Mukhyamantri Yojana Doot Bharti 2025
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2025 | मुख्यमंत्री योजना दूत भरती २०२५ : या योजने अंतर्गत प्रत्येक गावामध्ये मिळणार नोकरी. महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्या द्वारे शेतकरी व राज्यातील नागरिकांकरिता अनेक प्रकारच्या योजना राबवत आहेत. जेणेकरून देशातील नागरिकांना या योजनेच्या अंतर्गत त्यांचे जीवन मान सुधारण्यासाठी व त्यांच्या दैनदिन जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी मदत होत असते. देशातील अशे बरेच ठिकाण आहेत जसे कि ग्रामीण भाग ज्या ठिकाणी शासकीय योजनांची माहिती पोहचू शकत नाही. आणि ग्रामीण भागातील नागरिक अनेक प्रकारच्या शासनाच्या योजनाचा लाभ घेऊ शकत नाहीत.

अशा ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या योजना विषयी माहिती पण मिळत नाही. तर अशा विविध अडचणी व समस्या करिता महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक अत्यंत महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण योजना सुरु करण्याची मंजुरी मिळालेली आहे ती आहे मुख्यमंत्री योजना दूत भरती या योजने मुळे राज्यातील युवा वर्गा साठी महत्व पूर्ण योजना आहे.
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2025 : माहिती
महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, ‘शासन आपल्या दारी ” हा कार्यक्रम थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहचविण्यासाठी राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमा मुळे नागरिकांना एकाच छताखाली विविध योजने बद्दल जाणून घेण्यासाठी व योजनेचा लाभ घेण्यास सक्षम करण्यात आले आहे. योजनादूत हा या कार्यक्रमाचा विस्तार आहे, या कार्यक्रमाचा उद्देश सामाजिक बदल घडवण्यासाठी व उत्सुक असलेल्या उत्साही तरुणाच्या समर्पित प्रयत्ना द्वारे जनते पर्यंत पोहचवण्याचा आहे.
मुख्यमंत्री योजना दूत या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, प्रसिद्धी करणे व तसेच त्या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळावा या द्रुष्टीने व त्यांना सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या योजने अंतर्गत कोणत्या पद्ध्तीने लाभ देण्यात येणार या योजने साठी अर्ज कोणत्या पद्ध्तीने करावा याची पूर्ण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2025 : हायलाईट
योजनेचे नाव | मुख्यमंत्री योजना दूत भरती २०२५ |
उद्देश | शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, प्रसिद्धी करणे |
द्वारा सुरु | महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील तरुण वर्ग |
वेतन | १०,०००/- रुपये प्रतिमाह संभावित |
अधिकृत वेबसाईट | योजना दूत |
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2025 : उद्दिष्ट
- मुख्यमंत्री योजना दूत या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार करणे हा आहे.
- महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी करणे आणि त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत कसा पोहचविला जाणार या करिता मुख्यमंत्री योजना दूत थेट ग्रामस्थांना नेमले जाणार आहेत.
- योजना दूत हा महाराष्ट्र शासनाचा एक अनोखा उपक्रम आहे ज्याच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करण्याची ओढ असलेले युवक योजना दूत म्हणून काम करतील आणि शासनाच्या विविध कल्याणकारी कार्यक्रमांबाबत जनजागृतीचे काम करतील.
- या कार्यक्रमा मुळे नागरिकांना एकाच छताखाली विविध योजने बद्दल जाणून घेण्यासाठी व योजनेचा लाभ घेण्यास सक्षम करण्यात आले आहे
- योजनादूत हा या कार्यक्रमाचा विस्तार आहे, या कार्यक्रमाचा उद्देश सामाजिक बदल घडवण्यासाठी व उत्सुक असलेल्या उत्साही तरुणाच्या समर्पित प्रयत्ना द्वारे जनते पर्यंत पोहचवण्याचा आहे.
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2025 : पात्रता
- मुख्यमंत्री योजना दूत या योजने साठी उमेदवार वय वर्ष १८ ते ३५ वयोगटातील असावे.
- उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
- शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील किमान पदवीधर असले पाहिजे.
- उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- उमेदवारांकडे वैध आधार कार्ड असावे आणि त्यांच्या नावाचे बँक खाते आधारशी जोडलेले असावे.
- उमेदवाराकडे मोबाईल फोन असणे आवश्यक आहे.
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2025 : फायदे
- प्रत्यक्ष कामाचा अनुभव येतो.
- शिकण्या सोबतच कौशल्य विकास होणे.
- स्टायपेंड आर्थिक सहाय्य प्रदान करते.
- सरकारी कामाचा अनुभव
- सामाजिक बदलाचा भाग बनण्याची संधी
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2025 : आवश्यक कागदपत्रे
- मुख्यमंत्री योजना दूत या योजने करिता विहित नमुन्यातील ऑनलाईन पद्ध्तीने केलेला अर्ज
- अधिवास प्रमाणपत्र
- अर्जदाराचे आधार कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
- पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचे पुरावे दाखले किंवा प्रमाणपत्र
- ऑनलाईन अर्जासोबत असलेले हमीपत्र
- लाभार्थी अर्जदारास संगणकी ज्ञान असणे आवश्यक असेल.
- अर्जदाराकडे स्वत: चे आधार कार्ड असावे आणि त्याच्या नावाचे बँक खाते आधारशी संलग्न असावे.
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
- पात्रतेचे निवड निकष सर्वप्रथम अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदाराचे वय १८ ते ३५ या वयोगटातील असावे.
- लाभार्थी उमेदवाराकडे त्याचा चालू मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2025 : रिक्त पदे
महाराष्ट्र शासना मार्फत मुख्यमंत्री योजना दूत या अंतर्गत एकूण ५०००० योजना दूत निवडण्याकरिता सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबतची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या वर सोपविण्यात आली आहे. शासन निर्णयात स्पष्ट केल्या प्रमाणे योजना दुतांचे मानधन कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे.
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2025 : निवड झालेल्या योजना दूतने करावयाची कामे
- पात्रता निकषाच्या आधारे निवड झालेल्या उमेदवारांना खाली दिल्या प्रमाणे कामे करणे बंधनकारक असेल.
- सर्व प्रथम योजना दूत हे संबधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कामध्ये राहून जिल्ह्यातील विविध योजनांची माहिती मिळवतील.
- विविध योजनांची माहिती मिळविल्यानंतर समक्ष प्रशिक्षित अशा योजना दूतांनी नवडून देलेल्या ठिकाणी जाऊन त्यांना ठरवून दिलेली काम पूर्ण करणे त्यांच्या वर बंधन कारक असणार.
- महाराष्ट्र शासनाचा विविध योजनांची माहिती ही ग्रामपातळी वरील घरोघरी होईल यासाठी सतत प्रयत्न करतील.
- त्याच प्रमाणे योजना दूत हे राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्रामपातळी वरील यंत्रणाशी समन्वय साधून त्यांना काम पूर्ण करावे लागतील.
- योजनादूत यांच्या मार्फत दररोज पार पडलेला कामांचा तपशील त्यांना दिलेल्या विहित नमुन्यात भरून विहित नमुना अहवाल तयार करून तो त्यांना ऑनलाईन पद्ध्तीने अपलोड करणे गरजेचे आहे.
- योजना दूत हे त्यांचे काम पूर्ण करत असताना त्यांना या दरम्यान गैरवर्तन करता येणार नाही तसेच त्यांना सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्या स्वत: चा स्वार्थासाठी किंवा नियमा बाह्य कामासाठी त्यांना उपयोग करता येऊ शकणार नाही.
- योजना दूत कडून असे गैरवर्तन आढळून आल्यास त्यांच्या सोबत करण्यात आलेला करा हा संपुष्टात आणण्यात येणार आणि त्यांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात येणार.
- योजना दूत हा अनधिकृत रित्या गैरहजर राहिला किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला देण्यात येणारे मानधन हे अनुदेय राहणार नाही.
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2025 : नोंदणी प्रक्रिया
जिल्हा माहिती कार्यालय नोंदणी :-
- योजना दूत पोर्टलवर ‘DIO नोंदणी ‘ वर क्लिक करा.
- अधिकृत व्यक्तीची माहिती प्रविष्ट करा.
- अनिर्वाय माहिती प्रविष्ट करा आणि अर्ज सबमिट करा.
- सत्यापित करण्यासाठी तुमच्या ईमेल पत्यावर OTP मिळवा.
- तुम्ही आपोआप लॉग इन होणार. प्रत्येक वेळी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तोच ई मेल आयडी वापरावा लागेल.
- एकदा तुमचे प्रोफाईल मंजूर झाले कि तुम्ही ओपन पोझिशन्स जोडू शकता.
युवक नोंदणी :-
- योजना दूत पोर्टलवर ‘उमेदवार नोंदणी ‘ वार क्लिक करा.
- पात्रतेशी संबधित आवश्यक कागदपत्रे काळजी पूर्वक वाचा.
- नोंदणीकृत आधार नंबर एंटर करा आणि OTP पाठवलेल्या फोनची तपासणी करा.
- सत्यापना नंतर तुमचा आधार भूत तपशील प्रविष्ट करा आणि तुमचा ईमेल आणि फोन नंबर बरोबर असल्याची पडताळणी करा.
- तुम्ही आपोआप लॉग इन होणार. प्रत्येक वेळी लॉग इन करण्यासाठी समान ईमेल आयडी वापरण्याची आवश्यकता आहे. तुमची शैक्षणिक पात्रता प्रविष्ट करा आणि संबधित कागदपत्रे संलग्न करा.
- रिक्त जागा तुम्हाला दाखवल्या जातील. तुम्ही ते फिल्टर करू शकता आणि त्यासाठी अर्ज करू शकता.
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2025 : निवड प्रक्रिया
- सर्वात आधी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्ध्तीने शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज सदर करावा लागणार आहे. ऑनलाईन पद्ध्तीने अर्ज करण्याकरिता लिंक खाली दिली आहे तिच्या सहाय्याने तुम्ही मुख्यमंत्री योजना दूत पदाकरिता अर्ज करू शकता.
- ऑनलाईन पद्ध्तीने अर्ज स्वीकारणे सध्य स्थिती मध्ये चालू झालेले नाहीत तरी लवकरच अर्ज भरणे सुरुवात होईल.
- ऑनलाईन पद्ध्तीने अर्ज केल्या नंतर उमेदवारांच्या नोंदणीची आणि रिक्त अर्जांच्या चरणीचे प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महा संचालनालयात द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्था मार्फत ऑनलाईन पद्ध्तीने पूर्ण करण्यात येईल.
- उमेदवारांची नेमणूक आणि छाननी ही वरील दिलेल्या योजनेचा पात्रता निकषा वरून करण्यात येईल.
- ऑनलाईन पद्ध्तीने प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्या नंतर पात्र लाभार्थ्यांची यादी ही राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्या कडे पाठविण्यात येईल.
- त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला पर्तिनिधी यांचा समन्वयाने प्राप्त अर्जांची संबधित उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करतील.
- या पडताळणी मध्ये उमेदवारांची शैक्षणिक माहिती आणि वयोमर्यादे विषयक ओरिजनल कागदपत्रे तपासली जातील.
- आणि त्या नंतर पात्र उमेदवारांनी बरोबर सहा महिन्याचा करार केला जाईल तसेच हा क्र कोणत्याही कारणास्तव वाढविण्यात येणार नाही.
- पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी झाल्या नंतर जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार यांच्या मार्फत निवड यादी प्रकाशित केली जाईल.
- जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त म्हणजेच कौशल्य विकास रोजगार आणि जिल्हाधिकारी यांनी अधिकृत केलेला प्रतिनिधी हा त्यांचा समन्वयाने संबधित जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्राम पंचायत साठी १ आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी १ या प्रमाणामध्ये उमेदवारांना योजना दूत म्हणून रुजू कार्यील आणि त्यांना पाठविले जाईल.
टीप :- मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज ही शासकीय सेवा किंवा कामकाज म्हणून समजण्यात येणार नाही. सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यामध्ये कोणत्याही शासकीय सेवेत नियुक्तीचे मागणे अथवा हक्क सांगितला जाणार नाही. या बाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवारांकडून घेण्यात येणार आहे. आणि कार्यक्रमांतर्गत पुढे चालून उमेदवारांना शासकीय क्षेत्रामध्ये कोणतेही सवलत दिली जाणार नाही असे हमीपत्र नियुक्ती दरम्यान उमेदवारांकडून घेतले जाणार आहे.
Mukhyamantri Yojana Doot Bharti 2025 : विचारले जाणारे प्रश्न
१. मुख्यमंत्री योजना दूत यांना दरमहा किती रुपये मानधन दिले जाणार आहे ?
-मुख्यमंत्री योजना दूत यांना दरमहा १०,००० रुपये मानधन दिले जाणार आहे.
२.मुख्यमंत्री योजना दूत योजनेचा उद्देश काय आहे ?
-मुख्यमंत्री योजना दूत योजनेचा उद्देश शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, प्रसिद्धी करणे.
३. योजना दूत कार्यक्रम काय आहे ?
-योजना दूत हा महाराष्ट्र शासनाचा एक अनोखा उपक्रम आहे, ज्याच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करण्याची ओढ असलेले युवक योजना दूत म्हणून काम करतील आणि शासनाच्या कल्याणकारी कार्यक्रमांबाबत जनजागृतीचे काम करतील.
४. नोंदणी साठी तरुणांची किमान शैक्षणिक पात्रता किती आहे ?
-नोंदणी साठी, किमान शैक्षणिक पात्रता पदवीधर असणे.
- Mukhyamantri Yojana Doot Bharti 2025 | मुख्यमंत्री योजना दूत भरती २०२५ या योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत website ला भेट द्या.
- Maharashtra Berojgari Bhatta Yojana| महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना २०२५ या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा.
- Rajiv Gandhi Vidyarthi Apaghat Sanugrah Anudan Yojana| राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना २०२४ या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा.