Pocra Yojana Maharashtra 2024
Pocra Yojana Maharashtra 2024 | नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा योजना महाराष्ट्र २०२४ : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन तसेच जागतिक बँकेने कृषी क्षेत्रा करिता दीर्घ कालीन आणि शाश्वत उपाय म्हणून दुष्काळ निवारण आणि हवामान प्रतिरोधक धोरण विकसित करण्यासाठी बनवण्यात आलेली ही एक खूप महत्वाची आणि नाविन्यपूर्ण योजना शेतकऱ्यांसाठी ठरलेली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा योजना होय.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तांत्रिक तज्ञांच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य पद्ध्तीने वापर करण्यास शिकवणे हा या योजनेचा उद्देश आहे. जेणेकरून शेतकरी शेतीतून चांगल्या प्रतीचे उत्पादन करू शकतील व त्यांचे जीवनमान सुधारू शकतील.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या दुष्काळ ग्रस्त भागाला राज्य सरकार दुष्काळ मुक्त करेल. जेणेकरून शेतकरी शेती करू शकणार आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकेल आणि ते स्वताला आणि त्यांच्या कुटुबियांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवणार.
या योजनेचा लाभ राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील लघु व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. ही योजना राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांच्या लागवडीवर भर देईल आणि हवामानाच्या बदला मुळे होणाऱ्या अडचणींमध्ये शेतकऱ्यांना मदत होईल.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा या योजने मुळे शेतकऱ्याचा सामाजिक स्तर उंचावणार व त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल.महाराष्ट्र सरकारने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना २०२४ साठी ४००० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा या योजने अंतर्गत राज्यातील पाणी व माती यांच्या उपलब्धतेनुसार पिक लागवड करण्यावर भर देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यात येतील. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्ध्तीने अर्ज करावा लागेल तो कसा हे आपण ह्या लेखाच्या माध्यमातून पाहू.

Pocra Yojana Maharashtra 2024 : शेतकऱ्यांना मिळणारा लाभ
- शेतकऱ्यांना शेतीमध्ये लागणारे ठिबक सिंचन, तुषार सिंचन म्हणजेच स्प्रिंकलर, शेततळे, शेततळ्यामध्ये अस्तरी करण अशा अनेक प्रकरच्या उपक्रमांकरीता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान या पद्ध्तीने लाभ देण्यात येतो.
- अल्पभूधारक शेतकरी असतील तर त्यांना पाण्यासाठी विहिरीच्या योजनेचा समावेश आहे.
- शेतकऱ्यांनी जर विहीर आणि शेतामध्ये शेततळे घेतलेले असेल तर तर अशा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विहिरी पासून शेततळ्या मध्ये पाणी पोहचवण्यासाठी पाईप लाईन ही पण योजना या प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्यांसाठी सुरु केली आहे.
- या योजने अंतर्गत हवामान प्रतिरोधक बियाणे उत्पादन समाविष्ट आहे.
- पॉलि हाऊस, पॉलि बोगदे यांच्या सारख्या संरक्षित लागवड तत्रां साठी आर्थिक सहाय्य उपलब्ध आहे.
- शेतकऱ्यांनी शेतीतून उत्पादन काढल्यानंतर साठवणुकीची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे बाजार भाव कमी असतानाही शेतकऱ्यांना त्यांचे पीक विकावे लागते. त्यासाठी पण या योजने अंतर्गत गोडाऊनची सुविधा देखील शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.
- शेतकरी उत्पादक संस्था किंवा कंपनीत आणि बचत गटांकरिता या योजनेअंतर्गत विशेष अर्थसहाय्य दिले आहे.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा लाभ हा त्यांच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या मार्फत देण्यात येतो.
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा या योजनेअंतर्गत महिला, अपंग व्यक्ती व भूमिहीन मजुरांना विशेष अधिकार देण्यात आलेला आहे.
Pocra Yojana Maharashtra 2024 : हायलाईट
योजनेचे नाव | नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र सरकार |
विभाग | महाराष्ट्र शासन कृषी विभाग |
लाभार्थी | महाराष्ट्रातील शेतकरी |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://dbt.mahapocra.gov.in/ |
Pocra Yojana Maharashtra 2024 : आवश्यक कागदपत्रे
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेले कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- जमिनीचा तपशील ७/१२ उतारा, ८ अ
- आधार कार्ड
- जातीचा दाखला ( ST आणि SC या प्रवर्गातील अर्जदाराकरिता आवश्यक आहे.)
- भूमिहीन प्रमाणपत्र ( भूमिहीन शेतकरी आणि मजुरांकरिता )
- घटस्फोटीत महिलांकरिता घटस्फोट प्रमाणपत्र
- राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक
- विधवा महिलांकरिता पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
Pocra Yojana Maharashtra 2024 : अंमलबजावणी
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा या योजने अंतर्गत राज्यातील सर्व सुखी भागात महाराष्ट्र सरकार चौकशी करणार आहेत. या तपासणी नंतर सर्व महत्वपूर्ण डेटा गोळा करण्यात येणार. या नंतर शेतकऱ्यांना राज्यातील पाणी व हवेनुसार शेती करण्याचा सल्ला देण्यात येईल.या योजने अंतर्गत लागवड केलेल्या जमिनीच्या मातीचीही चाचणी करण्यात येणार आहे. ज्यामध्ये खनिजांची कमतरता आणि बॉक्टेरीयाची कमतरता पूर्ण होईल.
शेती करणे शक्य होणार नाही अशा सर्व क्षेत्रात शेळीपालन युनिट स्थापन केल्या जाणार आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा स्रोत राहील. तलावांचे उत्खनन व मत्स्यपालनाचे उद्योग उभारले जातील. सिंचनाच्या पाण्याची कमतरता असलेल्या सर्व ठिकाणी ठिबक सिंचन लागू केली जाणार आहेत.
Pocra Yojana Maharashtra 2024 : राबवल्या जाणाऱ्या विविध योजना
- शेततळे/ सामुदायिक शेततळे योजना
- नवीन विहीर/ विहीर पुनर्भरण योजना
- मधमाशी पालन योजना
- सेंद्रिय शेती विषयक योजना
- पिकासाठी ठिबक व तुषार सिंचन योजना
- पाणी उपसा सिंचन साधने व पाईप योजना
- फळबाग लागवड योजना
- रेशीम/ काषोउद्योग योजना
- बंदिस्त शेळीपालन योजना
- भाडेतत्वावर कृषी अवजारे/ यंत्रांची निर्मिती योजना
- परिसरातील कुक्कुटपालन योजना
Pocra Yojana Maharashtra 2024 : पात्रता
- अर्जदार हा शेतकरी असला पाहिजे तसेच महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्ज करत असणारा शेतकरी याची जमीन शेती करण्यासाठी वापरात असणे गरजेचे आहे. ह्याच शेतकऱ्यांना पोकरा योजनेचा लाभ देण्यात येतो.
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा या योजने अंतर्गत ५ हेक्टर पेक्षा जास्त जमीन असलेले शेतकरी या योजनेसाठी अपात्र असतील.
Pocra Yojana Maharashtra 2024 : उद्दिष्टे
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा या योजने मुळे दुष्काळ ग्रस्त भाग हा दुष्काळ मुक्त होणार.
- या योजने मुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावणार.
- मातीचे आरोग्य वाढवणे हे या योजनेचे उदिष्ट आहे.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
- सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे हे या योजनेचे उदिष्ट आहे.
- या योजनेमुळे कृषी उत्पादकता वाढणार.
- या योजनेचे उदिष्ट म्हणजे दुष्काळी भागातील सुपीक शेत जमिनीत रुपांतर करणे हे आहे.
Pocra Yojana Maharashtra 2024 : समाविष्ट असणारे जिल्हे
- अकोला, जळगाव, वाशीम, बुलढाणा, वर्धा,हिंगोली, नांदेड, यवतमाळ,परभणी,लातूर, बीड, अमरावती,जालना, उस्मानाबाद तसेच १५५ ते १५६ तालुक्यांचा व साधारणता ३७५५ इतक्या ग्रामपंचायतीचा या योजने मध्ये समावेश आहे.
वरती दिल्या प्रमाणे जिल्हे व तालुक्यांचा समावेश नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा या योजने मध्ये समाविष्ट आहेत.
Pocra Yojana Maharashtra 2024 : या योजनेमधील समाविष्ट घटक
- हवामान अनुकूल कृषी पद्धती यामध्ये शंभर टक्के अनुदान देण्यात येते.
- हवामान अनुकूल कृषी परिस्थिति प्रोत्साहनअनुदान देणे. यामध्ये शंभर टक्के अनुदान दिले जाते.
- जमिनीमध्ये कर्ब ग्रहणाचे प्रमाण वाढविणे यामध्ये शंभर टक्के अनुदान देण्यात येते.
- सूक्ष्म सिंचन यामध्ये ५०% अनुदान देण्यात येते.
- एकात्मिक शेती पद्धती यामध्ये ५०% अनुदान देण्यात येते.
- जमीन आरोग्य सुधारणे यामध्ये ५०% अनुदान देण्यात येते.
- क्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन( खारपाणीग्रस्त गावे) संरक्षक शेती यामध्ये १००% व काही ठिकाणी ५०% अनुदान दिले जाते.
- पाणी साठवण संरचनांची निर्मिती यामध्ये १०० % व काही ठिकाणी ५०% अनुदान देण्यात येते.
- शेतमाल वृद्धी साठी हवामान अनुकूल उद्यानमुख मूल्य साखळ्यांचे बळकटीकरणासाठी ५०% अनुदान देण्यात येते.
- हवामान अनुकूल बियाणे वितरण प्रणाली कार्यक्षमता वृद्धी मध्ये ५०% अनुदान देण्यात येते.बियाणे हबसाठी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी ५०% अनुदान देण्यात येते.
- काढणीपक्षात व्यवस्थापन व हवामान अनुकूल मूल्य साखळी प्रोत्साहन यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देणे. यामध्ये ही शेतकरी गटासाठी १००% अनुदान देण्यात येते. व भाडेतत्वावर कृषी अवजार केंद्र सुविधा निर्मिती यासाठी ५०% अनुदान देण्यात येते.
- पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर करण्यासाठी ५०% अनुदान देण्यात येते.
Pocra Yojana Maharashtra 2024 : गाव निवडीचे निकष
- निवड पेरणी क्षेत्राचे एकूण भौगोलिक क्षेत्राचे प्रमाण
- हवामान विषयक अनुमान
- दुष्काळाची वारंवारता
- भूजल स्थिती
- विना लागवड योग्य जमिनीची एकूण क्षेत्राचे प्रमाण
- दरमहा ५ हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण
- अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांचे एकूण शेतकऱ्यांचे प्रमाण
- शेतकरी आत्महत्या
- गावाचे पशुधन निर्देशांक
- शेतमजुरांचे एकूण मजुरांशी प्रमाण
- अनुसूचित जाती व जमातीचे एकूण लोकसंख्येची प्रमाण
Pocra Yojana Maharashtra 2024 : अर्ज प्रक्रिया
-नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा या योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्ध्तीने करावा लागेल.
-नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना २०२४ या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे इच्छुक लाभार्थी POCRA च्या अंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
-नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
-वेबसाईट वर गेल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार.
-त्यामध्ये तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना एप्लिकेशन फॉर्म पीडीएफ डाउनलोड करून घ्यावे लागेल.
-अर्ज डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती जसे कि तुमचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता ,जिल्हा इ. संपूर्ण माहिती अचूक पद्ध्तीने भरावी लागेल.
-सर्व माहिती भरून झाल्यावर आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड करावी.
-त्यानंतर अर्जाच्या खाली देण्यात आलेल्या पत्त्यावर अर्जदाराला त्याचा अर्ज जमा करावा लागेल.
-अशा पद्ध्तीने तुम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजनेचा लाभ घेऊ शकता.
Pocra Yojana Maharashtra 2024 : सतत विचारले जाणारे प्रश्न
१. योजनेचे नाव काय आहे ?
-Pocra Yojana Maharashtra 2024 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना महाराष्ट्र हे या योजनेचे नाव आहे.
२. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना महाराष्ट्र ही योजना कोणी सुरु केली आहे ?
-ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे.
३. या योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र असतील ?
-या योजनेसाठी महाराष्ट्रातील शेतकरी पात्र असणार.
४. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजनेचा अर्ज कसा करावा ?
-नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्ध्तीने करावा लागेल.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा या योजनेच्या अधिकृत website ला भेट द्या.
Ration Card New Update 2024|राशन कार्ड नवीन माहिती २०२४ साठी आमच्या website ला भेट द्या .
RTE Private School Admission Open|आरटीई द्वारे खाजगी शाळेत २५ % पुन्हा ऍडमिशन सुरु २०२५-२६ माहिती जाणून घेण्यसाठी येते click करा .
EPFO NEW UPDATE 2024 |पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्ड द्वारे काढता येणार याची माहिती जाणून घेण्यासाठी येथे click करा.
आता शेतकऱ्यांना मिळणार मुख्यमंत्री सोलर पंप २०२४ योजने ची माहिती जाणून घेण्येयसाठी येथे click करा