या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारणे.
- राज्यात दूध आणि मास यांच्या उत्पादनात वाढ करणे.
- बेरोजगार तरुणांना स्वत:च्या पायावर उभे करणे आणि त्यांचा आर्थिक विकास करणे.
- पशुपालकांना शेळ्या व मेंढ्यांच्या खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी या योजने द्वारे मदत करणे.
Maharashtra Sheli Mendhi Palan Yojana 2025 : फायदा
- योजनेच्या अंतर्गत शेतकरी, पशुपालक नागरिक यांना शेळी,मेंढी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी कमी व्याज दरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
- शेतीला जोड धंदा म्हणून जरी शेळी पालन केले तरी शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे.
- राज्यातील बेरोजगारी कमी करण्यास या योजनेचा खूप फायदा होत आहे.
- या व्यवसायामुळे शेळीचे दुध व मेंढीचे लोकर उत्पादनात भरघोस वाढ होण्यास मदत होते.
- बेरोजगार तरुणांना यामधून स्वत:चा नवीन व्यवसाय सुरु करता येणार आणि इतर नागरिकांना रोजगाराच्या संधी यामधून उपलब्ध होणार.
- राज्याच्या औद्योगिक विकासात शेळी पालन योजना खूप महत्वाची ठरत आहे.
- राज्यातील पशु पालकांचा सामाजिक आर्थिक विकास करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा सरकारचा उद्देश आहे.
Maharashtra Sheli Mendhi Palan Yojana 2025 : वैशिष्ट्ये
- महाराष्ट्र सरकारच्या पशु संवर्धन बिभागाद्वारे शेळीपालन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- या योजनेच्या अंतर्गत देण्यात येणारे अनुदान लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्या मध्ये DBT च्या द्वारे जमा होणार.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना कुठल्याही समस्येचा सामना करावा लागू नाही म्हणून शेळीपालन योजने साठी ऑनलाईन अर्ज करता येतो. त्यामुळे अर्जदार आपल्या घरी बसून मोबाईल च्या सहाय्याने या योजनेसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे अर्जदारला अर्ज करण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारायच्या गरज भासणार नाही.
- अर्जदाराने अर्ज केल्या पासून लाभ मिळेपर्यंत अर्जाची सर्व माहिती वेळोवेळी त्याला प्राप्त होणार. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा दोघांची बचत होणार.
Maharashtra Sheli Mendhi Palan Yojana 2025 : अटी व शर्ती
- फक्त महाराष्ट्र राज्या मधील नागरिकांना शेळी पालन योजनेचा लाभ घेता येणार.
- या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने याआधी केंद्र व राज्य सरकारच्या कोणत्याही शेळीपालन योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- या योजने साठी १८ वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे.
- या योजनेचा लाभ फक्त परिवारातील एकाच व्यक्तीला भेटू शकतो.
- राज्य बाहेरील नागरिकांनी शेळी पालन योजनेसाठी अर्ज केल्यास तो रद्द करण्यात येणार.
- शेळ्या. मेंढ्या साठी लागणारा चारा उगवण्यासाठी अर्जदाराकडे स्वत:ची जमीन असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराला शेळी व मेंढी पालनाचा अनुभव असेल तर प्राधान्य देण्यात येते.
- ज्या व्यक्तीला शेळी व मेंढी पालन योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याच्याकडे स्वत:च्या मालकीची किमान ९००० वर्ग मीटर जमीन असणे गरजेचे आहे. ज्यामध्ये १०० शेळ्या व पाच मेंढ्या राहू शकतील.
- अर्जदार अनुसूचित जाती, जमातीचा असेल तर त्यांना अर्जासोबत जातीचा दाखला जोडणे बंधनकारक आहे.
- पशु पालका कडे शेळ्या व मेंढ्यांचे देखभाल व त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी सुविधा असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराला अर्जासोबत राशन कार्ड वरती जेवढे सदस्य असतील त्या सर्व सदस्यांची नवे व त्यांचा आधार नंबर संपूर्ण माहिती द्यावी लागणार.
- अर्जदाराचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असेन आवश्यक आहे.
Maharashtra Sheli Mendhi Palan Yojana 2025 : आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- जातीचे प्रमाणपत्र
- राशन कार्ड
- जमिनीचा सातबारा व ८ अ
- ईमेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- पशु पालन प्रशिक्षण प्रमाणपत्र
- हमीपत्र
- बँक खाते पासबुक
- अर्जदार दिवंगत असेल तर त्या संदर्भाचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- मोबाईल नंबर
Maharashtra Sheli Mendhi Palan Yojana 2025 : ऑफलाईन अर्ज प्रक्रिया
- महाराष्ट्र सरकारच्या शेळी व मेंढी पालन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वात आधी आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात पशुसंवर्धन विभागात जावे लागेल.
- पशुसंवर्धन विभागात गेल्यानंतर कृषी विभागातून शेळी पालन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरून त्यामध्ये आवश्यक लागणारी सर्व कागदपत्रे जोडावी लागणार.
- त्यानंतर पशुसंवर्धन विभागात अर्ज जमा करावा लागेल.
- या पद्ध्तीने तुमची शेळी पालन योजनेच्या माध्यमातून ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार.
Maharashtra Sheli Mendhi Palan Yojana 2025 : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- महाराष्ट्र सरकारच्या शेळी पालन योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला सरकारच्या अधिकृत website ला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुमच्या समोर होम पेज ओपन होणार त्यावर शेळी मेंढी पालन योजना अर्ज या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या समोर या योजनेचा संपूर्ण अर्ज ओपन होणार .
- या अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्ध्तीने भरावी लागेल.
- तसेच या अर्जासोबत मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज एकदा संपूर्ण चेक करून घ्या.
- अर्ज बरोबर असेल तर तुम्ही तुमच्यासमोर असलेल्या सबमिट बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करू शकता.
Maharashtra Sheli Mendhi Palan Yojana 2025 : सतत विचारले जाणारे प्रश्न
१) शेळी व मेंढी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार किती अनुदान देते ?
-शेळी व मेंढी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार अनुसूचित जाती व जमातीसाठी ७५ % तर खुल्या प्रवर्गासाठी ५० % अनुदान देते.
२) शेळी पालन योजना कोणामार्फत राबविली जाते ?
-महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागा अंतर्गत शेळी पालन योजना राबवली जाते.
३) शेळी पालन योजना सुरु करण्याचा उद्देश काय आहे ?
-राज्यातील शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय सुरु करता येतो.
- Maharashtra Sheli Mendhi Palan Yojana 2025 |महाराष्ट्र शेळी मेंढी पालन योजना २०२५ या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत website ला भेट द्या.
- Mukhyamantri Yojana Doot Bharti 2025 | मुख्यमंत्री योजना दूत भरती २०२५ या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या website ला भेट द्या.
- Maharashtra Berojgari Bhatta Yojana| महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना २०२५ या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा.